'पुलावरचे भूत

Submitted by अविनाश जोशी on 7 September, 2017 - 05:59

मुंबईचा पाऊस. नवी मुंबई झाली म्हणून काय झाले, पाऊस जुन्या मुंबईसारखाच
खरं म्हणजे इतक्या उशिरा घराबाहेर . पडायलाच नको होते. पण बायकोची कटकट आणि पावसाची रपारप ह्यात पाऊसच परवडला . निदान आडोसा तरी घेता येतो.
काम तिच्या मामेबहिणीच्या चुलतभावाच्या भाच्याचे असल्यामुळेहत्तीने तिच्या दृष्टीने अति महत्वाचे होते. आमच्या घरापासून अंतर बरेच दूर होते पण नवीन पूल झाल्यामुळे ते ४/५ किमी वर आले होते. पण रात्री तशी वर्दळ कमीच असायची. पूल बांधताना ३ कामगारांना बळी दिले होते म्हणे.
त्या कोणाचे घर सापडेपर्यंत साडे दहा वाजले होते आणि १५० रिक्षा भाडे झाले होते. रिक्षा जास्त भाडे घेऊन हि थांबायला तयार नव्हता. त्या कुणाचे काम संपेपर्यंत ११ वाजून गेले होते,
आता ह्या गल्ली बोळातून महामार्गापर्यंत पोहोचायला अर्धा तास सहज जाणार होता. मग पुलापर्यंत अंतर पाऊण किमी पुलंचं एखादा किमी कि गाव , त्यातील महामार्गावरील बार , हौटेल्स दिसतातच आणि मग तिथून माझं घर दीड अशा प्रवासाची मानसिक तयारी करून ठेवली.
' चला निघतो आता , फार उशीर झालाय.'
'हो ना परत याल तेव्हा वेळेत या' असे म्हणून दार लागले सुद्धा
पावसात आणि भटक्या कुत्र्यांशी सामना करत करत एकदाचा महामार्गावर पोहोचलो. लांवर पूल दिसत होता.
रिक्षा मिळण्याचा संभवत नव्हता. अशा प्रसंगी सर्व रिक्षांना उलट दिशेलाच जायचे असते. कुठलेही वाहनहि थांबायला तयार नव्हते पुलाच्या अगोदर दोन मोठी वळणे होती. पुलावरून ह्या वाऱ्या पावसात जाणे शक्यच नव्हते . अजून एखाद्या भुताची भर पडली असती. पण वळणाकडे जाणे भाग होते.
एकला चालो रे! १२ वाजत आले होते. मनात म्हणले जर त्या कुणा भुताने मला पुलापलीकडील नगमा बार मध्ये सोडले तर त्याला दारू, कोंबडी, दहीभात काय हवं ते देईन. भुताला नवसच केला म्हणाना. पावसाचं जोर फारच वाढला होता. दोइ न हातावरचे काही दिसत नव्हते. नशिबाने माझा रेनकोट पिवळा भडक होता. लाईनमन सारखा . त्यामुळे निदान अपघात तरी झाला नसता.
तेवढ्यात एक गाडी हळूहळू डावीकडून येताना दिसली. त्यालाही पावसाचे ड्रायविंगचा त्रास होतच असणार. वळणाच्या अगोदर मी गाडी जवळ आली कि बिनधास्त मागचे दार उघडून घुसायचे ठरवले. गाडी जवळ आलीच . वळणा करता वेग कमी केला असावा. आत शिरून धाडकन दार लावले. हातांनीच चेहरा पुसला.
थँक यु म्हणायला तोंड उघडलं ते उघडच राहिलं गाडी चालत होती पण ड्राइवर नव्हता. गाडीत मी एकटाच होतो. वळण तर जवळ आले होते. पुलावरच भूत माझा बळी घेणार होते. रामरक्षा आठवेना. तेवढ्यात एक मनगट आत आले आणि गाडी वळाली. आता मात्र माझे अवसान गळाले. धाडकन सीट वर आडवा झालो आणि डोळे गच्चं मिटून भीमरूपी सुरु केले.
गाडी पुलाच्या पलीकडे जाताच उडी मारून पळायचे ठरवले. तसा मारुतीला नवसही केला. नवस फेडायला मी जगात राहणार होतो का? पुलाचा शेवट जवळ आला होता. पूल संपताच मी उडी मारली आणि दार लावायचे कष्ट न घेता नगमा बारकडे पळालो.
नगमात बारजवळच उभा राहिलो. कारेकर आत होताच,
'अरे जरा पतियाळा भर'
'ओला झालायस. अंग तरी पूस'
'ते नंतर '
निम्मा पेग पोटात जाताच जीवात जीव आला. कारेकर माझ्याकडे पहात होताच. त्याच्याकडे वळोन मी काही बोलणार तर माझ्या पाठीवर थाप पडली
एक ओलाचिंब दुसऱ्याला म्हणत होता ' हा बघ मूर्ख माणूस. आपण गाडी ढकलत असताना आत शिरून बसला होता'
'कारेकर अजून दोन. अरे पण तुम्ही काही बोलला का नाहीत?'
'पुलावरचे भूत आम्हालाही माहित आहे ना,'

[नादभय ह्या आगामी संग्रहातून]

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा चांगली आहे पण exact याच कल्पनेवरचा सरदारजीचा एक जोक वाचला आहे. शोधून कुठे मिळाला तर टाकेन.

हेच लिहणार होतो, सरदारजी जोक ऐकलेला, त्यालाच बळच वातावरण निर्मिती करून मुलामा दिला आहे.
विनोदी लिखाण मध्ये तरी हलवा

हो, असा जोक आधीच वाचल्याने सस्पेन्स आधीच माहीत झाले आणि तितकी मजा नाही आली. पण जोकला खुलवून कथा स्वरुपात सादर करण्यात काही गैर नाहीये. फार तर फक्त तसे नमूद करावे.
बाकी लेखनात बरेच टायपो असल्याने रसभंग होतोय हे खरेय.
नुकतेच तुमची बोगोरबुदूर दिर्घकथा वाचल्याने आणि आवडल्याने अपेक्षा वाढल्यात. पुढील लेखनास शुभेच्छा Happy

जोकला खुलवून कथा स्वरुपात सादर करण्यात काही गैर नाहीये. फार तर फक्त तसे नमूद करावे.>>111+++

नुकतेच तुमची बोगोरबुदूर दिर्घकथा वाचल्याने आणि आवडल्याने अपेक्षा वाढल्यात. >>111+++

छान लिहिलयं.. Happy
जोकला खुलवून कथा स्वरुपात सादर करण्यात काही गैर नाहीये. फार तर फक्त तसे नमूद करावे.>> +११११११११११११

छान ! Happy