मुंबई पाऊस - मदत / माहीती

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 29 August, 2017 - 09:45

२००५ सालचा जुलै महिना......
शेवटचा मंगळवार......
२६ तारीख......

कोणताही मुंबईकर आयुष्यात विसरु शकणार नाही असा दिवस

ज्या दिवशी पावसाने संपूर्ण मुंबई ठप्प करून दाखवली.
तथाकथित नालेसफाईचा 'पोल-खोल' केला.
कित्येक जीव आयुष्याला मुकले, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

आज १२ वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे का???
योगायोग पहा!
आजही महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे.
सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबापुरीची पार तुंबापुरी झाली आहे.

मायबोलीकरांना आजचे अनुभव 'शेअर' करता यावेत म्हणून हा धागा!!!

तळटीप : या धाग्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेवर कोणाचे राज्य आहे, कोण कसे चुकले आदी राजकीय चर्चा करू नये, ही 'नम्र' विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशीब माझं.. आज कॉलेज नव्हतं.. नाहितर मी पण अडकले असते.. माझे बाबा अडकून राहिले आहेत.. Sad दर पंधरा मिनिटांनी फोन करतेय त्यांना..

ज्यांचा कुटुंबियांशी फोनवरून संपर्क होऊ शकत नाही अशांनी Radio City, Red FM, Radio Mirachi आदी radio stations शी संपर्क करावा. ही radio stations अशा आणीबाणीच्या वेळी आपले संदेश radio वरून broadcast करतात. अर्थात आपले जे नातेवाईक अडकले आहेत त्यांना FM ऐकायची सवय असेल तर नक्की फायदा होऊ शकतो.

लोक, मंदिर ,चर्च , मशिदी, जैन मंदिर ,गुरूद्वारे,सार्वजनिक गणेशमंडळ यांनी लोकांची खाण्याची व राहण्याची सोय जागोजागी केली आहे, लोकांनी फेसबूक द्वारे घरी येऊन राहू शकतात असे आवाहन केले आहे . कृपया त्याचा न लाजता लाभ घ्यावा. अडचणीत असाल तर मदत अवश्य घ्यावी

सायुरी, काळजी करू नका.बाबांना वारंवार फोन करु नका एवढ्यासाठीच म्हणेन की त्यांच्या फोनचे चार्जिंग संपू नये.नक्की येतील ते.
अशा पावसात नेटवर्क खंडित होते/ केले जाते.मीही २६ जुलैला अशीच अडकले होते.त्यावेळी घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता.चालत येताना एका ठिकाणी लँडलाईनवरून आईकडे फोन केला होता.तिला माझ्या घरी कळवायला सांगितले होते.
काळजी करू नकोस,ही मुंबई आहे.इथे माणसे धावून मदतीला येतात.बाबा घरी आले की कळव.

काळजी करू नकोस,ही मुंबई आहे.इथे माणसे धावून मदतीला येतात.बाबा घरी आले की कळव.
>>>>
+१
पावसात तर हमखास सोय केलीच जाते.

बाकी मी पोचलो घरी मजा करत.. फक्त नेहमीच्या घरात न जाता दुसर्‍या जवळच्या घरात गेलो. कारण मुंबईकडे जाणार्‍या ट्रेन बंद होत्या Sad

whatsapp वर आलेला मेसेज इथे देत आहे .
*Mumbai Rains*

In case of any *emergency* or *help* you can contact Leo volunteers across Mumbai Thane and Navi Mumbai region:

*Navi Mumbai* - Nidhi Bhalera
+91 96199 44889
*Airoli* - Radhika Suryavanshi
+91 99876 54719
*Panvel* - Leo Ankit Jain
+91 98706 66650
*Chembur* - Anchit Agarwal
+91 98197 49587
*Charni road / South Mumbai* - Chahat Modi - +91 80977 88191
& Mehendi Dodia - +91 9773008147
*Nariman point* - Nupen Gandhi
+91 98207 27927
*Masjid Bunder* - Anand Deshmane
+91 98335 39992
*Thane* - Manthan Mehta
+91 98923 88994
*Mulund, Bhandup* - Hemanshu Kothari
+91 9920699205
*Malad* - Rajan Jogi
+91 9773847303
*Andheri & Lokhandwala*- Shwetank Maheshwari - +91 99670 54448
& Shashank Maheshwari - +91 98927 17830
*Juhu* - Kshitij shah
+91 98208 67037
*Kalina* - Karandeep Narula
+91 8080134174
*Goregaon* - Prabhsimram Narula
+91 99694 26205
*Santacruz* - Vinil shah
*Borivali & Kandivali* - Akshay Doshi
+91 98219 37284
*Mira Bhayander* - Sanchit Dhanuka
+91 9833261664
*Ghatkopar* - Dipesh Doshi - +91 99204 70711
& Krutarth Shah - +91 9930839891
*Powai* - Anand Dusane - +91 99302 01759
& Krutarth Shah - +91 9930839891
*Kalyan* - umang shah
+91 9167514691
*Aarey Colony* - Snehil Dhal
+91 9821729876
*Parel* - Viral Gala
+919619496601
Be Safe

If unable to contact anyone specific please call:-
*Dipesh Doshi* - +91 99204 70711
*Shashank Maheshwari* - +91 98927 17830
*Manthan Mehta* - +91 98923 88994
*Krutarth shah* - +91 9930839891

मी अजून ऑफीस मध्येच आहे. आम्हाला टिम लीडर चांगला मिळाला आहे. तो म्हणाला की कोणीही घरी जायचा नाही एवढ्या पावसात

ज्यांचा कुटुंबियांशी फोनवरून संपर्क होऊ शकत नाही अशांनी Radio City, Red FM, Radio Mirachi आदी radio stations शी संपर्क करावा. ही radio stations अशा आणीबाणीच्या वेळी आपले संदेश radio वरून broadcast करतात. अर्थात आपले जे नातेवाईक अडकले आहेत त्यांना FM ऐकायची सवय असेल तर नक्की फायदा होऊ शकतो.>> सहमत.. 26 जुलै च्या वेळी FM ची खुप मदत झाली होती. त्या वेळी मझ्या कडे मोबाइल नव्हता, मी struggler होतो. सुदैवाने घरीच अडकून पडलो होतो. पण माझा भाऊ तीन दिवस कार्यालयात अडकला होता. त्या वेळी 10-15 रुपयांचे pocket FM Radio मिळत. 2-3 दिवस त्याचीच सोबत होती.. या निमित्ताने पुन्हा ते दिवस आठवले. एक मात्र खरे.. अशा वेळी माणसं सर्व भेदभाव विसरून मदत करतात.. that's the spirit of Mumbai.. मला खात्री आहे, या वेळी पण हेच spirit दिसून येईल..

जर कुणी कार्यालयात अडकून पडले असतील व कार्यालय बहुमजली व दणकट इमारतीत असेल तर तिथेच रहाणे उत्तम. पाण्यात कार चालवत जाण्याचे धाडस कृपया करू नये. कार पाण्यात शिरल्यास दारे आतून उघडणे अशक्य असते.

Request everbdy to spread this message to all groups for people who are stranded
Note:- our volunteers are in that particular area
Sion hospital, near Gandhi market, 4 Road, King Circle, Dadar
1. Dadar Gurudwara for food and shelter. Opp chitra cinema
2. Where ever in mumbai can go to any guruwadara sahib for food and shelter any help can contact. 9323567555. MANPREET SINGH KHALSA ! 9022272252 HARNIT SINGH KHALSA

Hello Everyone seeing the situation in Mumbai High alert has Been Declared due to Heavy rains
People who are stuck at Vidyavihar can Come down And Take Shelter At Neelkanth Kingdom
-Vidyavihar west Kirol road(Next to Vidyavihar bus depot)
Share with ur friends & Family.
Anyone who are stucked up in ghatkopar, can come to parasdham ,food & staying arrangements done...02225015152/5354. Please pass this message in your group.

ही मुंबई आहे.इथे माणसे धावून मदतीला येतात.... +११११

.२६/०७/२००५ खरेचं अविस्मरणीय दिवस होता.

माझी तर फर्स्ट नाईट आऊट होती

Dear All
Those stranded near dadar, matunga, sion, parel can move towards *G.S.B. Sarvajanik Ganeshotsava Samiti Pandal* at *Ram Mandir wadala* Food and water has been made available.

Subhash Pai
Convenor( PRO )
*G. S. B. Sarvajanik Ganeshotsava Samiti.* Ram Mandir Wadala
Mumbai
9821595432 // 8879114932
Helpline 1916 declare by BMC...Please frwrd to as many as possible.

मुंबईत २६-२९ ऑगस्टदरम्यान पूरस्थिती उद्भवू शकते, हा अंदाज गेल्या आठवड्यात उपलब्ध होता. २०० मिलीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली गेली होती. अशा परिस्थितीत सोमवार-बुधवार निदान शाळांना सुट्टी देणं आवश्यक होतं.

आपल्याकडे वेधशाळेच्या अंदाजांची खेचली जाते.
तरी गणपतीमुळे काही शाळांना सुट्टी असावी..
ऑफिसेस तीन साडेतीन नंतर सोडायला सुरुवात केली... पण तोपर्यंत उशीर झालेला.

गणपतीमुळे काही शाळांना सुट्टी असावी..
ऑफिसेस तीन साडेतीन नंतर सोडायला सुरुवात केली... पण तोपर्यंत उशीर झालेला. >>>> हो अगदी.

मी गणपतीसाठी सुट्टी घेतल्यामुळे घरी आहे पण अडीच वाजता निघालेले बरेच जण अजुन घरी पोहचले नाहीयेत तर.काही जवळपास.राहणार्या मित्रमंडळी / नातेवाईंकाकडे.थांबलेत.

एकजण आहे जी विरारला राहते , लहान बाळ पाळणाघरी, अन नवरा सध्या दिल्लीत आहे. तीचे हाल तर विचार करण्यापलीकडचे आहेत.

@ श्री, आपल्या विनंतीला मान देऊन धाग्याच्या शीर्षकात योग्य तो बदल केला आहे.
@ सायुरी, आपले वडील आले का घरी?

माहितीसाठी - बृहन्मुंबई महानगरपालिकेने रेल्वे स्थानकाजवळील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नागरिकांच्या निवाऱ्याची सोय केली आहे.

Submitted by देवकी on 29 August, 2017 - 20:44>>धन्यवाद देवकीजी

एकजण आहे जी विरारला राहते , लहान बाळ पाळणाघरी, अन नवरा सध्या दिल्लीत आहे. तीचे हाल तर विचार करण्यापलीकडचे आहेत.>> बापरे
माझे बाबा पण अडीच-तीनच्या दरम्यान निघालेयत. अजून घरी नाही आले आहेत. एका तासापूर्वी फोन केलेला तेव्हा कसेबसे बांद्रापर्यंत पोचलेले.

बोरिवली ( पूर्व ) श्रीकृष्णनगर येथे दहिसर नदीवरच्या कठड्याचा काही भाग वाहून गेला. पुलावरून पाणी वाहात होते. नदीकाठच्या एका सार्वजनिक गणपतीलाही धोका पोहोचला आहे असा मेसेज होता .

लालबागच्या मुंबईचा राजा कडून अडकलेल्या मुंबईकरांची भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत आज झालेल्या अतिवृष्टीमुळे जे कोणी चाकरमानी, बाप्पाचे भक्त करीरोड, लोअर परळ, परळ, एल्फिस्टन रोड, कॉटन ग्रीन, शिवडी, भायखळा, रे रोड, वडाळा, दादर किंवा अन्य भागात अडकले असतील त्यांनी थेट मुंबईच्या राजाचे मंडप गाठावे. त्यांच्या भोजनाची व राहण्याची सोय मंडळातर्फे करण्यात आली आहे असे आवाहनच मुंबईच्या राजाने केले.
सिद्धीविनायक मंदिराकडून पावसात अडकलेल्यांची मंदिरात राहण्याची सोय केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे. तर लालबागचा राजा मंडळाकडून पावसात अडकलेल्यांची जेवण-खाण्याची सोय करण्यात आली आहे.
अंधेरीमधील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्येही चाकरमान्यांची खाण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे. याबरोबर मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह, फोर्टमधील बाई काबीबाई शाळा, ताडदेवमधील तुलसीवाडी गणेशोत्सव मंडप, वडाळ्याचे जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माटुंग्यातील श्री हरजी बोजराज अँड सन्स, के व्ही ओ जैन छत्रालय, माटुंग्यातील शगून हॉल, दादर गुरुद्वारा, माटुंगा मध्यरेल्वेसमोरील एचएनआर टेक प्रायव्हेट लिमिटेड, घाटकोपर रेल्वे स्टेशनसमोरील गणेश प्रिमियम टी पी एल, 103 नीलयोग स्क्वेअर, वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील तिरुपती भवन, मशीद बंदरमधील महाजनवाडी, फोर्टमधील डी.एन. रोडवरील बालवीर सार्वजनिक गणेशोत्स मंडळ, ठाणे रेल्वे स्टेशनजवळील ए वन कॅटरर्स, रेल्वे हॉल अशा ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

आपत्कालीन स्थितीत मुंबई महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक – १९१६

पुढील ४८ तासांमध्ये मुंबई आणि लगतच्या पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग अर्थात एन. एच. ४ मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहने थांबवण्यात आल्याने मुंबईकरांसाठी भाजीपाला आणि दुधाची उद्या टंचाई भासण्याची शक्यता.

संदर्भ : लोकसत्ता संकेतस्थळ

अरे बापरे. अजुन ४८ तास! कहर आहे! २६ जुलैच्या वेळेस मुंबईतच होते त्यामुळे पुरेपुर कल्पना आहे त्रासाची.

Pages