webmaster आणि विषयांतर!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 8 September, 2017 - 10:09

सध्या admin पेक्षा webmaster जास्त ॲक्टीव झालेले दिसत आहेत.सरवटेंपेक्षा गल्लेवाले कमी कडक आहेत असा माझा अनुभव आहे.त्यामुळे वेमा ॲक्टीव झाल्याचा आनंदच आहे.
पण सध्या अनेक महत्वाच्या राजकीय सामाजिक धाग्यांवर वेमांची " विषयांतर होत आहे" याअर्थाची वॉर्निंग पहावयास मिळते.मला अजूनही विषयांतर म्हणजे काय ,ते कीती होते आहे हे समजत नाही. मला तर सगळ्याच पोस्ट विषयाशी संबंधीत वाटतात.काही ठीकाणी विषयांतर होत असेल तरीही त्यात फार काही वावगं नाही.
मायबोली हा फोरम आहे,एखाद्या चर्चेवेळेस अनेक विषय उपस्थीत होऊ शकतात.उदा.आर्थिक सुधारणांवर चर्चा चालू असेल तर त्यात काही राजकीय इलेमेंट येणारच.मग त्यात भाजप काँग्रेस गांधी नेहरु हे विषय ओघाओघाने येणारच,त्यात गैर ते काय???
पण सध्या एखाद्या विषयाला असलेला दुसरा ॲंगल दाखवायचा प्रयत्न केल्यास वेमांची तंबी मिळते.हे बरोबर नाही असे वाटते.सांगोपांग चर्चा हा प्र्कार मायबोलीवरुन निकालात निघेल की काय अशी शंका वाटते.
एखादा थ्रीडी चित्रपट बनवताना म्हणे अनेक ॲंगलने अनेक कॅमेरे लावून शूट केले जाते.तसेच इथल्या चर्चांचे आहे.इथल्या चर्चा 2D ठेवायच्या असतील तर ते नीरस होईल.पण विषयांतराचा बाऊ न करता अनेक ॲँगलने चर्चा केल्यास 3D अनुभव वाचकाला येईल असे माझी अल्पमती सांगत आहे.
बघा बुवा वेमा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंजी,
तुमची आईड्यांतर ची वेळ आली आहे Happy

सांगोपांग चर्चा हा प्र्कार मायबोलीवरुन निकालात निघेल की काय अशी शंका वाटते. >>> याची चिंता तुम्ही कशाला करता? वेमा आणि अ‍ॅडमिन भरपूर सक्षम आहेत. त्यांनी २० + वर्षे मायबोली यशस्वीपणे चालवली आहे.
शिवाय जिथे , (तुमच्या मते ' विनाकारण ') तंब्या मिळतात, अशा ठिकाणी न जाण्याचा चॉइस तुम्हाला आहेच की!

>>शिवाय जिथे , (तुमच्या मते ' विनाकारण ') तंब्या मिळतात, अशा ठिकाणी न जाण्याचा चॉइस तुम्हाला आहेच की
झालं. एव्हडं कळत असतं तर..... ! Happy

सरवटेंपेक्षा गल्लेवाले कमी कडक आहेत >>>>> हे काय समजले नाही. हे एडमिन वेमा यांची खरीखुरी नावे आहेत की कुठली ग्रामीण म्हण आहे?

पण सध्या एखाद्या विषयाला असलेला दुसरा ॲंगल दाखवायचा प्रयत्न केल्यास वेमांची तंबी मिळते.हे बरोबर नाही असे वाटते.सांगोपांग चर्चा हा प्र्कार मायबोलीवरुन निकालात निघेल की काय अशी शंका वाटते. >>
Biggrin तुमचा दुसरा ॲंगल काय असतो ते व्यवस्थित माहीत आहे. जाती वरून फूट पाडून बॅशिंग करणे. त्याला सांगोपांग चर्चेचा रंग देऊन माबो जनता भुलणार नाहीये.
>>पण विषयांतराचा बाऊ न करता अनेक ॲँगलने चर्चा केल्यास 3D अनुभव वाचकाला येईल असे माझी अल्पमती सांगत आहे.>> जेव्हा विविध कोनातून चर्चा होत असतात तेव्हा वेमा 'विषयांतर नकोचा' झेंडा घेऊन येत नाहीत हा अनुभव आहे. ठराविक वळण घेऊन चर्चेची गाडी नेहेमीची स्टेशने घेत पळायला लागली की येतात. तुमचा काय जो थ्री डी अनुभव असेल तो आम्हाला नको.

>>तुमची आईड्यांतर ची वेळ आली आहे<<

हल्लीच जन्म/पुनर्जन्म झालेल्या काहि आय्ड्यांचं ध्येयच विषयांतर आहे असं म्हणु शकतो... Lol

अरे त्याला बी कोण /काय आहे ते सुद्धा माहीत नसेल त्यामुळे त्याच्या डोक्यावरून गेले असेल ! Proud

विषयांतर हे एल बी डब्ल्यू सारखे असते. जो झाला त्याला ते कळत नाही आणि दिसत नाही. जो अपील करतो आणि निर्णय देतो ते कुठे उभे आहेत त्यावर त्यांना तसे वाटते.अगदी काटकोनात उभे असाल तर काहीच दिसत नाही. आणि मग आय डी उडाला की ब्याट आपटीत तम्बूत जावे लागते . आणि दुसर्‍या इनिण्ग मधे यावे लागते Proud

त्यामुळे कशाला विषयान्तर म्हणायचे हे बोट वर करणारानेच ठरवायचे असते.

गल्लीवाल्यांचे हेतु वेगळे होते सरवटेंचे वेगळे...मायबोली प्रोफेशनल झाल्यावर काही गोष्टी व्यावसायिक पद्धतीनेच हाताळाव्या लागतात. भावनाविवश होउन नव्हे.

मला हे सरवटे व गल्लेवाले काय प्रकरण आहे कळेल काय? १ च आठवडा झाला आहे त्यामुळे माहीत नाही. मलाही तो काहीतरी विनोदच वाटला...आइड्यांतराची माझीपण ईच्छा नाही...!
अजून एक..
अ‍ॅडमीन व वेमा यांचे काम वेगवेगळे असते काय?

कपाळावर हात!!!!
"शेती बरोबरच वेळ जाण्यासाठी काय कामधंदा करावा?? काहीतरी सूचवा!!!!" हा धागा तुम्ही काढला होतात ना? प्लिज मग वेळ घालवायला हे नका करू.

एकच आठवडा झालाय ना? थाम्बा घाइ करू नका. अब्ब्यास करा. तुमचा गट ठरवा. चुकीच्या गटात गेला तर अदृश्य व्हाल... सगळे कळेल. अ‍ॅडमिन यांची विपु वाचायची पद्धत ठेवा.

सुनिधी Rofl

शुगोल, पर्फेक्ट कमेंट पण त्याचा उपयोग होईल असं वाटतंय का तुला? Proud

अ‍ॅडमिन्/वेमा विषयांतर होतंय याची वॉर्निंग देतात ह्याचं कधीकधी कौतुकच वाटतं, एस्पेशली तेव्हा जेव्हा काही प्रतिसाद आणि बीबी (तुम्ही काढता तसले) वॉर्निंगही न देता उडवायच्या योग्यतेचे असतात. तेव्हा (प्रतिसाद) सुधारायला चान्स मिळतोय ह्यात आनंदच माना. Happy

सुनिधी Rofl

रीया, माझ्या कमेंटच्या उपयोगाचं सोडंच, हा धागाच निरुपयोगी आहे. Proud

पण बाबा कामदेव, प्रत्येक डिलिवरी पॅडवर घेणार्याला आपण एलबिडबलु होणार याची आधीपासुनच कल्पना असते ना?.. Proud

"शेती बरोबरच वेळ जाण्यासाठी काय कामधंदा करावा?? काहीतरी सूचवा!!!!" हा धागा तुम्ही काढला होतात ना? प्लिज मग वेळ घालवायला हे नका करू. >> Lol

राज डिलीव्हरी म्हटले कि थोडे इकडे तिकडे होणारच Lol

आली आली आली!!!
तरी म्हटलं असहिष्णुतेची बीजे मायबोली प्रशासकांमुळे फोफावतात अशी सहिष्णू पोस्ट कशी आली नाही.
धन्य जाहलो.

तेव्हा जेव्हा काही प्रतिसाद आणि बीबी (तुम्ही काढता तसले) वॉर्निंगही न देता उडवायच्या योग्यतेचे असतात.
>>
अशे जल केले तल सगली मायबोली ब्लँक स्क्रीन होईल...

Pages