अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )

Submitted by अविनाश जोशी on 19 October, 2017 - 04:50

अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )

या देवीचे वर्णन आगम व विष्णुपुराण यांतआढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय. शीतलादेवीचे स्वरूपही काही अंशी अलक्ष्मीसारखेच आहे. या वर्णनाशी जुळणार्या काही मध्ययुगीन शिल्पकृती.हिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी आश्विन शु. अष्टमीस महालक्ष्मीच्या पूजेआधी ज्येष्ठा या नावाने हिची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन करतात. ही घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती घराच्या कोनाकोपर्यात फिरवून पुढील दारी आणुन टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखविणे होय. याच्याउलट बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखविणे, असे समजतात. बंगालमध्ये आश्विनी अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.आश्विन अमावस्याया दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर देव, पितृ व पूज्य लोकांची पूजा करून दूध, दही, तूप इ. ने श्राद्ध करावे. अपरान्हवेळी आपल्या गल्लीतील घरे स्वच्छ करवून घेऊन सुशोभित करावीत व विविध प्रकारचे गायन-वादन, नर्तन-कीर्तन इ. करून प्रदोषकाळी दिवाळी करून आप्तजन व संबंधितांसह मध्यरात्री निरीक्षण करावे. नंतर रात्रीच्या राहिल्या भागात जागरण करून सूप व डमरू जोराने वाजवून अलक्ष्मीला ( दरिद्रतेला ) हाकलावे.

----------------------

कौमुदी महोत्सव

वर वर्णन केलेल्या पद्धतीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या ठाकठीक असताना दिवे प्रज्वलित करणे यासच हे नाव आहे. बलिपुराणानुसार व. एकादशी ते अमावस्येपर्यंत हे व्रत करतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरचे काही प्रतिसाद वाचुन शनिवारी आमच्याईथल्या गणपती मंदिरात घडलेला एक प्रसंग आठवला.

या शनिवारी कसलीशी पुजा होती गणपती मंदिरात तर त्याच्या शेवटी जेव्हा आरती चालु झाली तेव्हा आरतीचे ताट तीथे ऊभे असलेल्या बर्याच जणांच्या हातात देत होते पुजारी, तेव्हा तीथे एक विधवा स्त्री सुधा होती, पुजार्यांनी तीच्याही हातात ती थाळी दिली.
हे पाहुन ते मंदीर ज्यांनी बांधलेय अन त्याची देखभाल करतात त्या कुटुंबातील एक स्त्री पुजार्यावर भडकली की आरतीची थाळी विधवेच्या हातात का दिली त्याने अपशकुन होईल ईतकेच नव्हे तर तीने पुजार्यालाही कामावरुन काढले अन दुसरा पुजारी ठेवला.

गेले दोन दिवस सगळे कुजबुज करतायेत ह्या प्रसंगाची पण त्यावेळी तीथे कोणीच काही बोलले नाही.

हे सर्व मी माझ्या मैत्रीणी अन आई कडुन ऐकलेय कारण मी नास्तीक असल्यामुळे ना मंदीरात जाते ना देव किंवा कुठल्या भोंदु बाबावर विश्वास आहे.

गेले दोन दिवस सगळे कुजबुज करतायेत ह्या प्रसंगाची पण त्यावेळी तीथे कोणीच काही बोलले नाही.
>>>>>
यात काही नवल नाही.
सरकारी जाचक कायद्यांविरुद्ध आवाज उठवणे सोपे असते. धर्माच्या चौकटीत जे कायदे (प्रथा) येतात त्यांच्याविरुद्ध जायला किंचित धाडस लागते.

पाळल्याने नुकसान तर होत नाही ना.. चला नाही केली विधवेने आरती तर काय तिच्यावर एवढे मोठे आभाळ कोसळणार आहे.. कश्याला एवढ्यातेवढ्यासाठी हजारो वर्षांच्या प्रथापरंपरांविरुद्ध आवाज उठवा. कश्याला कोणाची श्रद्धा दुखवा.. त्यापेक्षा विधवांचे पुनर्वसन करा. त्याची जास्त गरज आहे.. वगैरे वगैरे.. पण ही अशी वेगळी वागणूक मिळणे त्या विधवेसाठी त्रासदायक असू शकते हे लक्षात येत नाही.

आता या चर्चेत अश्याही पोस्ट येतील, आमच्याकडेही अमुक तमुक पाळले जाते, पण हा विधवा वगैरे भेद कधी केला जात नाही. पण कदाचित तिथे वेगळे भेद पाळले जात असतील. असतीलच असे नाही, पण एकदा सारासार विचार न करता हे प्रथापरंपरात हजारो वर्षापासून चालत आलेय तर पाळा असे ठरवले तर सगळेच न पटणारे धुडकावणे शक्य होत नाही.

या गोष्टीचा आपण वेगळ्या तर्हेने विचार करू
वेद व उपनिषद मधील तत्वन्यान पुढे गोष्टीत रूपांतरित झाले. हा शंकराचार्यांचा द्वैत /अद्वैतवाद आहे. गीतेत सांख्ययोगात २-१४ /१५
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ (१४)
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ (१५)
यात किंवा २-२८, २ .१७ -१८ , १४ .२४ -२५ आणि १५ .५ .वेगवेगळ्या तर्हेने मांडले आहे.
लक्ष्मी आणि अलक्ष्मी एकाच नाण्याच्या दोन आजू आहेत. तुम्हाला नाणं स्वीकारावे लागेल. हा आशय स्वतंत्र धागा होईल .
२१ व्य शतकातही या गोष्टीचे महत्व अबाधित आहे नव्हे पार Wave Equation शी संबंधित आहे

तुम्ही कथा वाचली आहे असे प्रतिसादात दिले म्हणून प्रश्न विचारला होता. पण उत्तर नाही असे दिसते आहे.>>>>>

कथा वाचून खूप वर्षे झालीत, त्यामुळे आता नावे लक्षात नाही व मी जर श्यामभट नाव दिले तरी त्यावर वाद होऊ शकतो की रामभट का नाही किंवा भटच का म्हणून. माझी सगळी पुस्तके मी गावी नेऊन ठेवली, इथे जागा नाही म्हणून. त्यामुळे आता नाव शोधुही शकत नाही. म्हणून तुम्हाला रस असेल तर तुम्ही वाचा म्हटले.

बाकी तुम्हाला किंवा इतर कोणालाही जे काय निष्कर्ष काढायचे असतील ते काढायला ते मोकळे आहेत.

अलक्ष्मी म्हणजे खरे तर लक्ष्मीचा अभाव. अस्तित्व आणि अभाव यात जो विरोध आहे तोच लक्ष्मी आणि अलक्ष्मीमध्ये आहे. ती एक संकल्पना आहे. पण कुठलाही भाव सगुण- मूर्त स्वरूपात समोर आल्याशिवाय तो आम्हांला भावत नाही. म्हणून आम्ही पुराणांतून आख्यायिका रचल्या . पण अलक्ष्मी ( किंवा आपल्याकडची आक्काबाई) ही प्रसन्न करणारी देवता नाही. तिने आपले काही वाकडे करू नये म्हणून तिला खुश राखायचे एव्हढेच. श्रीसूक्तात ' अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे', ' मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी:' , ' अलक्ष्मीं नाशयाम्यहम ' असे उल्लेख आहेत. मरीआई यांचा कोप होऊ नये म्हणून आपण धडपडतो किंवा एकेकाळच्या विघ्नकर्त्या गणपतीला खुश राखता राखता आपण त्याला विघ्नहर्ता बनवून टाकले त्याच तऱ्हेने अलक्ष्मी देवता बनली.
केरसुणी ही लक्ष्मी समजली जाते, अलक्ष्मी नव्हे. घरातला केरकचरा, अमंगळ ते सर्व बाहेर टाकणारी, मांगल्य , पावित्र्य सुखसमाधान वाढवणारी अशी ती, म्हणून तिला काही ठिकाणी वाढवण म्हणतात. विक्रम संवत वर्षाच्या शेवटच्या रात्री जुन्या केरसुणीने कचरा काढून तो सुपात भरायचा, आणि हळदकुंकू वाहून केरसुणीसकट उकिरड्यावर नेऊन ठेवायचा अशी पद्धत आहे. नव्या पहाटे नव्या केरसुणीची पूजा करून ती वापरायला काढायची. केरसुणीला पाय लावू नये किंवा ती जमिनीवर आपटूही नये अशी रीत आहे.
मरीआई, महामारी या देवता आता शहरी जीवनातून हद्दपार होत आहेत, देवी आल्यावर भजन करून शितळादेवीला संतुष्ट करण्याची प्रथासुद्धा देवी या रोगासोबत नष्ट झाली आहे तशीच काही काळाने ही अलक्ष्मीची आख्यायिकासुद्धा पोथ्यापुराणांतच राहील, प्रत्यक्ष जीवनातून नाहीशी होईल.

अविनाश जोशींनी दिलेली वरची लिंक ही छद्मविज्ञाना / छद्मज्ञान व छद्ममाहिती (असा शब्द असेल तर) याचे उत्तम उदाहरण आहे. आइन्स्टाइनने भारतीय तत्वज्ञानाचा गाढ अभ्यास केला आहे वा त्यातील वचनांने कुठे संदर्भ दिले आहेत असा एकही संदर्भ नाहिये. नील्स बोहर व हाइझेनबर्गच्या संशोधनाचा वेदांशी उगाच ओढून ताणून संबंध लावलेला आहे. इथरची संकल्पना पुढे बाद झालेली असताना ती कशी वेदातून आली होती हे सांगून काय साध्य झाले ते लेखकालाच ठावूक.

खालचे विधान तर संपूर्ण लेख किती हास्यास्पद आहे हे ठळकपणे दर्शविण्यासाठी बहुतेक लेखकानेच मुद्दामून ठळक अक्षरात लिहिलेले दिसते.

WERNER HEISENBERG’S UNCERTAINTY PRINCIPLE, WHICH STATES THAT WE CANNOT MEASURE BOTH THE POSITION AND MOMENTUM OF A PARTICLE AT THE SAME TIME, IS ALSO A REFLECTION OF THE ADVAITIC APHORISM OF ROPE AND SNAKE;“ WHEN A SNAKE IS SEEN IN THE PLACE OF A ROPE, ONLY THE SNAKE IS SEEN AS REAL. BUT IS IT INDEPENDENTLY REAL?”.

टेस्ला, श्रोडिंजर, आईनस्टाईन, बोहर इंटरेस्टिंग माहिती.
श्री़कृष्ण रणांगणावरुन डिप्लोमसी करायला गेला तेव्हा अर्जुनाच्या रथाचे इतर कोणी सारथ्य केल्याचा उल्लेख नाही. तरीही अर्जुनाने त्याकाळात परक्रम गाजवल्याचा मात्र ठळक उल्लेख आहे, हे कसं झालं असेल याचा विचार करता, अर्जुनाचा रथ हे सेल्फ ड्रायव्हिंग कारचे आद्य उदाहरण आहे हे संशोधकांच्या लक्षात आले आणि आता त्यावर अधिक संशोधन चालू आहे.
संजयाच्या दिव्य दृष्टी बद्दल अनेक आख्याईका आहेत. पण व्यासांनी खुबीने नॅनो सॅटेलाईटचा उल्लेख टाळलेला आहे. गो प्रो प्रकारच्या ड्रोन वरील एचडी कॅमेराद्यारे फोकस करत संजय हे सर्व बघत होता. द्रोणाचार्य म्हणजे द्रोण म्हणजे एक व्यक्ती मानून आपण सगळं महाभारत वाचत आलोय पण द्रोण ही व्यक्ती नसून एक संकल्पना आहे. तो ड्रोनचा अपभ्रंष आहे. ग्रो प्रो प्रकारची साधने तेव्हा उपलब्ध होती याचाच हा पुरावा आहे.

हंम्म्म अमित इंटरेस्टिंग थिअरी,
पण मला पत्रावळकर शास्त्र्यांची थिअरी जास्त पटते.
द्रोण ही 'एक' व्यक्ती नाही, तर एक पिढीजात गुरुपरंपरा आहे,
महाभारतात त्यांचे स्थान गुरू चे आहे, पिढ्यान्पिढ्याचे ज्ञान जो आपल्यात साठवतो तो "द्रोण" (सारेच धर्म मूळ सनातन धर्मातून बाहेर आलेले असल्याने , ख्रिस्ती धर्मातील होली ग्रेल चे या कल्पनेशी साधर्म्य दिसते यात नवल नाही, परत त्यात ख्रिस्ताची भूमिका ज्ञान देणाऱ्या मार्गदर्शकाची आहे हे साम्य टाळता येणार नाही)

आजही ती परंपरा अखंडित चालू आहे,
ही परंपरा लोकांसमोर आणण्याचा नतद्रष्ट प्रयत्न खुद्द अमिताभ बच्चन ने " द्रोणा" चित्रपट काढुन केला, पण या परंपरेतील लोकांनी त्याला धमकावून बराच भाग कापायला भाग पाडले, परिणामी चित्रपट लोकांना कळला नाही आणि फ्लॉप झाला.
तर ते एक असो...

मरीआई, महामारी या देवता आता शहरी जीवनातून हद्दपार होत आहेत,
>>>>

एक शंका - मरीआई आणि ख्रिश्चनांची मदर मेरी एकच का? त्याचाच अपभ्रंश आहे का?

द्रोणात ते आपले ते हे गोळा करून मग त्या गोळ्याचे तुकडे अन तुकडे घ्रुतकुंभात वगैरे आयव्हिएफ अन टेस्टट्यूब बेबी अन कायकाय ते विसरलात की काय? ड्रोण ही नक्कीच परंपरा आहे. मल्टिफॅसेटेड.

ता.क.
नुस्तंच आप्लं ते हे असेल तर ते मोनोसेक्सुअल क्लोनिंग होईल. नैका?

एक शंका - मरीआई आणि ख्रिश्चनांची मदर मेरी एकच का? त्याचाच अपभ्रंश आहे का?
<<
माझे पर्तिसाद चोरत जाऊ नकोस.

यक्स्प्लेन करून सांगतो.

एकतर हे (मरी आई = मदर मेरी) मी आधी बहुदा तुझ्याच धाग्यावर लिहिलंय तिकडे. (लिंक सापडली की देतो)

दुसरं,,

लॅटिन अमेरिकेत लोकल इंका माया वगैरेंचा पाडाव झाला, त्यात एक मोठे कारण म्हणजे युरोपियनांनी सोबत आणलेले अनेक साथीचे आजार, ज्यांच्यासाठी लोकल्सकडे इम्युनिटी नव्हती. ते झाले रेड इंड्यन्स.

युरोपियन्स "हॉली"डेजना फेर्‍या काढत्/तात. मेरी आईचे फोटो सोबत मिरवत Wink त्याला म्हनतात मरी आईचा फेरा.
आपल्या नुस्त्याच इड्यन लोकान्ना पण तेच झालं असेल. मरीआईचा फेरा गेला की लोकं पटापट आजारी पडाय्ल्यात.

मंग भो बकरं मार त्या मरी आईला Wink

जरीमरी हे नाव जारणमारण या शब्दावरून आले आहे. जारणमारण करणारी शक्ती ती जरीमरी आई.
केरळी मंगलोरी क्रिस्टिअनांमध्ये मरियम, मरिअम्मा अशी नावे असतात ती मदर मेरीवरून ठेवलेली असतात. त्यांच्याकडे प्रौढ स्त्रियांना संबोधताना त्यांच्या नावापुढे आदरार्थी 'अम्मा' शब्द जोडण्याची पद्धत असते. मुस्लिमांमध्ये देखील मरिया, मारिया, मरियमबी अशी नावे असतात, ती त्यांच्या इतिहासकालीन पार्श्वभूमीतून आली आहेत. मरिया, युसुफ(जोजफ), इब्राहिम(एब्रहॅम), दाउद(डेविड), हव्वा(ॲवा,ईव) अशी अनेक पैगंबरपूर्वकालीन नावे मुस्लिमांमध्ये असतात.
अम्मा म्हणजे अर्थात आईं . हा शब्द एकतर ' मातृ' या संस्कृत शब्दावरून आलेला असू शकतो किंवा काही विद्वानांच्या मतानुसार अंब, अम्म स्वरूप जुन्या तमीळ (द्रवीड) मुळावरूनही आलेला असू शकतो.

आरारा, हो लिहिले असेल तुम्ही, मी वाचलेही असेल, सध्या आठवत नाही नेमके, मात्र ही शंका माझ्या मनाच्या कोपरयात फार पहिलेपासून होती हे देखील खरे.
असो, माहितीबद्दल धन्यवाद.
मूळ धागा आणि यात नवनवीन येणारे वेगळेच ट्रॅक, यातून माहिती मात्र बरीच नवीन मिळत आहे.

(सारेच धर्म मूळ सनातन धर्मातून बाहेर आलेले असल्याने , >>>
वर सनातन धर्माचा उल्लेख आल्याने येथेच लिहीतो.
'सनातन धर्म' म्हणजे काय समजावून घेतलेत का कधी?? मान्य आहे, 'दास आणि दास्यू' सारखी वर्णाचाराची जळमटं मुळ धर्मसिद्धान्तावर बसलीत किंवा जाणूनबुजून बसवली गेलीत. पण त्यापलीकडे जाऊन बघायला नको का?
आत्मसाक्षात्काराचा अनुभव देणारा एकमेव शाश्वत मार्ग आहे सनातन धर्म! आत्मोन्नति, विश्व चालविणारे किंवा विश्व ज्या नियमांवर चालतं ते नियम आणि भगवद्गीता-ज्ञानेश्वरीतील प्रत्येक वचनाची सुस्पष्ट आणि नि:संदिग्ध अनुभूति देणारा राजमार्ग आहे सनातन धर्म! पण हे सगळं प्रत्यक्ष पडताळून बघण्यासाठी त्याच योगमार्गावरून चालण्याची स्वत:ची इच्छा आणि तयारी हवी तरच निरनिराळे 'चष्मे' दूर होऊन तुम्हा-आम्हाला काहीतरी दिसेल. नसेल तयारी तर चालू द्या, हिंदूंनी जपवणूक केलेल्या सनातन धर्माची टिंगलटवाळी!!! पण यामुळे साध्य काहीच होणार नाही अन् एके दिवशी तुम्ही-आम्ही 'असेच' मरून जाणार आहोत. पण एक मात्र नक्की ह्या असल्या टिंगलटवाळीमुळे एके दिवशी सार्याचा उद्रेक होईल आणि ज्यांना मुळ सनातन धर्म म्हणजे काय हेच माहित नाही असे तथाकथित सनातनी हातांत शस्र घेऊन टिंगलटवाळी करणार्यांवर तुटून पडतील. दोन्ही बाजूंनी मोठा रक्तपात घडेल, हिंसाचार होईल. हाताबाहेर परीस्थिती गेल्यावर कुणीच (कोणाचंही आणि कुठलंही सरकार) काहीच थांबवू शकणार नाही. देशातलं वातावरण बघा, राजकारण बघा ते अशाच भल्यामोठ्या उद्रेकाकडे वाहत चाललेलं आहे. ( उदाहरण म्हणून गोरक्षक हा संदर्भ घेऊन बघा.) तुम्ही आम्ही टिंगलटवाळी करून, हिंदूंच्या भावनांशी खेळून अप्रत्यक्षपणे होऊ घातलेल्या उद्रेकाला खतपाणी घालतो आहोत हे लक्षात येतंय का?

[ Disclaimer- वरील प्रतिसादातील 'सनातन', 'सनातनी' शब्द कुठल्याही संस्थांशी संबंधीत म्हणून वापरलेले नसून, 'सनातन धर्म आणि त्या धर्माचे पुरस्कर्ते, त्या मार्गावरून चालणारे' या अर्थाने वापरले आहेत याची नोंद घ्यावी.]

नक्की काय आहे सनातनी धर्म , सनातन किंवा त्या मार्गावरुन चालनारे सनातनी लोक ???? मला खरंच काही कल्पना नाही.

जगात चार प्रकारची माणसे आहेत....
१)विशाल हृदय..आपण न खाता दुसर्यास देतो तो....

२)उदार हृदय...
आपण खातों व दुसऱ्यासही देतो...

3)अनुदार हृदय...
दुसऱ्यास न देता स्वतः च सर्व स्वाहा करतो तो

आणि

४)कृपण हृदय
जो आपण ही खात नाही आणि दुसऱ्यासही देत नाही...

त्याच प्रमाणे प्रतिसाद देणारे चार प्रकार आहेत. आपापली टोपी निवडावी

Pages