webmaster आणि विषयांतर!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 8 September, 2017 - 10:09

सध्या admin पेक्षा webmaster जास्त ॲक्टीव झालेले दिसत आहेत.सरवटेंपेक्षा गल्लेवाले कमी कडक आहेत असा माझा अनुभव आहे.त्यामुळे वेमा ॲक्टीव झाल्याचा आनंदच आहे.
पण सध्या अनेक महत्वाच्या राजकीय सामाजिक धाग्यांवर वेमांची " विषयांतर होत आहे" याअर्थाची वॉर्निंग पहावयास मिळते.मला अजूनही विषयांतर म्हणजे काय ,ते कीती होते आहे हे समजत नाही. मला तर सगळ्याच पोस्ट विषयाशी संबंधीत वाटतात.काही ठीकाणी विषयांतर होत असेल तरीही त्यात फार काही वावगं नाही.
मायबोली हा फोरम आहे,एखाद्या चर्चेवेळेस अनेक विषय उपस्थीत होऊ शकतात.उदा.आर्थिक सुधारणांवर चर्चा चालू असेल तर त्यात काही राजकीय इलेमेंट येणारच.मग त्यात भाजप काँग्रेस गांधी नेहरु हे विषय ओघाओघाने येणारच,त्यात गैर ते काय???
पण सध्या एखाद्या विषयाला असलेला दुसरा ॲंगल दाखवायचा प्रयत्न केल्यास वेमांची तंबी मिळते.हे बरोबर नाही असे वाटते.सांगोपांग चर्चा हा प्र्कार मायबोलीवरुन निकालात निघेल की काय अशी शंका वाटते.
एखादा थ्रीडी चित्रपट बनवताना म्हणे अनेक ॲंगलने अनेक कॅमेरे लावून शूट केले जाते.तसेच इथल्या चर्चांचे आहे.इथल्या चर्चा 2D ठेवायच्या असतील तर ते नीरस होईल.पण विषयांतराचा बाऊ न करता अनेक ॲँगलने चर्चा केल्यास 3D अनुभव वाचकाला येईल असे माझी अल्पमती सांगत आहे.
बघा बुवा वेमा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>राज डिलीव्हरी म्हटले कि थोडे इकडे तिकडे होणारच<<
हो हो, वाय्ड/नो बाॅलवर सुद्धा एलबिडबलु झालेले आहेत इथे... Proud

>राज डिलीव्हरी म्हटले कि थोडे इकडे तिकडे होणारच<<

पौष्टिक जीवन!

जसं डॅनीचं टायटल नेहमी पूर्ण बोललं जातं- Daenerys Stormborn of the House Targaryen, the first of her name, Queen of the Andals, the Rhoynar and the First Men वगैरे, तसं तुम्ही लोक प्रत्येक पोस्टमध्ये असं लिहित जा - 'मोदी , नोटाबंदी, संघ, हिंदू, जातीयवाद, असहिष्णू, कम्युनल - निषेध , सर्व प्रॉब्लेम, एकच रिझन' वगैरे. मग मूळ धागा बेत काय करू असो वा क्रिकेटवर. मग कधी चुकून विषयाला धरून लिहिलंत तर काय वेमा ओरडणार नाहीत तुम्हाला.

ऋन्मेऽऽष, ते राहू नाही 'रॉहू' आहे. 'रॉहू' म्हणजे रॉबिनहूड असा एक आयडी आहे.

ऋन्मेऽऽष, ते राहू नाही 'रॉहू' आहे. 'रॉहू' म्हणजे रॉबिनहूड असा एक आयडी आहे.
>>>
हो ते टायपो झाला असावा.. पण रॉहू तरी कुठे आहेत या धाग्यावर , नाव बदलून आहेत का?

हो ते टायपो झाला असावा.. पण रॉहू तरी कुठे आहेत या धाग्यावर , नाव बदलून आहेत का?>>>खरच की, मी पण शोधलं सगळ्या प्रतिसादांत.
आणि कामदेव बाबांना धन्स...वेमा व अ‍ॅडमीनचा एकत्रीत झाडू फिरण्यापासून वाचवलेत....  Wink

ऋ बाळा, इथे परत परत पुनरुज्जीवित होणारे जे आयडी आहेत त्यांचे मूळ आयडी काय आहेत हे त्या सगळ्या संबंधितांना माहीत असते. कसे कळते हे मलाही माहीत नाही, मला फक्त एकाच आईडीला ओळखू येता येत होते, पण हल्ली तो आईडीही ओळखता येत नाही. कारण बहुधा हे आहे की कोणे एके काळी तोच एक आयडी होता जो सतत बॅन व्हायचा. मग तो बाण, शेळी, मेंढी वगैरे नावे घेऊन परत परत येत राहायचा. हल्ली तसले बॅन होणारे आयडी इतके वाढलेत की कोण कुठचा ते ओळखणे कठीण.

ताई त्या id च्या जोडीला मंदार जोशी, मंजो, कोकणस्थ, अंतुबरवा, बाळजीपंत असे अशी रूपे धारण करणाऱ्या id चे पण नाव जोडा.
हा पण अगदी 2 3 पोस्ट मध्ये ओळखता येतो Happy

अहो चटकन आठवणारा आयडी लिहिला गेला. बाकी आईडीही भरपूर आहेत जे फिरुनी नवा जन्मेन मी म्हणत येत राहतात याची कल्पना आहे.

अरे या धाग्याला विनोदी लेखन मध्ये जाण्याचे भरपूर पोटेनशीयल आहे.

ऋ हा बी च्या पुढे एक पाऊल आहे.
बी कितीही आक्रस्ताळी वाटलं तरी तो जेन्यूईन -- होता पण ऋ तसे असल्याचा आव आणतोय. जेवढा तो आहे असं दाखवतोय तितका तो नक्कीच नाहीये.

हे एडमिन वेमा यांची खरीखुरी नावे आहेत की कुठली ग्रामीण म्हण आहे?>>>>>>>>>>>>> Lol अरे का रे का?

ऋ बाळा, इथे परत परत पुनरुज्जीवित होणारे जे आयडी आहेत त्यांचे मूळ आयडी काय आहेत हे त्या सगळ्या संबंधितांना माहीत असते. कसे कळते हे मलाही माहीत नाही, मला फक्त एकाच आईडीला ओळखू येता येत होते, पण हल्ली तो आईडीही ओळखता येत नाही. कारण बहुधा हे आहे की कोणे एके काळी तोच एक आयडी होता जो सतत बॅन व्हायचा. मग तो बाण, शेळी, मेंढी वगैरे नावे घेऊन परत परत येत राहायचा. हल्ली तसले बॅन होणारे आयडी इतके वाढलेत की कोण कुठचा ते ओळखणे कठीण.>>>>>>>>>>>>>> साधना Lol +१
आता ओळखुच येत नाही हे खरंय.

आशुचॅम्प,
असे पुनर्रजिवित होणारे आणि बॅन होणारे आयडी राजकारणासारख्या धाग्यांवरच गोंधळ घालत असतील ज्यात मला जराही ईंटरेस्ट नाही. अश्या आयडींबद्दल उत्सुकताही नाही. तसेच कोण कोणाचा ड्यू आयडी आहे हे शोधणे वा त्या विचारात वेळ घालवणे हा मला माझ्या आयुष्यातील वेस्ट ऑफ टाईम वाटतो. कारण ते कळल्याने न कळल्याने आपल्या आयुष्यातील गणित जराही बदलणार नसते. याऊपर मी आयडीनावाला महत्व न देता, कोणी लिहिलेय तो आपल्या बद्दल चांगले लिहितो की वाईट लिहितो याकडे न बघता त्यातील मुद्दा मला पटतोय की नाही यावर प्रतिसाद देतो. त्यामुळे आयडीनाव ही माझ्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. वर फक्त कोणीतरी अमुकतमुक आयडीची पोस्ट आवडली म्हणून ती शोधून वाचायला गेलो तर सापडली नाही म्हणून विचारले ईतकेच.

बाकी माझी बी यांच्याशी किंवा कोणाशीही तुलना करू नका. एवरी चाईल्ड ईज डिफरंट हे समजून घ्या. मी चांगला आहे वाईट आहे जसा कसाही आहे पण युनिक आहे. मला माझे वेगळेपण जपायला आवडते. लोकं त्याकडे कसे बघताहेत आणि माझ्याबद्दल काय विचार करताहेत हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. कारण आपण आयुष्यभर तसेच राहिलो तरी लोकांची आपल्याबद्दलची मते सतत बदलत असतात हे एक वैश्विक सत्य आहे.

तू जे पानभर लिहिले आहेस तेच मी वरती एक वाक्यात लिहिले आहे. कधी वेळ झाला तर वाचून पहा.
पाणी फुकट असले तरी कुठे थांबावे हे कळणे महत्वाचे

पाणी फुकट असले तरी कुठे थांबावे हे कळणे महत्वाचे
>>>>
पाणी म्हणजे जीवन
पाणी थांबले जीवन थांबले.

कसं जमत रे तुला ?

माझ्या वरच्या वाक्याला तातडीने उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. आता खात्री झाली असेलच.

सुसंगती सदा घडो
सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो
"विषय" सर्वथा नावडो
" विषयांतर होत आहे"

एखाद्या चर्चेवेळेस अनेक विषय उपस्थीत होऊ शकतात. आणि सांगोपांग चर्चा झाली तर ठीकच आहे.

बरेच वेळा इथे बरेच चांगले व माहितीजनक मुद्दे मांडण्यात येतात. हे सर्व मायबोलीत हरवून जाते.ऐवते मुद्दे, ती माहिती कुठे अन्यत्र, संबंधित संस्थांना, राजकारण्यांना पाठवता येईल का? कोण करणार हे काम?

Pages