पाटलाची मुलगी.. – भाग १

Submitted by दिपक ०५ on 2 September, 2017 - 11:52

संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा..

मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव...

राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला...

संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे..

राघव : तुला म्हणतोय तुला..

मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा..

संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा..

राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा...

मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत..

संकेत : मी काय म्हणतो

राघव : काय म्हणतोस तु??

संकेत : हेच्या आयलां...

मयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन..

राघव : काय बोल्ली?

मयुरी : अरे तु जा ना बाबा दोन मिनीट कुठंतरी..

राघव : अरे पण??

मयुरी : राघव प्लीस..

राघव : बरं.. पण आल्यावर या सुकड्याचा सगळा प्लॅन सांगायचा हा मला..

मयुरी : हो हो.. नक्की.. तु ये अता..

मयुरी : संकेत.. तो गेला.. सांग लवकर आता..

संकेत : सुकडा??

मयुरी : असुदेत.. म्हटल्याने कोनी होत नाही..

संकेत : पण.. मी सुकडा??

मयुरी : ए.. आता गप ना बाबा.. तो यायच्या आत बोलना पट्कन..

संकेत : मयुरी.. मी काय म्हणतो..

मयुरी : संक्या.. आता डायरेक्ट मुद्याचं बोल..

संकेत : आपणाला तिच्या घरच्यांशी भेटाव लागेल?

मयुरी : कोणाच्या?

संकेत : माझ्या गर्लफ्रेंडच्या..

मयुरी : मग आम्ही कशाला मधे?

राघव : काय मग.. झालं का डिस्कशन?

मयुरी : आलास बाबा.. टायमिंग लावूनच बसलेलास वाटतं?

राघव : मग काय.. वेळेचा पक्का हाय आपण.. मग.. काय म्हणतोय सूकडा??

संकेत : परत सुकडां..

मयुरी : शांतबस संक्या.. हेच्यां गर्लफ्रेंड च्या घरी बोलवतोय आपल्याला..

राघव : का? गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं का याच्या?

संकेत : त्यासाठीच जायचंय..

राघव : ए.. सरळ बोल ना काय लोचा हाय ते?

संकेत : तिचा बाबा स्थळ बघतोय तिच्यासाठी..

मयुरी : मग तुझ्या दादाला घेऊन जाना तीच्याघरी..

संकेत : तो नाही म्हणतोय..

मयुरी : का?

संकेत : काय माहित..

राघव : टरकली असेल साल्याची..

मयुरी : रघू काय बोलतोयस..

राघव : अबे.. पण तुझी आयटम आहे तरी कोण?

संकेत : मुलगी आहे..

राघव : सुकड्या.. कॉमेडी करतो काय माझ्याशी? अबे कोणाची मुलगी ते सांग ना..

संकेत : पाटलाची..

मयुरी : काय?... संक्या डोकं जाग्यावर आहे ना?

संकेत : का?

मयुरी : का म्हणून काय विचारतो वर तोंड करून..
पाटील कोण आहे माहित आहे ना.. परवाच सुटलाय तो तुरुंगातून..

संकेत : सुटला नाय.. पळून आला..

राघव : काय? तुझ्यात इतकी हिम्मत कुठून आली बे साल्या?

मयुरी : गाढवा तुकडे करून टाकील तुझे तो..

राघव : अनी पार्सल करून पाठवेल... HOME DELIVERY.. हा हा हा...

मयुरी : पाटलाला तुझ्याबद्दल कळाल तर नाही ना?

संकेत : कळालय..

मयुरी : छान.. चांगलाच अडकलायस.. आता यातून बाहेर कसं निघणार तु?

संकेत : मी नाही.. आम्ही?

मयुरी : म्हणजे?

संकेत : पाटलाला तुमच्याबद्दल सुद्धा कळलंय..
त्याने बोलावलंय... तिघांनाही..

मयुरी : काय? मेंटल झालायस का साल्या सूकड्या..
आमच्याबद्दल का सांगितलंस त्याला?

संकेत : अग मी कशाला सांगेन? मंजु ने सांगितलंय सगळं..

मयुरी : आता ही कोण?

संकेत : पाटलाची मुलगी..

राघव : संक्या.. कधी बोलावलय पाटलानं?

मयुरी : राघव, काय बोलतोयस तु?

संकेत : मयुरी शांत हो.. संक्या आपला मित्र आहे, आपला यार आहे.. आणी त्याला सध्या आपली गरज आहे..

मयुरी : पण राघव

राघव : पण वगैरे काही नाही.. संक्या बोल.. कधी बोलावलंय?

संकेत : उद्या सकाळी..

मयुरी : आणि तु आम्हाला आत्ता सांगतोयस??

राघव : मयुरी शांत हो.. उद्या सकाळी ९:०५ ला सगळी इथ भेटूया.. मग इथुन जावू पाटलाकडे..
ओके?

संकेत : ओके..

मयुरी : पण?

राघव : मयुरी प्लीज...

मयुरी : बरं ओके..
...............................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनयवाद च्रप्स जी...
तुमच्या प्रतिसादा मुळे नवीन लेखकांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळते..
धनयवाद..!!

छान दिपक.

राघव : संक्या.. कधी बोलावलय पाटलानं?

मयुरी : राघव, काय बोलतोयस तु?

संकेत : मयुरी शांत हो.. संक्या आपला मित्र आहे, आपला यार आहे.. आणी त्याला सध्या आपली गरज आहे..

मयुरी : पण राघव

राघव : पण वगैरे काही नाही.. संक्या बोल.. कधी बोलावलंय?

संकेत : उद्या सकाळी.. >>>

कलरमधील वाक्य राघवचं आहे ना!
पुभाप्र.