ऑफलाईन लेखन 'बरहा'मध्ये कसे कराल?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'ऑनलाईन' असताना 'मायबोली'त लेखन कसे करायचे, ते आपण इथे- http://www.maayboli.com/node/9728 पाहिले. आता 'ऑफलाईन' लेखन कसे करायचे ते पाहू.
विविध मराठी फॉन्ट आपल्याला उपलब्ध आहेत, जसे की 'मंगल', 'गार्गी' इत्यादी, जे वापरून आपण वर्डपॅड किंवा नोटपॅडमध्ये मराठीत लिहू शकतो. 'बरहा' हे सॉफ्टवेअर वापरूनही मराठीत उत्तम प्रकारे लिहिता येतं.

'बरहा'त कसे लिहायचे हे पायरीपायरीने पाहूया-
१) बरहा लिहिण्यासाठी 'बरहा' सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागते. www.baraha.com वर टीचकी मारा. तिथून बरहा संगणाकावर डाऊनलोड करा..

3.JPG

हे एकदा डाऊनलोड केलेत, की इतर कोणताही मराठी फॉन्ट नसला, तरी मराठीमधून लिहू शकाल.

२) या स्क्रीनशॉटमध्ये क्रमांक २ वर Download Baraha Unicode, BarahaPad, BarahaIME असे दिसत आहे. हेही अतिशय उपयुक्त आहे, आणि तेही संगणकावर उतरवून घ्या.

३) आता डेस्कटॉपवर 'New Baraha Document', 'Baraha IME' असे icons दिसायला लागतील. यातले 'Baraha IME' सुरू केलेत, की मराठी लिहायला सुरू होईल.. मग अचानक, ऑफिसच्या इन्ग्रजी वर्ड डोक्यूमेन्टमध्ये जन्क दिसायला लागेल Happy ही बरहा आयएमईची कमाल. हे सुरू केलेत, की तुमचा डीफॉल्ट फॉन्ट मराठी होतो, त्यामुळे सगळीकडे वेगळेच काहीतरी दिसू लागते Happy हे disable करण्यासाठी f11 ही कळफलकावरची कळ दाबा, म्हणजे इन्ग्रजी हे इन्ग्रजीतच लिहाल. मराठीत लिहायचे असल्यास, परत f11 दाबा.. f11 हे इन्ग्रजी-मराठी टॉगल स्विच असल्यासारखे आहे 'बरहा'तले.

४) 'नवीन बरहा डॉक्यूमेन्ट' उघडलेत की ऑफलाईन मराठीत लिहायला सुरूवात करता येईल. यासाठी बरहा आयएमई मात्र बन्द ठेवा. फक्त हे नवीन डॉक उघडा. उघडलेत की असे दिसेल-

4.JPG

नवीन बरहा डॉक हे दोन भागात विभागलेले असते. यातला खालचा भाग आहे, ज्यात आपण इन्ग्रजीत लिहायचे असते. जिथे लाल गोल केला आहे, ते बटण दाबले, की वरच्या भागात त्याच इन्ग्रजी मजकूराचे मराठीकरण होईल.
त्याच बारमध्ये सर्वात शेवटी '?' हे चिन्ह दाबलेत, कि 'हेल्प', अर्थात मदत मिळेल. त्यात 'Transliteration Rules' आहेत. त्यात मराठी शब्द लिहिण्यासाठी कोणते इन्ग्रजी अक्षर वापरायचे हे दिलेले आहे..

'मायबोली'मध्ये आपण लिहितो, तसेच ९९% लिहायचे आहे, पण काही अक्षरे जबरदस्त बुचकळ्यात पाडतात, म्हणून इथे मला अवघड वाटलेली आणि त्या नियमांमध्येही न सापडलेली काही अक्षरे देते..

अ) रफार द्यायचा असेल, तर कळफलकावरचे '^' चिन्ह द्या.. उदा. 'वार्‍यावरची वरात' लिहायचे असेल, तर बरहात ते vaar^yaavarachee असे लिहा.. दिसताना ते 'र'चा पाय मोडल्यासारखे दिसते, पण पब्लिश केल्यानंतर बरोबर दिसते. मात्र, ते लिखाण मायबोलीत पेस्ट केलेत, तर 'र'चा पाय मोडलेलाच रहातो Happy मायबोलीच्या नियमाप्रमाणे vaaRyaavarachee असे केलेत, की तेही ठीक होते.

ब) सर्वात छळतो तो 'ज्ञ'! हे अक्षर बरहात शोधायला फार कष्ट घ्यायला लागतात बरं Happy 'ज्ञानेश्वर' लिहायचे असेल तर चक्क 'j~jaaneshwar' असे लिहा. थोडक्यात, ज्ञ=j~j

क) अनुस्वार Mने द्यायचा, .n बरहात चालत नाही.

ड) k~ap k~ep = कॅप
k~op= कॉप
k~Mp= कँप
kA~Mp= काँप
बाकी, काना, मात्रा, वेलांटीचे नियम 'मायबोली'प्रमाणेच.

५) हे लेखन सेव्ह करा. वरच्या भागात जे मराठी झालेलं लेखन आहे, ते तसंच्या तसं मराठी (युनिकोड) सपोर्ट करणार्‍या कोणत्याही संकेतस्थळावर पेस्ट करू शकता- जसं ब्लॉगवर, मायबोलीवर वगैरे.

आधी म्हटलं तसं, सतत ऑनलाईन राहता येणं शक्य नसेल, तर बरहात लिहून सेव्ह करून, एकदमच लिखाण पूर्ण करून ते प्रकाशित करू शकता.

लिहिते व्हा,
शुभेच्छा.

विषय: 
प्रकार: 

वैनी, संपूर्णम् हा शब्द कसा लिहायचा बरहामध्ये? आय मीन...म चा पाय कसा मोडायचा? ठळक केलेला शब्द मी नेटवरून कॉपी-पेश्ट करून इथे टाकलाय.
धन्यवाद!

>>>>>> 'ऽ' म्हणायचंय मला.
नाही येत कस बरहा मधे? येतच येत
शिफ्ट व & दाबा (शिफ्ट व ७) म्हणजे येईल ऽ

>>>> आणि वार्‍यावरचा हा शब्द वाऱ्यावरचा असाच लिहिता येतो.
येत, हे देखिल बरहामधे येत लिहीता
barxyaa = बर्‍या
आर नन्तर एक्स टाकायचा! Happy
तर ज्ञ करता j~j असे टायपायचे तिथे! Happy

>>>> आय मीन...म चा पाय कसा मोडायचा?

< lang=san > k
< lang=hin >k (कोनिकल कन्सामधील जागा उडवावी)
येथे पहिला पाय मोडलेला दिसेल, तसेच जोवर < lang-hin > सुरु करत नाही तोवर पाय मोडलेलेच दिसतील.
बर्‍याच वेळा पाय मोडायचे अस्तील Proud तर बरहामधे मराठि ऐवजी सन्स्कृत निवडावी, तिथे जर क करता ka असे टाईप केले नाही व नुस्ताच k टाईप केला तर पाय मोडला जातो.
बरहा हेल्प मधे माहिती मिळते ती बघा! Happy

आता, इथे मायबोलीवर कुणाचा पाय कसा मोडायचा ते मला माहित नाही Wink
क् अरे व्वा! आला की मोडता Lol

<<इथे मायबोलीवर कुणाचा पाय कसा मोडायचा ते मला माहित नाही >>
केव्हढा हा विनय! पायच काय, हात, मान, सुद्धा मोडाल तुम्ही.

बाकी PSG, धन्यवाद. मायबोलीखेरीज इतरत्रहि मराठी लेखन करण्याचा विचार आहे, विशेषतः इ-मेल मधे.

अरे वा.. तो s काढता येतो का बराहात? बरे झाले कळले!

बराहात अ‍ॅ काढता येत नाही, पण मला अँ जमलाय तिथे .. ~(शिफ्ट आणि १च्या डावीकडचे अक्षर) + ं (अनुस्वार -> शिफ्ट एम) असे लिहीले की मग त्या शब्दांच्याआधी जाऊन 'अ' जोडला की अँ दिसते..त्याच पद्धतीने लिहीले तरी ऍ दिसतेय.. मायबोलिसारखे दिसत नाही... अजुन कुठे तरी हीच चर्चा झाली होती, त्यात वाचले होते की युनिकोडच्या एका स्पेसिफीक क्रमांकावर तो अ‍ॅ आहे , पण इथून, किबोर्डवरून लिहायचा कसा माहीत नाही.. सद्ध्यातरी मी ऍ वरच चालवून घेतीय.. Happy

पाय कसा मोडावा त्याची माहिती सापडली..
एखादे अक्षर टायपल्यावर लगेच शिफ़्ट की दाबून दोन वेळा ६ नं ची की दाबावी..
‍Shift^^

भोटम्‌ = bhoTamShift^^

अहो लिंबू, मी बराहा वापरायला लागल्यापासून तुम्ही दिल्याप्रमाणेच टाईपते आहे barxyaa असे. पण तरीही ते ’बऱ्या’ असेच दिसते ...'बर्‍या' असे नाही दिसत ! हा दुसरा बर्‍या मायबोलीवरचा फॊंट वापरुन काढला आहे Sad काय गडबड आहे कळत नाही. आणि दुसरे गुगल क्रोम डाऊनलोड केल्यापासून मराठी टाईप करायची जाम गडबड होत आहे. टाईप करताना चुकलं आणि बॆक स्पेस करुन टायपायला गेलं की सगळे शब्द विचित्र एकात एक होतात.

अरे वा! पाय कसा मोडायचा (बरहात) हे शोधून काढल्याबद्दल लिंब्या आणि अभिजाचे धन्यवाद! मला स्वतःला हे ठाऊक नव्हते. आता मोडेन दोन्ही पद्धती वापरून Proud

'अ‍ॅ' लिहिता येतो की बस्के Happy
~ + a ने
आधी ~ मग अ लिही

बरहा ९.० सन्गणकावर उतरवला व बरहा दायरेक्ट सुरू केल. परन्तु वर्ड मधे मराठी काही लिहिता येत नाही. कोणितरी माहिती दिलीत तर बर होईल. शिवाय, बरहा ने एकाच font मधे लिहिता येते कि वेगवेगळे font ही वापरता येतात?

विजे- Arial Unicode Font सिलेक्ट करा वर्डमध्ये, म्हणजे बरहा डायरेक्ट ऑन करून थेट देवनागरी लिहिता येईल.

बरहा ने एकाच font मधे लिहिता येते कि वेगवेगळे font ही वापरता येतात?>>> बरहा हाच एक फॉन्ट आहे Happy प्रश्न समजला नाही.

विजे, बरहा मधे डिफॉल्ट एकच फाँट आहे. पण बर्‍याच भाषा आहेत त्यामधे लिहीता येतील.
वेगवेगळे फाँट तुम्ही नेटवरुन डाउनलोड करुन त्यात वापरु शकता. पणे ते इथे मायबोलीवर दिसणार नाहीत...दुसरीकडे वापरु शकाल. Happy

बरहाडायरेक्टमधे अ‍ॅ काढण्यासाठी
जर भाषा "मराठी - अ‍ॅन्सि" असेल तरच वर्डमधे ~e असे टायपुन अ‍ॅ मिळवता येतो

बाकी कुठल्याही प्रकारे, खास करुन संस्कृत मधे अ‍ॅ मिळवता येत नाही.

पौर्णिमाजी,
मी तुमच्या गायडन्सप्रमाणे बरहा डाउनलोड केला. ते अक्टिवेट पण झालं
पण हा बरहा १० मिनटं चालु १० मिनटं बंद अशा पद्धतीने चालतो का?
रजिस्टर करा म्हणतो, १३-२० डालर मागतोय. यावर काही उपाय आहे का ?
किंवा दुसरा कुठला फोंट असल्यास प्लीज सांगा.

अरे कुणीतरी मदत करा रे दोस्तानो.
मला ओफलाईन लिखानासाठी फोन्ट हवा आहे.
प्लीज मदत करा.

आगाऊ धन्यवाद.

@बकासूर
खरं तर बराहमधे हा प्रॉब्लेम येत नाही. ते फ्री व्हर्जन आहे. रीइन्स्टॉल करून पाहा.
बराहला मराठी युनिकोडचा उत्तम पर्याय आहे. युनिकोड डाऊनलोड कुठून करता येईल याची सध्या कल्पना नाही. सापडल्यावर लगेच टाकतो इथे.

सागर,
मी नेटवर या अडचणीविषयी बरिच शोधाषोध केल्यावर कळलं, आता बरहानी १०.२ वर्जन काढलय.
हा वर्जन असा १० मिनिट ऑन १० मिनिट ऑफ असतो. पैसे मोजल्यास तो पुर्ण्वेळ ऑन करुन मिळतो म्हणे.

मग यावर उपाय असा आहे, बरहा ८.० वर्जन मिळवायचा. तो संपुर्णता फ्रि आहे.

नेटवर या ८.० वर्जनची शोधाशोढ केली. पण तो १०.२ ला रिडायरेक्ट होतो.

कुणी सांगाला का हा बरहा ८.० वर्जन कुठुन उतरविता येईल.

ओह्ह! ही माहिती नवीन आहे. म्हणजे बरहा आता 'फ्री' राहिले नाही तर! Sad
Download BarahaSDK काय आहे? सध्या तिथून बरहापॅड किंवा बरहा आयएमई उतरवता येत आहे असे वाटत आहे. जुनी व्हर्जन्स मात्र काढलेली दिसतात. सगळीकडे बरहा १०.२चाच प्रचार आहे.

हो ना,
ज्यानी कुणी बरहा ८.० कंपुटरवर उतरवुन ठेवल्याय त्यानी कुठेतरी उपलोड कराल का? जिथुन आम्हाला तो उतरवुन घेता येईल.

आजुन काही उपाय आहे का यावर ?

छान माहिती Happy

मी मात्र ऑफलाईन लेखन करण्यासाठी मायबोलीचेच "नविन लेखन करा" हे पान (गुलमोहर/साहित्य लेखन) (.htm) सेव्ह करून ठेवले आहे.
http://www.maayboli.com/node/add/story-gulmohar
त्यातच टाईप करून नंतर .txt मध्ये कॉपी/पेस्ट करून ठेवतो. फक्त .txt "Save" करताना "Encoding" मध्ये "Unicode" करतो आणि जेंव्हा लिखाण संपूर्ण झाल्यावर .txt मध्ये कॉपी करून मायबोलीवर (ऑनलाईन असताना) प्रदर्शित करतो. Happy

जर तुम्हास हेच लिखाण MSWord (.doc/.rtf) मध्ये सेव्ह करायचे असेल तर फक्त Font "Arial Unicode MS" हा ठेवा (बाय डिफॉल्ट फॉन्ट आहे). Happy

मला जर मायबोलीचे एखादे लिखाण सेव्ह करून ठेवायचे असेल तर मी वरील पध्दतीनेच वर्ड मध्ये सेव्ह करतो किंवा त्याची पीडीएफ फाईल करून ठेवतो. Happy

मायबोलीवरच अप्रकाशित लेखनही करता येतं. >>>हो, पण जर मी १ तारखेला लिखाण सुरु केले आणि १५ तारखेला प्रदर्शित केले असता ते १ तारखेच्या लिखाणातच जाते (१५ तारखेला नविन लिखाणात दिसत नाही). Sad

हो, ती त्रुटी मात्र आहे.
त्यात एक आयडिया लढवायची- १५ला नवा धागा उघडून जुने त्यात पेस्ट करायचे. मग ते त्या दिवशीच्या नवीन लेखनात दिसतं Happy

Pages