लाल दिवा बघुनी
थांबलो सिग्नलला
काचेवरती नाजूक
काळा हात फिरला ॥१॥
बघुनी मी अस्वस्थ
थोडा मनांत झालो
हलकेच काच गाडीची
खाली करता झालो ॥२॥
उघडणारी काच बघुनी
डोळे तिचे चमकले
उदास मलूल चेहर्यावरी
हास्य खिन्न विलसले ॥३॥
हातांत मिळताच काही
मनोमन ती हरखली
बघुनी माझ्याकडे ती
खळखळून किती हसली ॥४॥
कृतज्ञतेने हात तिने
माझ्यासमोर जोडले
बघुनी मला मनांत
खजील अपार वाटले ॥५॥
हळूहळू ती पाठीमागे
मागे सरकत राहीली
मनपटलावर माझ्या
माझीच ईशू झळकली ॥६॥
नकळत मी तुलना
मनांत दोघींची केली
दोघींतही मला केवळ
आदिमायाच फक्त दिसली ॥७॥
एवढ्यात खांबावरची
सिग्नल लाल बदलली
मीही हलकेच काच
वरती गाडीची घेतली ॥८॥
प्रतिमा तिची समोर
अंधुक धुसर बनली
मनांत आहेच अजूनही
ती माझ्या रेंगाळली ॥९॥
घरी जातांच सायंकाळी
ईशू माझ्याकडे झेपावली
कडेवरती ती माझ्या
अलगद बाहूंत विसावली ॥१०॥
ृ
उचलून ईशूला घेताना
परी सिग्नलची आठवली
नकळत माझ्या डोळ्यांची
कडा अबोल ओलावली ॥११॥
निरागस एक सवाल
ईशूने मजला केला
काय रे बाबा तू
आज कसकाय रडला? ॥१२॥
ऐकूनी तिला खोटं
मी लटकंच हसलो
काही नाही गं पिल्लू
असंच काही बोललो ॥१३॥
ढोंगी किती आपण
जाणिव मला झाली
सुरक्षित समाजाने शाल
एक विषमतेची पांघरली ॥१४॥
―₹!हुल/१.९.१७
सिंजी, संशोधक, विजय, च्रप्स,
सिंजी, संशोधक, विजय, च्रप्स, अजय प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.
सही जा रहे हो...बढते रहो
सही जा रहे हो...बढते रहो,लिखते रहो!
शुभेच्छा!
धन्यवाद सत्यजितजी
धन्यवाद सत्यजितजी
सुंदर आवडली.
सुंदर आवडली.
धन्यवाद कांदापोहे.
धन्यवाद कांदापोहे.
छान आहे.
छान आहे.
खूप सुंदर कविता. आवडली.
खूप सुंदर कविता. आवडली.
खूsssssssssssssप सुंदर रचना!!
खूsssssssssssssप सुंदर रचना!!!!!!!!!!!!!!
(मी कविता वाचून प्रतिसाद दिला नव्हता एवढा दिवस माझाच विश्वास बसेना.. )
खूsssssssssssssप सुंदर रचना!!
खूsssssssssssssप सुंदर रचना!!!!!!!!!!!!!!
(मी कविता वाचून प्रतिसाद दिला नव्हता एवढा दिवस माझाच विश्वास बसेना.. )
सुनिधीजी, चैत्रालीजी, कावेरि
सुनिधीजी, चैत्रालीजी, कावेरि धन्यवाद
सुन्दर रचना राहूल
सुन्दर रचना राहूल
धन्यवाद दक्षिणाताई
धन्यवाद दक्षिणाताई
__/\__
__/\__
__/\__ खुप सुंदर
__/\__ खुप सुंदर
ब्रह्मास्मि, पंडितजी
ब्रह्मास्मि, पंडितजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
भारीच..
भारीच..
अप्रतिम कविता
अप्रतिम कविता
निलमजी, पवनपरी प्रतिसादाबद्दल
निलमजी, पवनपरी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
अप्रतिम!!
अप्रतिम!!
धन्यवाद गार्गी
धन्यवाद गार्गी
खुप सरळ आणि सुंदर ओळी...
खुप सरळ आणि सुंदर ओळी...
अप्रतिम!!
अप्रतिम!!
प्रशांत, शेखर मनापासून
प्रशांत, शेखर मनापासून धन्यवाद
Pages