Mi_anu-ज्युनियर मास्टरशेफ-सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड-ईशा

Submitted by mi_anu on 25 August, 2017 - 12:02

"जर तुला एकटीला आईच्या हेल्प शिवाय एक सॅलड बनवायचं असेल तर तू काय बनवशील?"
"मी ना, ऍप्पल कापीन,टोमॅटो कापीन, पॉमोग्रेनेट कापीन,चाट मसाला घालीन आणि नाचोज ने डेकोरेट करीन"
सफरचंद डाळिंब आणि टोमॅटो ऐकून "पण खाणार कोण" हा भयचकित प्रश्न आईबाबांच्या मनात तरळून गुप्ततेत बाजूला निघून गेला.
मागच्या वेळी 'लवकर ऑफिस मधून या मी तुमच्यासाठी स्टारटर केलंय' असा फोन लँड लाईन वरून मोबाईल वर करून तीन कोकोनट बिस्कीट, मध्ये टोमॅटो केचप, वर चीज स्लाइस आणि चॉकलेट सॉस हा प्रकार पाहून बाप परत ऑफिस ला जायला निघाला होता.
"तुला ज्या गोष्टी आईच्या हेल्प शिवाय करता येतील त्याच वापर.पोमॉग्रेनेट एकटी कशी सोलणार?"
मग टोमॅटो काकडी सफरचंद सॅलड वर मांडवली झाली.

मग इन्व्हेंटरी जमा करणे
पिंपळे सौदागरी किराणा वालयाना 'नाचो क्या होता है' याचं 'वो ऐसा त्रिकोणी त्रिकोणी फेंट ऑरेंज होता है, मॅड अंगल्स करके ऍड आता है वगैरे संदर्भासहित स्पष्टीकरण करून झाल्यावर त्यांच्याकडे फक्त बटाटा चिपा आणि कुरकुरे आहेत असा शोध लागला.मग लेज ला नाक मुरडून स्वदेशी बुधानी घेऊन पावसात घरी परतले.घरी आल्यावर चाट मसाला नाही याचा शोध लागून ताक मसाला वापरणे ठरले.आणि कलाकार सेफ बड्डे नाईफ घेऊन कामाला लागला.
IMG_20170825_204713.jpgIMG_20170825_204757.jpg
मध्येच जरा मान वळवून डिस्कव्हरी वर हाऊ इट्स मेड बघून घेऊ.
IMG_20170825_205005.jpg
काकडी ची साले बिले काढणे हे अती नटवे आणि कृत्रिम प्रकार आहेत असे सोयीस्कर मत आम्ही घाई असताना सालकाढणे मिळाले नाही की मांडतो.
IMG_20170825_205057_0.jpg
अश्या प्रकारे हे सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड तयार झाले आणि कलाकार उरलेले चिप्स चे पाकीट संपवायला पळाला.
IMG_20170825_212547.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह

Pages