मायबोलीवरच्या लॉगीन सुविधेत (आणि इतरत्रही) महत्वाचा बदल

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

आजपासून मायबोलीवर एक मोठा बदल केला आहे.
तांत्रिक भाषेत मायबोली पुरेशी सुरक्षीत नव्हती. आपण http://www.maayboli.com किंवा http://maayboli.com असे मायबोलीवर जात असू. आजपासून हे बदलून https://www.maayboli.com किंवा https://maayboli.com असे जावे लागेल.

जे वाचक/सभासद पूर्वीप्रमाणेच http:// वापरून मायबोलीवर यायचा प्रयत्न करतील त्याना आपोआप https:// द्वारे यावे लागेल असे केले आहे. त्यामुळे जुने बुकमार्क बदलायची आवश्यकता नाही.

हे फक्त लॉगीन साठीच नाही तर सगळ्याच वाचकांसाठी (अगदी वाचनमात्र असलेल्या वाचकांसाठीही) लागू आहे. त्यामुळे ब्राउझर च्या पत्ता देण्याच्या खिडकीत (URL address bar) मायबोलीच्या बहुतेक सगळ्याच पानांवर वर बंद कुलुप दिसायला लागले आहे.

काही सभासदांना क्रोम ब्राऊझर मधून "ही साईट सुरक्षीत नाही" असा संदेश येत होता. तो आता येणार नाही.

हा बदल वर वर सोपा वाटला तरी पुष्कळ कष्टाचा होता आणि बरेच आठवडे त्यावर काम सुरु होते. सभासदांना शक्यतो काहीच बदल जाणवू नये असा आमचा उद्देश होता. चाचणी समीतीच्या खालील सभासदांनी वेगवेगळ्या ब्राऊझर, ओस, डिव्ह्यायसेस वरती अनेक चाचण्या घेऊन बदल पडताळून पाहीले आणि त्यांचा अभिप्राय कळवला.
धनि, योकु, मेधा, अमितव, मानव पृथ्वीकर, विजय दिनकर पाटील, admin, अतरंगी, ललिता-प्रीति , गजानन, atuldpatil, फारएण्ड, व्यत्यय

मायबोली या सगळ्यांची ऋणी आहे.

तरीही काही अडचणी राहून गेल्या असणे शक्य आहे. तुम्हाला काही अडचण येत असेल तर इथे लिहा पण कृपया डेक्स्टॉप कि मोबाईल, ब्राऊझर, वर्जन, ओस, वर्जन आणि तुम्हाला नक्की काय अडचण आहे, कुठला संदेश दिसतो आहे हे लिहायला विसरू नका.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

धन्यवाद. मला गेले तीन चार दिवस एक प्रॉब्लेम येत होता. मी मायबोली साईट ओपन केली की मी वाचनमात्र असल्याचे दिसायचे. मी कधी logout करत नाही तरीही असे दिसायचे. मग मी लॉगिन करून एखादि प्रतिक्रिया दिली की ती प्रतिक्रिया मला दिसायची नाही, मीही वाचन मात्र आहे असे दिसायचे. मग तो ब्राउझर बंद करून मी नंतर परत जर परतले तर या वेळेस मी लॉगिन दिसायचे व प्रतिक्रिया प्रकाशित असा संदेशही काही क्षण झळकलेला दिसायचा. आज मात्र असे झाले नाहीय. बहुतेक आपोआप प्रॉब्लेम solve झाला.

साधना हा प्रॉब्लेम आणखीही काही जणांना येत होता. चाचणीसाठी सुरक्षीत मायबोली काही जणांसाठी पण इतरांसाठी जुनीच असे एकाच वेळी ठेवावे लागल्याने असे होत होते. सॉरी. पण चाचणीशिवाय सगळ्यांसाठी एकदम सुरक्षीत केली असती आणि मोठी अडचण राहून गेली असती तर जास्त प्रश्न आले असते.

व्वा मायबोली अद्ययावत राहाण्यासाठी संचालक मंडळ वेळोवेळी कष्ट घेत आहे याचे कौतुक आहे.
माझ्या विंडोज फोनवर IE11, UC browser,opera mini वापरतो आणि सर्व ठिकाणी बुकमार्क्स/स्पीडडाइलस व्यवस्थित चालत आहेत कारण हुशार ब्राउजरांनी खिशातली 'S' चावीने साइट उघडून दिली होती हे आता धागा वाचल्यावर कळले.
चार तासांचे प्रतिसादांस मिळणारे संपादन ( व्याकरण / शुद्धलेखनासाठीचे बहुतेक)आवडले

अभिनंदन...
तांत्रिक कारणाने मला या उपक्रमात ईथे पडीक असूनही मदत करता आली नव्हती.

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम

मोबाईल मध्ये ओपेरा ब्राउझर साठी सतत लोगिन मेसेज येतोय पण पासवर्ड टाकून सुद्धा नवीन लिखाण ओपन होत नाही
पुन्हा तीच विंडो रेफ्रेश होवून येतेय.
आज सकाळ पासून सुरु आहे हा प्रकार
मात्र दुसरा ब्राउझर वापरला तर काहीही त्रास जाणवत नाही
आणि PC वर काहीही अडचण आली नाही

अंबज्ञ,
ओपरा मिनि ( डेटा कम्प्रेस करणारा ब्राउजर) https sites ओपन करत नाही. अपग्रेड योर ब्राउजर/ for better experience go to full browser असे मेसिजिस येणे साहजिक आहे.
तरी माझा मायबोलीला अडथळा करत नाही.

अपग्रेड चा काही मेसेज नाही येत ओपेरा मध्ये
ऑलरेडी अपडेट वर्शन आहे
लॉगिन केले तरी साइट वरील नविन लिखाण वाले पान न येता परत परत तेच लॉगिन वाले पान येतेय

हां प्रॉब्लेम सॉल्व होइल ? की ओपेरा ऐवजी आता दुसरा वापरत जाऊ मोबाईल साठी ?

मेसिज येतोच असे नाही. फ्लिकर सारख्या वेबसाइट्स अर्धवट चालतात. ( html5test dot com ही साइट ओपन केल्यावर इतर ब्राउजरचा स्कोर ५५५पैकी ३५० अथवा अधिक येतो तसा ओपेरामध्ये येत नाही॥ १५०-१६० येतो. ही साइट तीस सेकंदात स्कोर देते. बय्राच गोष्टी काढलेल्या असतात. ) थोडक्यात दुसरा ब्राउजर वापरावा लागेल.

मी आत्ता ऑपेरा मिनी मधूनच मायबोली उघडलंय. व्यवस्थित दिसतंय. परत लॉगइन करावं लागलं नाहिये.

>>तांत्रिक भाषेत मायबोली पुरेशी सुरक्षीत नव्हती.<<

मायबोली तांत्रीकद्रुष्ट्या सुरक्षित झाली, हा एक वेल्कम चेंज आहे.

नॉर्मली डेटा सेंसिटिव वेब साइट्स हा प्रोटोकॉल वापरतात. मायबोलीने हे धोरण अवलंबलं याचा अर्थ यापुढे सभासदांना त्यांच्या प्रायवसीची चिंता करण्याचं कारण नाहि, असा समजावा का? यापुढे सभासद नोंदणी/चाचणी/प्रवेश जास्त स्ट्रिंजंट होणार (रिपिट ऑफेंडर्सना एस्पेश्यली) अशी अपेक्षा करावी का? Happy

धन्यवाद वेमा. अजून काय काय बदल केलेत? मला आता मी रोबो नाहीये हे 2 टेस्टस देऊन पटवुन द्यावे लागले तेव्हा कुठे मायबोलीय येता आले. हे गुगल स्पेसिफिक की माबो स्पेसिफिक कळले नाही. गुगल स्पेसिफिक असावे असे वाटतेय.

धनि, योकु, मेधा, अमितव, मानव पृथ्वीकर, विजय दिनकर पाटील, admin, अतरंगी, ललिता-प्रीति , गजानन, atuldpatil, फारएण्ड, व्यत्यय >> सर्वांचे आभार!!