डॉ.नरेन्द्र दाभोळकरांची निर्घृण हत्या

Submitted by pkarandikar50 on 21 August, 2013 - 04:12

डॉ.नरेन्द्र दाभोळलरांची निर्घृण हत्या
रक्षाबंधनाचा दिवस उजाडला तोच एका अतिशय दु:ख्खद आणि धक्कादायक बातमीने. [ विचित्र योगायोग म्हणजे हाच दिवस राष्ट्रीय स्तरावर 'सदभावना-दिन म्हणूनही पाळला जातो!] डॉ. दाभोळकरांसारख्या एका सत्प्रवृत्त आणि तळमळीच्या समाजधुरीणाची हत्या करून कुणाला काय मिळालं असेल हा विषण्ण करणारा प्रश्न मनात आला. या हत्येचा थेट संबंध अंधश्रद्धा निर्मूलन समिती [अंनिस] च्या कार्याशी जोडला जाणं जितकं स्वाभाविक तितकंच खेदजनक होतं. ब्रिटीशांच्या राजवटीतही सतीबंदी, बालविवाहबंदी असे काही समाज सुधारक कायदे झाले. त्याला सनातनी वर्गाकडून विरोध नक्कीच झाला, नव्हे ते अपेक्षितच होतं परंतु त्या विरोधाचं पर्यवसान हिंसाचारात किंवा कोण्या समाज सुधरकांच्या हत्येत झालं नव्हतं. मग जादूटोणा इ. भंपक, आणि अन्यायमूलक भोंदू कृतींच्या विरोधी कायद्याला होणार्‍या विरोधाने असं क्रूर वळण का घेतलं असाही प्रश्न उभा राहतो.

मला वाटतं की ब्रिटीश सरकारच्या 'कायदा आणि सुव्यवस्था' यंत्रणेचा लक्षणीय दरारा होता हे एक कारण असू शकेल. स्वातंत्र्यानंतरच्या काळांत आपल्या सरकारच्या पोलिस यंत्रणेचं रुपांतर कायद्याच्या कडक अंमलबजावणीपेक्षाही सत्ताधार्‍यांच्या तालावर नाचणार्‍या आणि त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यात धन्यता मानणार्‍या एका बोटचेप्या आणि भ्रष्ट यंत्रणेत झालं आहे आणि या यंत्रणेचा गुन्हेगारांना धाक वाटेनासा झाला आहे हे स्पष्ट आहे.

वरून लोकशाही आणि आतून निवडणूकशाही अशी आपल्या राज्यव्यवस्थेची अधोगती होत आली आहे.
आजकालच्या सत्ताधार्‍यांना सामाजिक विकास आणि समतोल आर्थिक विकास किंवा विवेकवादी मूल्य व्यवस्था यांच्याशी काही देणं-घेणं उरलेलं नाही. वैयक्तिक आणि राजकिय हितसंबंध जपणं आणि सदैव मतपेटीवर डोळा ठेवून आपली खुर्ची सांभाळणं यातच ते गुंतले आहेत. आपली उद्दिष्टं साध्य करण्याकरिता शासकीय यंत्रणेचा कुशलपणे भला-बुरा वापर करणं हाच राजकारणाचा स्थायीभाव होऊन बसला आहे. येता-जाता शाहू- फुले- आंबेडकरांच्या नावाने जपमाळा ओढणारे आणि महाराष्ट्राच्या कथित पुरोगामी परंपरेचे मानभावी गोडवे गाणारे हे राजकीय पक्षनेते आतून मात्र बुरसटलेल्या, जातीयवादी आणि अंधश्रद्ध विचारांचे खंदे पुरस्कर्ते आहेत. अन्यथा, डॉ. दाभोळकरांनी ज्या कायद्याचा हिरिरीने प्रचार आणि पुरस्कार केला ते बिल गेली १४ वर्षे लोंबकळत राहिलं नसतं.

एक पुरोगामी राज्य अशी आम्ही आमची कितीही पाठ थोपटून घेतली तरी महाराष्ट्रात जातीयवादी आणि फॅसिस्ट प्रवृत्तींचा जोर वाढतच गेल्याचं वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. अर्थकारण आणि समाजकारण यांवर राजकारणाने सतत कुरघोडी केल्याचं चित्र दिसतं. कुठल्याच लोकशाही-वादी मूल्यांचा विधिनिषेध न बाळगता, आक्रमकपणे भावना प्रक्षुब्ध करणारं आततायी राजकारण ह़ळू हळू यशस्वी होत गेलं. 'ठोकशाही'. 'राडा-संस्कृती' किंवा 'टगेगिरी' असं या राजकारणाचं नुसतं वर्णनच नव्हे तर समर्थनही केलं जाऊ लागलं. तोच युगधर्म ठरत गेला आणि तो स्वीकारण्यात एकही पक्ष मागे राहिला नाही. [जे भाबडेपणाने साधन-शुचितेचे आणि विवेकवादाचे गोडवे गात राहिले ते नामशेष झाले!] ही भारतीय लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

या प्रकारच्या विधीनिषेधशून्य राजकारणाने आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर आपली पीछेहाट होते आहे. 'कायदा आणि सुव्यवस्था' यांचा बळी या सर्पयज्ञांत सर्वप्रथम जावा याचं आश्चर्य करण्याचे किंवा खेद वाटून घेण्याचे दिवस केंव्हाच निघून गेलेत.

'ज्या प्रवृत्तींनी महत्मा गांधींची हत्या केली त्याच प्रवृत्तींनी डॉ. दाभोळकरांनाही संपवले' असं विधान करून आपले मुख्यमंत्री मोकळे झाले. वर वर पहाता हे विधान फॅसिस्ट प्रवृत्तींच्या विरोधात आहे असं दिसलं तरी या दोन हत्या एकाच मापानं मोजण्यात एक मोठी गल्लत होते आहे असं मला वाटतं. भारताच्या फाळणीच्या स्फोटक आणि विदारक घटनेच्या पार्श्वभूमीवर गांधीजींची हत्या घडली. मारेकर्‍याने पळ काढण्याचा कोणताही प्रयत्न न करता स्वतःला तत्परतेनं पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबूलीही त्याने दिली होती. कोणत्याच युक्तिवादाने त्या हत्येचं यत्किंचितही समर्थन होऊ शकत नसलं तरी अशी कोणतीच पार्श्वभूमी डॉ. दाभोळकरांच्या हत्येला नाही हेही लक्षात घ्यावं लागेल. स्वातंत्र्यानंतरच्या ६६ वर्षांच्या वाटचालीनंतरही आपण फॅसिस्ट प्रवृत्तींवर अंकुश आणू शकलेलो नाही या अपयशाची अप्रत्यक्ष कबूलीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दिवसाढवळ्या, हमरस्त्यावर खून करून पसार होण्याएव्हढं धाडस मारेकरी दाखवू शकतात हे कशाचं लक्षण म्हणायचं? अंधश्रद्ध आणि मूलतत्ववादी प्रवृत्ती या कृत्यामागे दडलेल्या आहेत असं सामान्यतः मानलं जातं. या प्रवृत्तींना खतपाणी घालण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीही पुढे येणार नसलं तरी सत्तांध राजकारणामुळेच अशा समाज-विघातक प्रवृत्ती पोसल्या जात आहेत हे नाकारून चालणार नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना पकडून फासावर लटकावण्याने मूलभूत प्रश्न सुटणार आहे का? याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची ही वेळ आहे.

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तस नाही मला म्हणायच. हा खून विचारांसाठी झाला याबाबत जेव्हा दुमत होते त्या वेळी मनात एक शंका येते की या लोकांना मारेकर्‍यांचा शोध घेण्याची दिशा तर बदलायची नाही ना? मारेकरी कोण याबाबत वादग्रस्तता असू शकते. शेवटी कोर्टात सिद्ध होतील असे पुरावे द्यावे लागतात ना! आणि भाडोत्री मारेकरी एकवेळ सापडेल पण त्यामागचे मास्टर माईंड?

धागाकर्ते कुठे गायबलेत?

"डॉ.नरेन्द्र दाभोळरांची निर्घृण हत्या"

आधी शीर्षक एडिट करा म्हणावं मग चर्चा करु.

दाभोलकरांच्या हत्येत सनातनचा हात असल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे ही हत्या इतर कारणांमुळे झाली असल्याचा सनातनचा आरोप आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असताना एका बाजूने झालेले आरोप हे काळ्या दगडावरील रेषेइतके खरे आणि दुसर्‍या बाजूने झालेले आरोप धादांत खोटे असा निर्णय मायबोलीवरच घेतला जात असेल तर मग कोर्ट कचेरीची गरजच काय?

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/andhashradd...

{{{ दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हत्यांत साम्य असल्याचं पोलिस तपासात समोर आलंय. तसंच या प्रकरणी ज्यांना ताब्यात घेतलं गेलंय ते संशयित विशिष्ट संस्थेशी संबंधित आहेत. या संस्थेच्या संकेतस्थळावर दाभोलकर हत्येनंतर त्यांच्या छायाचित्रावर फुली मारल्याचं दाखवलं गेलं होतं.
Submitted by भरत. on 22 August, 2017 - 11:36 }}}

खरंच हा किती मोठा पुरावा आहे नाही? या पुराव्याच्या जोरावर सरळ फाशीच द्यायला हवं संस्था आणि संकेतस्थळाशी संबंधित लोकांना. सीसीटीव्हीत आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनाही न दिसण्याची काळजी घेण्याइतके हुशार भाडोत्री मारेकरी आणि वेबसाईट फुल्ली मारण्याइतका ढळढळीत पुरावा सोडणारे कमालीचे मूर्ख मास्टरमाईंड. एकदम डेडली कॉम्बिनेशन आहे की.

सनातन हे कायम संशयाच्या भोवर्‍यात आहे.त्यामुळे सनातनकडे बोट दाखवले जाते.सनातनचा इतिहास पहा दाभोलकरांचा इतिहास पहा.सनातनच्या लोकांना जर असे वाटत असेल की दाभोलकारांच्या परिवर्तन ट्र्स्ट ने गैरव्यवहार केला तर त्यांनी कोर्टात याचिका दाखल करावी असे मुक्ता दाभोलकर ने टीव्ही वरच्या एका कार्यक्रमात अभय वर्त॑क यांना सांगितले आहेच. दाभोलकरांच्या हयातीतच असे आरोप झाले आहेत.

Tawne pan sanatan che pahune zalet ki kay?
>>>
नाय नाय.

पण घाटपांड्यांची जी अपेक्षा आहे की त्यांना जी शंका/संशय येतो तो इतर सर्व महाराष्ट्रालापण 'असायलाच' हवा ती चुकीची वाटते. जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व निकाल लागलेला नाही तोवर लोकं तुमच्या मताशी सहमत असलीच पाहिजेत ही अपेक्षा चुकीची आहे.

एकतर महाराष्ट्र पुरोगामी आहे ही समजूत खोटी जसा भारत महान आहे तशीच.
दुसरे म्हणजे दाभोलकरांना त्यांच्या हयातीत मोठ्या प्रमाणावर सामान्यांकडून विरोध होत होता ते एका दिवसात आपली मते बदलणार नाहीत.

घाटपांडे खिंडीतल्या बाजीप्रभूसारखे दोन्ही हातात दांडपट्टा धरून आजकाल सपासप फिरवत आहे इकडे तिकडे इतकेच म्हणून थांबतो.

दाभोलकरांना त्यांच्या हयातीत मोठ्या प्रमाणावर सामान्यांकडून विरोध होत होता
<<
हाय्ला.
ही नवी माहिती आहे. कोणते सामान्य दाभोलकरांना विरोध करीत होते? काही संदर्भ?

हाय्ला.
ही नवी माहिती आहे. कोणते सामान्य दाभोलकरांना विरोध करीत होते? काही संदर्भ?
>>>
दाभोलकरांना सर्वांचा पाठिंबा असता तर अंधश्रद्धाविरोधी त्यांच्या लढ्याचे परिणाम दिसून आले असते. महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलन झाले आहे असे मला तरी दिसत नाही.

दाभोलकरांची भाषणे जेव्हा जेव्हा ऐकली तेव्हा श्रोत्यांमधून एखादा तरी 'हिंदू धर्मातच तुम्हाला खोट दिसते का?', 'मुसलमानांचे प्रबोधन कधी करणार' इथपासून आमच्या श्रद्धास्थानांना हात वगैरे मते सुशिक्षीत लोकांकडून ऐकली आहेत.

तसेच विविध बाबा/महाराजांच्या मागे असणारे लोक सामान्य लोक नाहीत असे म्हणायचे आहे का?

दाभोलकरांना सर्वांचा पाठिंबा असता तर अंधश्रद्धाविरोधी त्यांच्या लढ्याचे परिणाम दिसून आले असते.
>> हे वाक्य अगदी "नोटाबंदीचा त्रास झाला असता तर जनता रस्त्यावर आली असती" छाप वाटले!

दाभोलकरांना सर्वांचा पाठिंबा असता तर अंधश्रद्धाविरोधी त्यांच्या लढ्याचे परिणाम दिसून आले असते. महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलन झाले आहे असे मला तरी दिसत नाही.

दाभोलकरांची भाषणे जेव्हा जेव्हा ऐकली *केव्हा? किती?* तेव्हा श्रोत्यांमधून एखादा तरी 'हिंदू धर्मातच तुम्हाला खोट दिसते का?', 'मुसलमानांचे प्रबोधन कधी करणार' इथपासून आमच्या श्रद्धास्थानांना हात वगैरे मते सुशिक्षीत (संघिष्ट ) लोकांकडून ऐकली आहेत.

तसेच विविध बाबा/महाराजांच्या मागे असणारे लोक सामान्य लोक नाहीत असे म्हणायचे आहे का?
<<
वरचे बोल्ड माझे आहे.

कृपया, गुळमुळीत थापेबाजी करू नका.

बाबा महाराजांच्या मागे असलेले लोक दाभोलकरांना विरोध करीत होते, हा जावाइशोध कुठून आला?

टवणे, तुम्ही खरेच सनातनचे पावणे झाल्यासारखे वाटायला लागले आहे आता.

भाषणे अनेकदा. मिरजेत वर्षातून एकदा तरी व्हायचे कुठे ना कुठे, वसंत व्याख्यानमाला,डॉ. पाठकांच्या स्मृतिदिनाला वगैरे.
संघिष्ट लोक सामान्य नसतात का?
जोव अंनिस 'दुसर्‍या'च्या विरोधात बोलते तोवर लोक गप्प बसतात, स्वतःच्या श्रद्धांविरोधात बोलले की लगेच विरोधात जातात.

तेव्हा दाभोलकर जनमानसात प्रिय सुधारक होते व बहुसंख्य जनता त्यांच्या चळवळीला पाठिंबा देईल असे तुमचे मत असेल तर तुम्ही प्राणपणाने जपा.

त्यांचे एक फार छान पुस्तक आहे 'मुकी मेंढरे कुणी हाका' नावाचे. हे शीर्षक दोन्ही कडच्या लोकांना फिट बसते हे मला आजच उमगले.

पण घाटपांड्यांची जी अपेक्षा आहे की त्यांना जी शंका/संशय येतो तो इतर सर्व महाराष्ट्रालापण 'असायलाच' हवा ती चुकीची वाटते. जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व निकाल लागलेला नाही तोवर लोकं तुमच्या मताशी सहमत असलीच पाहिजेत ही अपेक्षा चुकीची आहे.>>> अपेक्षा नाही फक्त माझे ते मत आहे. अपेक्षा ही आहे की जे कुणी दाभोलकरांचे मारेकरी असतील त्यांना लवकरात लवकर शासन व्हावे.

>>> संशयाची सुई, लोकांना वाटणारे संशयित जरी दाभोलकरांच्या कार्याला विरोध करणार्‍या संस्था असल्या तरी 'त्या संस्था गुन्हेगार आहेत' हे ठामपणे म्हणणे आणि दाभोलकरांचा खून मालमत्तेच्या वादातून झाला वगैरे मुद्दामून दिशाभूल करणार्‍या वावड्या पसरवणे यात फरक तो काय राहिला?

दाभोलकरांच्या कार्याला विरोध करणार्‍या संस्था गुन्हेगार आहेत हि बेसलेस वावडी नाही. ज्या प्रकारे विरोध झालाय ती पद्धत पहा. महाराष्ट्राने पूर्वी सुद्धा अनेक वैचारिक मतभेद पहिले आहेत. फडके-अत्रे, ठाकरे-अत्रे, ठाकरे-पुलं इत्यादी. त्याच पद्धतीने सनातन-अंनिस वादाकडे पहावे अशी तुमची अपेक्षा असेल तर ते थेट चुकीचे आहे. कारण सनातन कडून दाभोलकरांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर लाल फुली केलेले फोटो सनातनने प्रसिद्ध केले होते. हे सनातनने सुद्धा कबूल केले आहे. कधी अत्रेंनी फडकेंच्या फोटोवर लाल फुली करून ते मराठा मधून प्रसिद्ध केले होते का? ठाकरेंनी पुलंना जीवे मारण्याची धमकी दिली होती का? तेंव्हा कशाचीही तुलना कुठेही करून इतरांचा बुद्धिभेद करू नका. केवळ पुराव्या अभावी एखादा गुन्हेगार सुटला म्हणजे समाजाच्या मनातून तो गुन्हेगार म्हणून सुटत नाही.

खून सनातनने केलाय हे ओपन सिक्रेट आहे. ते किती विकृत लोक आहेत याचीही सर्वाना माहिती आहे. कारण फोटोवर लाल फुली वगैरे हि विकृत सिरीयल किलर ची मानसिकता आहे. बाकी सगळा शब्दच्छल आहे. असा शब्दच्छल काय कोणत्याही "पुरावे न सोडलेल्या थर्ड ग्रेड खुन्याविषयी" पण करता येतो. तेंव्हा, चालू द्या.

इनामदार, बेसलेस वावडी मालमत्ता वाद.
सनातनच्या मेम्बरांवर तर थेट पोलिसांचा संशय आहेच

>>>
केवळ पुराव्या अभावी एखादा गुन्हेगार सुटला म्हणजे समाजाच्या मनातून तो गुन्हेगार म्हणून सुटत नाही.
>>>
हे दोन्ही बाजूंनी होते आणि म्हणूनच धोकादायक आहे

तेव्हा दाभोलकर जनमानसात प्रिय सुधारक होते व बहुसंख्य जनता त्यांच्या चळवळीला पाठिंबा देईल असे तुमचे मत असेल तर तुम्ही प्राणपणाने जपा.
<<
Lol

>>दाभोलकरांना त्यांच्या हयातीत मोठ्या प्रमाणावर सामान्यांकडून विरोध होत होता<<

हे जे स्टेटमेंट आपण केलेत, ते डिफेंड न करता आल्याने मी प्राणपणाने काय जपावे हे सल्ले.

धन्यवाद!

दाभोलकर सरांची हत्या ही अत्यंत वाईट घटना घटना आहे. महात्मा गांधिजींच्या माथेफिरु खुन्याचा जसा फासाला लटकावुन वध करण्यात आला तसेच दाभोलकर सरांच्या खुन्याचे करण्यात यावे. पोलिसांनी ह्याही माथेफिरुला लवकर पकडावे ही अपेक्षा.

>>दाभोलकरांना त्यांच्या हयातीत मोठ्या प्रमाणावर सामान्यांकडून विरोध होत होता<<
हे जे स्टेटमेंट आपण केलेत, ते डिफेंड न करता आल्याने मी प्राणपणाने काय जपावे हे सल्ले.
>>>

तुम्हाला खरेच असे म्हणायचे आहे की दाभोलकरांच्या कार्याला जनसामान्यांचा भरघोस पाठिंबा होता?
तो तसा नव्हता असे म्हणून मी काही त्यांच्या कार्याचा अपमान करत नाहिये. मात्र अंनिसच्या कार्याला लोकांचा मोठा पाठिंबा होता असे म्हणणे आयवरी टॉवरमध्ये बसून म्हणणे झाले इतकेच मी म्हणेन.
जो पर्यंत अंनिस दुसर्‍याच्या अंधश्रद्धांविरुद्ध आंदोलन करतय तोवर मला प्रॉब्लेम नाही मात्र माझ्या अंधश्रद्धांविरुद्ध बोललात तर मी उलटून बोलेन ही भुमिका बहुसंख्या नागरिकांची असते. दाभोलकरांनीसुद्धा टॅक्टफुली त्यातल्या त्यात वाईट, थेट धोका पोचवणार्‍या प्रथा, अंधश्रद्धांविरुद्ध आवाज पहिले उठवला. त्यांनी एक जात चौफेर गोळीबार केला नाही कारण तसे करून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला असता.

मोठ्या प्रमाणात सामान्यांचा विरोध होता हे विधान खोटे याचा अर्थ मोठ्या प्रमाणात सामान्यांचा पाठिंबा असा होत नाही.
दोहोंच्या मधलीही काही स्थिती असेलच ना? इन्डिफरन्स? जस्ट क्युरियस?
सामान्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचं जाणवलं नाही. सोशल मीडिया आल्यावर तसं चित्र मात्र निर्माण होऊ लागलं होतं. इथे बोलणारे मोजके आणि विचार न करता माना डोलावणारेच बरेच, असे बहुतांश वेळा असते.

इथे वाचा शिरीष शेंबेकर यांची प्रतिक्रिया
http://jagatapahara.blogspot.in/2015/03/blog-post_89.html>>>>>>>>>>

इथे वाचा प्रकाश घाटपांडे यांची प्रतिक्रिया http://bhautorsekar.blogspot.in/2013/01/blog-post_6333.html

भाऊतोरसकराची लिंक वर त्यांचे विचार असतात. खात्रीशीर बातमी नव्हे Wink

काय दिवस आले टनाटनवर कुठल्याही ब्लॉगवर लिहीलेलेच खरे मानू लागले. Wink

कर नही तो डर कायका? लपतछपत का कार्यकर्ते फिरत आहे आतातर साध्वी, कर्नल सारखी लोकांना वाचवणारे सरकार आहे. कशाला घाबरतात राव ?

अरे पण पोलिसांनी त्या सनातनच्या कोणा डॉ. तावडेंना कधीच अटक केली आहे ना? मग खटला का नाही चालवत???

मग खटला का नाही चालवत???
नवीन Submitted by विक्षिप्त_मुलगा on 26 August, 2017 - 06:21
>>>
सरकार या टनाटनी लोकांचेच आहे.आपले ते आदरणीय आणि मा.मू सनातनच्या परत्पर गुरु आठवले साहेबांना गुरुस्थानी मानतात.मग कसा खटला चालेल? चालला तरी तपासयंत्रणांवर दबाव टकतील हे लोक.

मग आपण एखादी online petition चालू करावी का 'खटला लवकरात लवकर सुरु करावा' म्हणून? इतर कोणाला शक्य नसेल तर मी सुरु करेन अशी online petition. फक्त मला त्या petition मध्ये लिहिण्यासाठी सनातनच्या विरोधात असणारे पुरावे लागतील. कृपया मायबोलीकरांनी मला मदत करावी.

@विक्षिप्त_मुलगा: online petition जरूर सुरु करा. त्यासाठी पुरावे आवश्यक नाहीत. ते पोलिसांचे काम आहे आणि तावडे आणि सनातन विरोधात त्यांच्याकडे पुरावे असतीलच. जागरूक नागरिक म्हणून खटला लवकरात लवकर सुरु करा म्हणून आपण petition चालू करू शकतो. सध्या राज्य प्रो-सनातन प्रवृत्तींचे आहे त्यामुळे जास्त अपेक्षा धरण्यात अर्थ नाही. तरीही विवेकवाद्यांनी हारता काम नये.

तावडे आणि सनातन विरोधात त्यांच्याकडे पुरावे असतीलच............
असे 'जर-तर' च्या भाषेत petition कशी सुरु करू मी? काहीतरी ठोस मुद्दे हवेत ना!

रच्याक, 'मडगाव' स्फोटप्रकरणी पण या सनातन वाल्यांना अटक केली होती ना? त्याचे काय झाले पुढे? त्या प्रकरणाबद्दल हल्ली काहीच ऐकू येत नाही. दाभोलकर, पानसरे खुनाबद्दलच चर्चा होते आहे.

Pages