बिग बॉस - ९

Submitted by स्वरुप on 13 November, 2015 - 09:05

मी हा शो गेले काही सीझन बघतोय.... सुरुवातीला मला फारसा न आवडलेला हा शो हळूहळू आवडायला लागला.... गेल्या काही सीझनमधली प्रीतम, कामया, गोहर, मेहक असे काही लोक इम्प्रेस करुन गेले
मी सलमानचा अजिबात चाहता नाहीये पण या शो चा ॲंकर म्हणून त्याने कमाल काम केलय... इतके कमाल की त्याच्या जागी दुसर्या कुणाला इमॅजिनही करता येउ नये
मला या शोचा फॉरमॅट फार आवडतो.... दिवसादिवसाला समीकरणे बदलतात... ग्रुप्सचे डायनॅमिक्स बदलतात.... लोकांचे अनेक नमुने बघायला मिळतात.... काही प्रचंड आवडतात तर काहींचा भयानक तिरस्कार वाटतो अन काहींकाही कमालीचे बोअर वाटतात
आता यातला किती भाग खरा असतो आणि किती स्क्रिप्टेड असते... मला खरच माहिती नाही.... पण पूर्णपणे स्क्रीप्टेड सिरीअल्सपेक्षा मला अश्या शो मध्ये जास्त नाट्य आढळते.
इथे किती लोक हा शो बघतात ते माहित नाही... बहुतेक फारसे नसावेत कारण कुठल्या धाग्यांवर याबद्दल फारसे वाचनात आले नाही
पण त्यातुनही बघत असेलच कुणी तर त्याबद्दल इथे चर्चा करायला मजा येइल

चला लोकहो.... बिग बॉसच्या पंख्यांचे या धाग्यावर स्वागत आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना.... कसली मसाला सिच्युएशन दिली होती बिग बॉसनी.... या लोकांनी त्याची वाट लावली
मंदना काहीही बरळत होती.... एकच वाक्य चार चारदा!
रोशेलला पण नीट सांगता नाही आले की तिने असे का केले.... नुसतेच वोह टास्क था... वोह टास्क था... एव्हढच बोलत राहिली... आत इतके करुनही मंदनाचा विश्वास नाही बसत तर चल फुट्ट म्हणायचे ना!

पण मंदनाला सिक्रेट रूम मध्ये ठेवल्यावर तिच्याबद्दल वाईट साईट बोलून तिला राग आणायचा हा खरंच टास्क होता का? Uhoh की रोशेल स्वता:ची कातडी वाचवते आहे?
आणि जर टास्कच होता तर इतर जण काही का बोलले नाहीत तिच्याविषयी? फक्त हे दोघंच का?

टास्क नव्हते ते actually.... बिग बॉस ने सांगितलेले की मंदना ज्याना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करेल ते उलट सेफ होतील... आता मंदना कुणाला नॉमिनेट करेल तर जे तिच्याबद्दल बिचींग करतील त्यांना.... आता बाकीच्याकडून ते अपेक्षित होते मंदनाला पण रोशेलकडून नव्हते.... म्हणून तिच्यावर राग Angry

कालचा भाग पण इक्वल टू बोअर. Sad
तो रिषभ किती गुंड आहे. तिखट टाकत होता चेहर्‍यावर रोशेल आणि प्रिन्सच्या. Uhoh
ऑफिसचा कॉल सुरू असल्याने बराचसा भाग म्यूट करून पाहिला, त्यात तो एक अंगावर शाल घेतलेला माणूस आला ज्याने प्रिन्सच्या भांड्यातलं गुलाबी पाणी उडवून कमी केलं तो कोण होता ते कळलं नाही.

कोण आहे ती प्रिया Angry
काय अवतार. अरारा! Sad
आणि आग लावत फिरतेय. प्रिन्स, किश्वर आणि सुयशला फोडणार ही बहुतेक.

आणि रिमी कसली माठ आहे रागच आला मला काल तिचा. मेकप शिवाय मरते का ही? Uhoh

नुसते चांगले वागून उपयोग नाही या शोमध्ये.... एक तो प्रीतमच चांगल वागून टिकला होता मागच्या सीझनमध्ये!

ती प्रिया अवतार आहे पण तो गृप फोडणारे कुणीतरी यायलाच पाहिजे होते आत्ता घरात.... त्या माठ दिग्गी, रिमी आणि येडछाप सौरभ ला हे काही केल्या झेपले नसते

ऑनलाईन आहेत का कुठे या सिजनचे भाग ?

मी बिग बॉसचे २ ते ८ सर्व सिझन पाहिले आहेत. माझा आवडता शो आणि नवर्‍याला अजिबात आवडत नाही. या आधी माझ्यासमोर त्याची डाळ काही शिजली नाही पण यावेळेस लेकही त्याला सामिल झाली आहे त्यामुळे गनिमांची संख्या वाढुन २ विरुद्ध १ असा सामना होता अर्थात majority wins त्यामुळे सुरवातीचे २-३ एपिसोड सोडले तर यावेळेस घरुन बघताच नाही येत त्यामुळे मोबाईलवर ऑनलाईन बघु म्हंटल पण यु ट्युबवर अजुन याचे संपुर्ण भाग आलेच नाहीत. दुसरा काही सोर्स आहे का जिथुन मी पहिल्या भागापासुन आतापर्यंतचे सर्व भाग बघु शकेल?

रिपिट कधी असतं? Uhoh मला तर कित्येक सिझन ही बिग बॉस भानगड काय आहे तेच कळायचं नाही Proud म्हटलं हे लोक राहतात तर आपण त्यांचं खाणं पिणं काय पहायचं?
मग तो एक गे होता गेल्याच्या गेल्या सिझन मध्ये तो प्रचंड भांडकुदळ होता. उर्वशी जिंकली तो सिझन बहुतेक. तेव्हा पासून निट बारकाईने पाहिल्यावर आवडायला लागला प्रॉग्रॅम.
मागचा सिझन तर अगदी आवडीने पाहिला. गौतम जिंकला ते फार आवडलं होतं मला Happy Blush

या वेळी प्रिन्स जिंकावा Blush

निल्सन - just download colour app from Playstore, you will get all episode & the updates also

मीहि शनिवार रविवारी बघते. केवळ सलमानसाठी. आत्ता थोडे मजा येतेय कालपासून

आज कळेल,
कालचा एपिसोड कहर होता, रिमीच्या गळ्यात घन्टा अडकवल्या,किती तो अपमान पण तीही कसली बावळट आहे, हे सगळ आपल्याला अपमानित करण्यासाठी केल जातय हेही कळत नव्हत तील,सलमान इतक्या वेळा हिन्ट देवुनही यडपट सारखी उत्तर देतय, काल बीग बॉस ने मेन डोअर ओपन करुन्ही गेली नाही कारण दर एपिसोडला मिळणारा एझी मनि...आय मिन वरचा मजला हरव्लाय का हिचा??

ओह, काल कोणी गेलंच नाही का? प्रोमोज मधे सारखं दाखवत होते कि दरवाजा उघडा राहील, ज्यांना जायचं ते जावु शकतात. मला वाटलं होतं रिमी जाईल, कारण ती फारच disinterested आहे.

हम्म्म.... म्हणुनच मी म्हणते बिग बॉस एंटरटेनमेंट आहेच पण त्याहीपेक्षा जास्त एकेक भाग हा एकेक सॉयकॉलॉजीचा धडा आहे. ज्यांना मानवी मन आणि मानवी मनाची गुंतागुंत शिकायला आवडते त्यांना एकेका भागामधे ५-७ केसेस अभ्यास करायला मिळतील.

रिमी अ‍ॅक्ट्रेस म्हणून आवडत नव्हतीच कधी आता माणूस म्हणून पण पुर्ण माठ असल्याची खात्रीच पटली आहे. तिची अवस्था एका गडगडत जाणार्‍या चेंडूसारखी वाटते मला. तिला आयुष्यात काय हवं आहे हे तिचं तिला तरी माहित आहे की नाही देव जाणे.

तिला लाईफ मध्ये काहीच लक्ष्य नाहीये. ती एका एपिसोड म्हणाली होती कि ती दिवसभर अशीच घरात निरुद्देश बसुन राहाते

Pages