मायबोलीवूडचा नवा सुपर्रस्टार - फा फे अमेय वाघ ट्टॉक् !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2017 - 04:03

मला अमेय वाघ तसा फारसा आवडत नव्हता. आजवर जे काही त्याला छोट्या मोठ्या पडद्यावर थोडेथोडके पाहिले त्यात त्याचे कैवल्य हे एकच कॅरेक्टर आवडले होते. पण त्यावरून मला अमेय वाघ आवडतो हा दावा मी कधीच केला नव्हता. पण आज तो पुन्हा एका नवीन रुपात आवडला. त्याच्या आधीच्या आवडलेल्या भुमिकेपेक्षा अगदीच वेगळ्या भुमिकेत. आणि अफाट आवडला.

मुळात हा चित्रपट माझ्यासाठी एक आश्चर्याचा धक्का होता. मराठीमध्ये या जॉनरचा चित्रपट एवढा सही बनू शकतो हेच पहिल्यांदा खूप भारी वाटले.
यात दिलीप प्रभावळकरांसारखा दिग्गज अभिनेता आहे. छोट्या छोट्या तुकड्यांतून पुर्ण चित्रपट खाऊन टाकणारा गिरीश कुलकर्णी आहे. पण तरीही चित्रपट अमेयमय झाला आहे. तो पुर्ण चित्रपटभर पसरला आहे. ईतका की तो पडद्यावर न दिसणारा सीन आठवणे अवघड जावे, अर्थातच त्याचाच तर आहे फाफे, पण तरीही कुठेच त्याचा ओवरडोस झाल्याचे वाटत नाही. ड्रायफ्रूटस आपल्या कितीही आवडीचे असले तरी आईसक्रीम खाताना जर दर दुसरया घासाला तोंडात येऊ लागले तर कचकचू लागतात, पण अमेय मात्र आईसक्रीमच्या फ्लेवरसारखा यात मिसळलाय.

येस्स, या फाफेच्या जमलेल्या आईसक्रीममध्ये पटकथा हे दूध असेल, वेगवान मांडणी हे साखर असेल, गिरीश कुलकर्णी हे ड्रायफ्रूटस असतील, तर या आईसक्रीमला फ्लेवर देणारा अमेय वाघ आहे. आईसक्रीम जसे त्याच्या फ्लेवरवरून ओळखले जाते तसे यापुढे जगाच्या अंतापर्यंत फास्टर फेणे हा अमेय वाघ म्हणून ओळखला जाईल.
आणि अमेय वाघ हा देखील फास्टर फेणे म्हणूनच ओळखला जावा यासाठी मी रितेश देशमुखला मनापासून विनंती करतो की भावा, येऊ दे या चित्रपटाचे दोन चार सिक्वेल.

आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणारया या मराठी चित्रपटसृष्टीने दुनियादारीच्या निमित्ताने व्यावसायिक यश चाखले. सैराटने त्याला वेगळ्या ऊंचीवर नेत सोबत आपला क्लासही जोडला. पण एक नटसम्राटचा अपवाद वगळता सैराटनंतर पुढे काय हा प्रश्न सर्वांसारखाच मलाही पडलेला. कारण मराठी चित्रपट सृष्टीला तगवायला दर्जेदार बॉक्स ऑफिस हिट चित्रपटांची अधूनमधून गरज होतीच. त्यात मध्यंतरी रितेशच्या लय भारी सारख्या लयंच बंडल चित्रपटाला मिळालेले व्यावसायिक यश मला घाबरवून गेलेले की आता अश्या टिपिकल टुक्कार सौथेंडियन आणि सलमानछाप चित्रपटांची लाट मराठीतही येते की काय.. पण या भितीला आणि वरच्या प्रश्नाला उत्तर द्यायलाच जणू आलाय अमेय वाघ आणि त्याचा फास्टर फेणे !

एक किरकोळ शरीरयष्टीचा, पोरसवदा नायक. जो तुमच्या आमच्यातीलच वाटतो. फक्त जरासा चपळ, थोडासा स्मार्ट. सोबत आहे प्रामाणिकपणातून येणारा बावळटपणा, जो येणारया संकटांचा सामना करायची हिंमत देतो.. अशी व्यक्तीरेखा पडद्यावर जिवंत करणारया आणि तिने दिलेल्या लढ्याला तितकेच विश्वसनीय बनवणारया फास्टर अमेय फेणेला नक्की बघा आणि थिएटरातच बघा... जर चुकवलात, तर चुकाल! आणि एका मस्त चित्रपटाला मुकाल .. ट्टॉक् !

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोट्या छोट्या तुकड्यांतून पुर्ण चित्रपट खाऊन टाकणारा गिरीश कुलकर्णी आहे. पण तरीही चित्रपट अमेयमय झाला आहे.

बास हा बास!!
गिकु कच्चा खातो कित्येक सिन्समधेय अवाला. बिचारा बावचळून गेल्यासारखा वाटतो. निष्प्रभ पूर्णपणे.

मला अमेय वाघ तसा फारसा आवडत नव्हता. आजवर जे काही त्याला छोट्या मोठ्या पडद्यावर थोडेथोडके पाहिले त्यात त्याचे कैवल्य हे एकच कॅरेक्टर आवडले होते. पण त्यावरून मला अमेय वाघ आवडतो हा दावा मी कधीच केला नव्हता.>>https://www.maayboli.com/node/53692?page=8

बिचारा बावचळून गेल्यासारखा वाटतो. निष्प्रभ पूर्णपणे.
>>>>>

कमॉन.. तो तसा अभिनय करणे भुमिकेची गरज होती. त्याने सिंघमस्टाईल प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते का Happy
शेवटी त्याने अप्पाचा केलेला पराभव आणि अप्पाची हतबलता विश्वसनीय वाटते यातच अमेयच्या अभिनयाचे आणि पटकथेचे यश आहे.

बाकी त्याला गिरीश कुलकर्णी यांच्या अभिनयाला टक्कर द्यायचीच नव्हती. तितकी त्याची ऊंची नाहीयेच मुळात. मात्र त्यांच्या करिशम्याला त्याने टक्कर दिलीय. ट्रेलर पाहून मला वाटलेले की खरेच कच्चा खाल्ला असेल पण चित्रपट पाहताना ती जुगलबंदी परस्परपूरक वाटते.

अमा काय लिहिलेय तिथे?
वर्षा आपण का हसलात?
त्या कैवल्य फॅन क्लबच्या अनुषंगाने तर मी पहिला पॅरा लिहिलाय.
त्या धाग्यावरचे प्रतिसादातही मी लिहिलेय की मी अमेयचा नाही तर त्याच्या कैवल्य या कॅरेक्टरचा फॅन आहे.
मला वाटते हेच सिमिलर रीयाने सुद्धा लिहिले होते.
आता मात्र एकाच व्यक्तीचे दोन रोल आवडल्याने मला अमेय आवडू लागला असे बोलू शकतो.
आता त्याचा मोरंबाही एकदा चाखून बघायला हवा. तो नाही तर आपली मिथिला पारकर आहेच Happy

तो धागा मी वाचला नाहीये अन वाचणार पण नाही, पण अमाचा प्रतिसाद , ती लिंक पाहुन आले मला हसु अन हसले मी

यापेक्षा जास्त लिहायची गरज वाटत नाही.

तो धागा मी वाचला नाहीये अन वाचणार पण नाही,
>>>>
जर तो धागा पुर्ण वाचला तर अमा आणि आपला गैरसमज दूर झाला असता. पण जर एखादा गैरसमज कोणाला हसवत असेल तर तो तसाच राहू द्यावा Happy

बाकी तो धागा कोणी वाचा वा वाचू नका, पण फाफे सर्वांनी बघा आणि अमेयची अदाकारी चुकवू नका. हाच या धाग्याचा हेतू आहे Happy

अमेय चा तो डायलाॉग सही आहे गिरीश कुलकर्णी म्हणतो तुला भीती नाही वाटत ...अमेय म्हणतो...तुला विचारावं लागत म्हणजे बघ ना ....किती सहज बोलतो..म्हणून पिक्चर बघणार..रविवारी ...तोपर्यंत ...ट्टौककक..

नटसम्राटचा अपवाद वगळता >> का "कट्यार " चालला की आणि खूप चांगला पण होता .
चित्रपट बघायला पाहिजे . सगळी कडे परीक्षण चांगलं आलाय Happy

सिद्धार्थ जाधव चा छोटा रोल पण जबरा आहे. >>> त्याचे आणि भु-भु चे संवाद मस्त आहेत. संशयिताची ओळख परेड वाला सीन मस्त जमलाय .
बेक्कार हसलो तो सीन बघताना .

संशयिताची ओळख परेड वाला सीन मस्त जमलाय .
>>>
हा हा... हो. उलटा खुर्ची वाला. एकूण विनोदाची शैली छान आहे. हलकीफुलकी.
भूभू मलाही आवडला. त्याला कुठे आगाऊ केले नाहीये. सिद्धार्थ जाधवला फार आचरट केले नाहीये. फाफेचा लवएंगल दाखवला नाहीये. चित्रपटाच्या वेगासोबत त्याचा पोतही सांभाळलाय.

सुजा, हो. कट्यार विसरलो. माझा बघायचा राहिल्याने लक्षात आला नाही.

<नटसम्राटचा अपवाद वगळता सैराटनंतर पुढे काय हा >

नंतर हे कालानुक्रमाबद्दल असेल, तर नटसम्राट सैराटच्या आधी आला. आणि कट्यार त्याही आधी.
(गुणवत्ता, लोकप्रियता यांबद्दल नको बोलूया Wink )

भरत ओके, असेल.
मी स्वत: नटसम्राट फार उशीरा पाहिलेला. बहुधा सैराटच्या नंतर पाहिला असावा, आठवत नाही. तसेच ककाघु पाहिलाच नाहीये अजून. त्यामुळे माझी विचारसाखळी तशी उलटसुलट झाली असावी.

मात्र अश्या जातकुळीचा ईतका सफाईदार चित्रपट मराठीत झाला नव्हता. मराठीच काय हिंदीही पटकन आठवत नाही. एक उदाहरण द्यायचे झाल्यास, फॅन चित्रपटाची स्टोरी जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा त्याकडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या फाफे ने पुर्ण केल्या.

सिरीअसली, आज मी चित्रपट बघितल्यावर दिवसभर लहानपणी जे काही फाफे वाचलेय ते आठवत होतो आणि मला अमेय वाघच फाफेच्या रुपात दिसत होता Happy

<कमॉन.. तो तसा अभिनय करणे भुमिकेची गरज होती. त्याने सिंघमस्टाईल प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते का>
फास्टर फेणे हे कॅरेक्टर म्हणून नव्हे अभिनेता म्हणून.

एका चित्रपटानंतर लगेचच नविन सुपरस्टार कसा ????
>>>>>
का नाही ????
जर ऋत्विक रोशन त्याच्या वडिलांनीच काढलेल्या चित्रपटानंतर लगेच बॉलीवूडला नवीन सुपर्रस्टार मिळाल्याच्या नादात मिरवतो,
तर एक मराठी वाघ स्वतःच्या हिंमतीने मिळवलेल्या चित्रपटाच्या अफाट यशानंतर का मायबोलीवूडचा नवा सुपर्रस्टार म्हणून मिरवला जाऊ शकत नाही????

फास्टर फेणे हे कॅरेक्टर म्हणून नव्हे अभिनेता म्हणून.
>>>>
तेच तर, त्याने जे गिकु यांच्या पर्सनॅलिटीसमोर दबल्यासारखे दाखवले तो अभिनयच होता, तीच त्याच्या भुमिकेची गरज होती.
त्यातला एक सीन बघा, ज्यात पोलिसस्टेशनच्या बाहेर त्याला आप्पा भेटतो आणि त्याच्या आईवडीलांचा उल्लेख करत त्याला अप्रत्यक्ष धमकी देतो.. तेव्हा हलकेच अमेय वाघच्या डोळ्यात जे पाणी तरळते, पण ओघळत नाही, जे कासावीस झाल्याचे भाव त्याने चेहर्‍यावर आणलेत, ते निव्वळ अप्रतिम ! ..
पण जसा चित्रपट पुढे सरकतो तसे हळूहळू तो या सामान्य माणसांना गुंडांच्या वाटणार्‍या भितीवर, हिंमतीच्या चढत्या आलेखानुसार मात करतो त्या आलेखाला त्याने प्रत्येक प्रसंगानुरुप खुलवले आहे.. ते सारे प्रसंग एकेक करत ईथे लिहिले तर स्पॉयलर होईल.. पण एक लेख मी त्या वाढत्या हिंमतीच्या आलेखावर लिहू शकतो ईतकी त्यात मटेरीअल आहे.

एका चित्रपटानंतर लगेचच नविन सुपरस्टार कसा ????
>>> अहो मायबोलीवूड चा हो.. तिथे फक्त रूनमेश देसाईड करतो सुपेरस्टार्स, एके काळी स्वजो होता, आता टायगर आहे.

प्लिज स्वजो 'होता' हे कन्फ्र्म करणार का? म्हणजे टायगरला अजुन काही दिवस सहन करायची शक्ती येईल मायबोलीकरांना...

टायगर बोलू नका. उगाच टायगर श्रॉफ आठवतो ..

कोण सुपर्रस्टार याचा मागे पोल काढलेला खरे तर..
त्यात स्वप्निल जोशी जिण्कलेला बहुतेक..
शोधतो रात्री तो धागा..
त्यात आता अमेय वाघ हा पर्याय एड करायला हवा..

म्हणजे टायगरला अजुन काही दिवस सहन करायची शक्ती येईल .टायगर बोलू नका. उगाच टायगर श्रॉफ आठवतो ..>>> कोण हा टायगर? मराठीत नवीन हिरो आलाय का?

अजब, कैवल्य बनून दिदोदु मधून त्याने छोटा पडदा खाल्ला. आणि आता फाफे मधून मोठा पडदा.
बाकी टॅलेंट दिसायला वेळ लागत नाही. आणि तसेही कॉम्पिटीशनला मराठीत आहे कोण Happy

कोण हा टायगर? मराठीत नवीन हिरो आलाय का?
>>>>
आपल्या अमेय वाघलाच टायगर म्हटले जात आहे Happy
तसेही भारतात कमीच उरलेत, एक आपल्याकडे आहे याचा तेवढाच अभिमान

Pages