अमेरिकेतला गन व्हायोलन्स, गन कंट्रोल आणि राजकारण

Submitted by माने गुरुजी on 2 October, 2017 - 13:50

काल व्हेगासमधे झालेल्या शूटींगनंतर हा धागा काढावासा वाटला. खरंतर ती दुर्घटना राजकारणापलीकडे असायला हवी. पण गन्स आणि अमेरिकेतलं राजकारण इतकं जवळ आहे की हा धागा नुसता चालू घडामोडीत चालणार नाही.
cnn वर एक वाचनीय लेख आहे.
http://www.cnn.com/2017/10/02/politics/guns-maps-las-vegas/index.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कोणता माणूस शेकडो गोळ्या झाडणारे शस्त्र स्वरक्षणासाठी विकत घेईल हा विचार न करता धडधड अशा गोष्टी परवान्याशिवाय विकणे, विकु देणे हे तरी थांबवा म्हणावे.

आता 'अशा माथेफिरू लोकांना रोखण्यासाठी "Good" लोकांना अधिक पॉवरफुल शस्त्रे देऊन वरच्या सज्ज्यांवर बसवले पाहिजे होते' असे निवेदन NRA जाहिर केले कि लुप पूर्ण होईल. सँडी हूक ने जे होउ शकले नाहि ते अजून कशानेच होणे शक्य नाही Sad

>>सँडी हूक ने जे होउ शकले नाहि ते अजून कशानेच होणे शक्य नाही>> बरोबर. अमेरिकेत गन कंट्रोल होणार नाही.
सँडी हूकच्या वेळी पिअर्स मॉर्गन शोमध्ये मिडवेस्टमधली एक बाई आली होती तिचा स्वतःचा मुलगा गन वायलंसमध्ये गेला होता पण ती गन बाळगणं कशी गरजेची आहे हे अहमहमिकेने पटवताना बघून या देशाचं काही खरं नाही असंच वाटून गेलं.

मुंबईच्या चेंगराचेंगरी नंतर आज ही बातमी वाचली आणि नकळत तुलना झालीच. देश कुठलाही असो, राजकारणात माणसाच्या आयुष्याला सर्वात शेवटची किंमत आहे.

यात राजकारण काय आहे कोणी समजाउन सांगाल का?
अमेरिकेत ४२% घरातील लोकांना मनापासून गन बाळगाव्या वाटतं. एकूण देशांतील बंदुकींचे प्रमाण बघितलं तर जवळ जवळ माणशी एक गन आहे. युनिवर्सल हेल्थ केअर नाही करणार पण युनिवर्सल गन ओनरशिपची सेकंड अमेंडमेंट हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. बंदुकीचा सायलेन्सर सहज उपलब्ध व्हावा असं बिल फ्लोअरवर कधीही व्होटिंगला येऊन पास होऊ शकते.
टॉडलर च्या हाती बंदूक लागून आई जखमी झाली तरी ती आई गन कंट्रोलच्या विरुद्ध आहे. गन कंट्रोल न करण्यात राजकारण असेल तरी तेच कारण आहे म्हणणे ही घोर फसवणूक आहे.
केवळ एनआरए आणि रिपब्लिकन साटलोट आहे म्हणून हे असं आहे हा विचार टोटल नाईव्ह आहे.

>>केवळ एनआरए आणि रिपब्लिकन साटलोट आहे म्हणून हे असं आहे हा विचार टोटल नाईव्ह आहे.<<
+१

सेकंड अमेंड्मेंट, गन ओनर्शिप हा माइंडसेट टोटली अमेरिकन आहे. गेल्या २५-३० वर्षात इमिग्रेट झलेल्यांना तो पटणार नाहि...

सेकंड अमेंड्मेंट, गन ओनर्शिप हा माइंडसेट टोटली अमेरिकन आहे. गेल्या २५-३० वर्षात इमिग्रेट झलेल्यांना तो पटणार नाहि... >>>>

राज तुमचा मुद्दा मान्य आहे. गन बाळगणे हे बर्याच लोकासाठी रिलिजियस फेत सारखे आहे त्यात बदल करता येइल असे वाटत नाही. आपण राजकारण म्हणत असलो तरी पब्लिक सपोर्ट असल्याशिवाय राजकारणी पण हा मुद्दा उचलुन धरणार नाही. जर गन कंट्रोल चे नाव काढले तरी निवडणुका हरु शकतात, (at least in mid west). त्यामुळे राजकारणी लोकाना दोष देण्यात अर्थ नाही.

पण ऑटोमेटेड गन ला तरी सगळ्या स्टेट मध्ये कायद्यानी बंदी आणण्याचे काम करु शकतात. सेकंड अमेंड्मेंट पास झाली त्यावेळी जे गन टाईप उपलब्ध होते त्या प्रकारचा गन सोडुन सगळ्या automated गन वर बंदी आणली पहिजे महणजे लोकाचा फेतलापण धक्का लागणार नाही.

>>पण ऑटोमेटेड गन ला तरी सगळ्या स्टेट मध्ये कायद्यानी बंदी आणण्याचे काम करु शकतात. <<
टोटली अग्री. पण हा विचार करणारे माय्नॉरिटीत (<३०%) आहेत...

बंदुका आणि तत्सम हत्यारे मुक्तपणे वापरता येणे समजू शकते. पण एखादा माणूस आलिशान हॉटेलात महागडी रुम घेतो आणि २५ हत्यारे आणतो ज्यात मुख्यतः रायफली ज्या आकाराने मोठ्या असतात त्यांचा समावेश असतो. हॉटेलच्या सफाई कर्मचार्‍यांना वा अन्य लोकांना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हत्यारे वा सामान आणणे समजले कसे नाही? थोड्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारांची खरेदी केल्यास कुठेतरी धोक्याची घंटा वाजत नाही का? कारण सगळी हत्यारे कायदेशीररित्या खरेदी केली आहेत असे दिसते आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करुन इतका क्रूर घाऊक नरसंहार करण्यामागे उद्देश काय? उरलेले आयुष्य इतके साधे सोपे असणारा. चांगला पैसेवाला माणूस अचानक असे भयंकर करायला का उद्युक्त व्हावा?
अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

गन कंट्रोल. Lol टिपिकल अमेरिकन चर्चा. करमणूक होतेय वाचून.
बरं,
याला टेररिस्ट अ‍ॅटॅक म्हणायचं का?
म्हणजे त्या क्राऊडमधे ट्रक घालणार्‍या कुणा युरोपियनला टेररिस्ट म्हण्त होते लोक. या "कंट्री म्युझिक लव्हर" प्रौढास "लोन वुल्फ" म्हणताहेत म्हणे?

चांगला पैसेवाला माणूस अचानक असे भयंकर करायला का उद्युक्त व्हावा?
अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
<<
टेररिस्टांपैकी कित्येक अतिशिक्षित व श्रीमंत वगैरे असतात म्हणे. त्यात माथेफिरू होण्यापाठी "आयडिऑलॉजी" "ब्रेनवॉश"(उर्फ "संस्कार) वगैरे काही कारण असतं का?

>एनआरए आणि रिपब्लिकन साटलोट आहे म्हणून हे असं आहे हा विचार टोटल नाईव्ह आहे.
अमितव. पटलंय पण तसं कुठे मी म्ह्टलंय. एनआरए आणि काही राजकारणी (दोन्ही बाजूचे) यांचं साटलोट आहेच. त्यामुळे एनआरए च्या धोरणांवर गदा येईल अशी विधेयक मतदानासाठी येऊच देत नाहीत. डेमोक्रेटीक कंट्रोल असतानाही हे अलिकडच्या काळात झाले होते.

मी आता हा लेख वाचला आणि हसावे का रडावे त कळेचना. हसावे मूर्खपणाला; का रडावे आपण काही करू शकत नाही म्हणून. तो ओबामाही अश्रू ढाळण्यापलिकडे काही करू शकला नाही.
It's been illegal to carry a toy gun on the Las Vegas Strip since 2012, when Clark County commissioners passed an ordinance banning “dangerous objects” from the Strip. The ban, intended to make the sidewalks safer, prohibited flame throwers, blades over three-inches long and toy guns.
http://www.charlotteobserver.com/news/nation-world/article176655566.html

कुणाची तरी एक कमेंट वाचली ती इथे पेस्ट करतोय. माझ्याही मनात असेच काहीसे विचार आले होते.

He switched firearms because of the heat made by rapid fire.

There is a high likelihood a singe rifle would run into thermal problems, so this was very much a designed strategy to continue until he was stopped or he ran out of ammo.

I doubt he planned on living to see himself on trial, he had passionate hopelessness from something he had no control over. Did he expect comp tickets for all his gambling? Or did he have them and no one to take to the show? Had the musician been to the Guitars and Guns store in Paddock's town and been in an argument? Why was the top bill targeted?

All those suitcases took some advanced planning to acquire and pack and move, this could have been several weeks or more in the planning. It looks like he was settling a score in town or with the town, he may have been rejected in some way, even though he threw around alot of impressive money, he was acting and living like a high roller. Was he mad that he was disrespected and that he felt more entitled to better treatment???

he had a camera to document it?

Was there any connection to OJ's release the same day?? What was the man pasionate about other than a new fondness for advanced weaponry and its modification?

>>
टेररिस्टांपैकी कित्येक अतिशिक्षित व श्रीमंत वगैरे असतात म्हणे. त्यात माथेफिरू होण्यापाठी "आयडिऑलॉजी" "ब्रेनवॉश"(उर्फ "संस्कार) वगैरे काही कारण असतं का?
<<
मुद्दा हा निव्वळ श्रीमंत असण्याचा नसून श्रीमंत आणि निरुपद्रवी असण्याचा दोन्ही आहे. जर अचानक दिवाळे निघाले वा धंदा बुडला तर डोके फिरुन एखादा माथेफिरू काहीतरी करतो. जन्मभर कुठल्यातरी अतिरेकी विचारांचे भूत बाळगणारा पिसाट अचानक काही कृत्य करत असेल तर निदान कारण समजू शकतो. इथे तसे काहीही दिसत नाही. कुठल्यातरी पिसाट विचारसारणीचा प्रभाव ह्या माणसावर असल्याचे चिन्ह नाही, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक काही संकट नाही. तरी जिवावर उदार होऊन इतके खून करण्याची बुद्धी का व्हावी?
जेव्हा एखाद्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले जाते तेव्हा तो घडवून आणणार्‍यांच्या काही मागण्या असतात काही इच्छा असतात. अरबी भूभागातून पश्चिमी देशांचे बिगर मुस्लिम सैन्य हटवणे, पॅलेस्टीनी लोकांना हक्काचा देश मिळवून देणे, कश्मीर स्वतंत्र करणे, पंजाब स्वतंत्र करणे , तमिळ लोकांना स्वतःचा देश असे काहीतरी ठोस मागणे असते. इथे काहीच नाही. निव्वळ घाऊक प्रकारे लोकांना मारणे. त्यामुळे ह्याला दहशतवाद न म्हणता एका माथेफिरूने केलेली कत्तल म्हणणे जास्त उचित. जर नंतर काही वेगळे पुरावे मिळाले तर तो निष्कर्ष बदलेल.