सिनेमा रिव्हीव्ह - सिक्रेट सुपरस्टार..

Submitted by अजय चव्हाण on 20 October, 2017 - 18:20

"नटसम्राट" ह्या चित्रपटानंतर पहिल्यांदाच ज्यावर काही लिहावं असा वाटणारा हा माझा दुसरा सिनेमा...

काही चित्रपट खरंच खुप भारावून टाकणारे असतात म्हणजे पाहून झाल्यानंतर आपल्या तोंडातून वाॅव, मस्त असे शब्दही निघत नाही किंवा टाळ्याही वाजवल्या जात नाहीत कारण अशा चित्रपटांची स्तुती कुठल्याच शब्दांनी किंवा टाळ्यांनी आपण करू शकत नाही ते इतके अप्रतिम असतात की,"अप्रतिम" हा शब्दही कमी पडतो कौतुक करायला..

"सिक्रेट सुपरस्टार" हा अशाच अजरामर ठरवला जाऊ शकणार्या पठडीतला सिनेमा आहे..सिनेमातल्या एका गाण्यात सिनेमातल्या नायिकेचं अंतरंग दाखवण्यात आलं आहे आणि हे सांगायला

"डर लगता है सपनोसे कर दे ना ये तबाह
डर लगता है अपनोसें दे दे ना ये दगा" ह्या दोन ओळी पुरेशा आहेत..

ह्या सिनेमाची कथा अगदी साधी,सरळ आणि सहजसुंदर आहे
ही कथा पाहताना किंवा जगताना (हो अक्षरक्ष: ही कथा जगतो आपण) कुठेही ती ऑफ ट्रॅक वाटत नाही ...सिनेमाची गोष्ट ही जगातल्या प्रत्येक त्या व्यक्तीची गोष्ट आहे जी स्वप्न पाहतात आणि ते साकार करायला धडपडतात किंबहुना प्रत्येकाचे संघर्ष वेगळे असतीलही पण जिद्द मात्र एक असते तर अशीच स्वप्न पाहणार्या व साकार करण्यासाठी धडपणार्या इंन्सियाची (झायरा वसिम) गोष्ट म्हणजे हा सिनेमा..

इंन्सिया एका साधारण मुस्लिम कुंटुंबात वाढलेली मुलगी दहावीत शिकतेय..तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून तिच्या अम्मीने गिटार घेऊन दिलं होतं आणि तेव्हापासून गिटार आणि गाणं हाच तिचा छंद आहे... खुप मोठी गायिका होऊन पुरस्कार घेण्याच तिचं एक स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नाला तिच्या अम्मीचा (मेहेर विज) काही मर्यादेपर्यंत पाठींबा आहे कारण तिचं स्वतःचच आयुष्यच काही मर्यांदापर्यंत बांधल गेल आहे..तिला स्वतःलाच मनासारखं जगण्याचा अधिकार तिच्या नवर्याने कधीच तिला दिला नाही...तिचा नवरा (राज अर्जुन) हा नवरा नसून हा एक अहंकारी पुरूष आहे ज्याला आपली बायको केवळ गुलाम वाटते...डाळीत मीठ कमी पडलं तर अख्खी थाळी भिरकवणारा, गिझर ऑफ करायला विसरली म्हणून हात तोडणारा अशा ह्या तिच्या नवर्याला आपल्या बायको-मुलीने केवळ आपल्या अटीनुसार आयुष्य जगावं असं वाटतं असतं पण इंन्सिया हतबल असली तरी जिद्दी आहे...

उंच झेप घेणार्या पक्षाला कितीही बांधून ठेवलं तरी तिथल्या तिथे भरारी घेण्याचा प्रयत्न तो करतोच तसंच इंन्सियाच मन देखिल स्वप्नाच्या अवकाशात लाखो भरारी जिथल्या तिथ घेतयं...
इंन्सियाच्या भाषेत सांगायच झालं तर

"हम सुबह उठते है इसिलिए ताकी कल के देखे हुए सपने पुरे कर सके और उसे जीए"

एकीकडे अम्मीचही तिला खुप वाईट वाटतयं..तिला तिच आयुष्य
सुकर करायचयं आणि त्याचबरोबर स्वतःच स्वप्न ही पुरं करायचं

तिला तिच्या अब्बा ला नकळता हे करायचं आहे म्हणून ती युट्युबवर नाव न सांगता "सिक्रेट सुपरस्टार" ह्या नावाने बुरखा घालून स्वतःच लिहलेलं ,स्वतःच गायलेले
, स्वतःच गाणं ती टाकते..अल्पावधीत ती खुप फेमस होते अर्थात सिक्रेट सुपरस्टार ह्या नावानेच..आणि ह्याच गाण्याच्या कमेंटमध्ये शक्ती कपूर ज्याला पुर्ण मिडीयाने "ठर्की" म्हणून प्रूफ केलयं तो तिच कौतुक करतो आणि आपला मोबाईल नंबरही देतो..

पुढे तिच स्वप्न पुर्ण होत का?? तिला ते पुर्ण करण्यासाठी काय काय दिव्य करावं लागतं...शक्ती कपूर तिची कशी मदत करतो..तिच सिक्रेट सुपरस्टार असणं अब्बाला कळत का?

हे सर्व सिनेमात पाहायला जास्त मजा येईल...

अभिनयाच्या बाबतीत सगळयांनीच कमाल केलीय पुरस्कार द्यायचा झाला तर कुणा एखाद्याला आपण निवडूच शकणार नाही...अगदी इंन्सीयाचा छोटा भाऊ झालेला कबीर असो व आजी झालेल्या फारूख..सगळ्याच वयोगटातल्या कलाकारांनी आपआपली व्यक्तीरेखा अगदी जिवंत साकारलीय..पण मला सर्वात जास्त राज अर्जुन ह्याचा अभिनय खुप भावला..
जी काही पती आणि पित्याची दहशत त्याने सिनेमात निर्माण केलीय त्याची ती दहशत आपण फिल करतो...कधी कधी आपल्याला पण त्याच्या वागण्याची भीती वाटते...मेहेर विज आणि झायरा यांच कौतुक जितकं कराव तितकं कमीच आहे ह्या दोघी खर्याखुर्याच मायलेकी वाटतात अगदी हे फक्त सिनेमात हे आपल्याला माहीत असलं तरीही...तीर्थ ने साकारलेला चिंतन नावाचा बेस्टफ्रेंड कम बाॅयफ्रेंड खुप गोंडस आणि त्याच्या वयापेक्षा मॅच्युअर वाटतो आणी मुख्य म्हणजे पुर्ण सिनेमात हा अभिनय करतोय हे कळतचं नाही...
आमीर खानने साकारलेला शक्ती कपूर बेस्टच..त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर बेबी ...झक्कास...आमिर खान ला उगीच कुणी परफेक्टनिस्च म्हणत नाही आणि शक्ती कपूर नावाचं जे कॅरेक्टर आहे ते त्याने इतकं जबरी साकारलाय की शक्ती कपूर मध्ये आपण आमिर शोधत राहतो पण तो मिळत नाही...

बाकी लेखक आणि दिग्ददर्शक म्हणून अद्वेत चंदन कुठेच नवखा वाटत नाही प्रत्येक गाणं प्रसंगानुसार योग्यप्रकारे करणं असो वा त्याचा कथेत उपयोग करणं असो ही बाब खरंच कौतुकास्पद आहे आणि काही प्रसंग इतके जिवंत लिहले आणि चित्रित केले आहेत की विचारायची सोय नाही स्पेशली राज अर्जुन जेव्हा थाळी भिरकवतो लिटरली खुरी खरी डाळं (वरणं) आणी आमटी जमीनीवर सांडताना आपण पाहू शकतो आणि तिच डाळ पुसताना इंन्सिया जेव्हा एका स्पर्धेचा कागद वापरते ज्यात तिला सहभाग घेण्याची परवानगी हवी असते तेव्हा कुठेतरी आपणही हतबल फील करतो... अनिल मेहतांच्या छायांकनाने सिनेमाला चार चांद लावले आहेत हे वेगळ सांगायलाच नको.

पात्रे -

आजी -फारूख झाफर
अम्मी - मेहेर विज
अब्बा - राज अर्जुन
इंन्सिया - झायरा वसिम
गुड्डु - कबिर शेख
चिंतन - तीर्थ
शक्ती कपूर - आमिर खान
पाहुणे कलाकार- मोनाली ठाकुर व शान.

का पाहावा:

स्वप्नांवर विश्वास ठेवण्यासाठी आणि ते साकार करण्याची धडपड, संघर्ष कळण्यासाठी व तेच स्वप्न सत्यात उतरल्यावर काय वाटत हे जाणण्यासाठी...

अचुक गोष्ट ,अचुक कलाकारांची निवड ,अचुक अभिनय आणि अचुक दिग्ददर्शन अनुभवण्यासाठी...

नामाकंन :*****

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोबाईल थोडा खराब झालाय...त्यामुळे काही शब्द लिहताना चुकाही झाल्या आहेत...सो त्यासाठी क्षमस्व..

अजय,
प्रत्येक वाक्याशी सहमत,
नक्की बघावा असा सुंदर चित्रपट,

मुलांना (वय 7 8 +) घेऊन जाण्यास हरकत नाही.
घरगुती हिंसा असली तरी डायरेक्ट दाखवली नाही आहे.
चित्रपटातील विषयाला धरून मुलांशी चाईल्ड marriage, स्त्रियांचे हक्क, या समानता याबाबत चांगली चर्चा होऊ शकते.

परीक्षणाचीच वाट बघत होतो. जायचा विचार आहे.
अजून कोणी पाहिला असेल तर प्लीज पटपट मते येऊ द्या. दिवाळीच्या सुट्टीचा फायदा उचलत सोमवारी जाता येईल Happy

आजच 'सिक्रेट सुपरस्टार' बघितला. अजय ने लिहिलेला प्रत्येक मुद्दा तंतोतंत खरा आहे. कथा साधी असली तरी एकूण बांधणी उत्तम झाली आहे. आमीर perfectionist असल्याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. इंन्सिया गिटार वाजवताना दाखवली आहे तेंव्हा प्रत्येक chord साठी लागणारी बोटांची रचना अचूक दाखवली आहे. एव्हढेच कशाला, गिटारवर capo म्हणून पेन्सिल चा वापर केलेला दाखवला आहे (जो अनेकदा घरगुती उपाय म्हणून केला जातो) ज्यामुळे इंन्सियाचं संगीताबद्दलचं ज्ञान अधोरेखीत होतं. त्यासाठी हॅट्स ऑफ !!

काही ठिकाणी मात्र मला व्यक्तिशः थोडा खटकला. मित्र म्हणून एखाद्याने मदत करणे इतपर्यंत ठीक पण लगेच 'I luv you' 'I luv you too' म्हणत प्रेमाचे प्रदर्शन करणे मला पटले नाही. दहावीतल्या मुला-मुलीचे एकमेकांवरचे प्रेम चित्रपटात glorify करून दाखवावे का हा वादाचा मुद्दा असला तरी 'सिक्रेट सुपरस्टार' च्या मूळ theme ला तो विसंगत असा वाटला.

बाकी सगळ्यांचा अभिनय उत्तम झाला आहे. चित्रपट नक्की बघावा असा आहे.

आवडला पण खूप आवडला असं नाही . थोडा प्रचारकी वाटला. अर्थात सादरीकरण उत्तम आहे, अभिनय उत्तम आहे आणि हेतूही चांगला आहे. मध्यंतरानंतर चांगली पकड घेतो हा चित्रपट . कुटुंबासहित बघण्याजोगा आहे. लो बजेट असल्याने ब्रेक ईवन नक्कीच होईल. गोलमाल ३ ला टक्कर देईल की नाही सांगता येत नाही .

त्याचाच पुढचा येऊ घातलाय... 3.. 4.. 5.. आकडे कोण लक्षात ठेवणार.. पण आताचा 4 असेल तर 3 एवढा 2010 चा जुना नसणार.. अश्याने तुषार कपूरचा रोजगार बंद होईल

क्या कूल हैं हम वली सिरीज आहे त्याला दुसरा रोजगार. आणि गोलमाल 3 हा 2010 लाच आलेला, माझा कॉलेज चा शेवटचा वर्ष होता, मित्रांबरोबर पाहिलेला, त्यात करीना फॅन असल्यामुळे विसरू शकत नाही 2010.

दहावीतल्या मुला-मुलीचे एकमेकांवरचे प्रेम चित्रपटात glorify करून दाखवावे का हा>>>>>>

असे काही वाटले नाही, घरात अशांतता असताना घराबाहेर कोणी समजून घेतो आहे, काळजी घेतो आहे असे वाटले तर ओढ लागणे नैसर्गिक आहे,

अगदी 20 वर्षांपासून (हम जब जवान हुआ करते थे) 8-9-10 मधली मुले मुली प्रोपोज करताना पहिली आहेत, आणि त्या काळी तरी ते इतके इनोसंट असायचे की i love u- i love you too म्हणून झाले की पुढे काय करायचे याची दोन्ही पार्टीना कल्पना नसायची Wink

आपल्याकडे डेटिंग ही संकल्पना नसल्याने मुले फेस व्हॅल्यू वर विसंबून i love you म्हणून मग एकमेकांसोबत वेळ घालवतात/एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
डेटिंग संकल्पना असलेल्या ठिकाणी बिनधास्त we are seeing each other म्हणून आधी समजून घेतात आणि मग i love you होते.

असो...अवांतर बद्दल सॉरी

गोलमालची कमाई पस्तीस कोटी आणि याची सिंगल डिजीट बहुतेक विकांतानंतर. या शुक्रवारीच रीलीज झालेत ना दोन्ही? गोलमालची प्रसिद्धी जास्त झाली असणार आाणि डोकं बाजूला ठेवून बघायची काॅमेडी जास्त आवडते लोकांन्ना.

डोकं बाजूला ठेवून बघायची काॅमेडी जास्त आवडते लोकांन्ना.
>>>>
टवाळा आवडे विनोद !
समाजात टवाळांची संख्या वाढली आहे ..

गोलमालची कमाई पस्तीस कोटी आणि याची सिंगल डिजीट बहुतेक विकांतानंतर.
>>> Golmaal 3200+ screens वर लागला आहे, सीसू 1700 वगैरे..
ओव्हरल आता गोलमाल 60 cr आणि सीसू 23 cr बिननेस झालाय.. दोन्ही जोरात आहेत. सीसू चा बजेट पाहता मुवि हिट आहे .. गोमा पण नकीच हिट आहे.

आजच पाहिला. अतिशय आवडला! फुल रेको माझ्याकडून.

अजय - आमिर च्या कॅरेक्टरचे नाव वरती शक्ती "कपूर" लिहील्याने काल परवा वाचताना खूप गोंधळ झाला होता. प्रत्यक्षातील शक्ती कपूरशी काही संबंध आहे का म्हणजे आमिर ने शक्ती कपूरचा रोल केला आहे का वगैरे वाटले होते. त्याचे यात नाव शक्ती "कुमार" आहे :), आणि शक्ती कपूरशी काहीच संबंध नाही.

जाहिरा वासिम आणि तिची आई मेहेर विज दोघींनी जबरी काम केले आहे. आमिर ने तो शक्ती कुमार भन्नाट उभा केला आहे. धमाल उडवतो तो Happy

गळ्यात आवंढा वाले सीन्स बरेच आहेत. पण चित्रपट अजिबात रडका नाही. उलट भरपूर् हलकाफुलका आहे आणि अनेक विनोदी सीन्स ही सहजपणे आलेले आहेत. मजा येते. मला लक्षात राहिलेले दोन सीन्सः
- इन्सिया संतापलेली असते आणि तिला मार्ग सापडत नसतो, तेव्हा पिंजर्‍यात येरझारा घालणारी वाघीण्/वाघ
- तिच्या बापाच्या तोंडावर दार बंद होते तो.
यातले मेटॅफोर्स आवर्जून केलेले आहेत की नाही माहीत नाही पण जमून गेले आहेत.

यातल्या व्यक्तिरेखा कुठेही आपले कॅरॅक्टर सोडून वागत नाहीत,
त्या व्यक्तीच्या कॅरॅक्टर चा जो परीघ असेल त्यातच राहतात,

उदा , इंसिया आई ला पळून जाऊ असा प्लॅन सुचवते त्यात ती आई आणि ती असे दोघेच असतात, भाऊ किंवा आजी नसतात,भावाबरोबर लहानपणापासून पक्षपात पाहिल्याने त्याच्या बद्दल थोडी अढी असणे साहजिक आहे.
या उलट आई दोन्ही मुलांचा विचार करते.
पण वेळ आल्यावर ती सासूची जबाबदारी घेऊन कॉम्प्लिकेशन्स वाढवत बसत नाही.

लहान मुलीला मदत केल्याने शक्तीचे काही मनपरिवर्तन वगैरे होत नाही तो तसाच राहतो,

फिअर ऑफ अन्नोन असल्याने आई चे सही करण्याबद्दल चा स्टॅन्ड पण खरा वाटतो.

शेवटच्या प्रसंगात आई खूप अग्रेसीव्ह वगैरे बोलत नाही, ती डिफेन्सीवली अग्रेसीव अशीच वागते, आणि बाहेर पडल्यावर आणलेले उसने अवसान गेल्यावर तिची घालमेल सुद्धा होते.

या सगळ्यामूळे त्या व्यक्तिरेखा खऱ्या वाटतात

@फार एण्ड..मी सुरूवातीलाच सांगितलयं . की, माझा मोबा नीट काम करत नसल्यामुळे लिहण्यात काही चुका झाल्यात हे मान्य आहे..

मला पण आवडला, अगदी सिंपल, विषयाशी प्रामाणिक फॅमिली मुव्ही.
सगळ्या पात्रांचा अभिनय सुरेख, आई मुलीचं नातं मस्तं दाखवलय.
आमिर खाननी शक्ति कुमार धमाल साकारलाय आणि उगीच सिनेमा स्वतः मधे व्यापून टाकला नाहीये, विषय अजिबात भरकटत नाही. अगदी लो प्रोफाइल ठेवलय स्वतःला.
फारेंडने वर लिहिलेय त्याप्रमाणे इन्सियानी तिचा राग चिडचिड ,अम्मीवर होणारा अत्याचार बघताना हतबल असणे फार छान अभिनय केलय.
गाणी ऐकताना डिस्नीची हिंदी व्हर्जन गाणी चालु आहेत असं वाटत होतं Happy , आधी गाणी फार आवडली नव्हती पण सिनेमा बघताना आवडली.
एकदा नक्की पहावा असा सिनेमा.

तरीच मी विचार करत होतो शक्ती कपूरसारखे कॅरेक्टरलेस नाव कसे ठेवले. चित्रपट रडका नसून हलकाफुलका असेल तर बघायला हवा.

आजच पाहिला. प्रत्येक भूमिकेला न्याय मिळवून दिलेला आहे अचूक निवड केलेल्या त्या त्या कलाकारांनी..
हॅट्स ऑफ टू आमिर.

खरंच छान जमला आहे पिक्चर. इन्सिया, तिची आई, चिंतन आणि आमिर ह्यांनीं अतिशय उत्तम कामे केली आहेत.

आमिर ने काही काही ट्रू (?) इव्हेन्ट्स चा छान वापर केला आहे, उदा. अ‍ॅवार्ड न मिळणे.

इन्सिया नावाचा अर्थ माहित नव्हता. आईने मुलीचे नाव सुंदर ठेवले आहे Happy

हो इन्सिया नाव मलाही आवडले. आमिर जेव्हा त्याचा अर्थ विचारतो आणि मग म्हणतो, "नाम जितना बकवास है उससे ज्यादा उसका मीनिंग" - तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. आमिर चे एकूणच ओव्हर द टॉप काम धमाल आहे. त्या लॉयर च्या ऑफिस मधे बसलेला असतो तेव्हा किरकोळ हालचालींमधून सुद्धा तो जबरी रोमियोगिरी करतो.

बाय द वे - ती लॉयर मराठी कलाकार आहे ना? बहुधा "बिनधास्त" वाली?

विकी वर मोना आंबेगावकर चं नाव वाचलं लॉयर च्या रोल मध्ये. चेहेरा ओळखीचा वाटला पण मोना आंबेगावकर ला अजिबात ओळखता आलं नाही.

आमीरची नावावरून शेरेबाजी Happy

यातल्या व्यक्तिरेखा कुठेही आपले कॅरॅक्टर सोडून वागत नाहीत,
त्या व्यक्तीच्या कॅरॅक्टर चा जो परीघ असेल त्यातच राहतात, >>>

या सगळ्यामूळे त्या व्यक्तिरेखा खऱ्या वाटतात >>> एकदम सहमत.

Pages