मीच संसारात सारे रंग भरले आजवर ( तरही )

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 October, 2017 - 00:23

तरहीच्या ओळीसाठी बेफिजींचे आभार मानून ...

गैरसमजूतीत ह्या आयुष्य सरले आजवर
मीच संसारात सारे रंग भरले आजवर

स्तब्ध होता चंद्र आणिक स्तब्ध दर्यातीरही
चांदणे होवून लाटेवर विखुरले आजवर

तो म्हणाला की तुझ्यावर प्रेम केले मी खरे
फक्त तो म्हणतो म्हणुन ते ग्राह्य धरले आजवर

बाळ पायावर उभे राहील तोवर हात दे
हात कोणाहीपुढे नव्हते पसरले आजवर

लालिमा उरतो नभी अस्तास गेल्यावर रवी
मी स्वतःला विझवताना हेच स्मरले आजवर

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गैरसमजूतीत ह्या आयुष्य सरले आजवर
मीच संसारात सारे रंग भरले आजवर

तो म्हणाला की तुझ्यावर प्रेम केले मी खरे
फक्त तो म्हणतो म्हणुन ते ग्राह्य धरले आजवर

अप्रतिम..!