विखंची ज्ञानवर्धक शब्दअर्थावली

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 25 September, 2017 - 03:32

मायबोलीकर मित्र मैत्रिणींना सप्रेम नमस्कार.

आधुनिक जगात बऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदललेले आहेत. डिक्शनरीत असलेले अर्थही चुकीचे ठरत आहेत, त्यांना समानार्थी पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपणासही समाजात वावरताना सहाय्यक ठरावेत असे काही ज्ञानवर्धक शब्द त्यांच्या खऱ्या अर्थांसकट टाकत आहे.
(Italics मधे लिहलेला पहिला शब्द डिक्शनरीतील पारंपरिक अर्थ आहे. आधी तो वाचावा.)

चुंबन :
> कलेचा एक प्रकार
> थिएटरमधे चित्रपट सुरू असताना कोपऱ्या - कापरऱ्यांमधे सुरू असलेला गंमतपट
> वादळाची सुरुवात

महाविद्यालय :
> उच्च शिक्षण मिळणारे विद्यालय जे व्यक्तीला सुसंस्कृत अन नोकरी – व्यवसायासाठी लायक बनवते

>महागडे विद्यालय
> असे ठिकाण जिथे काही वर्ष घालवल्यावर आपण जे येतं ते विसरतो अन नको ते शिकून येतो.

प्रियकर :
> प्रेयसीवर प्रेम करणारा

> पाळीव प्राण्यांची एक जमात
> समानार्थी शब्द : बैल, ड्रायव्हर, चावट इ.

शिवी :
> राग, चीड व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारे असभ्य संबोधन

 >नाम,सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अलंकार इत्यादी सर्व प्रकारांनी वापरता येणारा एकमेव शब्दप्रकार
> X, XX, XXX, XXXX, XXXXX, ……

कंपनी :
> असे ठिकाण/ व्यवस्था जिथे वस्तू/ सेवांचे उत्पादन केले जाते.

> अशी जागा जिथे वस्तू आणि गुलाम यांचे उत्पादन केले जाते

केस :
> जे गळताहेत या चिंतेने अजून जास्त गळतात

स्त्री :
> मायबोलीवर बहुसंख्येने असलेला वाचकवर्ग

मोबाईल :
> टेलीफोनची खिशात मावेल अशी छोटी आवृत्ती.

> अंगठ्याचा व्यायाम करणारे यंत्र

आई :
> माय, जननी,जन्मदात्री, माता

>मम्मी, मॉम

आंधळा :
> डोळ्यांमधे दोष असल्यामुळे ज्याला दिसत नाही तो

>डोळे ठीकठाक असूनही ज्याला दिसत नाही तो

लग्न :
विधीसंमत/ कायदेशीर पद्धतीने मुलगा अन मुलगी सहजीवन सुरू करतात तो सोहळा

> घोडीवर बसून केलेली घोडचूक

> स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस

>गरीबांची चिंता श्रीमंतांची उधळपट्टी

> बॅचलर मुलांचा आनंद सहन न झाल्यास आईवडील हे लावून देतात.

क्रिकेट :
>चेंडूफळी, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ

> दिवसभर/ दिवसरात्र चालणारा असा खेळ जो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी स्टेडियम हमखास भारतीयांनीच भरलेले असते

> याचे सामने सुरू असले की घरात हमखास भांडणं होतात

फुटबॉल :
> “रात्रभर जागरण झालं म्हणजे एकतर ती मॅच खेळली असेल किंवा फुटबॉलची मॅच पाहली असेल” असा सर्वसाधारण समज आहे

लॉन टेनिस :
> स्त्री खेळाडू असलेला असा एकमेव खेळ जो पुरुषांना आवडतो

हॉकी :
> भारताचा राष्ट्रीय खेळ जो चॅनेल बदलताना चुकून लागला तरच पाचेक मिनिटे बघितला जातो

मालिका :
> जाहिरातींच्या मधेमधे कडमडणारा कौटुंबिक अत्याचार

अभ्यास :
> पुस्तक उघडं करून जे डोक्यात भरलं जातं ते

>पुस्तक बंद केल्यावर डोक्यात जे उरतं ते

अश्रू :
अतीव दुःख झाल्यावर/ खूप हसल्यावर डोळ्यांतून आपोआप बाहेर पडणारे जलबिंदू

> बायकांचे हत्यार

हसू :
> सर्वाधिक विशेषणे मिरवणारे नाम ( गोड, वाईट, खळीदार, खळाळतं, गूढ, छद्मी, खोटं, प्रामाणिक, फीदीफीदी, खोखो, गडगडाटी, नाटकी, स्मित, मंद, मिश्किल, बेरकं इ.

व्यायाम :
शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी केली जाणारी नियमबद्ध कसरत

> घरी झोपता येत नाही म्हणून दूर जाऊन शवासनात झोपणे

> वजन कमी करण्यासाठी हा सुरू करतात, पण हा सुरू केल्यावर भूक, आहार अन वजन तिन्ही वाढतात

> वडिलांना बीपी होतो तेव्हा करायचा ठरवला जातो अन स्वतःला बीपी झाल्यावर सुरू केला जातो

----------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users