अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )

Submitted by अविनाश जोशी on 19 October, 2017 - 04:50

अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )

या देवीचे वर्णन आगम व विष्णुपुराण यांतआढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय. शीतलादेवीचे स्वरूपही काही अंशी अलक्ष्मीसारखेच आहे. या वर्णनाशी जुळणार्या काही मध्ययुगीन शिल्पकृती.हिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी आश्विन शु. अष्टमीस महालक्ष्मीच्या पूजेआधी ज्येष्ठा या नावाने हिची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन करतात. ही घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती घराच्या कोनाकोपर्यात फिरवून पुढील दारी आणुन टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखविणे होय. याच्याउलट बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखविणे, असे समजतात. बंगालमध्ये आश्विनी अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.आश्विन अमावस्याया दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर देव, पितृ व पूज्य लोकांची पूजा करून दूध, दही, तूप इ. ने श्राद्ध करावे. अपरान्हवेळी आपल्या गल्लीतील घरे स्वच्छ करवून घेऊन सुशोभित करावीत व विविध प्रकारचे गायन-वादन, नर्तन-कीर्तन इ. करून प्रदोषकाळी दिवाळी करून आप्तजन व संबंधितांसह मध्यरात्री निरीक्षण करावे. नंतर रात्रीच्या राहिल्या भागात जागरण करून सूप व डमरू जोराने वाजवून अलक्ष्मीला ( दरिद्रतेला ) हाकलावे.

----------------------

कौमुदी महोत्सव

वर वर्णन केलेल्या पद्धतीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या ठाकठीक असताना दिवे प्रज्वलित करणे यासच हे नाव आहे. बलिपुराणानुसार व. एकादशी ते अमावस्येपर्यंत हे व्रत करतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समुद्र मंथनातुन लक्ष्मी निघायच्या आधी अवदसा निघाली, त्या नात्याने ती लक्ष्मीची मोठी बहीण. दिवाळीला लक्ष्मीपूजनाचे आधी नवी केरसुणी घेऊन तिला हळदीकुंकू वाहायची पद्धत आमच्या भागात आहे, त्यामागे वरील आख्यायिकेचा काहीतरी संदर्भ असावा.

या देवीचे वर्णन आगम व विष्णुपुराण यांतआढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय. >> अश्या पौरा णिक कथे मुळे व तिला घराबाहेर घालवण्याच्या सतत आग्रहा मुळे समाजातल्या काही स्त्रियांवर अन्याय होत असावा. लक्ष्मी ती गोरी, सुरेख चार भुजा व अ लक्ष्मी ती साधी स्त्री, काळ्या रंगाची दिसायला साधारण, तिला दुसरी काही शक्ती नाही आयुधे नाहीत. केरसुणी हे एकच. हे तिचे काम करायचे आयुधही असू शकते. स्तन व पो ट मोठे असणे म्हणजे वाइट का? अशी इमेज कुठून झिरपली? मेजॉरि टी स्त्रियांची दोन बाळंतप्णे झाली की शरीर य्ष्टीत आपसूक बदल होतात. ते कुठे अ‍ॅक्सेप्ट केले जात नाहीत असे आहे का? तिला कन्या पुत्र आहेत पण नाथ नाही असे का? तिचे पती कोण? ती गृहिणी सवाष्ण आहे का? का ती सामान्य गरीब स्त्रीचे प्रतीक आहे? असे प्रश्न पडतात.

आमा, द्रौप दीच्या सौन्दर्य्॑अची भरभरऊन वर्णने आहेत. ती द्रौपदी तरी कुठे गोरी होती?

{कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली }
हे सगळं वर्णन द्रौपदीला लागू पडतं?

@ nanba: This is about a goddess . Draupadi is just one character. A queen and human being. Not worshipped by devotees. Kindly do not compare apples with oranges.

Bharat - i didn't mention other characteristics.
Ama - i don't think it's apple to oranges. I don't think black was considered bad at all. Ram, Krishna were black too. Draupadi was not fair either. They are considered good looking. They are considered supreme./superior.
we have ganapati who has big belly. Not all our gods are slender and chic's.
Draupadi is one of 5 to be remembered.
It is more abt characters.
Eg. they say, wherever she goes peace is lost. We know such people and we obviously don't want them around.

I felt comparison was far-fetched. NOM.

नानबा, तुमच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत.

आपल्या पुराणांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यात सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजू आहेत. सकारात्मक गोष्टींकडे पुराणातली वानगी म्हणून दुर्लक्ष करायचे व नकारात्मक गोष्टी तितक्या उचलून टीका करायची यात काय संतुलन आहे कळत नाही.

आणि पुराणात या अलक्ष्मीची गोष्ट पूर्णपणे आलीय. मी ती अवदसेची गोष्ट म्हणून वाचलीय. विष्णूला लक्ष्मीशी विवाह करायचा असतो पण मोठ्या बहिणीचे लग्न आधी व्हावे ह्या तिच्या आग्रहामुळे विष्णू अवदसेचा विवाह एका ब्राह्मणाशी करून देतो हे कथेत आहे. माझ्याकडे कथाकल्पतरु नावाचे पुस्तक होते ज्यात सर्व पुराणातील गोष्टी दिलेल्या. आजही हे पुस्तक चार भागात उपलब्ध आहे.

जय मल्हार मध्ये पाहिलं होतं तेव्हा अशी कोणी अलक्ष्मी असते हे कळलं होतं. ते character करणाऱ्या बाईला धोप काळं फासलं होतं.

नानबा.. तुम्ही म्हणताय ते पटलं काही अंशी. पण असं मोठं पोट किंवा सावळेपणा जास्तकरून पुरुष देवांना / characters ना दिला आहे. हेच स्त्रीला दिले असतील तर तिला कुरूप ठरवलं आहे. याचं कारण पूर्वीपासून स्त्रीच्या सौंदर्यवान असण्याला जास्त महत्व आहे. आणि पुरुषाने कर्तृत्ववान असण्याला.

ननबा, अलक्ष्मीच्या रूपातील सात वैशिष्ट्यांपैकी( जी सगळी कुरूपतेचा शिक्का लागायला कारण ठरू शकतात) फक्त एक, वर्ण घेऊन, द्रौपदीही काळी तरी सुंदर होती, असं म्हणणं
आणि त्याजोरावर अमांच्या मुद्द्याचा प्रतिवाद करणं; पटलं नाही.
अलक्ष्मीच्या वर्णनात तिचं द्रुश्य रूपही नकोसं रंगवलेँलं नाही, असं म्हणायचंय का?

Bharat, pinjaralelya kesanchi, nilyakalya varnachi, gadhavavar basaleli Sudha amhala vandaniy ahe - the kashamule?
Var kunitari mhatalyapramane jar similar varnanachi shitaladevi hi vandaniy asel tarihi kurupata hech Karan disatay Ka?

विष्णू अवदसेचा विवाह एका ब्राह्मणाशी करून देतो >>> त्या ब्राम्हणाचे पुढे काय होते कथेत. त्याचे नाव काय दिले आहे.

. याचं कारण पूर्वीपासून स्त्रीच्या सौंदर्यवान असण्याला जास्त महत्व आहे. आणि पुरुषाने कर्तृत्ववान असण्याला.>> हे जेंडर रोल स्टिरीओ टायपिंग आहे . ही विचारधारा बदलायला हवी. २१ व्या शतकात किती तरी स्त्रिया कर्तुत्ववान आहेत. झाडू वापरून घर व ऑफिस स्वच्छ करणारी स्त्री मला कोणत्याही पौराणिक प्रतिमेपेक्षा वंदनीय वाट्ते.

Draupadi is one of 5 to be remembered.>> पाच पतिव्रता स्त्रियांपैकी. स्त्रियांपैकी, सीता तारा मंदो दरी ह्यात तिचे नाव आहे.

It is more abt characters.>> नाही लक्ष्मी एक परम दैवत आहे. विष्णू ह्या जगन्नियंत्याची पत्नी तिचे नसणे म्हणजे अलक्ष्मी. द्रौपदी एक राणी . तर लक्ष्मी हे एक महत्वाचे दैवी रूप आहे. दोघींची काहीच बरोबरी नाही. द्र्रौपदी सावळी आहे असे वर्णन आढळ ते. तिचे एक नाव़़
कृ ष्णा असे पण आहे. अ लक्ष्मी सावळी नव्हे. काळी आहे.

Eg. they say, wherever she goes peace is lost. We know such people and we obviously don't want them around.>>
जिथे अलक्ष्मी जाते तिथे मनःशांती निघून जाते. बरोब र आहे. गरीबी असताना पदरी पोरे उपाशी असताना मनःशांती कुठून येइल. काळजी उपासमारीने माणूस व्यग्रच होणार. आर्थिक स्टॅबिलिटी ही गृहस्थ धर्मासाठी म्हणूनच महत्वाची आहे. सन्यस्त्त असताना किम्वा वानप्रस्थाश्रमात
लक्ष्मीची( पर्यायाने अर्थाची) गरज कमी भासते. गरीब , कावलेले माणूस डोळ्यासमोर नको घालवून द्यावे त्याला, असे वरील वाक्याचा अर्थ असावा असे दिसते परंतु त्यांची काही बाजू असेल. घरातील कलहामुळे किंवा व्यक्तिगत मतभेदांमुळे एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिसमुह( आपण पीपल म्हटले आहे म्हणून) नजरे समोर नको असे वाटणे वेगळे. पण स्त्रीची प्रतिमा जी रूढ स्टँडर्ड किंवा बेंच मार्क मध्ये बसत नाही तिला काळी, जाडी, गरीब, कुरूप , मुलांसहित आलेली. ( म्हणजे उपलब्ध रिसोर्सेस मध्ये वा टणी - ते आपल्या घराला कमी करून तिला देणे आले ) हे केवळ पुराणात आहे म्हणून अ‍ॅक्सेप्ट करण्या ऐवजी अश्या अलक्ष्मीला रिसोर्से स उपलब्ध करणे ती काम करून जगण्या साठी पैसे मिळवत असताना तिला रिलाए बल चाइल्ड केअर, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ह्यावर विचार व्हायला हवा. दुर्बल घटकांनाच
इ न्सिट्युशनलाइज्ड मदतीची गरज असते.

Amaa - i find ur reply far fetched.
If u don't want to compare her with Draupadi - compare with Kali. Even name has black in it. Refer to the description of kalratri i gave above.
There are many in our religion,who became goddess based on their deeds. Do u know thr are widows, there are kumarikas, thr r terrible looking goddesses (first glance)- anyone could and can raise based on thr qualities and hardwork.
I hope u know what these so called seculars say about Durga. Now that is double dholaki as per me.(नॉट यू - seculars who take convenient stand)

Also, ur example of shanti and ashanti and being poor does injustice to those less fortunate, i feel. (yes, my opinion. It cam be right or wrong in ur views)
Personal ethics, way of thinking etc are not just qualities Of rich.
Check my lekhan where I have narrated my experience with 2 different economically poor people. One of them has rich ethics and culture, other one doesnt.
Also, if u prefer Lakshmi, by all means u can invite her. Same with alakshmi. No one can stop anyone from doing so. Our religion accepts atheists too.

केवळ पुराणात आहे म्हणून अ‍ॅक्सेप्ट करण्या ऐवजी अश्या अलक्ष्मीला रिसोर्से स उपलब्ध करणे ती काम करून जगण्या साठी पैसे मिळवत असताना तिला रिलाए बल चाइल्ड केअर, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ह्यावर विचार व्हायला हवा. दुर्बल घटकांनाच
इ न्सिट्युशनलाइज्ड मदतीची गरज असते.>>>>>

कोणी केले accept? ज्या पुराणात अवदसेची कथा आहे त्याच पुराणात नवऱ्याबरोबर रणांगणात जाऊन लढणाऱ्या व प्रसंगी त्याचा जीव वाचवणार्या कैकयीची कथा आहे. गार्गी मैत्रेयी या विदुषी आहे. आधीचे आयुष्य सुखासीनतेत गेल्यानंतर प्रसंगोत्पात नवऱ्याबरोबर जंगलात, रानावनात भटकून मिळेल ते खाणाऱ्या, पडेल ते काम करणाऱ्या सीता, द्रौपदी आहेत, बलवान नवऱ्यालाही खडे बोल सूनवणाऱ्या मंदोदरी आहेत. या सगळ्या बायांकडे दुर्लक्ष का?

अवदसेला असे चित्रित केले म्हणून आज बायकांवर अन्याय होतोय, सीतेवर संशय घेतला म्हणून आज बायकांवर संशय घेतला जातो म्हणणारे पुराणातील फक्त स्वतःचा मुद्दा रेटून नेणारे भाग वाचून त्यावर भाष्य करताना का दिसतात? तुम्ही विचारवंत आहात तर संतुलित विचार करा की...

मला आजच्या समाजात पुराणातील दोन्ही बाबींचे प्रतिबिंब दिसते. सीतेचा दाखला देऊन बायकोला मारझोड करणारे दिसतात तसेच आपल्या मुलींना गार्गी मैत्रयी करण्यासाठी झटणारेही दिसतात. मला पुराणातल्या गोष्टींबद्दल खूप कुतूहल आहे कारण आपल्या समाजाचा तो आरसा आहे. लोकांना जे हवे होते, लोक जे पहात होते, जे घडावे वाटत होते हे सगळे त्यात प्रतिबिंबित होते. हे कोणी एकाने लिहिलेले नाहीय तर ते अपग्रेड होत गेले वेळोवेळी. त्यातले चित्र ग्रे आहे, आपण फक्त ब्लॅक न व्हाइट बघायचे ठरवले तर आपल्याला तसेच दिसणार.

तुमचा चष्मा जसा आहे तसे तुम्हाला जग दिसते.

छान चर्चा,
महाभारत वा रामायण फारसे वा सविस्तर वाचले नाही, पण बरेपैकी पाहिले आहे.
त्यामुळे द्रौपदी रंगाने काळीसावळी होती ही माहीती माझ्यासाठी नवीन आहे. माझ्यासारखे ईतरही बरेच असतील ज्यांना याची कल्पना नसावी. कारण महाभारताचे जितके वर्जन पाहिले आहेत त्यात माझ्या आठवणीप्रमाणे द्रौपदी गोरीच दाखवली आहे. कदाचित पडद्यावरचे सौंदर्य गोरेपणातच खुलून दिसत असावे, आणि द्रौपदी या कॅरेक्टरचे सुंदर दिसणे हे टीआरपीसाठी गरजेचे असावे.

@ धागा..
या दंतकथांचा मूळ हेतू जो काही असेल तो असेल, पण अंधश्रद्धाळूपणे प्रथा पाळल्या जाण्याने समाजाचे नुकसान खूप होते.
एकदा तुम्ही लक्ष्मी आणि अलक्ष्मी अश्या देवता असतात यावर श्रद्धा ठेवली, की विधवा वा निपुत्रिक बाईची भरल्या घराला नजर लागते वगैरे अंधश्रद्धा मग त्यातूनच येतात... येतातच हे गरजेचे नाही, पण शक्यता तिथेच असते जिथे ईनलॉजिकल गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे वरवर या दंतकथा वाचायला रोचक वाटत असल्या तरी त्या पसरू नयेत असेच मला वाटते.

व्हॉटसपवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फिरत आलेला एक मेसेज सहज आठवला, तसाच कॉपीपेस्ट करतो -

दर वर्षी लक्ष्मी पूजा करून सुद्धा आमचा देश उपासमारी मध्ये 100 वा कसा?
कडवट पण सत्य !

साधना, चांगले मुद्दे. खास करून, सकारात्मक गोष्टींकडे पुराणातली वानगी म्हणून दुर्लक्ष करायचे व नकारात्मक गोष्टी तितक्या उचलून टीका करायची >> हे अचूक लिहिले आहे. संतुलन म्हणजे दोन्ही बाजुना बरोबर न्याय हवा हे पटले एकदम.

आता पुराण व रूप याचा संबंध... तर या कथा कित्येकांना माहिती नसतात (मलाही नव्हती माहीत). नजरेला काही आवडले/खुपले की त्याबद्दल चांगले/वाईट बोलणे हे माणसाकडून होते. पूराणात लिहिले म्हणुन मानव असा वागतोय असे नाही.

अश्विनी, जाई, रिया, रश्मी धन्यवाद.

रुन्मेष, या दंतकथा हजारो वर्षे समाजात पसरलेल्या आहेत, आज पसरत नाहीयेत. हजारो वर्षे जर चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आहेत तर आज गरज आहे त्यातले चुकीचे संदेश दूर करून चांगले संदेश घेणे. व्हाट्सअप्प सारख्या माध्यमांमुळे चुकीचे संदेश हल्ली जास्त पसरवले जातात. लक्ष्मीचे पूजन करूनही दारिद्र का या प्रश्नातच उत्तर दडलंय. आता तुम्ही लक्ष्मीपूजन करताय म्हणजे यावर विश्वास आहेच तर मग सगळेच वाचा म्हणजे कुठल्या गोष्टीत लक्ष्मीने काय म्हटलेय तेही वाचायला मिळेल. जो मेहनती आहे, कष्टाचा घाम गाळतो त्याच्या घरी मी वास्तव्य करते असे बरेच काही संवाद देवी देवतांच्या तोंडी दिलेले असतात. आपण ते न वाचता पूजा करा हेच वाचून नुसते लक्ष्मीपूजन करत बसलो तर दारिद्र्य वाट्याला येणार.

<जो मेहनती आहे, कष्टाचा घाम गाळतो त्याच्या घरी मी वास्तव्य करते असे बरेच काही संवाद देवी देवतांच्या तोंडी दिलेले असतात. > असं होताना दिसत असतं तर किती छान झालं असतं.
उलट बहुतांशी ज्यांच्याकडे पुरेशी लक्ष्मी आहे, त्यांनाच पूजा आणि पोथ्या हे उद्योग सुचतात आणि परवडतात.

विष्णू अवदसेचा विवाह एका ब्राह्मणाशी करून देतो >>> त्या ब्राम्हणाचे पुढे काय होते कथेत. त्याचे नाव काय दिले आहे.
ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

भरत + १

अमा , तुम्हाला गोष्टीत रस असेल तर कथा कल्पतरू पुस्तक घेऊन वाचा, बुकगंगा वर उपलब्ध आहे.

भरत, मलाही तुम्ही म्हणता तेच म्हणायचे आहे. हाती धन नसताना पूजेअर्चेत वेळ घालवण्यापेक्ष तो कामासाठी उपयोगी लावला व धन कमावले तर मग नंतर आरामात पूजापाठ कराNयात वेळ घालवता येतो. नाहीतर वर आलेल्या व्हॉट्सअप सारखी गत होणार.

अमा , तुम्हाला गोष्टीत रस असेल तर कथा कल्पतरू पुस्तक घेऊन वाचा, बुकगंगा वर उपलब्ध आहे.>> आजिबात नाही.
तुम्ही कथा वाचली आहे असे प्रतिसादात दिले म्हणून प्रश्न विचारला होता. पण उत्तर नाही असे दिसते आहे.

अलक्ष्मी हे एक कलचरल स्टिरीओटायपिंग आहे ते आता पोस्ट-अग्रारिअन सोसायटीत २१ व्या शतकात व्हॅलिड नाही. नव्याने विचार करायची गरज आहे.

जो मेहनती आहे, कष्टाचा घाम गाळतो त्याच्या घरी मी वास्तव्य करते असे बरेच काही संवाद देवी देवतांच्या तोंडी दिलेले असतात. आपण ते न वाचता पूजा करा हेच वाचून नुसते लक्ष्मीपूजन करत बसलो तर दारिद्र्य वाट्याला येणार.

>>>>>>>>

अहो हिच तर गोम आहे.
जे मिळते ते मेहनतीने मिळते पूजेने नाही मिळत.
"नुसते लक्ष्मीपूजन करत बसलो तर दारिद्र्य वाट्याला येईल" असे आपणच कबूल करत आहात.
पण मी म्हणतो लक्ष्मीपूजन न करता नुसती मेहनत करून बघा. दारिद्र्य तुमच्या वाट्याला येणार नाही याची ग्यारण्टी मी देतो.. आणि हो, तसे घडल्यावर मला देव बनवून माझी पूजा करायचीही गरज नाही Happy

हे जे सोबतीला मेहनतही हवी म्हटले आहे याचा वापर ढालीसारखाही केला जातो. म्हणजे अपयश मिळाले तर आमचे व्रतवैकल्य फेल नाही गेले तर तुमचीच मेहनत कमी पडली. आणि काही नाही तर गेल्या वा या जन्मीची पापे आहेतच. आणि उपाय म्हणून खडे गंडे धागे दोरे...

नशीब नशीब ज्याला म्हणतात ती एक मॅथेमॅटीकल वा लॉजिकल टर्म आहे.
जर तुम्ही नाणे हवेत उडवले तर छाप वा काटा पडायची शक्यता 50℅ च असणार. ज्याला प्रोबॅबिलिटी असे म्हणतात. मग काहीही पूजापाठ करा ती शक्यता वाढणार नाही.
तसेच जर एखाद्या नोकरीच्या चार जागा रिक्त आहेत आणि दहा उमेदवार परीक्षा देत आहेत तर त्या सर्वांनी कितीही मेहनत करा, कितीही पूजापाठ करा, त्यातील सहा जणांना नोकरी मिळणारच नाही. पण आपण मेहनत करूनही आपल्याला नोकरी का मिळाली नाही याचे कारण सहा जागा कमीच होत्या हे त्यांना समजत नाही किंवा समजून घ्यायचे नसते. मग नशिबाला दोष देणे सुरू होते आणि त्यावर उपाय शोधले जातात. आधीची व्रतवैकल्ये सोडून नवी केले जातात. पण आपण जी मेहनत आधी केलीय ती वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे हे समजून घेतले जात नाही.

आणि व्हॉटसपला का उगाच बदनाम करायचे. ते फक्त एक माध्यम आहे. त्यातून आपण पुढे काय पसरवत आहोत हे महत्वाचे.
हजारो वर्षे पसरलेल्या या दंतकथातील संदेश शोधण्यापेक्षा या शतकातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या सत्य कथांतून नाही का हा मेहनतीचा संदेश जाऊ शकत...

आज जे बाबा लोकं पकडले गेले ते पकडले गेले. जे नाही पकडले गेले ते हजार वर्षांनी संत म्हणूनच ओळखले जाणार. तरी नशीब हल्ली जे घडते त्याचे डॉक्युमेंटेशन होते. अन्यथा पकडले गेले त्या बाबांनाही त्यांच्या अनुयायांनी संत म्हणूनच अजरामर केले असते. हजार वर्षांनी कोणी खरेखोटे करत बसले नसते.
या दंतकथांमागच्या श्रद्धा ईतक्यासाठीच तग धरून आहेत की आपण टाईममशीनमधून त्या काळात जाऊन खरे खोटे करू शकत नाही.

तळटीप - रामायण महाभारत या कथा म्हणून क्लासिकल आहेत. यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. वर जे भाष्य केले आहे ते त्यात वा पुराणात घुसडलेल्या दंतकथांबद्दल आणि त्यानिमित्ताने सांगितलेल्या व्रतवैकल्ये पूजापाठाबद्दल.

Pages