राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा! Happy

गुगल वरील जयंती...
gandhi09.gif

आज एक दिवस उपवास करायचा निश्चय केला आहे!

प्रकार: 

चंपक तु उपवास करनार आहेस .......?
आज तर तुझ्या ऑफिस मध्ये जेवन आहे ना............
तु करनार असशिल तर मि हि करेल मग.
अरे वा ! आज कुकिंग ला सुट्टी ! मज्जाच मज्जा!

चंपी, तुम्ही कशाला उपास करणार? कुणास ठाउक, तिकडे हापिसातून श्री. चंपक भरपेट जेवून येतील आणि तुम्ही उपाशी? (त्यापेक्षा त्यांना तिकडे पोटभर खाऊन घ्या म्हणावं. तुमच्यासाठी डबा भरून आणायला सांगा.) (नुकत्याच संसारात पडल्या आहात म्हणून फुकट सल्ल्याची भेट!) Proud

आज एक दिवस उपवास करायचा निश्चय केला आहे!
--- कशा साठी जिवाला त्रास? तुम्हाला तुमच्या पोटावर अन्याय करायची नक्कीच मुभा नाही आहे. नव्हे उपवास केल्यास स्वर्गातही बापू क्रोध पावणार, त्यापेक्षा भरपेट खा मग हवे तर "वैष्णव जन तो तेने कहिये.... " म्हणा.

गांधीजयंतीच्या दिवशी सरसेनापतीजींचे उदबोधक विचार वाचुन बरे वाटले..:) थोडासा जोश पण आला..:) असो
चम्पक उपवास नक्की ना?..:)

चम्पक , आज इथल्या बर्‍याच जणांच्या दृष्टीने 'काळा दिवस'. दिवसभर माध्यमातू आदळणार्‍या जयन्ती समारोहाच्या आठवणी.मुळे दिवस डसत राहणार...

मारणारांची आठवण तर आता त्यांचे कुटुम्बीयही काढत नसतील , गांधींची भीती तर साठ वर्षानन्तर्ही वाटतेय...

महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा!

मुंबईमधील मणिभवनमध्ये गांधीजींचे ज्या खोलीत वास्तव्य होते, त्या खोलीचे हे प्रकाशचित्र आहे. गांधीजी वापरत होते त्या सर्व वस्तू , उदा. लाठी, खडावा, टेलीफोन, वारा घेण्याचा हात-पंखा, चरखा, लेखनाचे साहित्य इ., इथे जतन करून ठेवल्या आहेत. ह्या खोलीचे प्रकाशचित्र बाहेरच्या काचेतून घ्यावे लागते, आत जाण्याची परवानगी नाही. मणिभवनला जरूर भेट द्या! Happy

उजव्या कोप-यात गांधीजी वापरायचे ती प्रसिद्ध लाठी उभी करून ठेवली आहे.

आज अजून एका महान नेत्याचा जन्मदिवस आहे... भारताचे माजी पंतप्रधान माननीय श्री लाल बहादूर शास्त्री... त्यांना कोटी कोटी प्रणाम!!!

हो का ! मला नव्हते माहित!
आभारि आहे!
भारताचे माजी पंतप्रधान माननीय श्री लाल बहादूर शास्त्री... त्यांना कोटी कोटी प्रणाम!!!

अभिजा, सुंदर फोटो. मुद्दाम ब्लॅक/व्हाईट काढला का? पुण्यात आगा खान पॅलेस मधे सुद्धा अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत.

"स्वराज्य आले हत्तीवरुन मिरवीत. अंबारीत राजेंद्रबाबूंच्या हाती कलश होता, समोर घोड्यावर बसून चालले होते जवाहरलाल - फक्त बापू मात्र आमच्याबरोबर पायी चालत होते."
-- पु. ल. देशपांडे

नारायण, नारायण

मद्यसम्राट विजय मलया साहेबांनी कुठल्या वस्तू आणल्या होत्या भारतात? त्या ह्या समयी कोठे आहेत?

भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्याचे अर्ध्वयु, स्वातंत्र्यवीर महात्माजी गांधींना कोटी कोटी प्रणाम.

>>>> भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्याचे अर्ध्वयु, स्वातंत्र्यवीर महात्माजी गांधींना कोटी कोटी प्रणाम. <<<<<
या वाक्यात मुद्दामहूनच "राष्ट्रपिता" हे विशेषण लिहायचे विसरल्याबद्दल आभार! Happy
याच वाक्यात मुद्दामहूनच राष्ट्रपिता हे विशेषण विसरुन "असन्तोषाचे जनक" ही लोकमान्य टिळकान्ची बिरुदावली मात्र आठवणीने घुसवल्याबद्दल मात्र निषेध!
त्याचबरोबर, याच वाक्यात "स्वातन्त्र्यवीर" ही सावरकरान्ची उपाधी आठवणीने घुसडवल्याबद्दलही तीव्र निषेध!
सरतेशेवटी दोन ऑक्टोम्बरची रितसर वाट न पहाता घाईघाई या बीबीवर काहीबाही (खरे तर कैच्च्याकै) खरडल्याबद्दलही निषेधच निषेध! Proud

>>>> मारणारांची आठवण तर आता त्यांचे कुटुम्बीयही काढत नसतील , <<<<<
रॉबिनहूडा, कुटुम्बियान्चे मला ठाऊक नाही, गरजही नाही माहित करुन घ्यायची, पण नथुरामची आठवण मला नक्कीच दरवर्षी होते माझ्याच वाढदिवशी! कारण त्याच तारखेला त्याला फासावर दिले गेले! १५ नोव्हेम्बर!
बा़की तुझ्या वाक्याच्या त्या उर्वरित घिश्यापिट्या अर्ध्या वाक्याशी असहमती दर्शविण्याचीही गरज वाटत नाही!
असो.
(२००९ च्या तुझ्या पोस्टला २०१२ मधे उत्तर द्यायचे वेळ आली यातच सर्वकाही आले! नै? )

  • इंग्रजांविरुद्ध पहिला भारतीय असंतोष म्हणजेच स्वातंत्र्ययुद्ध >> १८५७
  • भारतीय असंतोषाचे जनक >> लोकमान्य टिळक (हे पण काँग्रेसचेच बर्का Wink )
  • स्वातंत्र्यवीर >> ही उपाधी सावरकरांच्या नावाआधी लावली जाते
  • राष्ट्रपिता >> ही उपाधी मो.क.गांधी यांना उद्देशून वापरली जाते.

आधी आपली तथ्ये तपासून पहावीत.

>>>> उजव्या कोप-यात गांधीजी वापरायचे ती प्रसिद्ध लाठी उभी करून ठेवली आहे. <<<< Uhoh
बाबान्नो, बाकि काहीही करा, पण गांधीजिन्च्या काठीला हिन्सक "लाठी" असे नाव देऊ नका!
गान्धीजी वापरायचे ती काठी होती
सन्घवाले वापरतात ती लाठी अस्ते!
किमान इतका तरी फरक अपेक्षावा ना?