मुली पाहण्याचा कार्यक्रम..

Submitted by अजय चव्हाण on 9 September, 2017 - 04:25

मुली पाहण्याचा कार्यक्रम हा प्रत्येक विवाहइच्छुक तरूणाच्या वाटेला येतोच आणि त्यात जर तो पहिलाच कार्यक्रम असेल तर
आणखीनच गंमतीदार वाटतो..आणि आजच असा कार्यक्रम पाहण्याचा, अनुभवन्याचा योग माझ्या नशिबी आला..
मुलाने विशी गाठली , मिसरूडे फुटल की, तो विवाहस पात्र झाला अशी एकंदरीत जुनी समजूत अजूनही काही पालकांच्या मनात ठाण मांडून आहे...
मग त्या समजूतीआड चाॅईस, करीअर, "नोट रेडी नाॅऊ" असले कुल शब्द येत नाही आणि असे विचार करणार्‍या माझ्यासारख्या तरूणांना मग तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागतो...जन्मदात्यापुढे काय करणार बापुडे ?? असो ..
तर अशाच काहीशा मनस्थितीत एकंदरीत मला युद्धापेक्षा भयानक परिस्थितीला सामोर जावं लागलं...
नाही म्हणजे, ही सुरूवात लग्नाळू नातेवाईकांपासून होते..
प्रत्येकांच्या नात्यात अशी एक तरी व्यक्ती असते जिला लग्न म्हटलं की, हुरहुरी येते किंबहुना लग्न जमवणं आणि ते पार पाडणं हाच त्यांचा पार्ट टाईम हाॅबी असतो...
आणि अशा व्यक्तींना काळ, वेळ, प्रसंग कशाचेही भान नसते...
अमकी म्हातारी गचकली तिच्या तेराव्याला गेलो की, सुतकामध्येसुद्धा सुतकी बाॅम्ब फोडतात...
मग माझ्यासारखा डबल ग्रॅज्युएट, तरणाताठा, दिसायला बरा मुलगा दिसला की, ह्यांच्या चांभारचौकशा सुरू ....

अशाच काहीशा चांभारचौकशीनंतर एकेदिवशी भल्यापहाटे व्हाॅट्स अपवर एका मुलीचा फोटो, घराणे, आणि त्यांचे डिटेल्स माझ्या मोबाईलवर येऊन टपकले.. पाठवणारा आपल्याच सख्खा बहिणाचा नवरा असल्याने काही बोलताही येत नाही
आणि बोलणार काय हो..सख्ख्या बहिणाला नांदायच आहे तिथे म्हणून सगळं ऐकून घ्यावं लागतं...
फोटो पाहून " आवडली नाही" इतकं पुरेसे उत्तर देऊनही "
"अरे लेका परत्येकाशात बघ तरी, फुटुमध्ये अन् रिअल दिसण्यामंदी फरक असता.." असे ह्यांचे डायलॉग अगोदरच ठरलेले असतात त्यामुळे मन मारून जावं लागतं..

तर मी अगदीच आपला सॅम्पल म्हणून मुलगी पाहयलो गेलो..
मुलीचा बाप तर अगदी नम्र नम्र होऊन बोलू लागतो ऐरवी त्याचं वागण बेदारक जरी असलं तरी अशा प्रसंगामध्ये अगदी कशी कोण जाणे त्याच्या स्वभावात सार्या जगातली नम्रता एकवटलेली असते...
बोलण चालण सुरू झालं आम्ही अमकं अमकं करतो.. अमुक अमुक आमची परिस्थिती...अमुक अमुक आमची मुलगी, अमुक ढमुक छान करते...
अशा काहीशा गप्पा त्या तिथे जमलेल्या मोठ्या माणसांत रंगलेल्या असतात..
आणि मी मात्र भेदरलेल्या सशाप्रमाणे इकडे तिकडे ऊगीच आपला पाहू लागतो..घरांचे पडदे..शोकेस, घड्याळ मग त्या मुलीचा लहानपणीचा असणारा फोटो हे सगळं पाहून झाल्यानंतर किचनमधला पडदा हलल्यासारखा वाटतो आणि बारीक कुजबुज कानी येते .मुलगा दिसायला बरा आहे हो...
ते आपल ऊगीचच बायका बायका रंग , डोळे, केस, अशा एकंदरीत माझ्या वर्णावर चर्चा सुरू असते..

मग थोड्यावेळाने चहा आणि नाश्ता आला हल्ली कांदे खुप महाग झाले आहेत त्यामुळेच की काय कांदेपोहेऐवजी एका बशीमध्ये ढोकला माझ्या वाटेला आला...

मुलगी अगदी लाजत लाजत खाली मान करून बसलेली असते....नेमकं त्याचवेळी बाजूच्या खिडकीतून कुणीतरी आपल्याला पाहतयं असा भास होतो सहजच म्हणून नजर जाते तर एक भन्नाट आयटम समोरच्या दारात ऊभी असते आणि तिच्यासमोर ही मुलगी अगदीच चाय कम पाणी वाटते..

झालं सगळं लक्ष इथेच विचलित झालं...

मग अमके ढमके प्रश्न आणि चौकशी झाल्यानंतर
मोर्चा परत जायला लागतो...

कुठेतरी बसून निवांत विचारविनिमय करावं म्हणून एका हॉटेलमध्ये आमची गाडी वळते मग पाहुण्याचे आणि आमच्या वडिलधारांचे बोलण सुरू असताना अगदी एक मुलगी एका मुलाबरोबर बाईकवरून उतरते..

मगाशीच साडीवर सतीसावत्री भासणारी मुलगी स्कर्टवर अगदीच वेगळी वाटते आणि नेमकं आमच्या पाहुण्याच लक्ष तिच्याकडे जात आणि त्यांना चहा पिताना लागलेल्या ठसक्याबरोबर माझ्या लग्नाचं घोड काहीवेळ तरी तिथेच अडतं..

(पु ल.च्या "नारायण" ह्या व्यक्तीचित्रातल्या एका प्रसंगावर आधारीत..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशीबवान आहात. आम्हा गर्लफ्रेण्डधारी मुलांच्या नशिबात हे अनुभव नाही येत Sad

<<<<<<
सहजच म्हणून नजर जाते तर एक भन्नाट आयटम समोरच्या दारात ऊभी असते आणि तिच्यासमोर ही मुलगी अगदीच चाय कम पाणी वाटते..
>>>>>

मग मला हिच आवडलीय असे बोलायचे बिनधास्त. पटली तर पटली नाहीतर जिच्यासाठी गेलोय ती तरी सुटली.

ऋन्मेऽऽष हे फक्त इथं लिहण्यापुरतं ..

इतकं सोप नसतं ठरवून विवाह करणं..गर्लफेंडधारी म्हणजे सुखी आहात ह्या मानाने..."मिया बिबी राझी काय करेगा काझी?"

ठरवून विवाह करण्यास विषाची परीक्षा द्यावी लागते...
मुली,तिचे आईवडील,कारण नसताना मध्येच लुडबुड करणारे नातेवाईक,शेजारीपाजारी सगळ्यांच्या मनात उतरावं लागतं..

आणि इतकं करूनही आपलेही असेच नातेवाईक सांभाळावे लागतात...

अय्यो
फोटो बघून मी पण मनात 'आपलं कोणी कझिन भाची बीची लग्नाचं आहे का विचार करायला लागले.
जसं कोणी बेकार/जॉबलेस मनुष्य अथवा स्त्री पाहिली की 'याला/हिला कोणत्या कंपनीत कुठे चिकतावता येईल' हे विचार चालू होतात तसंच लग्नाळू मुलामुलींचं.

एक पार्टी पाहिली की सुटेबल दुसरी पार्टी शोधायचा क्रोन जॉब मनात चालू राहतोच Happy

माझ्याकडे खूप आहे लिहिण्यासारखे. वेळ मिळाला की लिहीन.

एक पार्टी पाहिली की सुटेबल दुसरी पार्टी शोधायचा क्रोन जॉब मनात चालू राहतोच >>> Lol

एक पार्टी पाहिली की सुटेबल दुसरी पार्टी शोधायचा क्रोन जॉब मनात चालू राहतोच >>>

असंच क्रोन जॉब मनात राहून राहून शेवटी मी स्वतःचे वधुवर सुचक मंडळ थाटले Lol

एक पार्टी पाहिली की सुटेबल दुसरी पार्टी शोधायचा क्रोन जॉब मनात चालू राहतोच >>>

असंच क्रोन जॉब मनात राहून राहून शेवटी मी स्वतःचे वधुवर सुचक मंडळ थाटले Lol >>>>>>>

हा हा हा हा हा हाः हा