अमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट पिझ्झा >> जाई.

Submitted by जाई. on 5 September, 2017 - 10:52

गणेशोत्सवातच नव्हे तर मायबोलीवरही पाककृती लिहायची ही पहिलीच वेळ आहे . त्यामुळे अस्मादिकास सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.

तर आधीचे दोन प्रयोग फसल्यावर जाऊ दे आता म्हणून आधीच शस्त्र टाकून झाली होती.पण डोक्यातला किडा काही स्वस्थ बसवू देईना. त्यामुळे डोकं शिणवत असताना ही रेसिपी आठवली . आधीचे प्रयोग फसल्यावर (पक्षी -किचन मध्ये सांडलवंड केल्यावर ) आता मातेकडून हे शेवटचं असा अल्टिमेटम मिळाला होता .पण god help to them, those help themselves . तर आता बघूयात रेसिपी .

साहित्य

१) कलिंगडाची गोलाकार चकती
२) मध
३)दही
४)हाताला मिळतील ती फळे छोटे तुकडे करून .मी केळी , डाळींब , द्राक्ष वापरली

कृती
१) कलिंगडाच्या चकती वर दही लावून घ्या .
२) त्यावर आपल्या आपल्या डोक्यात असलेल्या पिझ्झाच्या कल्पनेप्रमाणे फळांचे टॉपिंग करा
३) त्यावर हलकासा मध टाका
४)आणि हेल्दी फ्रुट पिझा एंजॉय करा

हे फोटो .मोबाईलन काढले आहेत.समजून घेणे

New Doc 2017-09-05 (1)_1.jpgNew Doc 2017-09-05_1.jpg

अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे . फळं न खाण्याऱ्या गोड छोट्या आणि डामरट मोठ्या दोस्ताना आवडेल अशी अपेक्षा आहे.शिवाय अगदी बेसिक असल्यान जमू शकेल .
एका चॅनेलवर पाहिली होती .त्याच मी केलेलं हे व्हेरिएशन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २०१७ च्या संयोजकांचे खूप आभार .न कंटाळता त्यांनी प्रश्नांना उत्तरे दिली .धन्यवाद संयोजक Happy

मस्त दिसतेय!

कलिंगडाची साल काढली तर चालेल Happy (मला) म्हणजे आक्खा खाता येईल. मी डामरट क्याटेगरीतच मग! Wink

खुपच गोड आणि किशोरवयीन रेसिपी आहे Happy
असा केक मी स्वप्नातही कल्पना नाही करू शकत!
या केक मध्ये सॉलीड बेस म्हणून काही वापरता येउ शकते का?