Submitted by सत्यजित... on 1 August, 2017 - 07:09
भरवू नकात आता बाजार आरश्यांचा
येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा!
अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या
केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!
मीही जरा-जरासा संदिग्ध होत गेलो
संदिग्ध होत गेला व्यवहार आरश्यांचा!
तू ही परी प्रमाणे स्वप्नात बागडावे
देऊ कसा तुला मी उपहार अारश्यांचा!
ते वागले असावे लपवून चेहऱ्यांना
तेंव्हाच शक्य झाला अपहार आरश्यांचा!
सांभाळुनीच लावा आता जरा मुखवटे
होणार आज आहे,यल्गार आरश्यांचा!
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते वागले असावे लपवून
ते वागले असावे लपवून चेहऱ्यांना
तेंव्हाच शक्य झाला अपहार आरश्यांचा!>>>>>> मस्त!
क्या बात क्या बात क्या बात
क्या बात क्या बात क्या बात
सांभाळुनीच लावा आता जरा मुखवटे
होणार आज आहे,यल्गार आरश्यांचा!
वस्तीत आंधळ्यांच्या व्यापार
वस्तीत आंधळ्यांच्या व्यापार आरशांचा खयाल मस्तच
>>सांभाळुनीच लावा आता जरा
>>सांभाळुनीच लावा आता जरा मुखवटे
होणार आज आहे,यल्गार आरश्यांचा!
वाह वा! बडे दिनो बाद आये मिंया..
या गझलेला 'बाजार आरश्यांचा'
या गझलेला 'बाजार आरश्यांचा' हे नाव अधिक योग्य ठरेल का?
सत्त्या...?
छान !
छान !
रच्याकने...ते शिर्षक मी सारखे ' भरवू नाकात आता' असेच वाचतेय
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद!
सांभाळुनीच लावा आता जरा
सांभाळुनीच लावा आता जरा मुखवटे
होणार आज आहे,यल्गार आरश्यांचा!
सुर्रेखsssssssss!
Gr8
Gr8
खूप धन्यवाद दत्तात्रयजी
खूप धन्यवाद दत्तात्रयजी,मीनलजी!