गणेशोत्सव २०१७ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 23:43

maayboli_Ganesh-2017-640.jpg

हिंदू परंपरा जीवनाभिमुख आणि सौंदर्योपासक आहे. तीत अर्थ आणि काम यांना धर्म आणि मोक्षाच्या बरोबरीने पुरुषार्थांत गणले गेले आहे. आपले सर्व देवदेवता अस्त्रशस्त्रांसोबतच 'गीतं वाद्यं च नृत्यं च' कलांतही निपुण आहेत. गणपतीतर चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिदेव! त्याच्या साजिर्‍या सुलक्षण नृत्यमग्न मूर्तीचं श्रीसमर्थ रामदासांनी दासबोधाच्या प्रथम दशकातील दुसर्‍या समासात केलेलं हे वर्णन स्वाती आंबोळे यांच्या आवाजात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!

ऑडिओ ऐकतो नंतर.

मस्त सुरूवात!

गणपती बाप्पा मोरया!
सुरेख आहे गणपतीची प्रतिमा! ऑडिओ नंतर ऐकणार नक्की!

गणपती बाप्पा मोरया !
वा, प्रसन्न वाटले स्वातीच्या आवाजातले श्लोक ऐकताना Happy

खूप छान, प्रसन्न आहे गणेशमूर्ती.
स्वाती, फार छान गायलं आहेस हे गणेशस्तवन.

गणपती बाप्पा मोरया !
निर्विघ्नं कुरु मी देव सर्व कार्येषु सर्वदा |

श्लोक ऐकताना खूप छान वाटतंय.

गणपती बाप्पा मोरया | मंगलमूर्ती मोरया ||
स्वाती, श्लोक ऐकून प्रसन्न वाटले.

गणपती बाप्पा मोरया. सुरेख आहे सजावट आणि मुर्ती. अगदी शांत आणि समाधानी.वरती ते लाईट फिरताना मुख्य पानावर दाखवलयं ते फार मस्त जमलं आहे.

गणपती बाप्पा मोरया!

(हा एक सण मला खूपच आवडतो. नात्यातल्या गणपतीत बिझी असणार आहे तरी डोकावेनच..)

गणपती बाप्पा मोरया
छान गायलंय. सकाळी गणपती श्लोक ऐकून प्रसन्न वाटले. मला याचसाठी हा सण आवडतो.

Pages