" परी "

Submitted by सेन्साय on 10 October, 2017 - 04:02

.

.

निखळ हासिरी
मनमुक्त विहारी
गोड गोजिरी
छान एक परी

वेचत मकरंद जीवनाचा
वाऱ्यासंगे हिची फेरी
सवे कुंद कळ्यांच्या
बनली ही पवनपरी

स्वप्नं सुंदर पेरत
नभांगणी स्वारी
आकांक्षापूर्ती
सर्व मनोहारी

कुणी दावेल ममत्व
कुणास लाभेल स्वामित्व
आयुष्य सुंदर फुलवणारी
नित्य भरती सागरापरी

प्रत्यक्ष ही वसुंधरे वरी
भेट ही दैवी ईश्वरी
लाभों सर्वांस ऐसी
जीवनी एक परी

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा क्या बात Happy
वेचत मकरंद जीवनाचा
वाऱ्यासंगे हिची फेरी
सवे कुंद कळ्यांच्या
बनली ही पवनपरी >>> मस्तच अंबज्ञ Happy

धन्यवाद नीलम
परीकविता ..
कवितापरी ..
म्हणून दोन्हीही सुंदर Happy