डॅन डॅन नूडल्स

Submitted by मेधा on 2 August, 2017 - 11:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ पाकीट चिंग्स नूड्ल्स किंवा तुमच्या आवडीच्या नूड्ल्स. मी कधी कधी लिंग्विनी किंवा कॅपेलिनी पण वापरल्यात.
पाव किलो चिकन खिमा
चिनी तिळाचे तेल
मीठ
सॉय सॉस
राइस वाइन व्हिनेगर
अर्धा कप स्मूथ पीनट बटर्
हॉट चिलीज इन ऑइल ( हॉट सॉस )
पातीचा कांदा बारीक चिरून - हिरवा भाग अर्धा कप होईल इतका.
त्याच कांद्याचा पांढरा भाग बारीक चिरून
लसूण बारीक चिरून १ टीस्पून
आले बारीक चिरून १ टीस्पून
मिरपूड

क्रमवार पाककृती: 

नुडल्स उकळत्या पाण्यातून शिजवून निथळून घ्या.
खिम्यामधे थोडे तिळाचे तेल आणि थोडा सॉय सॉस मिसळून घ्या.
नूडल्सचे उकळलेले गरम पाणी १/२ कप आणि पीनट बटर एकत्र मिसळून घ्या. त्यात सॉय सॉस् , तिळाचे तेल, चिलीज इन ऑइल ( हॉट सॉस), राइस वाइन व्हिनेगर घाला व नीट मिसळून घ्या. सॉय सॉस, तिखट, आंबट आणि पीनट बटरची गोडसर nutty चव सर्व नीट बॅलंस व्हायला हव्यात . कांद्याच्या पातीचा हिरवा भाग मिसळून घ्या.

एका कढईत तेल गरम करुन प्रखर आचेवर आले लसूण आणी पातीचा पांढरा भाग परतून घ्या. मग त्यात खिमा घालून परतून घ्या. खिमा पूर्ण शिजला पाहिजे आणि पाणी आटले पाहीजे.

एका बॉलमधे २ चमचे सॉस, त्यावर नूड्ल्स घाला. शेवटी परतलेला खिमा थोडा घालून सर्व्ह करा

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

मी याच्यात कधि कधी चिनी दुकानात मिळणारे फ्रोझन मस्टर्ड ग्रीन्स घालते. चिकन परतले की अर्ध कप ग्रीन्स पण परतून घालायचे.
एडामामे / बारीक चिरलेला कोबी / गाजर / मटर हे पण स्टर फ्राय करुन मिसळू शकता.
डब्यात न्यायला आवडीचा प्रकार आहे

माहितीचा स्रोत: 
रेस्टॉरंट मधे खाऊन घरी प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, माझे सगळे आवडते सिचुआन पदार्थ करते आहेस की काय? नेक्स्ट टाईम खायला मिळेलच होपफुली. Proud मस्त रेसिपी!

सायो, खिमा न टाकतादेखील वेज करता येतात. मला ते खूप आवडतात.

मस्त एकदम !!!
खिमा न घालता पण छान लागतो.

मस्त रेसिपी मेधा. इकडे जपान मधे याला तान तान /दान दान मेन (नूडल्स) म्हणतात. बहुतेकदा पोर्क असते त्यामधे. काही स्पेशल ठिकाणी मिळणारे अफाट सुंदर लागते. हे नूडल्स, मापो तोफू, हीनाबे वगैरे सिचुआन पदार्थ आवडते आहेत. जरा तिखट खायची हौस भागवता येते.

पण हे घरी करायचा कधी विचार पण केला नव्हता. ड्ब्यासाठी म्हणजे हे ड्राय व्हर्शन असेल ना?

एम्बी , इथे रेस्टॉमधे जनरली पोर्क खिमा असतो. काही ठिकाणी व्हेज व्हर्शन सुद्धा असते. पण मी कधी ट्राय नाही केलं.
डब्यात द्यायचं असेल तेंव्हा मी सॉस फार पात़ळ करत नाही. शिवाय पीनट बटर असल्याने जरा गार झाला की थोडा घट्ट सुद्धा होतो.

अंकु, मटन खिमा मी कधी वापरला नाही. तुम्ही केलात तर इथे फीड बॅक द्या नक्की

( इथे अमेरिकेत चांगला खिमा मिळायला स्पेशल ग्रह योग असावे लागतात. त्यामूळे जेंव्हा केंव्हा चांगला खिमा मिळतो तेंव्हा पारंपारिक प्रकारच केले जातात )

इथे अमेरिकेत चांगला खिमा मिळायला स्पेशल ग्रह योग असावे लागतात.>>>असं का म्हणते आहेस? म्हनजे मटन खीमा मिळायला का? चिकन तर असतोच की ग्रोसरी स्टोअर मध्ये.

करुन बघायला पाहिजे.
तुमचं ते हान डायनॅस्टी वाला फार भारी बनवतं डॅन डॅन नूडल्स शोनू. Happy

सही! चिकन खिमा कसा लागेल अंदाज येत नाहिये. नेहेमी पोर्क च्याच खाल्ल्या आहेत. मी पण शाळा सुरू व्हायच्या आधी एकदा करून बघणार. सगळे सामान घरी आहेच.