"जर तुला एकटीला आईच्या हेल्प शिवाय एक सॅलड बनवायचं असेल तर तू काय बनवशील?"
"मी ना, ऍप्पल कापीन,टोमॅटो कापीन, पॉमोग्रेनेट कापीन,चाट मसाला घालीन आणि नाचोज ने डेकोरेट करीन"
सफरचंद डाळिंब आणि टोमॅटो ऐकून "पण खाणार कोण" हा भयचकित प्रश्न आईबाबांच्या मनात तरळून गुप्ततेत बाजूला निघून गेला.
मागच्या वेळी 'लवकर ऑफिस मधून या मी तुमच्यासाठी स्टारटर केलंय' असा फोन लँड लाईन वरून मोबाईल वर करून तीन कोकोनट बिस्कीट, मध्ये टोमॅटो केचप, वर चीज स्लाइस आणि चॉकलेट सॉस हा प्रकार पाहून बाप परत ऑफिस ला जायला निघाला होता.
"तुला ज्या गोष्टी आईच्या हेल्प शिवाय करता येतील त्याच वापर.पोमॉग्रेनेट एकटी कशी सोलणार?"
मग टोमॅटो काकडी सफरचंद सॅलड वर मांडवली झाली.
मग इन्व्हेंटरी जमा करणे
पिंपळे सौदागरी किराणा वालयाना 'नाचो क्या होता है' याचं 'वो ऐसा त्रिकोणी त्रिकोणी फेंट ऑरेंज होता है, मॅड अंगल्स करके ऍड आता है वगैरे संदर्भासहित स्पष्टीकरण करून झाल्यावर त्यांच्याकडे फक्त बटाटा चिपा आणि कुरकुरे आहेत असा शोध लागला.मग लेज ला नाक मुरडून स्वदेशी बुधानी घेऊन पावसात घरी परतले.घरी आल्यावर चाट मसाला नाही याचा शोध लागून ताक मसाला वापरणे ठरले.आणि कलाकार सेफ बड्डे नाईफ घेऊन कामाला लागला.
मध्येच जरा मान वळवून डिस्कव्हरी वर हाऊ इट्स मेड बघून घेऊ.
काकडी ची साले बिले काढणे हे अती नटवे आणि कृत्रिम प्रकार आहेत असे सोयीस्कर मत आम्ही घाई असताना सालकाढणे मिळाले नाही की मांडतो.
अश्या प्रकारे हे सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड तयार झाले आणि कलाकार उरलेले चिप्स चे पाकीट संपवायला पळाला.
मस्त!!!
मस्त!!!
वाह
वाह
सॅलॅडची कल्पना तिची स्वतःची
सॅलॅडची कल्पना तिची स्वतःची असल्यामुळे खुपच छान!!!
बड्डे नाईफने टोमॅटो कापलेन?
बड्डे नाईफने टोमॅटो कापलेन? मान गये उस्ताद.
मस्त आणि क्रिएटीव्ह.
सॅलड आणि नाव दोन्ही आवडलं
सॅलड आणि नाव दोन्ही आवडलं
(No subject)
Pages