झाली...पहाट झाली!

Submitted by सत्यजित... on 8 July, 2017 - 20:19

रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली
उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली!

फांदीवरुन कानी येतात सूर काही
मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली!

गेला चुकून ताफा येथून राजशाही
इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!

आता नव्या युगाची कविता नवी लिहूया
भरपूर आजवर नुसती काटछाट झाली!

फिरतोय स्वप्नवेडा..किरणे धरुन हाती
निद्रिस्तश्या जगाची,झाली..पहाट झाली!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगवेन सूर्य >> यातल हा टेक्नीकली बरोबर नाही.
उगवेन आणि उगवेल ही दोन्ही शब्द एकाच अर्थाची असली तरी संदर्भ बदलला की न्/ल चा वापर बदत असतो.
प्रस्तूत ओळीत ऐवजी योग्य असेल. (फर्स्ट पर्सन व थर्ड पर्सन नरेशन आठवून बघा)

sundar

सुंदर...
त्या दिवशी कट्ट्यावर समजावल्याने, नंतर बेफिकीरजींचा लेख वाचल्याने आणि नंतर भट साहेबांची बाराखडी पाहिल्यामुळे पहिल्यांदाच गझल अंगावर न येता समजून घेता आली..धन्यवाद सत्यजितजी Happy