बिग बॉस - ९

Submitted by स्वरुप on 13 November, 2015 - 09:05

मी हा शो गेले काही सीझन बघतोय.... सुरुवातीला मला फारसा न आवडलेला हा शो हळूहळू आवडायला लागला.... गेल्या काही सीझनमधली प्रीतम, कामया, गोहर, मेहक असे काही लोक इम्प्रेस करुन गेले
मी सलमानचा अजिबात चाहता नाहीये पण या शो चा ॲंकर म्हणून त्याने कमाल काम केलय... इतके कमाल की त्याच्या जागी दुसर्या कुणाला इमॅजिनही करता येउ नये
मला या शोचा फॉरमॅट फार आवडतो.... दिवसादिवसाला समीकरणे बदलतात... ग्रुप्सचे डायनॅमिक्स बदलतात.... लोकांचे अनेक नमुने बघायला मिळतात.... काही प्रचंड आवडतात तर काहींचा भयानक तिरस्कार वाटतो अन काहींकाही कमालीचे बोअर वाटतात
आता यातला किती भाग खरा असतो आणि किती स्क्रिप्टेड असते... मला खरच माहिती नाही.... पण पूर्णपणे स्क्रीप्टेड सिरीअल्सपेक्षा मला अश्या शो मध्ये जास्त नाट्य आढळते.
इथे किती लोक हा शो बघतात ते माहित नाही... बहुतेक फारसे नसावेत कारण कुठल्या धाग्यांवर याबद्दल फारसे वाचनात आले नाही
पण त्यातुनही बघत असेलच कुणी तर त्याबद्दल इथे चर्चा करायला मजा येइल

चला लोकहो.... बिग बॉसच्या पंख्यांचे या धाग्यावर स्वागत आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही काल पहिल्यांदा पाहिली त्या ढिंच्याक पुजाला, बापरे, कठीण आहे

हीना खान अन शिल्पाची रीअ‍ॅक्शन बघण्यासारखी होती

Pages