गाव गाता गजाली - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 18 July, 2017 - 03:21

तर, चूक भूल द्यावी घ्यावी ही चांगली चालू असलेली मालिका बंद होते आहे (बहुतेक). त्याजागी 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका चालू होतेय.
२ ऑगस्ट २०१७ पासून दर बुधवार - शनिवार रात्री ०९३० वाजता.
नेहेमीप्रमाणे साधक-बाधक चर्चेकरता हा धागा Happy

त्याबद्दलची लिंक - http://www.loksatta.com/manoranjan-news/writer-actor-prahlad-kudatkar-ne...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पहिल्यांदा बघितली. खूप आवडली.

"एक (फारतर दोन) एपिसोड - एक गोष्ट" हा फॉरमॅट मला खूप आवडतो. याच कारणाने गंगाधर टिपरे, कथाकथी, रेशीमगाठी, पिंपळपान, दिल दोस्ती दुनियादारी (पहिला सिझन) ह्या मालिका आवडल्या होत्या. आता त्यात या मालिकेची भर पडली.

बाकी मालिकेतले कलाकार, भाषा, परिसर इतकंच काय तर भांडीकुंडी सुद्धा ऑथेंटिक मालवणी / कोकणी असल्याचे जाणवले.

मालवणी भाषेचा लहेजा नाहि जमलाय अजुन - जो मच्छींद्र कांबळींनी दाखवला; त्यांच्या नाटकां मधुन. ती टिपिकल हेल काढुन बोलली जाणारी मालवणी भाषा या सिरियल मध्ये अजुन ऐकायला मिळालेली नाहि...

मस्त वाटतेय अजूनही.

हेमाताई तुमच्या नातीचं अभिनंदन.

मंच्छींद्र कांबळी यांची मालवणी आणि देवगड तालुक्यात बोलली जाणारी भाषा यात फरक आहे माझ्या मते, ती मालवणीच्या आसपास जाणारी आहे पण मं कां यांची मालवणी नाही. ती प्रॉपर मालवण तालुक्यात बोलतात बहुतेक. मे बी माझं चुकीचं असू शकेल. पण देवगड तालुक्यात सासर आहे माझं त्यावरुन मी सांगतेय.

विहीर पण आयताकृती परफेक्ट होती. आमची एक विहीर सेम तशी आहे.

गजाली मधे माझ्या मते जहाजातला ज बरोबर. तरी मी विचारेन.

>>चिर्‍याचो गडगो<<<

डोळे भरून पावले. गाव बघायला मस्त वाटताह. पांडू जाडा झालाय आणि अजून तशीच खुळ्यागत मान डोलावता आणि चुकीची मालवणी बोलतो.

गावागावात , मालवणी बोलायची पद्धत ( म्हणजे एक टोन) असते, सरमिसळ पण असते. पण राखेचा अगदीच भेळ होती. इथे अजून तरी बर.

अंजु एकदम बरोबर.. देवगड - मालवण ची बोली यात फरक पडतो.. अगदि कुडाळ आणि मालवणची बोली सुध्दा बदलते.... कुडाळ, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला इथली भाषा जवळपास गोव्याच्या भाषेसारखी वाटते.. कणकवली पासुनची भाषा मालवणी

>>कुडाळ, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला इथली भाषा जवळपास गोव्याच्या भाषेसारखी वाटते<<<
हो , बरोबर.

भावना गोवेकर यांनी माझ्या मनातील भावना योग्य रीतीने पोचवल्यांनी. Happy मैला मैलावर भाषा बदालता. कणकवलीत बोलली जाणारी मालवणी आणि सावंतवाडी-बांदा भागातली मालवणी यात पण भरपूर फरक आसा.

राखेचापेक्षा या सिरीयलमधे मस्त मालवणी बोलंतत. काही कलाकार मात्र दापोली भागातली बोली बोलंतत. उदा. ते जुळे भाऊ

तो छोटा मुलगा (डब्यात खिचडी आणणारा) अगदी बरोबर मालवणी सुरात बोलतो. माझ्या चुलत भावाच्या मुलाचीच आठवण झाली. Happy

ओ गाववाल्यांनु, तुमका कळला काय??? आपली 'राखेचा' म्हणजे `रात्रीस खेळ चाले' आता कानडीत सुरू झाली हा. 'निगुडा रात्री' असा कायतरी नाव असा त्येचा. गोष्टी तेच आसत पण काही नावा बदलली हत. माका खरोतर ह्येच्यावर धागो काढूचो होतो, पण कसो काढूचो ता काय कळना नाय.
ह्या बघा : https://youtu.be/gO80XlPY4jY

>>गजाली मधे माझ्या मते जहाजातला ज बरोबर.<<

आय्ला, आता जहाजातला "ज" कोणता हा माझा गोंधळ उडालेला आहे (माझ्यामते जखमेतला ज). मी ऐकलेल्या गजालीतला ज हा हिंदीत "जा जा रे", "जो तुमको हो पसंद" मध्यल्या ज सारखा... Happy

गजाली मधे माझ्या मते जहाजातला ज बरोबर.<< अगदी बरोब्बर.. कठिण 'ज'.. म्हणाचो..
तो खिचडी आणणारो पोरगो बरो मालवणी बोलता.

कुडाळ, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला इथली भाषा जवळपास गोव्याच्या भाषेसारखी वाटते <<< नाय हो.. बांद्याक गेल्याशिवाय मालवणीत गोव्याचे शब्द येणत नाय.. कुडाळवालो आसंय, वाडीक होतंय, आणि वेंगुर्ल्याक जाणांयेणां नेहमीचाच..

तो छोटा मुलगा (डब्यात खिचडी आणणारा) [क्रिश] अगदी बरोबर मालवणी सुरात बोलतो.
तो आहे पण खूप cute!!!! आजच्या एपिसोडमध्ये त्याच्या खोड्या पाहून माझ्या लहान मामेभावाची आठवण झाली!!! (फक्त skin colour मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे!!! :P)

त्या 'बेवड्याचा' पण अभिनय छान आहे!

तो छोटा मुलगा (डब्यात खिचडी आणणारा) [क्रिश] अगदी बरोबर मालवणी सुरात बोलतो >> +११
हातवारे करताना किंवा विचार करताना अजुन भारि वाटतो.

हातवारे करताना किंवा विचार करताना अजुन भारि वाटतो.>>>>>>मी काय दररोज बघूक नाय. पण हयसर गजाली वाचून, यु ट्युबवर पह्यला भाग बघलय.
क्रिश नाव काय त्याचो? माका वाटता ता मालवणातलाच/जवळपासचा असतला.
छान वाटता मालवणी ऐकूक आणि कोकण बघूक.

शोभा तू कणकवलीचं मालवणी शोधायला जाऊ नकोस हा, आमचा तालुका आहे तो देवगड. तिथली भाषा जास्त असेल Wink .

क्रिश आणि बैल ह्या दोघांचाच मालवणी लहेजा पर्फेक्ट आहे.>>>+११११
पण राखे पेक्षा मस्तच

ओ...पप्प्प्पानऊऊउ Happy

अंजू, मी काही कणकवलीचं मालवणी शोधत नाही गं! कणकवलीच मालवणी मलाच कुठे माहित आहे? Lol
अग, माझी काकू मालवणला रहाते, तिचा नातू , त्या मुलासारखच मालवणी बोलतो. म्हणून मला माहित. Happy
आमचा तालुका आहे तो देवगड>>>>>>>>.अगो मग मालवणीत्सून बोलून दाखव. Lol

हो तो बेवडा मस्तच करतोय काम.

कालचा भाग पण भारी होता . क्रीश ला बघून श्वास मधल्या छोट्याची आठवण येतेय . भारी बोलका आहे त्याचा चेहरा .
बाकी त्याने सुवासाच्या डोक्याव मस्त मिऱ्या वाटल्यान हो

आमचा बी देवगडाच असा तालुको पन आमकां बोलुचो जमात नाय . कोन काय बोलतंय त्या समजता वाईच .

आमचा बी देवगडाच असा तालुको पन आमकां बोलुचो जमात नाय . कोन काय बोलतंय त्या समजता वाईच . >>> मम.

मी नाही जात बोलायला, मला जमत नाही. बोलायला गेले तर कारवारची कोकणी देवगड भाषेत मिक्स होते माझी. शेजारी कोकणी रहायचे पुर्वी माहेरी त्यामुळे कानावर ती भाषा जास्त होती. ती पण येत नाही फारशी पण तरीही.

Pages