BS ४ वाहने आणि त्यांचा दिवसाही पेटलेला दिवा

Submitted by कुमार१ on 3 August, 2017 - 01:04

या वर्षी ज्या नव्या BS ४ दुचाक्या बाजारात आल्या आहेत त्यांना पुढचा दिवा (head lamp) चालू/बंद करण्याचे बटनच नाही. त्यामुळे गाडी चालू केली की दिवसा पण दिवा सतत चालू राहतो. याबद्दलचा हा धागा लिहिण्यास मी का उद्युक्त झालो त्याची गंमत सांगतो.

आधी हे BS4 येण्यापूर्वीची परिस्थिती सांगतो. आपण जर सकाळच्या वेळेस रस्त्यावर चालत असलो की नेहमीच आपल्याला दिवा चालू असणाऱ्या काही दुचाक्या दिसतात. अशा लोकांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असते. आदल्या रात्री जेव्हा ते वाहन बंद करतात तेव्हा दिव्याचे बटन काळजीपूर्वक बंद करायला ते विसरतात. ही तारुण्याची बेफिकिरी असते. अशा सर्वांना आपला हात दिव्याच्या आकारात हलवून जाणीव करून द्यायची ही माझी गेल्या तीस वर्षांची सवय आहे.

गेल्या ६-८ महिन्यांत मला सकाळी चक्क ११-१२ पर्यंत अशा ‘दिवेचालू’ गाड्या अचानक खूप मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या होत्या. त्यामुळे माझे हात दाखवण्याचे काम कैक पटीने वाढले. नंतर तर मी रोज किती वेळा आपण हात दाखवले याची गणती करू लागलो! सुरवातीस मला वाटले की दिवसेंदिवस तरुणांची बेफिकीरी वाढत चाललीय. पण जेव्हा अशा गाड्यांवर मला मध्यमवयीन लोक दिसू लागले तेव्हा मात्र अचंबा वाटू लागला.

एकदा मित्राशी गप्पा मारताना मी हा विषय काढला. मी ‘बेफिकीरी’ वगैरे बोलू लागणार तोच तो हसला आणि त्याने मला ही “BS4” कहाणी सांगितली. हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे असेही समजते. आपल्यासारख्या उष्ण हवामानीय देशाने युरोपीय मानकांची नक्कल का करावी, हा प्रश्न मात्र मनात आला.

..... असो, तर आता हा “सर्वोच्च” आदेश असल्याने आपण टीका करणे बरे नव्हे. तरीसुद्धा माझ्यापुढे अजून १० वर्षांनंतरचे चित्र तरळून जात आहे, ते असे. एप्रिल महिन्यात आपण नागपूर किंवा तत्सम गरम ठिकाणी आहोत. बाहेरचे तापमान आहे ४८ अंश से. आणि त्यात रस्त्यावर हजारो BS4 गाड्या भर दुपारी १ वाजता ‘दीपावली’ साजरी करीत आहेत !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरतर भारतात ब्राईट सनलाईट वर्षभर असतो शक्यतो सगळ्यांच भागांत. ही सक्ती नको. कारला असतात तसे एल.ई.डी डिआरएल्स असतील तर गोष्ट निराळी. आजकाल हेडलॅंप्स बॅटरी पण खातात. सो बॅटरी आणि बल्ब वाल्यांचं बरं चालेल एकंदरीत. डीआरएल्स असतील तर नक्कीच फारदेशीर होईल आणि एनर्जी कंजंप्शन ही कमी होईल.
हिम्स, दक्षिणा, साधना, अनु +१
पुण्यात तर बोलायलाच नकोय... आधीच ट्राफिक सेन्स च्या नावानी बोंब आणि त्यात भर दिवसा लोक्स हायबीम वर गाड्या हाणतात राँग साईडनी... Uhoh
बाकी देशांत सनलाईट त्यामानानी कमी सो तिथे हे संयुक्तिक असलं तरी इकडे चोप्य्पस्ते का? त्यात काही बदल तर करायचा... असोच

अमेरिकेत अश्या बर्‍याच कार्स आहेत ज्यांचा दिवा सतत चालू असतो!

भारतात खरे तर हॉर्न सतत वाजत राहिला पाहिजे. नाहीतरी हॉर्न दिल्याशिवाय गाडी चालतच नाही असे एकंदरीत भारतात दिसतेच.

मला वाटते यापुढची स्टेप म्हणजे पादचार्‍यांनाही कपाळावर हेडलाईट लावणे सक्तीचे करावे. त्यांचीही रोड-शेपटी महत्वाची आहे, नाही का?!

पादचाऱ्यांना चालायला फुटपाथ/ झेब्रा क्रॉसिंग/ अंडरपास इ. बनवा आणि त्यांना त्यातून चालायला लावा. चालले नाहीत तर दंड करा. त्याच बरोबर पादचाऱ्याना इजा पोहोचली आणि चूक वाहन चालकाची असेल तर वाहन चालक परवाना तत्काळ रद्द करा.
उगा कुठलाही नियम केला की तो मोडायचा कसा यावर पोस्टी, धागे आणि forward लिहिण्यात वेळ घालवू नका. नियम केलेला आहे तो पाळायला शिका, किमान तो का आहे यावर एक गुगल सर्च केला तरी समजेल इतपत गोष्टी तरी स्वतः वाचायची सवय अंगी बाणवा.

20-22 सालापर्यंत BS VI पण येतंय BS V skip करून. त्याला compatible वाहनं बनतील तेव्हा अजून बदल असतील.

भारताने २०३० नंतर कम्बश्च्न इंजिन वाली नवी वाहन विक्री टोटल बंद करणार असं टारगेट ठेवलंय का? http://www.huffingtonpost.in/2017/05/03/india-has-a-plan-to-only-have-el... हल्लीच वाचलं.
टिपिकल युरोपिअन देशांत २०४० टार्गेट ठेवलंय. भारतात सध्या बॅटरी ऑपरेटेड कार्स किती दिसतात? २०३० पर्यंत करायला काही ठोस कार्यक्रम चालू आहे का? कारण २०३० खूपच जास्त ambitious आहे.

माझा मोबाईल माझ्यासारखाच स्मार्ट आहे. अंधारात उजेडात बाह्य प्रकाशाला अनुसरून त्याचा ब्राईटनेस कमी जास्त होतो. तसे या दिव्यात करता आले तर दिवसाच्या प्रखर प्रकाशात आपसूक मावळतील. बाकी असे दिवे बनवायचे काँट्रेक्ट अंबानी यांना देऊ शकतोच. सरकार वा कोर्ट निर्णय घेते तो कोणाच्या ना कोणाच्या फायद्याचा असतोच.

बाकी यावरून आठवले, आमच्याकडे मी कोणत्याही रूममध्ये असलो तरी घराच्या सर्व लाईटस फॅन ऑन असतात. कारण या रूममधून त्या रूममध्ये गेल्यास पुन्हा पुन्हा बटण बंद चालू करायला त्रास नको. असे बरेच जण करत असतील. तर त्याच धर्तीवर मध्येच कुठे अंधार्‍या गल्लीत गेलो तर कुठे लगेच दिवा लावायचा आणि बाहेर पडताच बंद करायचा हा त्रास टाळायला सतत दिवा चालूच ठेवणेही गैर नाही..

अंधारात उजेडात बाह्य प्रकाशाला अनुसरून त्याचा ब्राईटनेस कमी जास्त होतो. तसे या दिव्यात करता आले तर दिवसाच्या प्रखर प्रकाशात आपसूक मावळतील. << ऑटो मोड वर गाडी हेच करते ना??

पुण्यात तर बोलायलाच नकोय... आधीच ट्राफिक सेन्स च्या नावानी बोंब आणि त्यात भर दिवसा लोक्स हायबीम वर गाड्या हाणतात राँग साईडनी... >> मलाही याच कारणामुळे हा निर्णय पटला नाही आहे, पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने तो मान्य करावा लागेल. असो, पण या हायबीमचं काही करता येणार नाही का? गाडी ला हायबीम/लोबीम असं काही बटण असतं हेच अनेकांना माहिती नाही असं मला वाटतं. माझी गाडी servicing करून आली की हमखास सेटिंग चेंज झालेलं असतं. इतका काय दुस्वास असतो लोबीमचा?
बाकी, photo sensor दिवे असावेत >>+१

पादचाऱ्यांना चालायला फुटपाथ/ झेब्रा क्रॉसिंग/ अंडरपास इ. बनवा आणि त्यांना त्यातून चालायला लावा. चालले नाहीत तर दंड करा.

>> पादचार्यांनीही सिग्नल नाही पाळला तर त्यांना दंड होतो का? अनेकदा चांगला भरपूर वेळचा सिग्नल लाल असला तरी पादचाऱ्यांना अचानक तो (वाहनांसाठी) हिरवा झाला की आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे हे आठवते. माझ्या अनुभवात तर सिग्नल वाहनांसाठी हिरवा असतांना, मोबाईलवर बोलत, डुलत डुलत, म्हशीपेक्षा कमी स्पीडने चालत, रस्ता क्रॉस करणारे काही महाभाग आहेत. अश्या लोकांना कोणतेच नियम नाहीत का वाहतुकीचे?

परवा एका मोठया चौकात सिग्नलला थांबलो होतो. पहिल्या रांगेत आम्ही जे 8 जण होतो त्यापैकी 6 गाड्यांचे दिवे दिवसा चालू होते.
आता बी एस ४ वाढताना दिसतेय

साद, सहमत.
तो दिवा फारसा तापत नाही असे एकदोघे म्हणाले.
मग ठीक आहे

Pages