डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे???

Submitted by सिंथेटिक जिनियस on 20 August, 2017 - 07:04

डीएसके हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे मराठी नाव.पण सध्या वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आहे.
डीएसके यांनी त्यांच्या अनेक कंपणीज मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातोय.मुद्दल तर सोडाच व्याजही परत न केल्याचा आरोप आहे.
हे नक्कि काय प्रकरण आहे?
गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करताना काय काळजी घ्यावी?
प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का?
एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच .
तरी जाणकारांनी डीएसके प्रकरणावर प्रकाश टाकावा व इतर प्रश्नावर मार्गदर्शन करावे.धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आमचे मुख्यमंत्री" म्हणजे काय ?
नाही म्हटलं एका धाग्यावर "तुमचे" असे कोणीतरी बोलल्यावर काहींनी फार गोंधळ घातलेला.त्यातल्यांनीच आता लिहीले म्हणजे "मुद्दामुन" गोंधळ करण्यासाठी लिहीले का?

केदार१२३,

जर एखाद्या कंपनीने नियमित NBFC फोर्म भरला. त्यात योग्य आणि खरी माहिती दिली. सुरवातिला त्या कंपनीची स्थिती खुप चांगली होती, दिवसेदिवस ती खराब होत चालली आहे आणि एक दिवस नविन आलेली माहिती वाचुन RBI ला कळतय की ही कंपनी बुडत आहे तरी माझ्या मते RBI काही action घेउ शकत नाही . त्यामुळे ती कंपनी डुबत असताना पण फिक्स डिपोसिट घेउ शकतात.. आणि जस्तित जास्त लोक यात अडकतात. लोक कंपनीची balance sheet बघुन फिक्स्ड डिपोसिट घेतात. त्याना कंपनीची आर्थिक स्थिती काहिच माहिती नसते.
मी यातिल तज्ञ नाही त्यामुळे जर तुम्हाला त्याबद्दल माहित असल्यास सांगावे.

कुठल्याही कंपनीचे प्रा.लि/पब्लिक लिमिटेड Fixed Deposit हे Secured नसतात. >>>

जरा गोंदळ उडाला. कंपनीत फ़िक्ष डीपोजित हि काय नवीन कल्पना आहे. मला बँकमध्ये एफडी असतात माहीत आहे. कंपनीत एफडी म्हणजे कंपनीत बँक अकौंट पण ओपन करता येते का?

RVI nakki action gheu shakate. Economic wing la hee case refer hou shakate tasech RBI ashee case ED la refer karu shakate. Navin fixed deposit accept karanyavar RBI immediate stay anu shakate.

Normally builders he swatacha paisa kadhich vaparat naaheet. Ulat alela paisa ( bank loan, booking, deposits) ha divert karatat.

Pan RERA atargant tyana project wise seperate account thevane garajeche hoil ani paise kadhatana CA ani Architect certificate ghene avashyak asel. Tyamule diversion la barya paikee ala basu shakel.

Pan jar reports fabricated asatil ( mee adhi mhatalya pramane) tar RBI la kahi kalane shakya honar nahi ani kahi action ghene hee durachi goshta hoil

>>कुठल्याही कंपनीचे प्रा.लि/पब्लिक लिमिटेड Fixed Deposit हे Secured नसतात. <<

पब्लिक लिमिटेड कंपन्यांचा बाबतीत हे लागु होत नाहि असं वाट्तं. पब्लिक कंपन्यांनी घेतलेली एफडिज सिक्युर्ड बाँड्सारखीच असतात. कंपनीने जर दिवाळखोरी जाहिर केली तर देणी फेडण्याच्या ऑर्डरमध्ये एफ्डीज शेअर होल्डरस्च्या आधी येते. एखादा सिए हि बाब क्लेरिफाय करु शकेल...

बातम्यांनुसार, डिएस्केने फ्रॉड केलेला आहे; सुब्रातो बॅनर्जी प्रमाणेच यांनाहि तुरुंगाची हवा खायला लागणार आहे...

अतुल पाटील,
व्यवसायातले छक्केपंजे म्हणजे फ्रॉड या अर्थानेच घेणे गरजेचे नाही.

असो. धाग्याचा तो विषय नाही. वेगळ्या संबंधित धाग्यावर बोलू पुन्हा केंव्हातरी.
>>
ओके ...

>त्यांच्या 'डेलनाझ'(आरारा) ने सांगितलेय ना, कि डिएसकेची दिवाळखोरी 'नोटबंदी'ने आली, तर तेच खरे आहे.
@ प्रसाद.
तुमच्या प्रतिसादांची भाषा आवरा आणि वैयक्तिक पातळीवर उतरणे थांबवा.

@सिंथेटिक जिनियस
तुमच्या प्रतिसादांची भाषा आवरा आणि ओढून ताणून आणलेले जातिविषय प्रतिसाद थांबवा.

>> कुठल्याही कंपनीचे प्रा.लि/पब्लिक लिमिटेड Fixed Deposit हे Secured नसतात.

सहमत. कंपनी बुडाली तर फिक्स डीपॉझीट बुडाले.

>> कंपनीने जर दिवाळखोरी जाहिर केली तर देणी फेडण्याच्या ऑर्डरमध्ये एफ्डीज शेअर होल्डरस्च्या आधी येते.

नाही. मी जे वाचले त्यानुसार आधी शेअर होल्डर विचारात घेतात:

fixed deposits mobilized by companies are governed by the provision of Section 58-A of the Companies Act 1956. According to the Companies Act, if the company is winding up, it should give first preference to the equity share holders in payments rather than the fixed deposit holders, which makes the corporate FDs risky.

Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/47426478.cms?utm_source=...

Company deposit च्या नियमासाठी कंपनी कायदा २०१३ चे सेक्शन ७३ पहा . मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सने वेळोवेळी सुधारित नोटिफिकेशन जारी केलेली आहेत.
हा माझ्या कामाचंच एक भाग आहे
विस्तृत प्रतिसाद नंतर देईन.

रवी करंदीकर नावाचे गृहस्थ घरबांधणी व्यवसायावर ब्लॉग लिहितात व चित्रपटासारखे ग्रुहनिर्मान प्रोजेक्टची परीक्षणेही करतात. बहुधा पेड सल्लेही देत असावेत . http://www.ravikarandeekarspunerealestatemarketnewsblog.com/

या करन्दीकरान्नी दीड दोन वर्षापूर्वीच डीएस्केचे बारा वाजले असल्याचा ब्लॉग लिहिला होता. ते आता सत्य ठरत आहे.
राजाश्रय असलेले आयडी कधीही जाणार नाहीत हेही स्पष्ट होते आहे.

ट्रंपचा काय सीन आहे?
आणि तो अमेरीकन आहे ना, त्याचे भारतीय समर्थक असण्या नसण्याचा काय संबंध?

बाण्धकाम व्यवसाय आणि काळा पैसा याण्चे अतूट नाते आहे. ऑक्सिजन आणि प्रकाश संश्लेषण याण्चे आहे तसेच. अगदी मराठी मध्यमवर्गीय सरळमार्गी लोकंही आपल्या घरांचे सौदे करताना व्हाईटमध्ये किती आणि ब्लॅकमध्ये किती हे धंदे करतातच. अगदी काहीही वावगे नसल्यासारखे... त्यामुळे या लाईनीतील माणूस निव्वळ सच्चा असेल या भ्रमात कोणी राहू नये. हा व्यवसाय काळा पैसे जमवण्यासाठीच असतो.

मला तर ते सिविल ईंजिनीअरींग करून उन्हात तापत साईट ईंजिनीअर करणारया हुशार मुलांबद्दल फार वाईट वाटते. जे बिल्डर लाईनमध्ये उतरतात वा गेला बाजार बीएमसी मध्ये कामाला लागतात. भले ज्युनिअर ईण्जिनीअर का असेना, तिथेच पैसा आहे. हे जमणार नसेल तर मराठी पोरांनी सिविल ईण्जिनीअरींगही करू नये.

जाई .. धन्यवाद..
Company deposit च्या नियमासाठी कंपनी कायदा २०१३ चे सेक्शन ७३ वाचुन काढला. > त्यात मला किती पैसे लोका कडुन घ्यायचे यावर काही बंधन दिसले नाही. फक्त वेळच्या वेळी कागग submit करायची, वेब वर कंपनीची परिस्थिती सांगायची, डिपॉसिट झाल्यातले १५% पैसे बॅकेत ठेवायचे एवढीच माहिती मिळाली. फक्त secured नसेल तर तसे लिहावे असे सांगितले आहे.
लोक कंपनीचे नाव बघुन Fixed Deposit करतात. कोणी त्याची balance sheet, किती कर्ज आहेत , secured आहे की नाही हे बघुन Fixed Deposit करत नाही. त्यामुळे दर १०-१५ वर्षात एखादी कंपनी तरी लोकाचे पैसे डुबवते/ व्याज वेळेवर देत नाही/ फक्त मुद्दल देते. १७ वर्षापुर्वी लॉईड फायनान्स नावाची कंपनीने पण असेच केले होते. लोकानी त्या कंपनीचे नाव बघुन Fixed Deposit केले होते.

तुमच्या विस्तृत प्रतिसाद वाचायला आवडेल.

Last yr travelling in a car, I heard about adhi Ghar nantar paise. I felt, there is somethingwrong with it. How can that be possible?
Then I felt, may he mee madhyamvargi vichar karatey and I don't understand business - perhaps.

>>Company deposit च्या नियमासाठी कंपनी कायदा २०१३ चे सेक्शन ७३ वाचुन काढला. <<
त्यात प्रा.लि. कंपन्यांना हि फिक्स्ड डिपाझिट्स स्विकारायला मुभा दिलेली आहे. पण दिवाळ्खोरीत ऑर्डर ऑफ पेमेंट कसं असावं याची गाईडलाइन्स सापडली नाहित. वर म्हटल्याप्रमाणे शेअरहोल्डर्सना (कंपनी ओनर्स) सर्वप्रथम पैसे द्यायचे, तेहि देणेकर्‍यांच्या आधी हे पट्त नाहि कारण दे हॅव सपोझेडली असुम्ड बिगर रिस्क दॅन एवरिबडी...

>>तुमच्या विस्तृत प्रतिसाद वाचायला आवडेल.<<
+१

राज, साहिल तुमचे बरोबर आहे. वर १९५६ च्या ऍक्ट ची लिंक दिली होती त्या संदर्भात पोस्ट लिहीले होते. त्या सेक्शन मध्ये फक्त गाईडलाईन्स आहेत.नेमकं काय करायचं हे दिलेलं नाही.
सगळा कंपनी ऍक्ट २०१३ मूळ गॅझेटेड रुपात आहे. MCA वेळोवेळी प्रत्येक सेक्शनवर नोटिफिकेशन जाहीर करते त्यावर ते सेक्शन कस implement करायचं ते ठरतं.
अजूनही २०१३ च्या ऍक्ट मध्ये अमेन्डमेंट्स चालू आहेत.
सेक्रेतेरीयल स्टॅण्डर्ड्स पण काय म्हणतात हे हि बघावं लागेल.

नक्की लिहिते नंतर

घाईत आहे म्हणून थोडक्यात लिहिते. कंपनी कायदा २०१३ च्या सेक्शन ७३ मध्ये काही गडबड झाल्यास tribunal कडे दाद मागता येते असे लिहिले आहे.हे tribunal म्हणजे NCLT .नॅशनल कंपनी Law tribunal. हे नुकतंच स्थापन झालेय. गुगल करून त्याची ऑफिस नक्की कुठे आहे ते शोधता येईल.
दुसरी गोष्ट सेबी कडे दाद मागता येऊ शकेल.सेबी अश्या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करते हे सहाराच्या वेळी दिसून आलेय. PCPL च्या गुंतवणूक दारांची केसही सध्या सेबीत चालू आहे.
RBI ला अश्या गोष्टीत लक्ष द्यायचे अधिकार असतात का आणि असले तरी ते कितपत इम्प्लेमेन्ट होतात ह्यात शंका आहे ।

मी आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस चेक पेमेंट नी फ्लॅट्स घेतले आहेत. त्यामुळे सरसकट सगळेच बांधकाम व्यावसायिक काळा पैसा मागतात हे म्हणणे धाडसाचे ठरेल.

तुझा पगार किती बोलतो किती हे वाक्य कोण्या नाटकातले आहे? आरारा यांच्या प्रतिसादामुळे आठवलं अचानक, अवांतर आहे माफ करा

सिंबा नोट बंदी वर माझ मत काय आहे याने खरचं काही फ़रक पडत नाही कारण डीएसके लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केट मधे लिस्टेड आहे आणि त्याचे त्यांचे समभाग विक्रीला आले होते. जर ही कंपनी डीमॉनिटायझेशनमुळे दिवाळ्खोर झाली असती तर तसे स्पष्ट ऑडीट रीपोर्ट मधे आले असते.

माझ्या माहिती प्रमाणे कंपनीने कोणतीही डीपॉझीट ही लिस्टेड कंपनीच्या नावावर घेतलेली नाहीत ती सगळी वेगळ्या कंपन्यांच्या नावावर आहेत त्यामुळे लिस्टेड कंपनी कोणतेही डीपॉझीट देणे लागत नाही.

घेतलेली डीपॉझीट ही सेक्युअर नसावित कारण लोकांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवुन डीपॉझीट ठेवलेली आहेत आणि ती अनेक वर्षापासुन असावित म्हणजेज कंपनी लिस्ट होण्या आधि पासुन. हे सगळे बरेच कॉप्लिकेटेड आहे कंपनीची कोणतीही असेट यासाठी विकता येतिलच असे वाटत नाही.

माझा सॅम्पल साईझ अगदी भाताच्या शिता एवढा असला तरी माझ्या साठी तोच benchmark नाही का? बांधकाम क्षेत्रात प्रचंड काळाबाजार असला तरी ग्राहकाने कोणाकडून विकत घ्यायचं हे त्याच्यावर अवलंबून नाही का! जर ग्राहकांनी ठरवले की मी कॅश payment करणार नाही तर ते पण शक्य आहे.

Dsk बद्दल कधिच आपलेपणा वाटला नाही... आता डबघाईला आल्यावर सगळीकडे चर्चा सुरू आहे पण त्यांची बांधकाम क्वालिटी चांगली नाही हे आम्हाला आधी पासून माहित होते. माझे यजमान बांधकाम तज्ञ आहेत. त्यांचे कितीतरी सहकारी Dsk मध्ये नोकरी करत होते पण त्यांचे पगार ही वेळेवर निघत नव्हते. आता तर काय सगळाच गोंधळ

त्यामुळे सरसकट सगळेच बांधकाम व्यावसायिक काळा पैसा मागतात हे म्हणणे धाडसाचे ठरेल.
<<
माझा सॅम्पल साईझ अगदी भाताच्या शिता एवढा असला तरी माझ्या साठी तोच benchmark नाही का?
<<

अहो ताई,
शितावरून परिक्षा करायला बिल्डर म्हणजे भात नाही. बिल्डिंगमधल्या एक दोन लोकांकडून संपूर्ण व्हाईट घेतले म्हणजे त्याचा संपूर्ण व्यवहार पांढरा, असे होत नाही. उलट पब्लिकला दाखवायला असे दोन चार दाखवायचे दात ठेवावे लागतात त्यांना. Lol

Pages