बाप्पाची कंठी

Submitted by अंकि on 12 September, 2017 - 01:30

नमस्कार मायबोलीकर,

दरवर्षी गणपतीच्या वेळी सजावट करत असताना माझा मोठा भाऊ नेहमीच आपली कलाकारी दाखवतो. दरवर्षी नवीन मखर तो स्वतः बनवतो. मला त्याला मदत करण्याची खूप इच्छा असते. पण तो मला फार काही करू देत नाही. त्यामुळे यावर्षी मी ठरविले की आपणही बाप्पासाठी काहीतरी नवीन करायचे. पण काय?? या प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळेन. खूप विचार केल्यावर एक आयडीया सुचली.

गेल्यावर्षी बहिणीच्या घरी गेले असता तेथे macrame वापरुन विविध शोपिस बनवायला शिकले होते. त्याचाच वापर करून बाप्पासाठी कंठी बनवायचे ठरविले. त्याचे फोटो पुढे टाकत आहे.

20150101_061429.jpg

ही पहिली कंठी, माझ्या घरातील बाप्पासाठी बनविलेली. (खरेतर बनवितानाचा फोटो टाकायचा होता पण तेव्हा मोबाईल नसल्याने फोटो काढता आला नाही. पण नवीन मोबाईल घेतल्यावर मात्र लगेच फोटो काढला. पण तेव्हा कंठी बाप्पाच्या गळ्यात होती.)

अश्या सेम कंठी आणखी २ बनवाव्या लागल्या. कारण पहिली बनविताना आत्याच्या मुलाने पाहिल्यावर आमच्या घरच्या गणपतीसाठी पण बनव असे सांगितले. मग आई म्हणाली दुसरी बनवतेच आहेस तर मामाच्या घरच्या गणपतीसाठी पण बनव. मग शेवटी माझी पहिली कंठी अर्धवट ठेवून आणखी २ कंठी बनविल्या. (ते ही ऑफिस मधून आल्यावर रात्री च्या वेळी.) तसेच गणपतीच्या आदल्या दिवशी त्या दोन्हीकडे पोच केल्या. आणि रात्री माझ्या घरच्या बाप्पाची कंठी पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी बाप्पाच्या गळ्यात ती कंठी पाहून मेहनतीचे फळ मिळाल्यासारखे वाटले.

यानंतर कंठी आवडल्याने माझ्या वाहिनीने तिच्या माहेरी विराजमान होणाऱ्या साखरचौथीच्या गणपतीसाठी कंठी बनवायला सांगितली. ही कंठी थोडी मोठी बनवावी लागली. तीचे फोटो मात्र सुरुवातीपासून देत आहे.

ही पूर्वतयारी

20170906_210444.jpg

ही सुरुवात
१.
20170906_203901.jpg

२.
20170906_215454.jpg

३.
20170906_222325.jpg

४. ही फुल बनविण्याची सुरुवात
20170907_235859.jpg

५. दोन्ही बाजूचे पट्टे.
20170908_012526.jpg

६. ही शेवटची पायरी.
20170908_085041.jpg

७. आणि माझी कंठी बाप्पाच्या गळ्यात.
IMG-20170909-WA0006.jpg

( गणपती पाहिला नसल्याने थोडी लांब झाली. )

त. टी. :- सर्व छायाचित्रे मोबाईल वरुन काढली आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

सर्वांना धन्यवाद.

पुढल्या वर्षी हिच कला तुला पैसे हि मिळवुन देईल >>>>> बऱ्याच जणांनी आताच सांगून ठेवलंय. जमल्यास करायचं ठरवलं आहे.