" प्रेम "

Submitted by सेन्साय on 4 September, 2017 - 04:00

prem.jpg
.
.
प्रेमाने सर्व जिंकता येते म्हणे ...!
खरे असेल का हो ? 

जिंकता येते का मृत्युला
प्रेमाने त्या नैराश्याला
नसते का त्या कॅन्सरग्रस्तांचे प्रेम ....स्वतःवर
अन् जिंकतात का ते पदवीधर
नो वेकेन्सी चे बोर्ड पाहुन आपल्या नैराश्याला !

मग का म्हणतात बरे
प्रेमाने सारे जिंकता येते
कदाचित गणिती आंकड़े चुकत असतील
बेरजापेक्षा वजाबाक्या जास्त असतील
पण उत्तर शेवटी प्रेम एके प्रेम हमखास येते

काही तरी विशेष नक्कीच आहे
माणसाच्या कल्पने पलिकडले
विज्ञानाच्या आकलना पलिकडले
खूप ख़ास नक्कीच आहे प्रेम म्हणजे ....!

दोन जीवांची आतुरता ही भेटीची
नकळत ओढ़ लावणारी अनाहूत नाती
अदृश्यापलीकडे दिसण्याची जेथे ख्याती
असेल अशी काही ह्या प्रेमाची व्याप्ति

प्रेमाची परिभाषाच एकदम निराळी
म्हटले तर दोन शब्दात न समजणारी
पण अवघ्या त्या अनभिज्ञ दोन श्वासात
असंख्य वचनांनी एकमेकांस सामावणारी ....!

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर !

अदृश्यापलीकडे दिसण्याची जेथे ख्याती
असेल अशी काही ह्या प्रेमाची व्याप्ति

प्रेमाची परिभाषाच एकदम निराळी
म्हटले तर दोन शब्दात न समजणारी
पण अवघ्या त्या अनभिज्ञ दोन श्वासात
असंख्य वचनांनी एकमेकांस सामावणारी ....!

केवळ अप्रतिमच !

अतिशय सुंदर !
अदृश्यापलीकडे दिसण्याची जेथे ख्याती
असेल अशी काही ह्या प्रेमाची व्याप्ति
प्रेमाची परिभाषाच एकदम निराळी
म्हटले तर दोन शब्दात न समजणारी
पण अवघ्या त्या अनभिज्ञ दोन श्वासात
असंख्य वचनांनी एकमेकांस सामावणारी ....!
केवळ अप्रतिमच !
+१