गाव गाता गजाली - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 18 July, 2017 - 03:21

तर, चूक भूल द्यावी घ्यावी ही चांगली चालू असलेली मालिका बंद होते आहे (बहुतेक). त्याजागी 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका चालू होतेय.
२ ऑगस्ट २०१७ पासून दर बुधवार - शनिवार रात्री ०९३० वाजता.
नेहेमीप्रमाणे साधक-बाधक चर्चेकरता हा धागा Happy

त्याबद्दलची लिंक - http://www.loksatta.com/manoranjan-news/writer-actor-prahlad-kudatkar-ne...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुक्रवार एपिसोडचा शेवट नाही आवडला. ज्याचं घर आहे, ज्याच्या घरी नागोबा आलाय नागपंचमीच्या दिवशी तो बिचारा लोकांना अंधश्रद्धेपासून दूर नेत असतो पण शेवटी बेरकीपणाने त्याच्यावर मात केली आणि अंधश्रद्धा फोफावायला मदत झाली.

पण ते वास्तव नाही का? कालच्या भागाचा शेवट जसा टोकदार केला, तसा आधीच्या भागांत (मुलगी बघायला येणे, दशावतार) करता आला असता आणि क्लायमॅक्सला मजा वाढली असती असं वाटलं. त्यांत शेवट झालाय हे कळलंच नाही.

क्रिशला कोणीतरी मोठ्याने डबिंग केलंय की काय असं मला मध्ये मध्ये वाटलं.

श्रेयनामावलीत प्रत्येकाच्या नावापुढे गावांची नावं दिलीय ती त्या लोकांची खरी गावं असतील असंही वाटत नाही. वातावरणनिर्मितीसाठी दिली असतील.

पाहिली नाही. पण देवगडच नाव वाचून पाहवीशी वाटती आहे. ४ वर्ष देवगडला होतो वडिलांच्या बदली मुळ. वाडातर पुलाच काम त्यांच्या देखरेखी खाली झालं. Happy त्या अगोदर लांजाला पाच वर्ष.

बेरकीपणाने > हा कोकणी माणसाचा गुणधर्म! तोच अधोरेखित करण्याचा प्रयत्न असावा

सीमा, तुमच्या वडिलांना लाख लाख धन्यवाद सांगा वाडातर पुलासाठी . वाडातर पुलामुळे आम्हा नाडणवासीयांच आयुष्य चांगल्या अर्थाने बदलून गेलं आहे . पूल व्हायच्या आधी तर म्हणजे होडीने देवगडला जाणे म्हणजे दिव्य होतं .
माझा पुतण्या पावसाळ्याचे दिवस देवगडलाच आमच्या गोगटे ह्या नातेवाईकांकडे राहत असे कॉलेजला होता तेव्हा . पण आता आमची पुढची मुलं पहिली पासून सुमोने देवगडच्या शाळेत जातात . ते ही कमी वेळात . कोणी आजारी झाले तर त्याला कोल्हापूर ला नेणे सोपे जाई देवगडला नेण्यापेक्षा . आता जाऊ शकतो आरामात देवगडला .

सिरीयल खरंच बघा. आपल्या भागातली आहे . छान वाटेल पहाताना .

ती गावं कोकणात खरंच आहेत असं वाटतंय पण आज नीट बघते परत आणि सांगते.

सीमा आमच्या कुटुंबाकडून पण धन्यवाद तुमच्या बाबांना. त्या पुलामुळे देवगड जवळ आले आम्हाला, नाहीतर विजयदुर्ग वरून जायला लागायचं कोल्हापूर, मुंबईला.

पण ते वास्तव नाही का? >>> हो पण बदल घडायला हवा ना सर्व समाजात कोकणात.

बेरकीपणाने > हा कोकणी माणसाचा गुणधर्म! तोच अधोरेखित करण्याचा प्रयत्न असावा >>> हो तसंच वाटलं मला शेवट बघून.

कालच्या भागात तीन चेहेरे दिसले कोकणचे. बेरकीपणा, भोळेपणा आणि समाजात बदल करण्यासाठी, सुधारणा होण्यासाठी पोटतिडकीने समजावणारा, बदल करू इच्छीणारा एक चेहेरा.

गणपतीचे भाग फारच छान होते. छोट्याने गणपती गोड वठवला. बघून मजा वाटली. अवांतर: वास्तुरंगमध्ये प्रल्हाद कुरतडकरने कोकणातल्या गणेशोत्सवाचे वर्णन केले आहे.

मागल्या आठवड्यात गणपतीचे भाग दाखवल्यानी. काल तो 'पपलो' कलमावर चढलो तर मास्तर म्हणता, "झाडावर आंबे नाय, म्हणजे ह्यो काय चोरी करूक झाडावर चढाक नाय". मग गोदाच्या पार्टीसाठी नाम्या न्हाव्ह्याच्या बायलेन आमरस खयसून आणलो? ह्येच्या घोवाच्या कलमाक सप्टेंबर महिन्यात पण आंबे लागतत??? खयची जात म्हणायची???

हल्ली सगळेजण डबाबंद आमरस करून ठेवतात हो ..
कधी ही खाता येतो.....
माहित आहे, पण हे चोचले शहरी भागात चालतात. ग्रामीण भागात मी तरी पाहिले नाही, ते सुद्धा घरगुती पार्टीत!
शिवाय ते वाक्य नीट ऐका. ती (न्हाव्याची बायको) म्हणते, "आमरस तर मी करून (इकत नाही) आणलंय" शिवाय विकतचा (डबाबंद) आमरस आणायचा असता तर न्हाव्याच्या बायकोला सांगण्याऐवजी शिक्षकाच्या बायकोला (मास्तरणीला) सांगणे जास्त योग्य होते, कारण त्यांचे स्वतःचे दुकान आहे!
(डबाबंद आमरस हा विकतच आणावा लागतो, घरी आमरस करून त्याला घराच्याघरी डबाबंद करणे शक्य नाही. त्यासाठी Canning machine लागते!)

भाऊ, मस्त जमलंय .

डबाबंद आमरस हा विकतच आणावा लागतो, घरी आमरस करून त्याला घराच्याघरी डबाबंद करणे शक्य नाही. त्यासाठी Canning machine लागते!) >> अहो ,हल्ली आपले आंबे दिले की रस डब्यात भरून देतात कॅनिंग वाले . त्यासाठी घरी कॅनिंग मशीन असण्याची गरज नसते . घरोघरी असतात हल्ली रसाचे डबे किंवा पिशव्या.

खूप दिवसानी झी मराठी वर एक बरी मालिका. कोणी observe केल का, मालिकेतला दुसरा भाग, 'बैल', जो काम चुकार मुलावर होता, विहिरीत उतरून घागर काढून देतो, तो पूर्ण पणे, 'मालगुडी डेज' मधला '४रुपये' वर बेतलेला होता. एकूण एक प्रसंग तसाच. मध्यंतरी सहज मालगुडी डेज बघण्यात आली,तेव्हा समजली उचलेगिरी

पूर्वी कधी मालवणी बोलीतला पेपर निघायचा का? किंवा मालवणी लेखन वाचायला कुठे मिळेल? कोकणात कोणत्या भागांत मालवणी बोलतात? रत्नागिरीपासून बांद्यापर्यंत?

पूर्वी कधी मालवणी बोलीतला पेपर निघायचा का? किंवा मालवणी लेखन वाचायला कुठे मिळेल?>>>>
माझ्या माहितीप्रमाणे मालवणी बोलीतील वृत्तपत्र वगैरे नाही निघत. अगदी कणकवलीतून एक 'सिंधुदुर्ग लाइव्ह' नावाचे लोकल न्यूज चॅॅनेल चालवले जाते त्यावरही प्रमाण मराठीतच बातम्या दिल्या जातात. मालवण येथून 'जनयुग' नावाचे साप्ताहिक निघते. ते देखील प्रमाण मराठीतच असते. त्यांचा (जनयुग) दिवाळी अंक निघतो त्यात मात्र आपल्याला मालवणी बोलीतील काही कथा वाचावयास मिळतील.

कोकणात कोणत्या भागांत मालवणी बोलतात? रत्नागिरीपासून बांद्यापर्यंत?>>>
जास्तकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात. रायगड जिल्हा कोकणात येत असला तरीही तिथे औषधालाही मालवणी बोली आढळत नाही. (हे माझे वैयक्तिक निरीक्षण)

कोकणात कोणत्या भागांत मालवणी बोलतात? रत्नागिरीपासून बांद्यापर्यंत?>>>> सिंधुदूर्ग जिल्हा. यात कणकवली फेमस हो. आपले नारायण राणे यांचा हा गड. दिगंबर नाईक, संजीवनी जाधव, जनार्दन परब, लिलाधर कांबळी, राजा मयेकर व कै. मछिंन्द्र कांबळी हे फेमस मालवणी कलाकार.

Srd, तुम्ही मछिंन्द्र कांबळी यांची मालवणी नाटकं बघा. फर्मास मालवणी बोलाल.

Pages