डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे???

Submitted by सिंथेटिक जिनियस on 20 August, 2017 - 07:04

डीएसके हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे मराठी नाव.पण सध्या वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आहे.
डीएसके यांनी त्यांच्या अनेक कंपणीज मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातोय.मुद्दल तर सोडाच व्याजही परत न केल्याचा आरोप आहे.
हे नक्कि काय प्रकरण आहे?
गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करताना काय काळजी घ्यावी?
प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का?
एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच .
तरी जाणकारांनी डीएसके प्रकरणावर प्रकाश टाकावा व इतर प्रश्नावर मार्गदर्शन करावे.धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{{ . पैसा कमवायला कालागांडी करणे हि गुजराती मारवाड्यांचीच मक्तेदारी नसून मराठी मुलांनी ठरवले तर ते देखील पैसा कमावू शकतात. }}}

ठरवून चूकीचे शब्द प्रतिसादात घुसडण्याची आपली खोड या गंभीर धाग्यावर कृपया दाखवू नका. तो शब्द कुलंगडी (इथे पाहा https://www.google.co.in/search?biw=1366&bih=613&q=%E0%A4%95%E0%A5%81%E0...) असा असायला पाहिजे. चार तास होण्याच्या आत एडिट करा.

'रेरा' ह्या कायद्यामुळे अनेक बिल्डर्सची कामे रेंगाळलेली आहेत. रेरा सर्टिफाईड झाल्यावरच कामे सुरू करता येणार आहेत.

यांच्या विधानांचे स्पष्टीकरण मागणारे ते "भक्तगणंग " आणि स्पष्टीकरण न देताच आपले विधान खरे मानण्याची इतरांना सक्ती करणारे हे कोणते भणंग?

काही पण लॉजीक आहे.
म्हणजे डिएसके त्यांचे सर्व प्रोजेक्ट काळ्या पैशातून उभे करत होते, असे तुम्हाला सुचवायचे आहे काय ?>>>>>>>>>>>

प्रसाद,
मी काय अनुभवले ते निरीक्षण लिहिले आहे, आणी त्यातून "मी" लावलेला अर्थ लिहिला आहे
बहुतांश बांधकाम व्यावसाईक खूप प्रमाणात काळ्या पैश्यामध्ये डील करतात हि नोन fact आहे,

आणी पांढर्या पैशात डील करणारे व्यावसाइक लोकसुद्धा नोटबंदी मुळे प्रोब्लेम मध्ये आले हे हे सर्व जाणतात.

त्यामुळे मी न सुचवलेल्या गोष्टी माझ्या मुखी घालणे कृपया थांबवावे

दुसरी गोष्ट, मी या प्रकरानातील एक विक्टीम आणे, माझा flat मिळायला उशीर होतो आहे,
घटनेतल्या विक्टीम ला , घटनेत इंवोल्व नसलेल्या लोकांपेक्षा किंचित माहिती जास्त असू शकेल या वर तुमचा विश्वास आहे का?

ठराविक जातीचे डॉक्टर हुशार असतात असा फालतु प्रतिवाद करणारा आयडी इथेही जातीचे तुणतुणे घेऊन उगवला आहे.स्वतःचे पैसे काढून मग इथे उंटावरुन शेळ्या हाकत आहे.
या रिकामटेकड्या आयडीला ॲडमीन यांनी कडक शब्दात समज देऊनही सॉफ्ट बुलिंग चालू आहे याचे.ॲडमीन कृपया लक्ष द्यावे.

जाई, छान लिंक दिलींत!....... +१

>> सुरुवातीला 19% रेट आणि नंतर 14% पर्यंत यफ डी चे रेट्स दिले गेलेत, लोकांना शंका येत नव्हती का असले रेट्स मिळतायत, झोल असेल म्हणून?
सहमत. मलाही हा प्रश्न अनेकदा पडतो. लोक कसे काय इन्वेस्ट करत असतील. बहुदा क्राउड सायकोलॉजी असेल. म्हणजे सुरवातीला काही थोडे इन्वेस्टर तयार करायचे. मग नंतर त्यांच्या जवळच्या इतरांना पटवायचे. ते म्हणतात "त्यांनी केलंय का मग मी पण करतो". मग असे बरेचसे झाले कि नंतरचे आलेले विचार करतात कि "इतक्या सगळ्यांनी केली आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळे ते काय मूर्ख असणार आहेत का? आपण पण करू" Lol असे होत असावे असा आपला माझा अंदाज.

>> मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी यानेच धंदा केला पाहिजे ....... हे दडपण
असहमत.

सुरवातीला काही थोडे इन्वेस्टर तयार करायचे. मग नंतर त्यांच्या जवळच्या इतरांना पटवायचे. >>>>>>>>>>>>>

आणि असे तयार केलेले इंवेसटर्स वेळीच पैसे काढून घेऊन नामानिराळे होतात.

माझ्या मते डिएसके मधे २ ३ वेळा निवडणुकीत उभे राहीले व जोरदार आपटले त्यात त्यांनी मजबुत पैसा खर्च केला व हाती काहीच आले नाही. अगदी हत्तीशी पण युती केलेली त्यांनी. त्या व्यतिरीक्त तो जो काही ड्रीम सिटी प्रोजेक्ट आहे तो यायची घोषणा होताच तो गंडणार असे अनेकांना वाटल्याने फेल गेला, त्यात त्यांचा अपघात. या तिन गोष्टी मला जास्त कारणीभुत वाटतात.

बाकी चालु द्या.

अगदी हत्तीशी पण युती केलेली त्यांनी
>> हे काय आहे? जणू पाकिस्तानी सैन्याशी किंवा दहशतवादी संघटनेशी युती केल्याच्या थाटात लिहिलंय.

असो,

मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी यानेच धंदा केला पाहिजे ....... हे दडपण
असहमत.
>>>>>>>>>>

वडापावची गाडी या गुणांवर निघते. मात्र मोठा व्यवसाय करायला छक्केपंजे जमले पाहिजेत. ते न करता एखादा यशस्वी उद्योजक विरळाच. मराठी पोरांना ते तितके जमत नाहीत. त्यामुळे एखादा विरळाच बनायची क्षमता तुमच्यात असेल तर धंद्यात उतरून मोठे व्हायचे स्वप्न बघा किंवा दूर राहा नाहीतर गुज्जू मारवाडी सिंधी बनिये तुम्हाला विकून खातील. डीएसके यातून झोलझपाटा करून बाहेर पडले तर ते आदर्श बनायला हरकत नाही.
प्रॉब्लेम असा आहे की जसे अंबानी अदानी यांच्या डोक्यावर मोदींचा हात आहे तसे यांच्या डोक्यावर कोणाचा आहे का...

मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी

>> ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात, पापभिरु मराठी मध्यमवर्गीय माणसांना धंद्यापासून दूर ठेवायला....

कार्पोरेट भ्रष्टाचार हा मोठा विषय आहे.

जाई तुमच्या लिंक मुळे मला बरच काही कळाल. मी डीएसकेंच्या ऑफिसचे बरेच खेटे मारले आहेत. सध्या त्यांची डबघाईला आलेली बातमी खरी आहे. माझ्या वडीलांनी तिथे गुंतूवणूक केली होती. वडील गेल्यानंतर ती रक्कम आईच्या नावे मिळवण्यासाठी बर्‍याच फेर्‍या झाल्या. दिड वर्ष होऊन गेल. चेकवर आईचे नाव बद्लून मिळाले पण रक्कम अजून मिळाली नाही आणि मिळेल अशी आशाही वाटत नाही. चेक हातात मिळाला पण ते 'आम्ही' सांगे पर्यन्त बँकेत भरू नका असे सांगतात. पैशाची विचारणा केली असता. काहीच उत्तर मिळत नाही. वडीलांसारखे जेष्ठ ठेवीदार त्यांच्या ऑफिस मधे हताश होउन बसलेले बघताना फार दुख्ख होत.
आता फक्त एवढच वाटतकी त्यांची परिस्थिती सुधारावी आणि सगळ्यांची येणी परत मिळावी.

ओह निर्झरा ! परिस्थिती लवकर सुधारो.तुमचे पैसे लवकर परत मिळोत

बाकी दीड वर्ष म्हणजे नोट बंदीच्या आधीपासूनच परिस्थिती खराब आहे म्हणायची

ठेवीदारांचा प्रोब्लेम जुनाच आहे, साधारण जानेवारी- फेब २०१६ च्या सुमारास अर्थविषयक सदरात "बांधकाम व्यावसाईक घेतलेल्या ठेवी रिन्यू करा म्हणून मागे लागला आहे , काय करू " अशा अर्थाचे पत्र आले होते , जरी त्यात नाव घेतले नव्हते तरी बाकी उल्लेखांवरून हे DSK हे काळात होते.

ते सदर लिहिणार्याने "जेव्हा असे सांगितले जाते , त्याचा अर्थ त्या संस्थेकडे आता तुम्हाला द्यायला पैसे नाहीत असा होतो , पैसे तत्काळ काढून घाय असे सांगितलेले"

तर ठेवींचा प्रोब्लेम जुना आहे, बांधकामाचा प्रोब्लेम ऑक्ट नोव २०१६ पासून आला असे मला दिसत आहे.

सहमत. मलाही हा प्रश्न अनेकदा पडतो. लोक कसे काय इन्वेस्ट करत असतील >> डीएसके, परांजपे या रजिस्टर्ड कंपन्या आहेत आणि त्यांना क्रेडीट रेटींगही दिलं जातं. या एफडी घेण्याआधी त्यांना आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्या लागतात. या दोन्ही कंपन्यांचे रेटींग्स बरेच चांगले होते (२ वर्षापुर्वीपर्यंत तरी). शिवाय बँकांपेक्षा चांगले व्याज दर देत होते. त्यामुळेच लोक इन्व्हेस्ट करायला तयार होतात.

त्यांच्या अ‍ॅक्सिडेंटनंतर लोकांनी पॅनिक होउन पैसे काढले हे त्यांनी स्वतःच एका मुलाखतीमधे सांगितले आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं ज्यांचे डीएसकेंच्या जवळचे कोणी नाही त्यांनाही ही माहिती आहे :-). त्यांच्याच मुलाखतीत नोटाबंदीचाही त्यांना इंपॅक्ट झाला हे त्यांनीच सांगितलं आहे (आणि हे बरेच बिल्डर बोलतात).

बर्‍याच गुंतवणूकदारांना डीएसकेनी इतर मार्गानं पैसे परत दिले आहेत. काही लोकांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट एवढ्या किमतीचे फ्लॅटस दिलेत, काहींना डीएसके टोयोटा मधून गाड्या दिल्यात.

अर्थात.. त्यांनी काही चुका नक्कीच केल्या असतील ज्या हळूहळू बाहेर येतीलच.

If the problem of demonetization leads to bankruptcy of the company then there is serious flaws in governance of that company. So there may be other big reasons for the current situation other than demonetization.

>> वडापावची गाडी या गुणांवर निघते. मात्र मोठा व्यवसाय करायला छक्केपंजे जमले पाहिजेत.
छक्केपंजे म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला लक्षात आले नाही. कारण माझ्यामते हा शब्द सकारात्मक गुणांसाठी वापरला जात नाही. आणि मोठे व्यवसाय करण्यासाठी (किंवा जनरली मोठी भरारी घेण्यासाठी) तर मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी याव्यतिरिक्त इतर अनेक सकारात्मक गुणांची कसोटी लागते. व्यवसायिक कौशल्य, सतत शिकत राहण्याची वृत्ती, टीमवर्क, बदलत्या काळाबरोबर स्वत:मध्ये आणि व्यवसायात बदल घडवणे, ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे, योग्य माणसे ओळखून त्यांना आपल्यासोबत जोडून घेणे, प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच ओळखणे इत्यादी.

मल्ल्या, सुब्रतो इत्यादी व्यवसायिक नक्की कशामुळे व कुठे फेल गेले हे आपल्याला नाहीत नसते. लगेच माध्यमातून त्यांच्याविषयी नकारात्मक गोष्टींची चर्चा सुरु होते. आपण ती एकच बाजू वाचतो आणि त्यावर आपले मत बनवतो. एकदा व्यवसायात मोठे झाल्यावर अनेक हितशत्रू स्पर्धक निर्माण होतात. हे सुद्धा विचारात घेतले पाहिजे. घाईघाईने लगेच यशासाठी आवश्यक मुलभूत गुणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणे व त्यातून चुकीचे निष्कर्ष काढणे हे योग्य नव्हे.

{{{ मनीष, खुद्द dsk जरी सांगितले की नोटबंदी ने प्रॉब्लेम झाला तरी लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत }}}

लोकांचं सोडून द्या हो. गवर्न्मेंट एजन्सीज् नक्कीच विश्वास ठेवतील आणि नोटबंदीमुळे प्रॉब्लेम झाला याचाच अर्थ आधी काळ्या पैशात व्यवहार केल्याची कबुली समजून सगळे जुने रेकॉर्ड्स तपासायला घेतील.

सिम्बा डीएसके ही लिस्टेड कंपनी आहे. कोणती लिस्टेड कंपनी नोट बंदीमुळे दिवाळ्यात निघाली ते सांगा? ब्लॉग मधल्या लिंक मधे पैसे कसे फ़िरवले हे लिहीले आहे तरी तुम्ही अफ़रातफ़र झाली नसेल अशी आशा व्यक्त करता अहात. आश्चर्य वाटत.

आश्चर्य वाटत.

<<

त्यात आश्चर्य काय !
त्यांच्या 'डेलनाझ'(आरारा) ने सांगितलेय ना, कि डिएसकेची दिवाळखोरी 'नोटबंदी'ने आली, तर तेच खरे आहे.

'डेलनाझ'ने बोला तो बोला. Proud

धाग्याचा मुळ विषय : प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का?
डि येस के ही पब्लिक लिमिटेड आहे. पण कुठल्याही कंपनीचे प्रा.लि/पब्लिक लिमिटेड Fixed Deposit हे Secured नसतात. त्यामुळे अश्या कंपन्यामध्ये गुंतवणुक ही खुप मोठी जोखिम असते. कारण त्यावर कुठल्याही वित्त संस्थाचे नियंत्रण नसते. जर कंपनीत व्याजाने पैसे गुंतवायचे असल्यास शेअर बाजारात जे डिबेंचर/Secured fixed deposit असतात ते घ्यावेत, त्यात कमी रिस्क असते कारण ते SEBI च्या नियंत्रणाखाली असतात आणी जर कंपनी लिक्विडॅट झाली तर त्याना सगळ्यात आधी पैसे मिळतात.
त्यात बिल्डर म्हणजे आजुन मोठी रिस्क. कारण हे बिल्डर लोकाकडुन पैसे घेतात आणी हातात पैसे आल्याने आपल्याकडची घरे विकत नाहीत किंवा कधी कधी चांगले बिल्डर ह्या पैस्यानी खुप जास्त रक्कम मोजुन जमिनी खरेदी करतात. दोन वर्षा पुर्वी पर्यन्त किंमती चढ्या असल्याने हे चक्र व्यवस्थित चालु होते. गेल्या दोन वर्षात किंमती स्थिरावल्याने आणि मागणी नसल्याने घरे विकली जात न्हवती आणि बिल्डर ची रोकड कमी झाली त्यामुळे त्याना थोडा त्रास व्यायला सुरवात झाला. आणि त्यात नोटबंदी मुळे घराची डिमांड आजुन कमी झाली आणी बिल्डर ची रोकड आजुन कमी झाली. resale मध्येच बरीच घरे असल्याने लोक बिल्डर कडे जाईनासे झाले. त्यामुळे डीएसके , युनिटेक सारख्या बिल्डरची अवस्था खराब आहे. पण हे कधी ना कधी तरी होणारच होते. घराच्या किंमती एवढ्या वाढल्या होत्या की आजुन वाढणे अशक्य होते. दर वेळी घराच्या किं मती खुप वाढतात तेव्हा बरेच बिल्डर अडकतात. १९९६ च्या तेजी मध्ये लोक सारखे बिल्डर अडकले होते. त्यामुळे बिल्डर कडे गुंतवणुकीपासुन लांबच राहिले पाहिजे मग ते fixed deposit असो किंवा secured deposit असो किंवा शेअर असो.

डीएसके च्या वेबसाईट वरिल माहितीनुसार त्याचा कडॅ २५००० पेक्षा जास्त लोकाच्या ठेवी आहेत. परिस्थिती अवघड आहे तरीही मला वाटते की ह्या सगळ्याचे पैसे लवकर परत मिळोत

युरो,
मी अफरा तफरी झाली नाही , आणी केवळ नोटबंदीमुळेच या लिस्टेड कंपनीचे दिवाळे निघाले या अर्थाचे कुठलेही statement केले नाहीये.

बिपिनचंद्र आणि युरो,

तुमचे नोटबंदी बद्दल चे व्युज माहित आहेत,
त्यामुळे तुम्हाला नोट बंदी हे कारण आहे हे पटाणार नाही कदाचित,

बांधकाम कंपनी हि listed कंपनी आहे, तिच्या ३०-४० सबसिदिअरी कंपन्या होत्या त्या पूर्ण पणे खाजगी कम्पन्या आहेत त्याचे स्टेट्स (listed कि non listed) मला माहित नाही. तिकडे होणारे व्यवहार किती पारदर्शकतेने होतात हे माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर जरूर सांगा
DSK चे नाव अगदी विश्वासार्ह म्हणून घेतले जात असले तरी ते शेवटी बिल्डर होते आणी कुठे आणी किती काळा पैसा वापरला जात होता याची कल्पना आपल्याला असणे अशक्य आहे. त्यामुळे कुलकर्णी काय black मध्ये व्यवहार करायचे का? हा प्रश्न गैरलागू आहे.

बांधकाम व्यवसायात १००% व्यवहार चेक किंवा कार्ड वापरून होत नाहीत हे तुम्हालाही मान्य असेल स्पेशली जिकडे लास्ट माईल वर्कर चा संदर्भ असतो तेव्हा हे सगळे व्यवहार कॅश मध्येच होतात.
तेव्हा कम्पनीच्या खात्यात व्हाईट पैसे आहेत पण व्यवस्थेत नोटाच नसल्यामुळे जर कंपनी लोकांना रोजगार देऊ शकत नसेल तर त्याची परिणीती काम रखडणे- थांबणे- कंपनीचे वर्किंग कॅपिटल अडकणे यात होणार.

- notbandi चा त्रास ऐनभरात असताना मोठ्या संख्येने बांधकाम मजूर पुणे/ मुंबई सोडून आपल्या मुळ गावी परत गेल्याच्या बातम्या नेहमी येत होत्या.
- याच कालावधीत मनरेगा वर काम करणाऱ्या माणसांची संख्या अचानक वाढली होती. (लोक बेरोजगार होऊन गावी परत आल्याचे इंदिकेशन)

बहुतेक सगळ्या बांधकाम व्यावसायिकांनी हिरानंदानी सकट notbandi ने बांधकाम क्षेत्रात प्रोब्लेम आले असे उघडपणे सांगितले आहे.

परत एकदा लक्षात घ्या "नोटबंदी हे एकाच कारण आहे असे मी म्हणत नाही आहे, पण हे एक कारण आहे ज्याने त्याचा डाऊन fall होण्यास वेग दिला " असे म्हणतो आहे.

अतुल पाटील,
तुम्ही ज्या सकारात्मक गुणांची यादी दिली आहे ती लागतेच. पण त्याविरुद्ध काही लागते त्याबद्दल मी बोलतोय. जर छक्केपंजे तुम्हाला नकारात्मक शब्द वाटत असेल तर मग सरळमार्गी मराठी लोकांनी आजच्या काळात धंद्यात न उतरणेच चांगले.
बाकी मेहनतीला पर्याय नाही. अंबानी अदानी हे मेहनती नाहीयेत असे धाडसी विधार करायला मी मुर्ख नाहीये.
जग आदर्श विचारांवर टिकलेय पण प्रॅक्टीकल विचारांवर चालते.

@ऋन्मेऽऽष, छक्केपंजे करणारी अनेक मराठी माणसे गावात गल्लोगल्ली भेटतील. टाटा, नारायण मूर्ती इत्यादी यशस्वी अमराठी उद्योजक छक्केपंजे करणारे म्हणून माझ्या तरी वाचनात नाही. असो. धाग्याचा तो विषय नाही. वेगळ्या संबंधित धाग्यावर बोलू पुन्हा केंव्हातरी.

Sahil shahancha pratisad patala

Tarihi company fixed deposit accept karatana co law pramane capital norms asatat te follow karave lagatata. Tasech NBFC norms lagu hotat. Tya norms pramane periodic reporting hote.

Itakya periodic reports madhye kahi problem ala nahi mhanje hyachach artha figures fabricated asane ha hou shakato.

Dusare karan he diversion of funds asu shakate . udaharanarth working capital funds are diverted in investment in land at a very high price for which resale value is less.

Maza ek vichar

Pages