मेन्स फॅशन,हेअरस्टाईल्स,दाढी,लेटेस्ट ट्रेंड्स!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 August, 2017 - 03:17

मायबोलीवर स्त्रीया बरेचदा फॅशन ,कपडे,हेअरस्टाईल यावर धागे काढुन चर्चा करताना दिसतात.आवडते कपडे कुठे मिळतात,ऑनलाईन कोणत्या वेबसाईट चांगल्या आहेत यावर चर्चा होताना दिसते.बर्याच चांगल्या चर्चा असतात या.
पण मायबोलीवर पुरुषांसाठी असा कुठलाही धागा नाही.तसा विभाग नाही.नुकताच मी स्वतः चा मेकोव्हर केला,लांब केस कापून स्लीक्ड बॅक अंडरकट हेअरस्टाईल ठेवली. लेटेस्ट फॅशन ट्रेंड चाळताना मायबोलीवर फार काही मिळालं नाही ,म्हणून हा प्रपंच.
इथे हेअरस्टाईल ,मेन्सवेअर,फूटवेअर ,लेटेस्ट मेन्स फॅशन ट्रेंडस यावर चर्चा अपेक्षीत आहे.अगदी केस गळायला लागल्यावर तुम्ही काय केलेत.पुर्ण टक्क्ल असेल तर त्यावर मॅच होणारे कपडे.लांब केस ठेवायचे असल्यास करायच्या स्टाईल्स.
दाढी अनेक पुरुष ठेवत आहेत सध्या,लाटच आली आहे .तर तुम्ही दाढी ठेवता का ,कशी ठेवता,कोणती स्टाईल हे अपेक्षीत आहे.
व्हा सुरु!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुल 1 तुमचे स्टाईल स्टेटमेंट, तुमच्या पर्सनॅलिटीला आणि भवताल ला जुळणारे असायला हवे,
उगा फॅशन मॅगझीन चा फोटोग्राफर म्हणून 3 पीस सुट घालून आणि कॉर्पोरेट ऑफिस मध्ये झब्बा जीन्स घालून जाऊ नये, आपल्याला कितीही शोभून दिसत असले तरी,

ड्रेस to the occasion.

आणि शिवाय आपल्याला काय चांगले दिसते हे जरी माहीत नसेल तरी आपल्याला काय चांगले दिसत नाही हे नक्कीच माहीत असावे Happy

सिम्बा,
सहमत
पण..

तुमचा ड्रेसिंग सेन्स तुमच्या पर्सनॅलिटी आणि आजूबाजूच्या वातावरणाला शोभलेले चांगलेच. पण तसे न शोभता तुमच्या कॅरेक्टरला शोभले तरी चालते. जर तुम्ही एखाद्या ओकेजनला न शोभणारे कपडे घातले, तरीही जर तुमची ईमेज हटके काहीतरी करणारा अशी असेल तर लोकं ते देखील कौतुकाने स्विकारतात..

मी तर रूल वन हाच सांगेल की प्रयोग करायला घाबरू नका.
आपल्याला काहीही शोभते असे स्वत:च बोलायचे आणि त्या आत्मविश्वासातच वावरायचे.
एकदा का तुम्ही जे घातलेय ते तुम्हाला कॅरी करता आले की पंचाण्णव टक्के फॅशन तिथेच जमली समजायची.

तो घातल्यावर लोक टुरीस्ट स्पॉटवरचे माकड बघावे तसे बघत होते .
>>>>
माफ करा, पण तुम्हाला बघितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर माकड येत होते हे तुम्ही कसे ओळखले?
हा आपल्या मनाचा खेळ आहे..

ऋन्मेऽऽष
चेहरयाला तजेला येण्यासाठी
१) खरे बोला
२) चांगले विचार करा
३) चांगले वाङ्मय वाचा
म्हणजे तुमचा चेहरा तेजपुंज होईल

अजूनही
१) दारू प्या - त्यामूळे मनावरील ताण जाऊन तुम्ही ताजेतवाने व्हाल
२) हवंतर थोडे जॉइंट्स मारा ...
http://extract.suntimes.com/extract-news/marijuana-keeps-looking-feeling...

>>केसांना वेट लुक कसा द्यावा?<<

हेअर वॅक्स्/पटी म्हणुन एक प्रकार मिळतो ($२ - $६ या रेंजमध्ये). ब्रिल्क्रिम वगैरे सारखा जेली (तेल्कट) नसतो; केस सेट होतात, ड्राय दिसत नाहि आणि डोकं तेलकट/चिकट हि दिसत नाहि...

माफ करा, पण तुम्हाला बघितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर माकड येत होते हे तुम्ही कसे ओळखले?

>> माकड बघतांना लोक कसे दिसतात तसे त्यांच्याकडे बघतांना त्यांना दिसत होते. काय राव!

#क्रमशः येणार्‍या प्रतिसादांतील प्रतिसाद क्र. १. #

केसांना तेल लावलेले आवडत नसले, तरीही तेल लावणे गरजेचे आहे.

आंघोळीच्या आधी तेल लावावे. म्हणजे केस तेलकट दिसणार नाहीत, पण केसांतला कोंडा आटोक्यात रहायला मदत होईल.
पॅराशूट हेयर ऑली वाल्यांचा आफ्टरशॉवर म्हणून एक ब्रिलक्रीमटाईप प्रकार मिळतो, तोही कामाचा आहे, कमी तेलकट व ओला लुक Wink

केसाच्या मुळांशी नॅचरली तेलकटपणा स्त्रवणार्‍या ग्रंथी असतात. त्यांच्या तेलकटपणामुळे भरपूर ब्रशिंग केले की केस लकाकतात, पण ते मुलींचे लांब केस. त्या रोज केस धूत नाहीत. आपण रोज डोक्यावर साबण्/शांपू ओतून नैसर्गिक तेलकटपणा कमी करतो, अन मग पुन्हा अँटी डँड्रफ शांपू लावतो.

१ रुपयांची अर्धी शांपू पुडी अन अर्धा चमचा तेल हातावर घेऊन मिक्स करून मस्त घासून केसांना लावा : स्वस्तातला घरगुती कंडीशनर इफेक्ट आला, तर मला धन्यवाद द्या Wink

*
१ . वरील मते माझी वैयक्तिक मते आहेत.
२. मजपाशी केस या बाबतीत कोणतीही विशेष क्वालिफिकेशन्स नाहीत.
३. केस हा नखासारखाच शरीराचा डेड्/लाईफलेस पार्ट असल्याने त्याचे फार जास्त लाड करू नयेत या मताचा मी आहे.

हेअर वॅक्स्/पटी म्हणुन एक प्रकार मिळतो ($>>>>>>
भारतात loreal चे 2wax म्हणून एक वॅक्स मिळते,
मे ते मिशा सेट करायला वापरायचो.
पण डोक्यावरचे केस सेट करायला तो भयंकर महाग पर्याय ठरेल .
50 ml ची डबी 575 ला आहे

#क्रमशः येणार्‍या प्रतिसादांतील प्रतिसाद क्र. २. #

केस रंगविण्याबद्दल :

बिन्धास्त रंगवा.

आपले आवडते सिनेस्टार टीव्हीस्टार अनेकदा अनेक रंगात रंगवतात, त्यांचे लुक्स हाच त्यांचा यूएसपी असल्याने रंगवून केस खराब होत असते, तर त्यांनी ते रंगवले नसते, असे माझे लॉजिक.

'हेअर डाय' नको! मेंदी लावा. हर्बल! आयुर्वेदिक!! सेफ!!! ← हा तद्दन फालतूपणा आहे.

मेंदी लावायची असेल, तर घराच्या कुंपणावर लावलेल्या खार्‍या मेंदीच्या झाडाची पाने मिक्सरमधे/पाट्या-वरवंट्याने वाटून लावा. आजकाल बाजारात मिळणारी कोणतीही तथाकथित हर्बल/आयुर्वेदिक्/होम्योपदीक इ. मेंदी घातक केमिकल्सनी भरलेली असते. ही मेंदी लावून अ‍ॅलर्जी आल्याने तोंड सुजलेले अनेक रुग्ण पाहण्यात आहेत.

विचार करा, पूर्वी तार यावी म्हणून भेंडी वगैरे घालून, अन रंगावी म्हणून अजून काय काय घालून वाटलेली मेंदी साखरपाणी लावून रात्रभर हातावर टिकवूनही हलका केशरी रंग येई. आजकाल तासाभरात तुमची चामडी जळल्यासारखा काळा रंग चढतो. अन खूऽप टिकतोही. तो कसा? मेंदीच्या पानांत काही आयुर्वेदिक जेनेटिक इंजिनेरिंग करून जास्त रंगणारी जात डेवलप केल्याचा काही रिसर्च माझ्यातरी पाहण्या/ऐकण्यात नाही. माझ्या माहितीप्रमाणे या कोनवाल्याही मेंदीत पोटॅशियम परमँगनेट वा तत्सम केमिकल मिक्स असते, ज्यामुळे स्किन चक्क जळून मेंदी रंगण्याचा कलर इफेक्ट येतो.

मुद्दा हा, की सरळ नामांकित कंपनीचे हेअरडाय आणून लावलेले चांगले. घरी रंगवलेत तर एकावेळी सुमारे ५० रुपयांच्या आसपास खर्च येतो. ह्यातली केमिकल्स तुम्हाला कमीत कमी घातक असावीत यासाठी यांच्यावर फूड अँड ड्रगचे नियंत्रण आहे. आयुर्वेद्/हर्बल म्हटले, की हे नियंत्रण मागच्या दाराने गायब होते.

सगळ्यात महत्वाचे.

१. पाकीटावर काय लिहिले आहे, ते सगळे वाचले पाहिजे. नव्या कंपनीचा / पहिल्यांदाच हेयरडाय वापरण्यापूर्वी, थेंबभर डाय मिक्स करून मांडीवर आतल्या भागावर रुपयाएवढ्या जागेवर लावून रात्रभर ठेवावा. तिथे अ‍ॅलर्जीची लक्षणे : लाली, आग इ. दिसलीत तर तो डाय तुमच्यासाठी नाही, दुसरी कंपनी पहा, किंवा त्वचारोगतज्ञाला विचारून पहा.

२. केसांत कोंडा/फिसके/जखमा इ. असतील तर डाय अधिक त्रासदायक ठरू शकतो.

३. शांपू केलेल्या केसांवर लावलेला रंग जास्त दिवस टिकतो. तेलकट केसांवर रंग नीट लागत नाही. पुन्हा एकदा, पाकीटावरील सूचना वाचा!

माकड बघतांना लोक कसे दिसतात तसे त्यांच्याकडे बघतांना त्यांना दिसत होते. काय राव!
>>>
हे आपल्या डोक्यातच असते. आमच्या गल्लीत एखादी शॉर्ट स्कर्ट घातलेली अगदी मॉडेल मुलगी आली तरी लोकं तिच्याकडे असेच बघतात..

अजून एक..
आपला एखादा नवा लूक कसा दिसतो याबाबत आपल्या ग्रूपच्या मुलांच्या टवाळक्या प्रतिक्रिया मनावर घेऊ नका. ग्रूपकडे कोणी बाहेरच्याने पाहता फोकस तुमच्यावर गेलेला आवडणार नाही अश्या विचारांचे लोकं असतात.

@ तेल...
रात्री झोपताना लावा.. मस्त मालिश करायला सांगा कोणालातरी.. आणि सकाळी धुवून टाका. निदान आठवड्यातून एकदा विकेण्डला छान तेल मालिश उत्तम. आजी होती तेव्हा माझी बरेचदा करायची. गेले ते दिवस ..

जाता जाता नव्या लुक्सबद्दल एक जोक :

"काय रे! इयररिंग कधीपासून घालायला लागलास? मॉड लुक की भिकबाळी लुक?"

"काय करू यार! ही इयररिंग बायकोला माझ्या गाडीत सापडली..."

बायोटिन घेतले तर केस वाढतात, माझा अनुभव आहे. खूप पातळ केस झाले होते, 1 वर्ष बायोटिन रोज खात आलो, एकदम दाट केस झाले आहेत आता.

आ.रा.रा. यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. जमल्यास वर हेडर मध्ये अपडेट केले तर बरे होईल.

छान धागा!

माझ्यासारखेच खुप सारे आहेत !

या रूनम्याचा एक धागा वाचुन ए सी सलून मधे गेलो अन २५० रू. कटींग + ५० रू. दाढी देऊन घरी आलो तर बायको ओरडली,
"असा का चमनगोटा करून आलाय ? " Lol

आमच्याईथे एक युनिसेक्स की काय म्हणतात तसे स्त्रीपुरुष समानतेचे सलून कम एसी पार्लर आहे. नवीन उघडले तेव्हा महाग असेल म्हणून जायला बिचकायचो, पण एकदा गेलो तर समजले फक्त 150 रुपयात दाढी प्लस केसकटींग प्लस कानावरचे केस काढून देतात.. आणि ते देखील खूप चांगली सर्विस देतात. एक केस ईथे तिथे अंगावर पडत नाही. दोनच पुरुष कारागीर आहेत, दोन्ही सही आहेत. चांगला कारागीर भेटणे खरेच नशीबाचा भाग असते.

हॉलीवूड बॉलिवूड मधल्या नटांसारखे दिसायचे असेल तर बरोब्बर अडीच दिवस वाढलेली दाढी चेहेर्‍यावर ठेवावी. त्याबरोबर जीन्स व मळका सुरकुतलेला टी शर्ट घालावा.
क्रिकेट प्लेयरसारखे दिसायचे असेल तर मात्र निदान सहा महिने तरी दाढी वाढवली पाहिजे. नवीन क्रिकेटपटूसारखे दिसायचे असेल तर जरा दाढी नीट कापून त्याला आकार द्यावा. पण खूप प्रसिद्ध क्रिकेटप्लेयर सारखे दिसायचे असेल, म्हणजे विराट कोहलीसारखे, तर दाढीला काहीहि आ़कार न देता कशीहि वाढू द्यावी!

फॅशन माझ्या आवडीचा विषय. मग त्यात स्त्री, पुरुष फॅशन्स, घराचं इंटेरिअर असो किंवा नविन कोणत्या वस्तु किंवा अ‍ॅप बद्दल असु दे, मला सगळं समान आवडीचे. Whatever is in, that fascinates me.

धाग्याचं शिर्षक वाचुन मी उत्सुकता आणि त्याही पेक्षा करमणुकीच्या उद्देशाने आले होते. मला वाटतं कि पुरुषांना फॅशन कमीच कळते आणि मराठी पुरुषांना फॅशन करणं आणि फॅशनेबल म्हणवुन घेणं यात कमीपणा वाटतो. 'साधी रहाणी उच्च विचारसरणी' या सुविचाराचा जबरी प्रभाव पिढ्या आणि पिढ्या आहेच. पण इथल्या एकेक पोस्ट्स वाचुन मी आजपासुन मर्द मराठ्यांबद्दलचा माझा (गैर) समज आजपासुन बदलुन टाकते आहे. मी Proud च्या उद्देशानेच आले होते, पण खरंच छान पोस्ट्स आहेत. विचारपुर्वक आणि on the track, to the topic. मला वाचायला आवडेल. कधी कधी भर घालायलाही.

पुरुष फॅशन्स बद्दल बोलताहेत आणि इतकं छान माहितीपुर्ण लिहिताहेत हे खरंच खुप मस्त आहे. कपडे फक्त शरीर झाकण्यासाठी नसतात तर प्रेझेंटेबल दिसणं आणि अगदी पुढे जावुन आकर्षक वगैरे दिसणं या मधे काही वाईट नाही. बर्‍याच पुरुषांना फॅशन हा बायकांचा मक्ता वाटतो आणि फॅशन करणे आणि त्याबद्दल चर्चा करणे अगदीच पुरुषाला न शोभणारी गोष्ट वाटते किंवा वाटायची असं म्हणु आजपासुन. काही पुरुष व्यवस्थित रहातात पण त्यांना फॅशनेबल म्हणालेलं आवडत नाही. इतका फॅशन हा शब्द बायकांना वाहिलेला आहे. तरीही माबोवर मेन्स फॅशनसाठी धागा आला. सिंजींचं कौतुक आणि मस्त मस्त पोस्टस लिहिणार्‍या सगळ्यांबद्दल आदर आणि कौतुक.

ऑनलाईन शॉपिंग वर कुठे चांगले शर्ट-टीशर्ट कोणाला चाळताना दिसले तर या धाग्यावरच कळवा...

इतक्या छान पोस्ट लिहिताहेत तर कोणी तरी पुरुषांच्या वॉर्ड रोबमधल्या must have ची लिस्ट पण करा. तुम्हाला सगळ्यांनाच उपयोग होइल. Happy

ऑनलाईन शॉपिंग वर कुठे चांगले शर्ट-टीशर्ट कोणाला चाळताना दिसले तर या धाग्यावरच कळवा...
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 4 August, 2017 - 12:58>>>>
ऋनम्या ,मी फ्लिपकार्टवरुन घेतले दहा दिवसांपुर्वी.पण डिस्ल्पेला जशी क्वालीटी दाखवतात तशी क्वालीटी नाही वाटली.जीन्स मात्र छान मिळाल्या.levi's मेडीयम, १२०० फक्त.amazon ट्राय करुन पहा असे सूचवेन.
मनीमाउ धन्यवाद्.मला हा धागा काढायची कल्पना बायकांच्या धाग्यावरुनच सुचली,दक्षीचा एक धागा आहे ना त्यावरुन.

मनिमाऊ +१

बोर्डरूम फॉर्मल्स, ऑफिस फॉर्मल्स, कॅज्युअल्स, ब्रॅंड्स, शूज, कॉंबिनेशन्स, परफ्यूम्स वगैरेवर पण discuss करू शकता. उगाच आपलं सुचवतेय Lol

कोणे एकेकाळी मनोजकुमारपुत्राचा एक सिनेमा आला होता श्रीदेवीबरोबर बहुतेक. त्यात त्याची entry होते तेव्हा त्याच्या पायांपासून कॅमेरा फिरतो. त्याच्या पायात लालसर पॉलिशवाल्या कोल्हापुरी चपला दाखवल्या आहेत आणि पेहराव ब्ल्यू डेनिम आणि पांढरा शर्ट. बाकी एकदम साधा. तो हिरो म्हणून चालला नाही पण ती फ्रेम अजून आठवतेय इतका मस्त वाटला होता त्या शॉटमध्ये. आमचं वयं पण अगदी येडचॅप होतं म्हणा तेव्हा, पण अजून तो लूक लक्षात राहिलाय व तसा लूक अजूनही आवडता आहे Lol . पण कोल्हापुरी चपलाच आता कुणी वापरताना दिसत नाही.

असो, वेगळा धागा म्हणून डोकावले इथे व सगळे चांगली चर्चा करताय म्हणून लगे हाथ एक प्रतिसादही दिला.

Carry on n enjoy Happy

पण कोल्हापुरी चपलाच आता कुणी वापरताना दिसत नाही.

<<

चुकीचा गैरसमज. मी वापरतो Happy

लिडकॉम उर्फ Leather Industries Development Corporation of Maharashtra चे रिटेल आऊटलेट शोधा. मस्त कोल्हापुरी मिळतील.

टीप : हे खादी भांडार सारखेच सरकारी दुकान असल्याने ११ ते ५ उघडे असते Lol

हो का? शोधायला पाहिजे. Thanks. मी महालक्ष्मी सरसमध्ये घेत असे आवडतात म्हणून. पण टिकत नाहीत तिथल्या म्हणून घेणे सोडले.

साधारण आठदहा वर्षांपूर्वी की त्याही आधी कोल्हापुरी चपला आणि जीन्सची फ्याशन आलेली. तेव्हा माझे पाय आणि लूक एकदमच बचकांडा असल्याने मी त्या नादी लागलो नव्हतो. पण तेव्हाचे कॉलेजला जाणारे दादा लोकं वापरायचे.

सिंजी, मध्यंतरी माझ्या ग'फ्रेंडने मला सहा शर्ट ऑनलाईन शॉपिंगने गिफ्ट केलेले. आवडतील ते ठेव उरलले रिटर्न करूया बोल्ली. मला चार आवडले, आणि दोन रिटर्न केले. तरी तिने आणखी एक घेतला. एकूण पाच शर्ट चार साडेचार हजारात आले. जेवढे मला कपड्यांच्या क्वालिटीतील कळते, सेम पीस मला मॉलला महाग गेला असते. किमान दिड हजार जास्तीचा फटका पडला असता. पण मी मध्यंतरी स्वतः शोधत होतो तर नाही मिळाले. आता या धाग्यावरून सहज आठवले. तिला विचारतो कुठून मागवलेले..

पाहिलं ते दाढी पुराण संपवतो,
कोणीतरी जिलेट चा गिफ्टपॅक दिला होता, त्यात शेव्हिंग जेल, आफ्टर शेव्ह च्या जोडीला एक प्रि शेव्ह ऑइलची चीमुकली बाटली होती.
तोपर्यंत मी हा प्रकार मेन्स हेल्थ मध्येच वाचला होता,

दाढी करण्यापूर्वी हे 2 3 थेंब तेल गालावर चोळून लावायचे, त्यांनी जास्त जवळून दाढी(क्लोज शेव्ह चे भाषांतर आहे हे) होते असा त्यांचा दावा होता,
ती बाटली संपल्यावर नवीन आणावी इतकी काही व्हॅल्यू ऍड वाटली नाही मला.

मात्र सलून मध्ये दाढी करताना तो बाप्या तोंडावर पाणी स्प्रे करून झाल्यावर चेहऱ्याला मोईश्चरायझर का चोळतो त्याचे कारण कळले Happy

Pages