गाव गाता गजाली - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 18 July, 2017 - 03:21

तर, चूक भूल द्यावी घ्यावी ही चांगली चालू असलेली मालिका बंद होते आहे (बहुतेक). त्याजागी 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका चालू होतेय.
२ ऑगस्ट २०१७ पासून दर बुधवार - शनिवार रात्री ०९३० वाजता.
नेहेमीप्रमाणे साधक-बाधक चर्चेकरता हा धागा Happy

त्याबद्दलची लिंक - http://www.loksatta.com/manoranjan-news/writer-actor-prahlad-kudatkar-ne...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मालवणी आहे, मिठबांव ला चित्रीकरण झाले आहे. पण त्या गजाली शब्दातील 'ज' चा उच्चार चुकलाय.

माझ्या भावजयीच्या सख्ख्या भावाने ( ओंकार दिक्षीत) ने याचे लेखन पांडूबरोबर केलेय. त्याने १-२ भागात अ‍ॅक्टींगपण केली आहे.

अंजू, ते दीक्षित आपल्या पडेल चे आहेत ग . या आधी त्यानी कॉमेडी ची बुलेट ट्रेन, चला हवा येऊ द्या साठी ही लेखन केले आहे .

पडेल हे गावाचे नाव आहे आणि त्याजवळ वाडा नावाचे पण गाव आहे (वाडा - पडेल असे जोडीने म्हणतात) देवगड तालुक्यात

प्रल्हाद कुडतरकरनेच केलेय लेखन...
चुकीचे मालवणी बोलली नाहीत तर ठिक... नाहितर. राखेचा होइल.

मालवणी एकावं तर जुनी मालवणी नाटकं पहावी.. मस्त बोलतात

हाली मालवणी शिरेली, नायतर मालवणी पात्र शिरेलीत घुसडुचो ट्रेंड इलोहा. पण मेले अशी दळभद्री मालवणी बोललंत... मालवणीत्सुन गाळीये घालुचा मनात येता. राखेचा मधली पात्रां, कादिपमधली आज्जी.... किमान मालवणी येणारी तरी लोकां निवडा मेल्यानु Angry

सुजा, देवगड तालुक्यात वाडा गाव फेमस आहे, तिथे हायस्कूल आहे आणि आजुबाजुची सर्व सातवीनंतर शिकायला येतात तिथे, त्याच्या आजुबाजुला असलेल्या गावांपैकी पडेल गांव, तिथे कँटीन आणि एस. टी. थांबा आहे आणि पुर्वी जेव्हा वाडातर पूल नव्हता तेव्हा देवगड लांब होतं सर्व गावाना आसपासच्या, त्यामुळे पडेलचं महत्व होतं. वाडा -पडेल असं म्हणतात, हे वाट्टेल ते यांनी बरोबर लिहीलंय. आमच्या गावाला वाडा-फणसे म्हणतात.

मी आज दोन्ही भाग बघितले या सिरियलचे. मला तर आवडली. मॅड झाले मी. Happy मस्त वाटतेय सिरियल.
राखेचा पेक्षा चांगलं मालवणी ऐकायला मिळालं.

मस्त, भारी होते दोन्ही भाग, खूप आवडले, धमाल एकदम. पुर्ण टीमचं मुळ गाव कोकणात आहे, हे नावानंतर कंसात दाखवलं आहे. मालगुडी डेजची आठवण आली. पहीले दोन तरी त्याच तोडीचे वाटले मला.

माकाय आवाडली बाय शिरिअल.. सगळीजणा अगदी ल्हान पोराय बरी मालवणी बोलतात... आजून तरी.. उलट पांडूच कधी तरी बोलताना गडबड करता. बहुतेक सगळे स्थानिक कलाकार दिसतत म्हणून बरे बोलतत..
आणि कोकणात गेल्या सारख्याय वाटता. काल ती पानन आणि चिर्याचो गडगो बगून अगदी नॉस्टेलेजिक की काय म्हणतत तसा झाला.
या धाग्यार मालावणीत्सून्च चर्चा जावक होयी असो काय नियम नाय आसा मा? Lol
>>किमान मालवणी येणारी तरी लोकां निवडा मेल्यानु >> व्हय तर आम्ही काय मेलव काय Proud

देवगड तालुक्यात अशीच बोली बोलतात बहुतेक, मिठबाव दाखवलं आहेना. मिन्स मला वाटतं. अगदी प्रॉपर मालवण जवळच्या मालवणीत आणि ह्यात थोडा फरक आहे. मला येत नाही पण माझ्या सासरचे बाहेर कोणाशी बोलताना अशीच बोलतात असं वाटतं. घरात आणि नातेवाईकात आमच्या प्रमाण मराठीच बोलतात.

अर्थात माझ्यापेक्षा जास्त चांगलं गावचे दीर सांगू शकतील. विचारेन त्यांना की नीट आहे का ही बोली आपल्या तालुक्यातली.

म्या पन बघलयं एक-दोन भाग .
मस्त वाटले. राखेच्या पेक्शा तर चांगलाच बोलततं .
ती बहिरी आजी फार आवडली .
जूनी घरा , पडवी आणि चिर्याचो गडगो , एक्दम भारी .
तो बबन , पांडू सारखो वाटता Happy

माका पन आवडले दोन्ही भाग .
आणि आवडणारच ना अंजू, आपल्या भागातली आहे ना !

सांगू की नको विचार करत होते पण आता सांगतेच , माझ्या पुतण्याची मुलगी ह्यात आर्ट dir मध्ये काम करतेय . आणि on the screen थोडासा रोल ही आहे तिला . प्रोमो मध्ये जिच्या डोक्यावर तो पांडू का कोण हात ठेवतो ती .
त्यामुळे आम्ही तर एक शॉट ही चुकवलेला नाही ह्या सिरियलचा .

गजाली म्हणजे गप्पा .. त्यातून करून घेतलेली फुकटची करमणूक .
माझ्या मते ज चा उच्चार जहाज मधल्या ज सारखा बसून जाम मधल्या ज सारखा आहे . पण टायटल ट्रॅक मध्ये जहाजातल्या ज सारखा केलाय अस वाटतंय.

मी नेहमीच जहाजातला 'ज' च ऐकलाय 'गजाल' बोलताना. जाम मधला 'ज' बोललं तर उच्चारायलाच जाम कठीण जातो 'गजाली' शब्द. गुज्जू लोक 'गजाली' बोलतायत असं वाटतं. Happy

मी पण आता हयसर मालवणीतनाच बोलूक लागतंय. मज्जा येता.पण आमचा मालवणी राखेचा सारखा आसा. समजून घेवा सगळ्यांनी. Happy ही सिरियल बघून सुधारात आमची मालवणी.

Pages