Submitted by सुप्रिया जाधव. on 4 October, 2017 - 00:23
तरहीच्या ओळीसाठी बेफिजींचे आभार मानून ...
गैरसमजूतीत ह्या आयुष्य सरले आजवर
मीच संसारात सारे रंग भरले आजवर
स्तब्ध होता चंद्र आणिक स्तब्ध दर्यातीरही
चांदणे होवून लाटेवर विखुरले आजवर
तो म्हणाला की तुझ्यावर प्रेम केले मी खरे
फक्त तो म्हणतो म्हणुन ते ग्राह्य धरले आजवर
बाळ पायावर उभे राहील तोवर हात दे
हात कोणाहीपुढे नव्हते पसरले आजवर
लालिमा उरतो नभी अस्तास गेल्यावर रवी
मी स्वतःला विझवताना हेच स्मरले आजवर
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख गझल..आवडली.
सुरेख गझल..आवडली.
छान! आवडली.
छान! आवडली.
सुरेख गझल सुप्रिया ताई,
सुरेख गझल सुप्रिया ताई, वहीत लिहून घेते.
गैरसमजूतीत ह्या आयुष्य सरले
गैरसमजूतीत ह्या आयुष्य सरले आजवर
मीच संसारात सारे रंग भरले आजवर
तो म्हणाला की तुझ्यावर प्रेम केले मी खरे
फक्त तो म्हणतो म्हणुन ते ग्राह्य धरले आजवर
अप्रतिम..!