एक परफेक्ट नॉनसेन्स ! - जुडवा - २ (Movie Review - Judwaa 2)

Submitted by रसप on 3 October, 2017 - 01:59

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता - 'Sins are like Credit Card. Enjoy now, pay later!'
एन्जॉय करून झालं आहे, आता पे-बॅक करतो !

1506607644_judwaa-2-poster.jpg

पहिला जुडवा खूप पूर्वी पाहिला होता. इतका फरगेटेबल की, तो एकसलग पाहिला होता की तुकड्या-तुकड्यांत तेही आठवत नाहीय आता ! त्यावेळी तर सलमान जामच सुमार होता, त्यामुळे असह्यही होता. पुन्हा कधी तो पाहायची हिंमत करावीशीच वाटली नव्हती. (सलमान आता पुन्हा सुमार झाला आहे. 'सुमार -> अतिसुमार -> बरा -> सहनीय -> सुमार' असा ग्राफ असलेला हा एकमेव 'अ‍ॅक्टर(?)' असावा बहुतेक !)
रिमेकसुद्धा पाहिला नसताच पण, स्त्री-हट्टापुढे कुणाचे काय चालणार ? मॅडमनी हुकुम सोडला आणि मी गपगुमान तिच्यासोबत गेलो. खरं तर तिने हट्टाने पाहायला लावलेल्या काही सिनेमांच्या आठवणी भयाण आहेत. उदा. - जब तक हैं जान, हॅप्पी न्यू इयर, तीस मार खान, दिलवाले, वगैरे. अर्थात, चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस अश्या शाहरुखपटांनी जरासा बॅलन्सही केला होता. पण तरी भयाण आठवणी स्वत:चा भयाणपणा कधी कमी होऊ देत नसतातच. त्यामुळे मनात धाकधूक घेऊनच गेलो 'जुडवा-२' ला.
ह्या धाकधुकीचं दुसरं कारण म्हणजे धवनपुत्र ! 'वरुण धवन' हा वरून, खालून, डावी-उजवीकडून सगळीकडूनच सल्लूइतका उल्लू नसला, तरी ती दोन गरीबांमधली भाग्यवान तुलनाच आहे. 'बदलापूर'मध्ये तो मला आवडला होता. अगदी, 'ढिशुम'मध्येही आवडला होता. पण तसा तर सल्लूसुद्धा 'दबंग' आणि 'वॉण्टेड' मध्ये आवडला आहेच.
असो.

तर 'जुडवा-२' पाहिला आणि चक्क आवडलाही !
फार ताणला आहे आणि शेवटाकडे अगदीच रिडीक्युलसोत्तम वगैरे लेव्हल गाठली आहे, पण तरी ओव्हरऑल मजा आलीच ! अनेक वेळा खळखळून हसलो.. अनेक वेळा गडगडाटीसुद्धा हसलो ! जुन्या 'जुडवा'मधल्या सल्लूच्या टुकार आठवणी वरुणने पुसून टाकल्या आहेत. अर्थात, सिनेमा संपल्यावर सल्लू पडद्यावर डोकावून जातोच आणि मजबूत पीळतोच. पण ते 'सिनेमा संपल्यावर' असल्यामुळे तेव्हढा भाग आपण नाही पाहिला तरी चालतंय.

सिनेमाचं कथानक सर्वांना माहित असावंच. त्यामुळे त्यावर रेंगाळत बसत नाहीय. डायरेक्ट काय आवडलं, काय नाही, ह्यावरच येतो.

'जॅकलिन फर्नांडीस' ही मला पूर्वी अजिबात आवडायची नाही. (Yes ! I am sorry for this !) पण आता हळूहळू आपुन का उस पे दिल आ रैलाय. जामच खट्याळ सौंदर्य आहे हे ! तिचा स्क्रीन प्रेझेन्स चिल्ड बियरच्या पहिल्या घोटासारखा असतो. अतिशय बोलका चेहरा, जबरदस्त आत्मविश्वास, दिलखेचक अदा आणि डवरलेल्या मोगऱ्याचं सौंदर्य असं डेडली कॉम्बिनेशन असलेली ही गुलबदन नशिल्या नजरेने सटासट बाण सोडून घायाळ करते !
ऑन द अदर हॅण्ड, 'तापसी पन्नू' म्हणजे उकडलेल्या भाज्यांच्या सलाडसारखी अळणी, बेचव वाटते. तिने बेबी, नाम शबाना, पिंक सारखे सिनेमेच करावेत. रोमॅण्टिक वगैरे रोल्समध्ये तिचा खप्पड मरतुकडेपणा फारच खटकतो. जोडीला जॅकलिन असल्यामुळे तर ती जास्तच मिसफिट वाटते.
राजपाल यादवने शक्ती कपूरची इरिटेटिंग उणीव भरून काढली आहे. प्रचंड बोअर करतो !
खेडेकर, खेर, झाकीर हुसेन वगैरे मंडळी मस्तच, पण सपोर्ट कास्टमध्ये भाव खाललाय तो लंडनमधला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेतल्या 'पवन मल्होत्रा'ने !

'म्युझिक' नावाचा भिकार प्रयत्न चांगला जमून आलाय. कारण ते उच्चतम भिकार बनलं आहे. पण आत्तापर्यंत आपण सुमार संगीताला सहन करण्याची दुर्दैवी सवय करून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या भिकारपणाबद्दल काही वाईट वाटत नाही.

'डेव्हिड धवन' हे एक अजब रसायन आहे. पंचवीस वर्षं झाली, हा माणूस प्रेक्षकांची नस पकडून आहे. प्रेक्षक बदलतो, तसा हा पुन्हा नव्याने नस पकडतो आहे. वीस वर्षांपूर्वीच्या 'जुडवा'ला पुन्हा घेऊन येताना त्याने योग्य तो मसाला वाढवला आहे आणि नको तो कमीही केला आहे. बिनडोक सिनेमा बनवावा, तर तो डेव्हिड धवनने. बाकी कुणाचं काम नाही ते. कारण प्रत्येक जण, स्वत:च्याच नकळत असेल पण, कुठे न कुठे तरी जरासा सेन्सिबल वगैरे होतो आणि मग सगळं मिसमॅच होतं. 'अथ:'पासून 'इति'पर्यंत 'नॉट-टू-मेक-सेन्स' हे सूत्र जपणं, नक्कीच सोपं नसावं. जाणीवपूर्वक आउटराईट नॉनसेन्स करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते, हे निश्चितच.
इथेच भन्साळीसारखे लोक कमी पडतात. कारण त्यांच्या स्वत:च्या नकळत 'नॉनसेन्स' बनत असतो आणि डेव्हिड धवनसारखे लोक विचारपूर्वक 'नॉनसेन्स' बनवतात. हाच परफेक्शनचा फरक असावा. 'जुडवा' हा एक परफेक्ट नॉनसेन्स आहे. ह्या कहाणीची मुळं 'जॅकी चॅन' च्या 'ट्विन ड्रॅगोन' नामक सिनेमापर्यंत जातात असं म्हणतात. जातही असतील, अपने को क्या ! तूर्तास तरी 'मॅडम'चा हट्ट पुरवण्यापूर्वी जी धाकधूक मनात होती, तिच्या जागी 'रिफ्रेश' झाल्याचं फिलिंग आलं आहे. कारण आपल्या रटाळ रुटीनमधून बाहेर पडण्यासाठी कधी कधी एखादा आउटराईट नॉनसेन्स असलेला मूव्ही रामबाण उपाय ठरत असतो !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2017/10/movie-review-judwaa-2.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथेच भन्साळीसारखे लोक कमी पडतात. कारण त्यांच्या स्वत:च्या नकळत 'नॉनसेन्स' बनत असतो आणि डेव्हिड धवनसारखे लोक विचारपूर्वक 'नॉनसेन्स' बनवतात. हाच परफेक्शनचा फरक असावा.

>>> हे जामच आवडलं!

"<जॅकलिन फर्नांडीस' = जामच खट्याळ सौंदर्य आहे हे ! तिचा स्क्रीन प्रेझेन्स चिल्ड बियरच्या पहिल्या घोटासारखा असतो. अतिशय बोलका चेहरा, जबरदस्त आत्मविश्वास, दिलखेचक अदा आणि डवरलेल्या मोगऱ्याचं सौंदर्य असं डेडली कॉम्बिनेशन असलेली ही गुलबदन नशिल्या नजरेने सटासट बाण सोडून घायाळ करते !> - एकदम दिल खेचक कॉम्बिनेशन!!!

छान लिहिलंय रसप.
जुडवा म्हणजे नॉन्सेन्सच असायला हवा.

जॅकलिन फर्नांडीस बद्दल जे काही लिहिलंय ते समोर तापसी पन्नु असल्यामुळे लिहिलंय ना? Lol

बिन्डोक सिनेमा, भन्साळीचं नकळत तयार होणारी नॉन्सेन्स कलाकृती Lol आणि
डेव्हिडची ठरवुन केलेली नॉन्सेन्स कलाकृती बद्दलचे दोन्ही पॅरा परफेक्ट.

पहिला जुडवा पाहिला नव्हता, हा ही बघायची मुळीच इच्छा नाही !
परिक्षण आवडलं.. विशेषतः 'सुमार -> अतिसुमार -> बरा -> सहनीय -> सुमार', जॅक्लिन आणि डेव्हिड धवन बद्दल च सगळंच पटलं आणि आवडलं Happy

रच्याकने मध्यंतरी आलेल्या 'शुभ मंगल सावधान' या सुंदर सिनेमाचं परिक्षण नाही लिहिलं का .. की मी मिसलं !

अज्जिब्बात बघेलसं वाटत नाही..

रच्याकने मध्यंतरी आलेल्या 'शुभ मंगल सावधान' या सुंदर सिनेमाचं परिक्षण नाही लिहिलं का .. की मी मिसलं !> >> मध्यंतरी आलेले बर्‍रेच सुंदर सिनेमे त्यांनी बघितले नसावे..

साजिद खान तिचा बॉयफ्रेंड होता आणि लिव्ह इन मध्ये होते हे वाचून धक्काच बसला..>>> होता हो...आता नाहीये.सुरुवातीचे पिकचर मिळवायला कोणालाही बॉयफ्रेंड बनवत असतील अभारतीय नटया.

बाकी जॅकीलीन भारी दिसली ,नाचली आहे.तापसी पण मला कमी नाही वाटली.उलट जुन्या चित्रपटातल्या रंभा पेक्षा तापसी ला जरा जास्त स्क्रीन टाईम मिळाला असेल.
मला फक्त गाण्यासाठी हा चित्रपट पाहायचा आहे.

त्यावेळी तर सलमान जामच सुमार होता>>> माझ्या बालपनातला हा अत्यंत आवडता चित्रपट.तेव्हा चलती है क्या नौ से बारा बोलायची क्रेझ होती.काही कळत नसल तरी.जुना तर आवडता होताच.नविन पण आवडेल अस वाटतय.
शेवटच्या पॅराबद्दल १०० मोदक.

सल्लूभाई आवडत नसल्याने ओरिजनल पाहिला नव्हता , आता वरूण धवन आवडत असल्यामुळे नक्की पहायचा आहे .
जामच खट्याळ सौंदर्य आहे हे ! तिचा स्क्रीन प्रेझेन्स चिल्ड बियरच्या पहिल्या घोटासारखा असतो. >>> + १००० .ढिशुम मध्ये पहिल्यान्दा आवडली मला ती .

खरं तर तिने हट्टाने पाहायला लावलेल्या काही सिनेमांच्या आठवणी भयाण आहेत. उदा. - जब तक हैं जान, हॅप्पी न्यू इयर, तीस मार खान, दिलवाले, वगैरे. अर्थात, चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस अश्या शाहरुखपटांनी जरासा बॅलन्सही केला होता.
>>>>>

हे खूप आवडले.
आमच्या टीमचा एक माणूस तुमच्या घरात आहे Happy

@ जुडवा,
मला तर बालिश वयात आवडलेला Happy

हा बघेन की नाही ग्यारण्टी नाही.
वरुन आवडीचा नाही.
जॅकलीनला बघूनच अंगावर काटा येतो..

रच्याकने मध्यंतरी आलेल्या 'शुभ मंगल सावधान' या सुंदर सिनेमाचं परिक्षण नाही लिहिलं का .. की मी मिसलं !
नवीन Submitted by मित on 3 October, 2017 - 13:15

रच्याकने मध्यंतरी आलेल्या 'शुभ मंगल सावधान' या सुंदर सिनेमाचं परिक्षण नाही लिहिलं का .. की मी मिसलं !> >> मध्यंतरी आलेले बर्‍रेच सुंदर सिनेमे त्यांनी बघितले नसावे..
नवीन Submitted by टीना on 3 October, 2017 - 13:20

>>
खरंय.. काही सिनेमे पाहता आले नाहीयत आणि काहींवर लिहिता आलं नाहीय. शु.मं.सा., लिपस्टिक वर लिहायला झालं नाही.

जॅकलीनला बघूनच अंगावर काटा येतो..>> +७८६ ती हसली नाहीतर कोणी ओळखणार नाही असे तिला वाट्ते कि काय कायम हसत असते
क्यामेरात बघून. अभिनयाच्या नावाने बोंब.

रुटर साइट वर सीमा जमखिंडीकर मस्त परीक्षणे लिहीते.

3rd क्लास चित्रपट
जुना चित्रपट उचलून सेम टू सेम नविन बनवला आहे. चित्रिकरण चालू असताना दिग्दर्शकच्या जागी जुना चित्रपट लावलेला असेल. तिकडे पडद्यावर बघा आणि इथे तसेच थोडा आचरटपणा वाढवून अभिनय करा हे ब्रीदवाक्य होते. (जुडवा सुध्दा जॅकीच्या चित्रपटावरून तंतोतंत कॉपी केलेला होता)
शिरशिरी येते.

वरूनला बदलापुर पासून चांगला रस्ता सापडलेला पण बापाच्या नादी लागून करीअरचा बट्ट्याबोळ करण्याच्या मागे आहे.

वरूनला बदलापुर पासून चांगला रस्ता सापडलेला पण बापाच्या नादी लागून करीअरचा बट्ट्याबोळ करण्याच्या मागे आहे.

.... कन्फ्युज झालो थोडासा... बदलापुरपासून चांगला रस्ता, काय दळवणवळणाच्या समस्या आणि वाहतूकीचे नियोजन वगैरे , मध्येच चित्रपटपरिक्षणाच्या धाग्यावर कुठून आलं असा विचार करत होतो.

अरे बाप रे! ती भयंकर पुरुषी जॅकलीन ..... तिच्यामुळेच हा सिनेमा पहाणार नाहिये.. झायेद खान सारखी ही बाई पण पडद्यावर १ सेकंददेखील सहन होत नाही.

ती भयंकर पुरुषी जॅकलीन .....
>>>>>>
पुरुषी दिसण्यात काही गैर नाही. मला तर अभिमान आहे Wink

पण बापाच्या नादी लागून करीअरचा बट्ट्याबोळ करण्याच्या मागे आहे.
>>>>>>
मस्त छापताहेत बापलेक.. करीअर करीअर म्हणजे आणखी काय असते? Happy

टाईमपास चित्रपट आहे असा रिव्ह्यू दिलाय एका कलीगने .
अगदीच कंटाळा आला वगैरे तर बघेन .

जॅकलिन पुरुषी ???? सेरेना विल्यम्सचे वेदना आठवली . मायबोलीवर शक्यतो अश्या कमेंट्स टाळता आल्या तर उत्तम .

च्रप्स, चेहरा वाटतो. मला वाटते. इतरांना वाटावेच असे नाही.
जाई, ही कमेंट काही इतकी भयंकर नाहिये. असो. माझे मत आहे.

सुनिधी, ती कमेंट मला भयंकर वाटली म्हणूनच लिहिलेय . वर लिहिलेय तस सेरेनाच यासंदर्भातील म्हणणं जरूर ऐका .माझ्या वर्गातील एका मुलीलाहि अश्याच कमेंट्सने चिडवलं जात असे. तिचा खिन्न झालेला चेहरा अजूनही डोळ्यासमोर आहे . बाकी असो . बाफ हायजॅक करायचा नाही म्हणून इथेच थांबते

सुनिधि, तू वाणी कपूर बद्दल बोलतेयस का?

ऋन्मेष, होल्ड. थोडा वेळ गेला, काय म्हणायचंय ते दोन्ही बाजूंना कळलं, २-४ काॅमेंट्स आल्या, धुके गायब झाले, की मग सुरूवात करावी. घाई कशाला? मायबोली आपलीच आहे. Happy

अरे, एक क्षुद्र कमेंट म्हणून सोडून द्या. पडद्यावर जे दिसणे असते ते मला आवडत नाही त्या नटीचे इतकाच अर्थ आहे. आडदांड वाटते बस्स. उगाच खेळ व इतर वेदना वगैरे कशाला आणताय मधे?

जाई., इकडे "शो बिझीनेस" मध्ये असलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा चालू आहे ना?

कितीतरी क्न्व्हेन्शन प्रमाणे पुरूषी दिसणार्‍या सक्सेसफुल अ‍ॅक्ट्रेसेस् आहेत. त्यात काय एव्हढं?

सुनिधी, मला जे वाटलं ते मी लिहिलं .आता थांबणार का तुम्ही ? मी ही थांबवलीये चर्चा
सशल, आपण विपुत बोलूयात Happy

Pages