एक परफेक्ट नॉनसेन्स ! - जुडवा - २ (Movie Review - Judwaa 2)

Submitted by रसप on 3 October, 2017 - 01:59

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता - 'Sins are like Credit Card. Enjoy now, pay later!'
एन्जॉय करून झालं आहे, आता पे-बॅक करतो !

1506607644_judwaa-2-poster.jpg

पहिला जुडवा खूप पूर्वी पाहिला होता. इतका फरगेटेबल की, तो एकसलग पाहिला होता की तुकड्या-तुकड्यांत तेही आठवत नाहीय आता ! त्यावेळी तर सलमान जामच सुमार होता, त्यामुळे असह्यही होता. पुन्हा कधी तो पाहायची हिंमत करावीशीच वाटली नव्हती. (सलमान आता पुन्हा सुमार झाला आहे. 'सुमार -> अतिसुमार -> बरा -> सहनीय -> सुमार' असा ग्राफ असलेला हा एकमेव 'अ‍ॅक्टर(?)' असावा बहुतेक !)
रिमेकसुद्धा पाहिला नसताच पण, स्त्री-हट्टापुढे कुणाचे काय चालणार ? मॅडमनी हुकुम सोडला आणि मी गपगुमान तिच्यासोबत गेलो. खरं तर तिने हट्टाने पाहायला लावलेल्या काही सिनेमांच्या आठवणी भयाण आहेत. उदा. - जब तक हैं जान, हॅप्पी न्यू इयर, तीस मार खान, दिलवाले, वगैरे. अर्थात, चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस अश्या शाहरुखपटांनी जरासा बॅलन्सही केला होता. पण तरी भयाण आठवणी स्वत:चा भयाणपणा कधी कमी होऊ देत नसतातच. त्यामुळे मनात धाकधूक घेऊनच गेलो 'जुडवा-२' ला.
ह्या धाकधुकीचं दुसरं कारण म्हणजे धवनपुत्र ! 'वरुण धवन' हा वरून, खालून, डावी-उजवीकडून सगळीकडूनच सल्लूइतका उल्लू नसला, तरी ती दोन गरीबांमधली भाग्यवान तुलनाच आहे. 'बदलापूर'मध्ये तो मला आवडला होता. अगदी, 'ढिशुम'मध्येही आवडला होता. पण तसा तर सल्लूसुद्धा 'दबंग' आणि 'वॉण्टेड' मध्ये आवडला आहेच.
असो.

तर 'जुडवा-२' पाहिला आणि चक्क आवडलाही !
फार ताणला आहे आणि शेवटाकडे अगदीच रिडीक्युलसोत्तम वगैरे लेव्हल गाठली आहे, पण तरी ओव्हरऑल मजा आलीच ! अनेक वेळा खळखळून हसलो.. अनेक वेळा गडगडाटीसुद्धा हसलो ! जुन्या 'जुडवा'मधल्या सल्लूच्या टुकार आठवणी वरुणने पुसून टाकल्या आहेत. अर्थात, सिनेमा संपल्यावर सल्लू पडद्यावर डोकावून जातोच आणि मजबूत पीळतोच. पण ते 'सिनेमा संपल्यावर' असल्यामुळे तेव्हढा भाग आपण नाही पाहिला तरी चालतंय.

सिनेमाचं कथानक सर्वांना माहित असावंच. त्यामुळे त्यावर रेंगाळत बसत नाहीय. डायरेक्ट काय आवडलं, काय नाही, ह्यावरच येतो.

'जॅकलिन फर्नांडीस' ही मला पूर्वी अजिबात आवडायची नाही. (Yes ! I am sorry for this !) पण आता हळूहळू आपुन का उस पे दिल आ रैलाय. जामच खट्याळ सौंदर्य आहे हे ! तिचा स्क्रीन प्रेझेन्स चिल्ड बियरच्या पहिल्या घोटासारखा असतो. अतिशय बोलका चेहरा, जबरदस्त आत्मविश्वास, दिलखेचक अदा आणि डवरलेल्या मोगऱ्याचं सौंदर्य असं डेडली कॉम्बिनेशन असलेली ही गुलबदन नशिल्या नजरेने सटासट बाण सोडून घायाळ करते !
ऑन द अदर हॅण्ड, 'तापसी पन्नू' म्हणजे उकडलेल्या भाज्यांच्या सलाडसारखी अळणी, बेचव वाटते. तिने बेबी, नाम शबाना, पिंक सारखे सिनेमेच करावेत. रोमॅण्टिक वगैरे रोल्समध्ये तिचा खप्पड मरतुकडेपणा फारच खटकतो. जोडीला जॅकलिन असल्यामुळे तर ती जास्तच मिसफिट वाटते.
राजपाल यादवने शक्ती कपूरची इरिटेटिंग उणीव भरून काढली आहे. प्रचंड बोअर करतो !
खेडेकर, खेर, झाकीर हुसेन वगैरे मंडळी मस्तच, पण सपोर्ट कास्टमध्ये भाव खाललाय तो लंडनमधला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेतल्या 'पवन मल्होत्रा'ने !

'म्युझिक' नावाचा भिकार प्रयत्न चांगला जमून आलाय. कारण ते उच्चतम भिकार बनलं आहे. पण आत्तापर्यंत आपण सुमार संगीताला सहन करण्याची दुर्दैवी सवय करून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या भिकारपणाबद्दल काही वाईट वाटत नाही.

'डेव्हिड धवन' हे एक अजब रसायन आहे. पंचवीस वर्षं झाली, हा माणूस प्रेक्षकांची नस पकडून आहे. प्रेक्षक बदलतो, तसा हा पुन्हा नव्याने नस पकडतो आहे. वीस वर्षांपूर्वीच्या 'जुडवा'ला पुन्हा घेऊन येताना त्याने योग्य तो मसाला वाढवला आहे आणि नको तो कमीही केला आहे. बिनडोक सिनेमा बनवावा, तर तो डेव्हिड धवनने. बाकी कुणाचं काम नाही ते. कारण प्रत्येक जण, स्वत:च्याच नकळत असेल पण, कुठे न कुठे तरी जरासा सेन्सिबल वगैरे होतो आणि मग सगळं मिसमॅच होतं. 'अथ:'पासून 'इति'पर्यंत 'नॉट-टू-मेक-सेन्स' हे सूत्र जपणं, नक्कीच सोपं नसावं. जाणीवपूर्वक आउटराईट नॉनसेन्स करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते, हे निश्चितच.
इथेच भन्साळीसारखे लोक कमी पडतात. कारण त्यांच्या स्वत:च्या नकळत 'नॉनसेन्स' बनत असतो आणि डेव्हिड धवनसारखे लोक विचारपूर्वक 'नॉनसेन्स' बनवतात. हाच परफेक्शनचा फरक असावा. 'जुडवा' हा एक परफेक्ट नॉनसेन्स आहे. ह्या कहाणीची मुळं 'जॅकी चॅन' च्या 'ट्विन ड्रॅगोन' नामक सिनेमापर्यंत जातात असं म्हणतात. जातही असतील, अपने को क्या ! तूर्तास तरी 'मॅडम'चा हट्ट पुरवण्यापूर्वी जी धाकधूक मनात होती, तिच्या जागी 'रिफ्रेश' झाल्याचं फिलिंग आलं आहे. कारण आपल्या रटाळ रुटीनमधून बाहेर पडण्यासाठी कधी कधी एखादा आउटराईट नॉनसेन्स असलेला मूव्ही रामबाण उपाय ठरत असतो !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2017/10/movie-review-judwaa-2.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ती डोक्यावर पडलेली वाटते, एक दोन मुलाखतित नुसतिच वेडयासारखी अति नाटकी हसत होती, अभिनय हा शब्द म्हणता आला तरी पुरेय! बाकी अ‍ॅव्हेरेजच आहे दिसायला.

हो ! ती जरा जास्तच हसते याबद्दल सहमत .पण त्याबद्दलच आवडते ती एका मित्राला.
गोंडस हसमुख कन्या आहे असे त्याचे मत आहे Happy

जाई मी थांबलेच होते. पण चर्चा 'माझ्या' प्रतिसादावरून गंभीर वळणावर नेलीस म्हणून 'मला' काय म्हणायचे होते हे स्पष्ट केले.

सॉरी साजिरा, सगळ्या भानगडीत तुला उत्तर द्यायचे राहून गेले. वाणी कपूरला मी पडद्यावर अजुन पाहिले नाहिये. तिचे फक्त ते रणबीर सिंग बरोबर एक सिनेमा आलेला त्यातले एक गाणे थोडे पाहिले आहे.

ती जरा जास्तच हसते याबद्दल सहमत .पण त्याबद्दलच आवडते ती एका मित्राला.>> अगदी अगदी... मलाही ती त्याच कारणाने आवडते बहुदा...अभिनेत्री म्हणून बोंब आहे मात्र नटी (शोभेची बाहुली) म्हणून छान आहे व बॉलीवूडचे गरजेचे न्रुत्याविष्कारही छान जमतात.

मायबोलीवर शक्यतो अश्या कमेंट्स टाळता आल्या तर उत्तम .
नवीन Submitted by जाई. on 4 October, 2017 - 20:58

>>
१. 'अश्या कमेंट्स' ? काय विशेष आहे त्या कमेंटमध्ये? माझ्या मते अर्वाच्यातेला टाळून केलेली प्रत्येक कमेंट ही स्वीकारार्ह असायला हवी.
२. 'मायबोलीवर' का म्हणून ? पहलाज निहलानींची पुढची नेमणूक इथे केली गेलीय की काय ?

हा हा ! डायरेक्त पहलाज निहलानी ! बरीच मोठी व्यक्ती आहे ती Lol
तेवढी आपली पॉवर नाही . ते माझं वैयक्तिक मत आहे .
आणि तुम्ही बाकीच्या कमेंट्स वाचलेल्या दिसत नाहीत का ? मला ती कमेंट खटकली , सुनिधीने तिची बाजू मांडली . We agreed to disagree . that's it! उगाच विषय वाढवायची गरज नाही .

असा कसा विषय नाही वाढणार.. हे मायबोली आहे.. विषय वाढत जाणार म्हणजे जाणारच... अलरेदी याच्यावर एक धागा पण उघडण्यात आला आहे..
पॉपकॉर्न घ्या आणि एन्जॉय करा !

जुडवा या ईतक्या सुंदर चित्रपटावरचा धागा भरकटू नये म्हणून तो धागा उघडला आहे. माझे आवडते कलाकार सई, स्वप्निल, शाहरूख, अमेय वाघ ईत्यादी यांच्या दिसण्यावर मी मायबोलीवर बरेच कॉमेंट वाचल्या आहेत. त्या त्या वेळी एंजॉयही केल्या आहेत. मात्र अश्या कॉमेण्टस करणारया सर्वांसोबत एक सामूहीक चर्चा घडवायचा हेतू होता ईतकेच. यापुढे जेव्हा कोणी माझ्या आवडत्या कलाकाराबद्दल काही कॉमेंट करेल तेव्हा ती त्या धाग्यावर कॉपीपेस्ट करत त्याला जाब विचारणार Happy

चला या धाग्यावर या विषयावर ईतकेच...

पण जॅकलीनचे सौण्दर्य खरेच नकली वाटते. बार्बी डॉल टाईप्स... कम्पेरीटीवली आलिया भट गोड वाटते.

रसपना जॅकलीन आवडलीये सिनेम्यात.
पण समोर तापसी पन्नु असल्यामुली तुका म्हणए त्यातल्या त्यात प्रमाने आवडली असावी असं मला वाटतंय. Happy
ती इतकी पुरषी नाही वाटत. फक्त ते ह्या कानापासुन त्या कानाप र्यंतचं तोंडभर हसु जास्त होतं.
आणि सौदर्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात.

पण जॅकलीनचे सौण्दर्य खरेच नकली वाटते. बार्बी डॉल टाईप्स... कम्पेरीटीवली आलिया भट गोड वाटते.>>> २वेगळ्या आशियाई देशाच्या सौन्द्र्यतला फरक आहे तो.तेवढा असणारच.

इथेच भन्साळीसारखे लोक कमी पडतात. कारण त्यांच्या स्वत:च्या नकळत 'नॉनसेन्स' बनत असतो आणि डेव्हिड धवनसारखे लोक विचारपूर्वक 'नॉनसेन्स' बनवतात. हाच परफेक्शनचा फरक असावा. >> ह्या वाक्याला प्रचंड हसले आहे. बाकी चित्रपट बघेन किंवा नाही माहित नाही.

वेगळ्या आशियाई देशाच्या सौन्द्र्यतला फरक आहे तो.तेवढा असणारच
>>>
ओह जॅकलीन भारतीय नाहीये का?

ओह जॅकलीन भारतीय नाहीये का?>>>> नाहीये.बाकी एवढे गुगल करुन तु वेगवेगळ्या विषयावर माहिती घेऊन ? धागा काढतोच की रे.आता हे पण गुगल कर बरं. Happy

रसप,
आठवा तुमचे मागचे जॅकलीनच्या मागे आलेल्या मूवीचे परीक्षण ..

जॅकलीनचे डोळे न आवडण्यापासून ते नशीली वाटण्यापर्यंत बरीच प्रगती केलीत.. ते हि तिच्या एका मागोमाग आलेल्या मूवीच्या छोट्ट्या कालावधीत. चांगल्य. Wink

सिलेक्टिव्ह रीडर झंपी,

>> 'जॅकलिन फर्नांडीस' ही मला पूर्वी अजिबात आवडायची नाही. <<

हे लिहिलंय की. आठवा-आठवी करायची गरजच नाहीय.

धन्यवाद !

. (Yes ! I am sorry for this !)
हे पण लिहलाय की ... माफ करून टाका की राव..

Fernandez was born on 11 August 1985, in Manama, Bahrain,
Her father, Elroy, is Sri Lankan,
and her mother, Kim, is of Malaysian descent.
Her maternal grandfather is Canadian.

Jacqueline Fernandez (born 11 August 1985) is a Sri Lankan actress, model, and the winner of the 2006 Miss Universe Sri Lanka pageant.

घ्या शोधली गूगाळून हिस्टरी जॅकलीनची... हिस्टरी कमी आणि जीऑग्राफीच जास्त हाती लागली..
कुठून कुठून लोकं बॉलीवूडमध्ये येतात..... पण हवा फक्त पाकिस्तानातून आलेल्यांची होते Happy

and her mother, Kim, is of Malaysian descent.
Her maternal grandfather is Canadian. << आई मलेशियन आणि आजोबा कॅनडाचे कसे?

<< आई मलेशियन आणि आजोबा कॅनडाचे कसे?
सिम्पल लॉजिक हो... आज्जी मलेशियन असेल ना..
आजोबा कॅनडा वरून असले म्हणून काय.

रसप्,मी तुमच्या प्रगतीबद्दल चांगल्य लिहिलय की.. ते पण वाचून लिहा प्रतिसाद, इतकी घाई कशाला सिलेक्टेवली प्रतिसाद द्यायची.

काल जॅकलीन ला " जन्टलमॅन" मध्ये बघितलं .
तिला आणि सिद्धार्थ ला गुन्ड पकडून ठेवतात . त्यावेळी तिची बडबड मजेशीर वाटली Happy
बाकी सीन बावळट आहे .

कुठून कुठून लोकं बॉलीवूडमध्ये येतात..... पण हवा फक्त पाकिस्तानातून आलेल्यांची होते>>>> असहमत. Katrina Kaif पाकिस्तानची नाहिये.

Pages