मेन्स फॅशन,हेअरस्टाईल्स,दाढी,लेटेस्ट ट्रेंड्स!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 August, 2017 - 03:17

मायबोलीवर स्त्रीया बरेचदा फॅशन ,कपडे,हेअरस्टाईल यावर धागे काढुन चर्चा करताना दिसतात.आवडते कपडे कुठे मिळतात,ऑनलाईन कोणत्या वेबसाईट चांगल्या आहेत यावर चर्चा होताना दिसते.बर्याच चांगल्या चर्चा असतात या.
पण मायबोलीवर पुरुषांसाठी असा कुठलाही धागा नाही.तसा विभाग नाही.नुकताच मी स्वतः चा मेकोव्हर केला,लांब केस कापून स्लीक्ड बॅक अंडरकट हेअरस्टाईल ठेवली. लेटेस्ट फॅशन ट्रेंड चाळताना मायबोलीवर फार काही मिळालं नाही ,म्हणून हा प्रपंच.
इथे हेअरस्टाईल ,मेन्सवेअर,फूटवेअर ,लेटेस्ट मेन्स फॅशन ट्रेंडस यावर चर्चा अपेक्षीत आहे.अगदी केस गळायला लागल्यावर तुम्ही काय केलेत.पुर्ण टक्क्ल असेल तर त्यावर मॅच होणारे कपडे.लांब केस ठेवायचे असल्यास करायच्या स्टाईल्स.
दाढी अनेक पुरुष ठेवत आहेत सध्या,लाटच आली आहे .तर तुम्ही दाढी ठेवता का ,कशी ठेवता,कोणती स्टाईल हे अपेक्षीत आहे.
व्हा सुरु!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाना,एकदा भांडवली अर्थव्यवस्था स्विकारली की हे होणारच.
वर्च्युल शॉपिंगचे काही ड्रॉ बॅक्स असणारच.फिटींग हा सर्वात महत्वाचा मुद्दा बर्यापैकी कवर करण्यात ऑनलाईन स्टोअरवाले यशस्वी झाले आहेत असे मी म्हणेन.
एक निरिक्षण असे आहे की भारतीय पुरुष स्त्रीया यांचे शरीर सिमेंट्रीकल नसते.गुढघ्याखाली पाय बारीक पण मांड्या मोठ्या.शोल्डर मोठा पण चेस्ट साईज बारीक.त्यामुळे फिटींगला अडचण येतेच.असे असेल तर दुकानात जाऊन शॉपिंग केलेले केव्हाही चांगले.

>>शेवर वापरणार्‍या अनुभवी कडून सल्ला अपेक्षित आहे.<<
फिलिप्स-नोरेल्को ब्रँडचे वापरतोय गेली बरीच वर्षे; काहि तक्रार नाहि. शेवर हलक्या हाताने चेहेर्‍यावर फिरवुन लेट इट डु द जॉब; रेझर प्रमाणे चेहेर्‍यावर घासु नये...

चोरी या शब्दाशी असहमत. चोरी हा गुन्हा आहे.
धागा भरकटू नये म्हणून इथे अजून काही लिहीत नाही. वेगळा धागा काढा तिथे बोलू.

Ok

वेगळा धागा काढा. मलाही बोलायला आवडेल. माझ्याही मते चोरी हा शब्द चुकीचा आहे. ईतकेच नव्हे तर या केससाठी खूप हार्श आहे.

मी फिलिप्स कंपनीचा ट्रीमर गेले 2 वर्षे वापरत आहे, अनुभव चांगला आहे
त्याला ट्रिम लेंग्थ ऍडजस्ट करता येतात,
मात्र अगदी 0 नम्बर चे ट्रिम केले तरी गुळगुळीत दाढीचा फील येत नाही हे खरे,
स्टबल लुक मेंटेन करायला चांगला आह,

ट्रीमर हेड छोटे आहे , त्यामुळे मला शेव्हड हेड लुक साठी याचा उपयोग नाही.
जर डोके+दाढी असा उपयोग करायचा असेल तर फिलिप्स "मल्टि ग्रुम" मॉडेल पहा.

उपयुक्त धागा आणि चर्चा पण!

घातल्यावर पँट घातलीच नाहीये अशी फिलींग येईल ती सर्वात बेस्ट फिटिंग.. >> बाल भी काटे, और पता भी नहीं चला आठवलं ! Biggrin

ऑनलाइन (अ‍ॅमेझॉन इंडिया) वरुन मागच्या डिसेंबर मधे ८०० रुपयांना दोन बूट+१ चप्पल अशी ऑफर मिळाली होती, तसंच २००० मधे ब्राउन आणि ब्लॅक असे दोन फॉर्मल शूज पण घेतले होते. ८ महिने झाले वापरुन, पैसा वसूल ! हां.. एक नाही दोन नाही, एकदम तब्बल ५ चप्पल-बूट चं कुरियर आल्यावर घरच्यांना चक्कर आल्यासारखी वाटली ते जाऊदे Wink कपड्यांच्या बाबतीत, कधी ऑनलाइन शॉपिंग चा प्रयत्न केला नाही. वर बर्‍याच जणांनी लिहिलंय त्याप्रमाणे ट्रायल रुम मधल्या भल्या मोठ्या 'एंटर द ड्रॅगन ' आरशात, वेगवेगळ्या कोनातून पाहून दोन तीन कवायती करुन पाहिल्याशिवाय फिटिंग बाबतीत समाधान होत नाही.

माझेही अकरावीलाच केस पांढरे झाले होते, त्यावर अनेक तेलं, मेंदी, आयुर्वेदिक औषधं घेतली (डाय फक्त केला नाही), शेवटी नाद सोडून दिला. लग्नाच्या आधी पहिल्यांदा आणि नंतर नियमित पणे डाय करायला सुरुवात केली. पांढरे केस आणि विमानतळ ही न घ्यावी अशी अनुवांशिकता बरोबर उचलली आहे. इलाज नाही !

दाढी करणे हे रोज सकाळचं आवडतं काम आहे. एखादा दिवस नाही केली तर चुकल्यासारखं वाटतं. इलेक्ट्रिक शेवर बाबतीत अनेकांचा अनुभव ऐकलाय की गुळगुळीत दाढी होत नाही, त्यामुळे अजून स्वतः वर प्रयोग केला नाही. नो दाढी- नो मिशी असा क्लिन शेवन लूक अनेक वर्ष होता, मधेच हुक्की आली की फेंच बीअर्ड, 'दिल चाहता है ' नंतर अनेक दिवस under lip beard पण ठेवली होती. आता गेली ६ वर्षं मिशी आहे, तिच्या लांबी-रुंदी वर प्रयोग करणे चालू आहे. "कारतूस' नावाच्या टुकार सिनेमातली जॅकी दादाची मिशी (थोडीशी लांब आणि पॉइंटेड) ऑल टाइम फेवरेट आहे ! Happy

वर लेखात लिहलेला पुरुषांच्या फॅशनसेन्सचा प्रश्न जगभर आहे. परदेशातील चित्रपट पाहून लेखिकेची (आणि अनेक भारतीय स्त्रियांची) अशी गैरसमजूत झाली आहे की फक्त भारतीय पुरुषांमधे आपण कसे दिसतो याबद्दल उदासीनता आहे.
https://www.theguardian.com/fashion/2014/sep/22/little-space-given-to-me...
http://www.redbookmag.com/love-sex/mens-perspective/a18737/guy-fashion-e...

या खालील लेखात दाखवलेल्या फोटोतले अजागळ पुरुष परदेशात दिसणे खूपच कॉमन आहे.
http://www.cosmopolitan.com/sex-love/news/a49735/why-do-guys-dress-like-...

पण ही अनेक पुरुषांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही थोडी जरी स्वत:ची काळजी घेऊन नीटनेटके दिसायला लागला तर " वासरात लंगडी गाय " का होईना तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसाल.

तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसाल. >>>> हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, निदान माझ्यासाठी तरी.. आपण उठून कसे दिसू हा विचार मी नेहमी करतो. एखाद्या मॉलमध्ये एकाच सारखे वीसपंचवीस टीशर्ट लटकावलेले असतात, मला त्यातील एक टीशर्ट घेणार्‍या लोकांची खरेच कमाल वाटते. पण पुरुष मात्र असे करतात. एकच सेम शर्ट दोन मित्र एकाच दिवशी घालून आले तरी त्यांना काही वाटत नाही. उलट लाडात मैत्रीची बँडवाली फिलींग घेत दिवसभर सोबत फिरतील.

माझ्यासारखे शर्ट दुसर्‍याने घातले तर मला आवडत नाही. मागे एकदा ठाण्यातून एक झकास महागडं टिशर्ट घेतलं, जबरदस्त होतं ते. एकदम कलरफुल-रिच-क्लासी. Belmonte. दुसर्‍या दिवशी घालून हाफिसात गेलो तर लीगलमधल्या एकाने तेच घातलेलं होतं. असला मुड ऑफ झाला... त्यानंतर ते घालून कधीच ऑफिसात नाय गेलो.... बायकोने आयलंड वरुन ट्रण्कभरुन टीशर्ट आणलेले, गेले सात वर्ष तेच पुरतायत. आजही नवीनच दिसतात. आणि वेगळेही... Happy

एका लिवाईजच्या ५११ मध्ये पण वेगवेगळ्या कापडात वेगवेगळे फिटींग येते *फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम >>>> अगदी अगदी.
पण ब्रँड माहितीचा असेल, तर ऑनलाईन खरेदी करायला हरकत नाही.

शॉवर नंतर दाढी कधी नाही केली, पण एक दिवस वाढलेली दाढी मलातरी साधारण शुक्रवारच्या non-formal ड्रेस साठी सूट होते (हेमावम) ..... Happy
मी पण कित्येक वर्षात डोक्याला कुठलही तेल लावलेलं नाही, पण आंघोळीनंतर ब्रिल्क्रीम मात्र लावतो.

परत एकदा चेंज in लुक,
या वेळी शेव्हड हेड च्या बरोबर पूर्ण दाढी Happy
दाढी ची काळजी घ्यायला beardo ची पूर्ण रेंज अवेलेबले आहे,
मी beard वॉश, beard balm ( दाढी मऊ राहण्यासाठी), मुस्टॅच वॅक्स (मिशी सेट करण्यासाठी) मागवले,

आता माझे दाढी रुटीन असे असते Wink

1) राखलेली दाढी सोडून बाकी भागाची दाढी करणे
2) beard वॉश वापरून दाढी धुणे
3)फेस वॉश वापरून चेहरा धुणे
4)दाढी केलेल्या भागाला आफ्टर शेव लावणे
5) दाढी ला beard balm लावणे
6) मिशी ला वॅक्स लावणे
7) उरलेल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणे.

बायको shocked ,सिम्बा रॉक्स Happy
#feelingpampared

मी स्लिक बॅक हेअरस्टाईल ठेऊन आता दिड वर्ष झाले आहे.सुरवातीला वाटले पॉमेड वगैरे वापरावे लागेल पण आता पुर्ण सेट झाले आहेत केस.
सिंबा ,क्लीन शेवन हेडवर दाढी चांगली दिसते पण तब्येत मजबुत असायला हवी मात्र.

Pages