BS ४ वाहने आणि त्यांचा दिवसाही पेटलेला दिवा

Submitted by कुमार१ on 3 August, 2017 - 01:04

या वर्षी ज्या नव्या BS ४ दुचाक्या बाजारात आल्या आहेत त्यांना पुढचा दिवा (head lamp) चालू/बंद करण्याचे बटनच नाही. त्यामुळे गाडी चालू केली की दिवसा पण दिवा सतत चालू राहतो. याबद्दलचा हा धागा लिहिण्यास मी का उद्युक्त झालो त्याची गंमत सांगतो.

आधी हे BS4 येण्यापूर्वीची परिस्थिती सांगतो. आपण जर सकाळच्या वेळेस रस्त्यावर चालत असलो की नेहमीच आपल्याला दिवा चालू असणाऱ्या काही दुचाक्या दिसतात. अशा लोकांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असते. आदल्या रात्री जेव्हा ते वाहन बंद करतात तेव्हा दिव्याचे बटन काळजीपूर्वक बंद करायला ते विसरतात. ही तारुण्याची बेफिकिरी असते. अशा सर्वांना आपला हात दिव्याच्या आकारात हलवून जाणीव करून द्यायची ही माझी गेल्या तीस वर्षांची सवय आहे.

गेल्या ६-८ महिन्यांत मला सकाळी चक्क ११-१२ पर्यंत अशा ‘दिवेचालू’ गाड्या अचानक खूप मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या होत्या. त्यामुळे माझे हात दाखवण्याचे काम कैक पटीने वाढले. नंतर तर मी रोज किती वेळा आपण हात दाखवले याची गणती करू लागलो! सुरवातीस मला वाटले की दिवसेंदिवस तरुणांची बेफिकीरी वाढत चाललीय. पण जेव्हा अशा गाड्यांवर मला मध्यमवयीन लोक दिसू लागले तेव्हा मात्र अचंबा वाटू लागला.

एकदा मित्राशी गप्पा मारताना मी हा विषय काढला. मी ‘बेफिकीरी’ वगैरे बोलू लागणार तोच तो हसला आणि त्याने मला ही “BS4” कहाणी सांगितली. हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे असेही समजते. आपल्यासारख्या उष्ण हवामानीय देशाने युरोपीय मानकांची नक्कल का करावी, हा प्रश्न मात्र मनात आला.

..... असो, तर आता हा “सर्वोच्च” आदेश असल्याने आपण टीका करणे बरे नव्हे. तरीसुद्धा माझ्यापुढे अजून १० वर्षांनंतरचे चित्र तरळून जात आहे, ते असे. एप्रिल महिन्यात आपण नागपूर किंवा तत्सम गरम ठिकाणी आहोत. बाहेरचे तापमान आहे ४८ अंश से. आणि त्यात रस्त्यावर हजारो BS4 गाड्या भर दुपारी १ वाजता ‘दीपावली’ साजरी करीत आहेत !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विषय.मलाही दिवा चालू दाखवायची सवय होती.
पण आता बी एस 4 गाडी घेतल्यावर हे कायम ऑन चे कळले.
मला हा वेस्ट ऑफ एनर्जी वाटतो.फोटो सेन्सर लावून उजेड कमी असेल तेव्हा दिवे ऑन असे करायला हरकत नव्हती.

कुठल्या तरी देशात म्हणे असेच असते, गाडीचे दिवे दिवसभर चालूच असतात.. पण तिथे सूर्यप्रकाश किती असतो हे बघितले आहे का कधी कोणी?

अत्यंत अतर्क्य निर्णय आहे हा.. दिवसा पण समोरच्या गाडीचा दिवा डोळ्यात जातो आता.. पूर्वी रात्री गाडी चालवताना दिवे डोळ्यात जायचे आता दिवसा पण तेच..

मला BS4 ची वगैरे कल्पना नाही,
पण दुचाकीच्या दिव्यासाठी जी ऊर्जा लागते ,ती चाकाच्या फिरण्यातूनच निर्माण होते, त्या उर्जेतून बॅटरी चार्ज होते आणि दिवा लागतो,
तेव्हा ऊर्जा जी एवीतेवी फुकट जात असते ती दिवे लावायला वापरली जाते असे वाटते.
दुसरे म्हणजे हे दिवे पेटल्याने तापमानात किती फरक पडतो हे ही पाहायला पाहिजे, माझी दुचाकी होती तेव्हा सलग तास भर दिवा चालु ठेऊन तो तापल्याचे आठवत नाही,
त्यामुळे बाहेर 41डिग्री असताना दिवाली साजरी करायचा मुद्दा कळला नाही.

बाकी दिव्याला बंद करायची सोय असायला हवी हे खरे,

दिव्याची उघडझाप करून काही इंडिकेशन्स दिली जातात, ती BS4 मध्ये कशी देतात हे समजून घ्यायला आवडेल

असं बिसं काय इंडिकेशन पुण्यात द्यायचं नसतं हो!!!गाडी सव्वा फुटाचा पॅसेज दिसला की दामटायची इतका एकच रुल असतो.हॉर्न नीट चालला की झालं!!बाकी इंडिकेटर फिंडिकेटर काही नाही चालवले तरी लोक शिव्या घालत समजून घेतात

BS ४ वाहने आणि त्यांचा दिवसाही पेटलेला दिवा

हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे, हे मुळधाग्यातच नमुद केलेत ते एक बरे झाले. नाहीतर मोदी सरकारच्या नावाने शिमगा साजरा करायला इथे अनेक जण जमले असते.

त्यामुळे बाहेर 41डिग्री असताना दिवाली साजरी करायचा मुद्दा कळला नाही. >> वृथा दीपो दिवापिच . सूर्य आग ओकत असताना चालू दिव्याची गरज नाही, असे वाटते. काही वर्षांपूर्वी वाचले होते की इंग्लंडमध्ये चालू वाहनाचा दिवा दिवसा चालू आढळला तर ५० पौंड दंड होतो.

मूलभूत वाहन नियमांनुसार दिवसा दिवा लावणे किंवा लावून लगेच बंद करणे, याचा अर्थ " मला खूप घाई आहे, तेव्हा पुढे जाउ द्या" असा असतो. तेव्हा याही कारणासाठी नवा नियम पटला नाही.

It's nothing about temperature or surrounding light. Keeping head lights switched on makes it easy to spot vehicles and avoid accidents. It's proven fact. In many US/ Canada proviences you cannot register your vehicles unless you have that enabled in your vehicle .

many US/ Canada proviences you cannot register your vehicles unless you have that enabled in your vehicle . >> फक्त दुचाकी की चारचाकी पण ?

पूर्वी 'हमारा बजाज' च्या जमान्यात असे शिकवले होते की गाडीला किक मारताना आधी दिव्याचे बटण बंद असल्याची खात्री करा. नाहीतर दिव्याचे फिलामेंट जळते. आता निदान बीएस ४ मध्ये फिलामेंट दणकट असावे ही अपेक्षा.

दिवे जास्त वेळ चालू राहिल्याने वारंवार बदलावे लागतील व चार वर्षे चालणारा दिवा सहा महिने वर्षातून बदलायला लागला तर आपला धंदा सस्टेन होईल असा काही दिवेवाल्या उद्योजकांचा उद्योग तर नव्हे. भारतातल्या-परदेशांतल्या धुक्याच्या प्रदेशांत ठिक आहे. पण आधीच लक्ख उन्हाने डोळे त्रासलेले असतांना लाईट चालू असणे बावळटपणा आहे.

Keeping head lights switched on makes it easy to spot vehicles and avoid accidents. >> हे संध्याकाळी आणि रात्री किंवा धुक्यात ठीक आहे. भर दुपारी ज्यांना समोरची गाडी दिसत नाही असे लोक रस्त्यावर जाणारच नाहीत Lol
दिवा चालू असण्याचे हे कारण आत्ताच कळले. मला वाटत होतं फॅशन आली आहे की काय अशा गाड्यांची Happy

तेव्हा ऊर्जा जी एवीतेवी फुकट जात असते ती दिवे लावायला वापरली जाते असे वाटते.

सहमत. वीजेचा वापर नसताना ही वीज रेक्टीफायर रेग्युलेटरने ग्राउंड केली जाते तेव्हा तेथे थोडीफार उष्णता निर्माण होते, त्यापेक्षा तीचा सुरक्षिततेसाठी वापर होणे हे कधीही चांगलेच.

पूर्वी 'हमारा बजाज' च्या जमान्यात असे शिकवले होते की गाडीला किक मारताना आधी दिव्याचे बटण बंद असल्याची खात्री करा. नाहीतर दिव्याचे फिलामेंट जळते.
आताचे वोल्टेज रेग्युलेटर उच्च दर्जाचे वापरले जातात, त्यामुळे ठरावीक वोल्टेजच्या वर वीजनिर्माण झाल्यास ती ग्राउंड केली जाते व बल्बचे फिलामेंट जळत नाही.

Nana, बाहेर सूर्य आग ओकत असताना दुचाकींचा दिवा डोळ्यांना त्रास देईल म्हणता ? Happy

भर दुपारी ज्यांना समोरची गाडी दिसत नाही असे लोक रस्त्यावर जाणारच नाहीत

मोठी वाहने त्यांच्या आकरमानामुळे सहज दिसतात, मोटारसायकल पटकन दिसत नाही. हेच जर मोटारसायकलचा दिवा चालू असेल तर समोरच्याचे लक्ष वेधून घेतो. दिवसा दिवा चालू ठेवून मोटारसायकल चालवून बघा तुम्हाला फरक जाणवेल.

हा हा हा,

तसे नाय हो. असो!

एक जोक सांगतो.
एक सरदार ट्रक चालवतांना अचानक उजवीकडे वळतो, मागून येणारा दुचाकीस्वार त्याला धडकतो. बाचाबाची होते.
"ट्र्कला इन्डिकेटर नाहीत ते तर धन्यच, पण महान माणसा, निदान हात तरी दाखव वळतांना..."
"ओये, तुस्सी इत्ता वड्डा ठेला णा दिखायी दित्ता.... मेरा ए हथ्थ के दिखता..."

हेड लाईट चालू ठेवायचा निर्णय योग्य वाटतो,आणि तसेही प्रखर सुर्यप्रकाशात त्यादिव्याचा फार त्रास होत नाही.फक्त ते झेनॉन लॅम्प बंद केले पाहीजेत.

एक सरदार ट्रक चालवतांना अचानक उजवीकडे वळतो, मागून येणारा दुचाकीस्वार त्याला धडकतो. बाचाबाची होते.

--

ते 'वीस लाख' रुपये घेऊन फिरणारा ट्रक ड्रायव्हर हाच काय ? Wink

विषय काय आहे आणि हे ठेवणीतले कट्टेकरी प्रसाद यांचे काय चालू आहे?
अडमिन कृपया यांना आवराच
जिथेतिथे यांचे चालू असते. हेच लोक चांगल्या चर्चेची वाट लावतात.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे ते ठिक आहे, पण भरदिवसा किंवा गाडी सुरू असताना दिवा चालू, याचे लॉजिक काय आहे नक्की? Uhoh

मी हल्ली गावी असताना हे दिवसा दिवा प्रकरण नोटीस केलं. मला bs4 वगैरे काही माहीत नव्हतं आणि ज्यांच्या गाड्या दिवसाही दिवे सुरू ठेऊन फिरताहेत त्यांनाही माहीत नव्हतं. दिवा सुरू आहे, बंद कर म्हणून सांगितले तेव्हा गावी 'आरटीओने नवा नियम केलाय, मोटरसायकल दिवसाही दिवा सुरू ठेऊन चालवायची' हे उत्तर मिळाले.

खरेतर चांगलाच निर्णय म्हटला पाहिजे. कारण कित्येक दुचाकीस्वार (आणि काही वेळा रिक्षावालेही) मिणमिणत्या उजेडातही गाडीचे सर्व दिवे बंद ठेवून, कधीकधी तर काळे / गडद निळे कपडे घालून (रिक्षाचा रंगच काळा असतो म्हणा) चाललेले असतात. दिवा चालू करायची अजिबात मेहनत (!) घेत नाहीत.

मी तर रात्रीचे रस्त्यावर दिवे नसतानाही मोटर बाईकवाल्याना गाडीचे दिवे बंद ठेऊन गाडी चालवताना बघितलंय.. खूप कौतुक वाटतं त्यांच्या धाडसाचं. Angry

चांगला आदेश आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा.
आता रहदारीचे नियम पाळल्या गेलेच पाहिजेत यासाठी कसले तरी आदेश काढायला हवेत.

दुचाकी ची हेड़लाइट कायम सुरू ठेवण्यापेक्षा न्यायालयाने
कंपन्यांना DRL (Daytime Running Lamp) ची सक्ती करायला हवी होती.
जसे अनेक चारचाकी वाहनांना आहे .

Pages