बिग बॉस - ९

Submitted by स्वरुप on 13 November, 2015 - 09:05

मी हा शो गेले काही सीझन बघतोय.... सुरुवातीला मला फारसा न आवडलेला हा शो हळूहळू आवडायला लागला.... गेल्या काही सीझनमधली प्रीतम, कामया, गोहर, मेहक असे काही लोक इम्प्रेस करुन गेले
मी सलमानचा अजिबात चाहता नाहीये पण या शो चा ॲंकर म्हणून त्याने कमाल काम केलय... इतके कमाल की त्याच्या जागी दुसर्या कुणाला इमॅजिनही करता येउ नये
मला या शोचा फॉरमॅट फार आवडतो.... दिवसादिवसाला समीकरणे बदलतात... ग्रुप्सचे डायनॅमिक्स बदलतात.... लोकांचे अनेक नमुने बघायला मिळतात.... काही प्रचंड आवडतात तर काहींचा भयानक तिरस्कार वाटतो अन काहींकाही कमालीचे बोअर वाटतात
आता यातला किती भाग खरा असतो आणि किती स्क्रिप्टेड असते... मला खरच माहिती नाही.... पण पूर्णपणे स्क्रीप्टेड सिरीअल्सपेक्षा मला अश्या शो मध्ये जास्त नाट्य आढळते.
इथे किती लोक हा शो बघतात ते माहित नाही... बहुतेक फारसे नसावेत कारण कुठल्या धाग्यांवर याबद्दल फारसे वाचनात आले नाही
पण त्यातुनही बघत असेलच कुणी तर त्याबद्दल इथे चर्चा करायला मजा येइल

चला लोकहो.... बिग बॉसच्या पंख्यांचे या धाग्यावर स्वागत आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळच स्क्रिप्टेड असते. अगदी कोण कधी रडेल कोण कधी काय करेल हे देखील. राहूल महाजन पळून गेलेला ते देखील ठरलेले होते म्हणतात. टीआरपी वाढवण्यासाठी असले उद्योग करतात नाहीतर यांच्या चेष्टा कोण बघणार ?

सक्रिय,
या लेव्हलपर्यंत स्क्रीप्टेड असेल असे वाटत नाही.... कुणाला काय सिच्युएशनमध्ये टाकायच इथपर्यंत ठीक आहे, पण त्यावर कोण कसा रिॲक्ट होइल हे स्क्रीप्टेड असेल अस वाटत नाही.... तुमच्याकडे काही ठोस माहिती आहे का?

हुडा,
सगळेच बदनाम नसतात

वेगवेगळे दहा बारा नमुने असतात त्यात एखाद- दोन असतात तसे... टीआरपी साठी Wink

हा सिझन मला तितकासा अपिल होत नाहिये त्यामुळे काही भाग बघुन मी सोडुन दिले, कधि मधे शनिवार-रविवार सलमानसाठी म्हनून बघते... मोस्ट अमॅझिन्ग होस्ट आहे तो.

मागचा सिझन भारी होता, त्यातही विकेन्डचे सगळे एपिसोड भारी होते..

हो ना!
हा सीझन अजुन तितकासा ग्रीप घेत नाहिये

किश्वर, सुयश आणि प्रिंसचा ग्रुप फारच स्ट्रॉंग झालाय.... तो फुटेल तेंव्हा मजा येइल Wink

मलाही हा सिझन फार आवडत नाहीये. मागचा सिझन ( p3G) आणि त्याच्या आधीचा ( तनिशा, अरमान, गौहर) मस्तं होता. श्वेता तिवारी, डॉली बिन्द्रा चाही खूप आवडला होता. पण या वेळेस मात्र चार आठवडे झाले आहेत पण फारच डल चाललंय.

मागच्या सिझनपासून नाही बघितलं. आधीचे बघितले. सलमान anchor म्हणून आवडतो इथे, एरवी विशेष आवडत नसला तरी.

मी शनिवार रविवारी बघते. केवळ सलमानसाठी. तो कस्ला अमेझिंगरीत्या होस्ट करतो.

स्क्रिप्टेड असलं तरी मनोरंजनात काहीच फरक पडत नाही. वर्षानुवर्षं चालणार्‍या दळिद्री मालिकांपेक्षा असला स्क्रिप्टेड शो परवडला.

मला पण बिगबॉस पहायला आवडतं. अगदी मी रोज नित्यनियमाने पहात नाही. वीकेन्डचे तर हमखास चुकतातच पहायचे.
यंदा बरंच बोर होतंय पाहताना. त्यातल्या त्यात किश्वर सुयश आणि प्रिन्स मस्त आहेत. दिगांगना आणि रिमी किती बोअर आहेत Uhoh

मिशेल आणि मंदना डोक्यात जातात. मिशेलचा आवाज कानात घुसतो आणि नॉर्मली जे सुरू असते त्यात तिचे तिसरेच काहीतरी सुरू असते.

किश्वर, सुयश आणि प्रिंसने गॅंगअप केल्यामुळे मला ते आवडेनासे झालेत याउलट एकट्या एकट्या खेळणार्या रोशेल, मंदना सॉफ्ट कॉर्नर घेउन जातात
रिमी सेन तर पार मनातन उतरली!

मोस्टली सगळ्या बाया मेंगळट असतात बिग बॉस मधल्या. ती रिमी सेन तर कणकेच्या गोळ्यासारखी बद्कन बसलेली असते. ना तिच्या चेहर्‍यावर कसले हावभाव ना हासू. ती दिगांगना पण तशीच. झरझर उठून काही करतील असं नाहीच. सगळ्या नुसत्या नाजूक पर्‍या.. Uhoh

मागच्या कुठल्या तरी सिझन मध्ये ती सोनाली राऊत होती, ती तर मेंगळटांची महाराणी होती. बोलणं सुद्धा लिथार्जिक होतं तिचं. त्यामानाने डॉली बिंद्रा, उर्वशी करिष्मा तन्ना, किश्वर सारखे पार्टिसिपंट्स मजा आणतात थोडी तरी.

मी तर फक्त आधीचे २-३ सीजन पहिले नंतर खूप ओवर वाटायला लागल मग बंदच केल पाहण. सल्लू मात्र आवडतो.

स्वरूप, ते अपेक्षित होतं
मागच्या वेळेला पण गोहर कुशल सोबत हेच केलेलं की
दर एपिसोडला हे असतंच असं वाटतंय मला

आधी मंदनाला घरसे बेघर केलं.
बाकीच्यांना वाटलं तिला हकलून दिलं आणि मग तिच्या खिलाफ हे लोक बोलायला लागले .
ती कन्फेशन रूम का कुठल्या तरी रूमात बसून सगळं ऐकत होती
आता ती परत येणारेय

रिमी खेळली नाही अजिबात कारण शी वॉज आस्क्ड टू डू दॅट

मंदनाला सिक्रेट रुममध्ये ठेवतील हा पक्का अंदाज होता... पण तिला तिथे ठेवलय हे घरातल्यांना सांगितले हा ट्वीस्ट होता!
आणि डबलगेम हा की मंदनाला दोघा जणांना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला जेणेकरुन ती शक्यतो सिक्रेट रुममध्ये असताना तिच्याबद्दल वाइट बोलणार्यांना नॉमिनेट करेल आणि त्याचवेळेला घरातल्यांना हे सांगून तिच्याविरुद्ध बोलायला उचकावणे की ती ज्या दोघांना नॉमिनेट करेल ते दोघे सेफ होतील!

कालचा भाग बर्‍यापैकी बोअर झाला Sad
मंदना सरळ सरळ खोटं बोलली रोशेल ला की किथ ला 'अपनोंकी जरूरत है' Uhoh
शिवाय रोशेल पण तिला किती उगिचच ओढून ताणून समजावून सांगत होती.
काल एकाच माणसाचं अमन शी टॉवेल वरून आणि प्रिन्स शी पराठ्यांवरून वाजलं तो कोण आहे? Uhoh
मला नाही आवडला.
रिमी आणि दिगांगना परत शिळ्या शेणाच्या गोळ्यासारख्याच भासल्या काल. Sad

Pages