साक्षात्कार

Submitted by सेन्साय on 14 October, 2017 - 11:45

.

.

जैसे व्यष्टि तैसेचि समष्टि
कशास जोजावणे संजय दृष्टी
किमर्थ होईतसे जीव कष्टी
अदृश्यास जाणावया ...?

जीव आला , तरुनी गेला
कर्मफलातुनि प्रारब्ध जाहला
जीव घाबरला , वाहुनी गेला
वृथा भविष्याच्या नादी लागला

उद्धरेत आत्मानं स्मृति वचने
स्व-सामर्थ्यासी जो जागृत असे
सद्गुरु परमात्मा काया वाचा मने
एक पाऊल पुढे तत्पर असे

नित्य स्व-धर्माचे पालन
उचिताचे शुद्ध अनुसरण
सहजी मार्गे पाप क्षालन
कृत कल्याण जीव सदा

नि:सारण अज्ञान भय अंधकार
जाज्वल्य भक्तिचा जेथे भुभुत्कार
मन:सामर्थ्यदाता हांची स्विकार
तोचि खरा जाण रे साक्षात्कार

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy पंडितजी धन्यवाद
आज एक प्रसंग घडला जेथे ह्या विषयावर बोलणे झाले माझे
अन संध्याकाळी सर्व आठवलं तेव्हा ते शब्दबद्ध झाले इथे