मी अभंगाची तुक्याच्या,एक पंक्ती जाहलो!

Submitted by सत्यजित... on 19 June, 2017 - 08:46

मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या
मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

रोज ढळतो अन् उगवतो..मी न झालो सूर्यही
मंदिरा-गाभारची मी,नित्य समई जाहलो!

मी लपंडावात माझे राज्य केले खालसा
मीच पहिली,मीच दुसरी,मीच तिसरी जाहलो!

चंद्रभागा अमृताची वाहते येथे सदा...
मी विठू-नामात न्हाती,टाळ-चिपळी जाहलो!

लाभली आहे दिशाही या प्रवासाला अता
मी जसा या पालखीचा एक भोई जाहलो!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर ..... खरं तर मी अजिबात श्रद्धाळू वगैरे नाही. पण असं काही वाचलं की खूप छान, शांत वाटतं....

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!>> हे

मी तुक्याच्या अभंगाची एक पंक्ती जाहलो! असे हवे आहे ना?