दृष्टी

Submitted by सेन्साय on 8 October, 2017 - 08:04

.

.

आसमंत अनुभूती
नवचैतन्य ही सृष्टी
मोरपंखी पाखरण
वरुणराजाची दृष्टी

लाहीलाही ग्रीष्म
तप्तरस पादंगुष्टि
बहरलेला गुलमोहर
फिनिक्सची दृष्टी

प्रात: सडा नित्य
असंचयी वृत्ती
निजकार्यतत्पर
पारिजातक दृष्टी

त्येनत्यक्तेन भुञ्जित
शिकवण आत्मियतेची
मनु स्विकारेल कधी
निसर्गाची अनमोल दृष्टी !

― अंबज्ञ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
शेवट सुरेख...
आपले शब्द जरा मला उधार द्याल का? Lol

छान.. Happy
मला शेवटच कडवं जड गेलं... Sad Uhoh

छान.. Happy
मला शेवटच कडवं जड गेलं... Sad Uhoh

धन्यवाद दत्तात्रय आणि मेघा Happy

मेघा ते तर मुख्य सार मांडलंय साऱ्या आशयाचं !
त्येन त्यक्तेन भुञ्जिता ह्याचा अर्थ समजला की बाकी सर्व सोप्पं आहे Happy