सिनेमा रिव्हीव्ह - सिक्रेट सुपरस्टार..

Submitted by अजय चव्हाण on 20 October, 2017 - 18:20

"नटसम्राट" ह्या चित्रपटानंतर पहिल्यांदाच ज्यावर काही लिहावं असा वाटणारा हा माझा दुसरा सिनेमा...

काही चित्रपट खरंच खुप भारावून टाकणारे असतात म्हणजे पाहून झाल्यानंतर आपल्या तोंडातून वाॅव, मस्त असे शब्दही निघत नाही किंवा टाळ्याही वाजवल्या जात नाहीत कारण अशा चित्रपटांची स्तुती कुठल्याच शब्दांनी किंवा टाळ्यांनी आपण करू शकत नाही ते इतके अप्रतिम असतात की,"अप्रतिम" हा शब्दही कमी पडतो कौतुक करायला..

"सिक्रेट सुपरस्टार" हा अशाच अजरामर ठरवला जाऊ शकणार्या पठडीतला सिनेमा आहे..सिनेमातल्या एका गाण्यात सिनेमातल्या नायिकेचं अंतरंग दाखवण्यात आलं आहे आणि हे सांगायला

"डर लगता है सपनोसे कर दे ना ये तबाह
डर लगता है अपनोसें दे दे ना ये दगा" ह्या दोन ओळी पुरेशा आहेत..

ह्या सिनेमाची कथा अगदी साधी,सरळ आणि सहजसुंदर आहे
ही कथा पाहताना किंवा जगताना (हो अक्षरक्ष: ही कथा जगतो आपण) कुठेही ती ऑफ ट्रॅक वाटत नाही ...सिनेमाची गोष्ट ही जगातल्या प्रत्येक त्या व्यक्तीची गोष्ट आहे जी स्वप्न पाहतात आणि ते साकार करायला धडपडतात किंबहुना प्रत्येकाचे संघर्ष वेगळे असतीलही पण जिद्द मात्र एक असते तर अशीच स्वप्न पाहणार्या व साकार करण्यासाठी धडपणार्या इंन्सियाची (झायरा वसिम) गोष्ट म्हणजे हा सिनेमा..

इंन्सिया एका साधारण मुस्लिम कुंटुंबात वाढलेली मुलगी दहावीत शिकतेय..तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून तिच्या अम्मीने गिटार घेऊन दिलं होतं आणि तेव्हापासून गिटार आणि गाणं हाच तिचा छंद आहे... खुप मोठी गायिका होऊन पुरस्कार घेण्याच तिचं एक स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नाला तिच्या अम्मीचा (मेहेर विज) काही मर्यादेपर्यंत पाठींबा आहे कारण तिचं स्वतःचच आयुष्यच काही मर्यांदापर्यंत बांधल गेल आहे..तिला स्वतःलाच मनासारखं जगण्याचा अधिकार तिच्या नवर्याने कधीच तिला दिला नाही...तिचा नवरा (राज अर्जुन) हा नवरा नसून हा एक अहंकारी पुरूष आहे ज्याला आपली बायको केवळ गुलाम वाटते...डाळीत मीठ कमी पडलं तर अख्खी थाळी भिरकवणारा, गिझर ऑफ करायला विसरली म्हणून हात तोडणारा अशा ह्या तिच्या नवर्याला आपल्या बायको-मुलीने केवळ आपल्या अटीनुसार आयुष्य जगावं असं वाटतं असतं पण इंन्सिया हतबल असली तरी जिद्दी आहे...

उंच झेप घेणार्या पक्षाला कितीही बांधून ठेवलं तरी तिथल्या तिथे भरारी घेण्याचा प्रयत्न तो करतोच तसंच इंन्सियाच मन देखिल स्वप्नाच्या अवकाशात लाखो भरारी जिथल्या तिथ घेतयं...
इंन्सियाच्या भाषेत सांगायच झालं तर

"हम सुबह उठते है इसिलिए ताकी कल के देखे हुए सपने पुरे कर सके और उसे जीए"

एकीकडे अम्मीचही तिला खुप वाईट वाटतयं..तिला तिच आयुष्य
सुकर करायचयं आणि त्याचबरोबर स्वतःच स्वप्न ही पुरं करायचं

तिला तिच्या अब्बा ला नकळता हे करायचं आहे म्हणून ती युट्युबवर नाव न सांगता "सिक्रेट सुपरस्टार" ह्या नावाने बुरखा घालून स्वतःच लिहलेलं ,स्वतःच गायलेले
, स्वतःच गाणं ती टाकते..अल्पावधीत ती खुप फेमस होते अर्थात सिक्रेट सुपरस्टार ह्या नावानेच..आणि ह्याच गाण्याच्या कमेंटमध्ये शक्ती कपूर ज्याला पुर्ण मिडीयाने "ठर्की" म्हणून प्रूफ केलयं तो तिच कौतुक करतो आणि आपला मोबाईल नंबरही देतो..

पुढे तिच स्वप्न पुर्ण होत का?? तिला ते पुर्ण करण्यासाठी काय काय दिव्य करावं लागतं...शक्ती कपूर तिची कशी मदत करतो..तिच सिक्रेट सुपरस्टार असणं अब्बाला कळत का?

हे सर्व सिनेमात पाहायला जास्त मजा येईल...

अभिनयाच्या बाबतीत सगळयांनीच कमाल केलीय पुरस्कार द्यायचा झाला तर कुणा एखाद्याला आपण निवडूच शकणार नाही...अगदी इंन्सीयाचा छोटा भाऊ झालेला कबीर असो व आजी झालेल्या फारूख..सगळ्याच वयोगटातल्या कलाकारांनी आपआपली व्यक्तीरेखा अगदी जिवंत साकारलीय..पण मला सर्वात जास्त राज अर्जुन ह्याचा अभिनय खुप भावला..
जी काही पती आणि पित्याची दहशत त्याने सिनेमात निर्माण केलीय त्याची ती दहशत आपण फिल करतो...कधी कधी आपल्याला पण त्याच्या वागण्याची भीती वाटते...मेहेर विज आणि झायरा यांच कौतुक जितकं कराव तितकं कमीच आहे ह्या दोघी खर्याखुर्याच मायलेकी वाटतात अगदी हे फक्त सिनेमात हे आपल्याला माहीत असलं तरीही...तीर्थ ने साकारलेला चिंतन नावाचा बेस्टफ्रेंड कम बाॅयफ्रेंड खुप गोंडस आणि त्याच्या वयापेक्षा मॅच्युअर वाटतो आणी मुख्य म्हणजे पुर्ण सिनेमात हा अभिनय करतोय हे कळतचं नाही...
आमीर खानने साकारलेला शक्ती कपूर बेस्टच..त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर बेबी ...झक्कास...आमिर खान ला उगीच कुणी परफेक्टनिस्च म्हणत नाही आणि शक्ती कपूर नावाचं जे कॅरेक्टर आहे ते त्याने इतकं जबरी साकारलाय की शक्ती कपूर मध्ये आपण आमिर शोधत राहतो पण तो मिळत नाही...

बाकी लेखक आणि दिग्ददर्शक म्हणून अद्वेत चंदन कुठेच नवखा वाटत नाही प्रत्येक गाणं प्रसंगानुसार योग्यप्रकारे करणं असो वा त्याचा कथेत उपयोग करणं असो ही बाब खरंच कौतुकास्पद आहे आणि काही प्रसंग इतके जिवंत लिहले आणि चित्रित केले आहेत की विचारायची सोय नाही स्पेशली राज अर्जुन जेव्हा थाळी भिरकवतो लिटरली खुरी खरी डाळं (वरणं) आणी आमटी जमीनीवर सांडताना आपण पाहू शकतो आणि तिच डाळ पुसताना इंन्सिया जेव्हा एका स्पर्धेचा कागद वापरते ज्यात तिला सहभाग घेण्याची परवानगी हवी असते तेव्हा कुठेतरी आपणही हतबल फील करतो... अनिल मेहतांच्या छायांकनाने सिनेमाला चार चांद लावले आहेत हे वेगळ सांगायलाच नको.

पात्रे -

आजी -फारूख झाफर
अम्मी - मेहेर विज
अब्बा - राज अर्जुन
इंन्सिया - झायरा वसिम
गुड्डु - कबिर शेख
चिंतन - तीर्थ
शक्ती कपूर - आमिर खान
पाहुणे कलाकार- मोनाली ठाकुर व शान.

का पाहावा:

स्वप्नांवर विश्वास ठेवण्यासाठी आणि ते साकार करण्याची धडपड, संघर्ष कळण्यासाठी व तेच स्वप्न सत्यात उतरल्यावर काय वाटत हे जाणण्यासाठी...

अचुक गोष्ट ,अचुक कलाकारांची निवड ,अचुक अभिनय आणि अचुक दिग्ददर्शन अनुभवण्यासाठी...

नामाकंन :*****

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या चार पाच दिवसांत 'मै कौन हूँ' आणि 'नचदी फिरा' दोन्ही खूपदा ऐकली. यातले पहिले शब्दरचने मुळे लगेच आवडले पण दुसरे सुद्धा "ग्रोज ऑन यू" टाइप आहे. ती मेघना शर्मा "तेरे इशकदा" काय खतरनाक म्हणते!

गोलमाल ४ आणि सिक्रेट सुपरस्टार दोन्ही लागोपाठच्या दिवशी पाहिले.
आश्चर्य म्हणजे गो४ बर्‍यापैकी चांगला चित्रपट आहे
सिक्रेट सुपरस्टार अप्रतिम आहे
शक्ती कुमार नाव आहे, कपूर नव्हे
यानिमित्ताने मुस्लिम स्त्रियांची घुसमट आणि मुस्लिम पुरुषांचा वैचारिक मागासलेपणा माण्डणारा चित्रपट बनवण्याचे धाडस बॉलीवूड आणि पक्षी आमिर ने दाखवावे हेही नसे थोडके

यानिमित्ताने मुस्लिम स्त्रियांची घुसमट आणि मुस्लिम पुरुषांचा वैचारिक मागासलेपणा माण्डणारा चित्रपट बनवण्याचे धाडस बॉलीवूड आणि पक्षी आमिर ने दाखवावे हेही नसे थोडके
>>>>>>>>

अरे हो की रे,.. खरंच .. भारी मुद्दा आहे हा
पीकेच्या वेळी अमीरवर तुटून पडणार्‍यांना घ्यायला Happy

अरे हो की रे,.. खरंच .. भारी मुद्दा आहे हा
पीकेच्या वेळी अमीरवर तुटून पडणार्‍यांना घ्यायला
>>> Selective अटॅक असतो हो.. लोक गप्प असतात आशा वेळी

आज पाहिला, खरच खूप छान आहे हा मूवी.
आई अन मुलीचे नाते खूप खूप सुंदररीत्या दाखवीलेय.

एकदा तरी पाहावा असा नक्कीच आहे.

तरी अजून कोणी धर्माचा अ‍ॅन्गल कसा आणला नाही याचे ताज्जुब वाटत होते.
वैचारिक मागासलेपण विशिष्ट धर्माची मक्तेदारी आहे हे नवीन ज्ञान झाले ह्या निमित्त.
असो,

गेल्या चार पाच दिवसांत 'मै कौन हूँ' आणि 'नचदी फिरा' दोन्ही खूपदा ऐकली. यातले पहिले शब्दरचने मुळे लगेच आवडले पण दुसरे सुद्धा "ग्रोज ऑन यू" टाइप आहे>>>>>+१

बऱ्याच दिवसांनी हिंदीमध्ये बघण्यालायक चित्रपट आलाय.

मस्त सिनेमा आहे. आजच पाहिला. माझ्या टीनेजर लेकीला पण खूप आवडला.
मला इन्सिया नाव खूप आवडले. झयरा आणि तिची अम्मी दोघींनी फार सुरेख काम केलंय. त्या अम्मी ला आधी कुठेतरी पाहिले आहे असे वाटत होते. अजून कशात आहे ती ?
आमीर तर मस्तच Happy
स्पॉयलर******
मला आवडलेले फनी सीन्स म्हणजे - शक्ती कुमार इन्सिया ला हेल्प करण्यासाठी मोना आंबेगावकर ला फोन लावतो आणि मग ते विसरून शट अप , यू शट अप , मै तुम्हे सुप्रीम कोर्ट तक घसीट के ले जाउंगा वगैरे बोलून फोन ठेवतो आणि नंतर इन्सिया निराश झाल्याचे बघून परत फोन लावून हॅहॅ हॅ करून माफी मागून अपॉइन्टमेन्ट घेतो Lol नंतर तिच्या ऑफिस मधे त्याला मिळालेली तुच्छ ट्रीटमेन्ट आणि त्याचे आदत से मजबूर फ्लर्टिंग पण धमाल. पार मोना आंबेगावकर ला पण हग वगैरे करायला पुढे होणे आणी तिने दुरुन हातानेच कटवणे Lol
शेवटचा एअरपोर्ट वरचा सीन मस्त केलाय तिच्या अम्मीने.

अम्मी ला आधी कुठेतरी पाहिले आहे असे वाटत होते. अजून कशात आहे ती ?
<,
मलाही तिला कुठे पाहिलय आठवेना म्हणून शोधलं मग कळलं , काही वर्षांपूर्वी झी हिंदी मधल्या “राम मिलायी जोडी” नावाच्या सिरियलमधे त्या गुज्जु हिरोच्या बहिणीची, हेतलचा रोल करायची.

अम्मी ला आधी कुठेतरी पाहिले आहे असे वाटत होते. अजून कशात आहे ती ?
>>> सिक्रेट सुपरस्टार च्या ट्रेलर मध्ये पहिली असेल आधी.

Pages