प्रतिशोध ??

Submitted by र।हुल on 7 September, 2017 - 13:04

आपलं बनवूनी कोणी
क्षणांत परकं करतो
सांग रे मना का तेवेळी,
मी दु:खात बुडुनी जातो ॥१॥

गोड बोलावे कधी कोणी
मनाला का रोजच वाटते
डोळ्यांत काटेरी शब्दांनी
माझ्या टचकन् पाणी येते ॥२॥

अकारण वादांनी मनात
रागाची भावना उफाळते
संथ लयीच्या श्वासांना
क्षणांत अस्थिर फुलवते ॥३॥

राग येता मन हे सैराट होते
घेण्या प्रतिशोध किती आतुरते!
क्षणभरीच्या प्रक्षुब्ध भावाला
चैतन्य कुठले हे दुर पळवते? ॥४॥

संस्कारांनी मज घडविले
नंतर झालं विसरूनी जातो
अशाश्वताच्या जगी वावरताना
कानांतील श्वासांना आठवतो ॥५॥

―₹!हुल/७.९.१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ! Happy