सरकारचे निवडणुकीतील घोषणापत्र

Submitted by सचिन पगारे on 15 July, 2017 - 02:44

देशात 3 वर्षांपुर्वि नवे सरकार आले. प्रत्येक नविन सरकारकडुन जनतेच्या ज्या अपेक्षा असतात त्याहुन जास्तच अपेक्षा ह्या सरकारकडुन जनतेला होत्या.कारण जाहिरातींचा आणी घोषणांचा प्रचंड मारा जनतेवर झाला होता. भाजपाने निवडणुकीपुर्वी जे घोषणापत्र जाहिर केले होते. ते बरेच कल्पक होते.. आता सर्व आठवत नाही आहेत कारण घोषणापत्राशिवायही सभेतुन अनेक घोषणांचा मारा करण्यात आला होता. आता सरकारने तिन वर्ष पुर्ण केलीत तर घोषणापत्रातील ज्या काही घोषणा आठवतात त्या येथे देतो. म्हणजे गत तिन वर्षात यातील किती घोषणा पु्र्ण झाल्यात अथवा सुरू आहेत यावरुन सरकारचे कार्य त्यातील गतिमानता लक्षात येईल.इतर सदस्यांनाही काही घोषणा आठवत असतील तर त्या येथे देण्यात याव्यात. जेणेकरुन त्यांची आज तिन वर्षाने काय अवस्था आहे हे ध्यानात येईल.

घोषणा:
१* देशामध्ये १०० नविन शहर वसवणार

२* देशातील जे सर्वात १०० मागास जिल्हे आहेत त्यांना विकसीत करणार.

३*राष्ट्रिय वायफाय नेटवर्क बनवणार

४*देशाच्या चारही दिशांना बुलेट ट्रेन धावणार

५*शेतिमालासाठी वेगळे रेल्वे नेटवर्क बनवणार.

६*देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी सप्लाय होणार.

७*बलत्कार पिडीत आणि अँसिड हल्ल्यात जखमी झालेल्या स्त्रियांसाठी विशेष निथी उभारणार.

८*काळाबाजार व साठवणुक रोखण्यासाठी स्वतंत्र न्यायालये उभारणार.

९*जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यता मिळणार.

१०*शेतकर्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या ५०% नफा देणारी व्यवस्था निर्माण करणार.

११*देशभरात ५० टुरीस्ट सर्किट बनवणार.

१२*न्यायालयांची संख्या दुप्पट करणार.

१३*महिला आयटिआय स्थापण करणार.

१४*महिलांद्वारा संचालित बँका निर्माण करणार

१५*प्रत्येक राज्यात एम्स सारख्या संस्था स्थापन करणार.

१६* नद्या साफ करण्यासाठी सिवेज ट्रिटमेंट प्लान्ट बसवणार.

१७* फुड काँर्पोरेशन आँफ ईंडियाला तिन विभागात स्थापन करणार.

ह्या काही घोषणापत्रातील घटना आठवतायत. या १७ घोषणा आहेत. याहुन काही जास्त कोणाला आठवत असतील तर त्या धाग्यामध्ये समाविष्ट करुया.आणि यातील काही घोषणा पुर्ण झाल्या असतिल तर त्या धाग्यातुन डिलीट करुया.

१८*गंगा स्वच्छता अभियान

१९* OROP
शेतमाल साठी वाढीव MSP

२०*100दिवसात विदेशातून काला पैसा परत आणू

२१*सर्वसहमतिने राममंदिर उभारणी

२२*भाव वाढु नये म्हणुन वेगळ्या कोषाची व्यवस्था करणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ह्या एवढ्या घोषणा भाजपाला, २०१४ साली कराव्या लागल्या, यावरुनच लक्षात येते की कॉंग्रेजने गेल्या ६५ वर्षात, जनतेच्या हिताची कामे करण्याऐवजी फक्त घोटाळे आणि भ्रष्टाचार करुन स्वत:च्या हिताची कामे केली.

प्रसाद ह्यातील एखादी घोषणा पुर्ण झालि असल्यास सांगा डिलीट करता येईल. सिम्बा तुम्ही दिलेला प्रतिसाद अँड करत आहे.

त्यासाठी वेगळा धागा काढा.

येथे मोदी सरकारने लिखीत दिलेल्या घोषणापत्रातील घोषणांची चर्चा आहे.
एखादी घोषणा तिन वर्षात पुर्ण झाली असे तुम्हास वाटत असल्यास डिलीट करतो.

सांगा पाहु एखादी डिलीट करण्याजोगी घोषणा.

अहो प्रसाद, त्यासाठीच लोकांनी मोदींना निवडून दिलं ना?
की कॉंग्रेसच्या घोषणा प्रत्यक्षात येत नाहीत म्हणून मोदींनीही तेच करावं.
निवडणूक प्रचारात परदेशातला काळा पैसा परत आणणार, तो दरडोई पंधरा लाख इतका असेल हे आठवतं.
बहुत हुआ नारी पर अत्याचार अबकी बार मोदी सरकार हे आणखी एक.

१९७१ साली दिलेली घोषणा, कॉंग्रेजला ४४ वर्षात पूर्ण करता आली नाही.
आणि तेच कॉंग्रेजी समर्थक वर धाग्यात दिलेल्या घोषणा, मोदीसरकारने तीन वर्षात पूर्ण कराव्यात ही अपेक्षा ठेवतायत.

मोदींनी स्वता सांगितल होत. काँग्रेसला ६०.वर्ष दिलीत मला ६० महिने द्या. तुम्ही चक्क मोदींवर अविश्वास दाखवताय.

सिम्बा घोषणा अँड करत आहे.

भरत तुम्ही जो प्रतिसाद दिलात ते जाहिर सभा आणि बँनरवर लावले होते. घोषणापत्रात नव्हते. त्यामुळे ते अँड करत नाही.

१९ संख्या झाली आहे. प्रसाद पुर्ण झालेली एखादी घोषणा डिलीट करता येउ शकेल त्याचे उदाहरण द्या.

सचिन,
दर डोई 15 लाख मिळणार हे सभेतील वक्तव्य होते,

पण 100दिवसात विदेशातून काला पैसा परत आणू हे जाहीरनाम्यात होते

http://www.bjp.org/images/pdf_2014/marathi_final%20highlights_april_22_0...

यातलं गाय आणि गोवंशाची रक्षा हे काम जोरात चालू आहे. पण तेही अर्धवट. एकीकडे सरकारी गोशाळांतील गाई तडफडून मरताहेत आणि दुसरीकडे गोरक्षणाच्या नावाखाली जमावांकडून काही लोकांना मारलं जातंय.

पगारे, वेल्कम बॅक. आणि अभिनंदन ह्या धाग्याबद्दल, असे ऑडीट व्हायला पाहिजे राजकिय पक्षांचे देखील.

नॅशनल हेरल्ड भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकषी करुन काँग्रेसच्या मेट्रियाक श्रीमती गांधी यांना (केस फास्ट ट्रॅक वर ठेउन) दोषी ठरवणार असा काहिसा वायदा होता; तुम्हाला त्याची कदाचीत जास्त ठळक महिती असेल. तर हे अस्लं काहि अजुन झालेलं नसल्याने हा वायदा २१* साठी क्वालिफाय होतो का?..

नाही. राज,मोदींनी सभेत चिक्कार वायदे केलेत त्यांना अर्थ नाही. पक्षाच्या जाहिरनाम्याचा फक्त विचार करण्यात आला आहे जो लिखित स्वरूपात आहे.

भरत, गाय आणि गोवंशाचा मुद्दा जाहिरनाम्यात होता.त्यावर किती जोशात काम चाललेय ते जग बघतय. किमान गायींना तरी अच्छे दिन आलेत.

भाजपाच्या जाहिरनाम्यावर राम म्ंदिर् आहे का ?

भाजपाच्या जाहिरनाम्यात अयोध्येचा उल्लेख् मारिचासारखा मायावी असतो. कधी असतो , कधी नसतो.

कायद्यानुसार promise can be verbal or documented , implied or expressed.

त्यामुळे आम्ही त्या १५ लाखांची वाट पहात आहोत .

( आणि ते १५ लाख आम्ही कागाळेना देणार नाही , आम्हालाच ठेवणार )

३७० कलम... ?

काही आष्वासने जरुर पुर्ण केले आहेत. १९१९ मध्ये गान्धीजीन्च्या १५० जयन्ती निमित्त्ताने "स्वच्छ भारत" कार्यक्रम सुरु करणार होते... तो खुप आधी सुरु केला.

हो स्वच्छतेबाबत खरे आहे.मागे उ .प्र चे मुख्यमंत्री योगी ह्यांना ज्या दलितांना भेटायचे होते त्यांना साबण दिले व स्नान करुन या अशीच काहीतरी बातमी वाचनात आली होती.

आधी १९७१ ला दिलेली "गरिबी हटाव" ही घोषणा पूर्ण झाली का, ते आधी सांगा?
<<
हो.

ही घोषणा पूर्ण झालेली आहे. मला एक "गरीब" भाजपेयी (पुढारी/कार्यकर्ता इ.) दाखवा. व त्या भाजपेयी व्यक्तीच्या खानदानाचे १९७१ सालचे इन्कम किती ते दाखवा. पुराव्यासकट.

उदा. हा प्रश्न विचारणार्‍या सदस्यांनी, १९७१ साली असलेले यांचे फॅमिली इन्कम व २०१४ साली असलेले यांचे फॅमिली इन्कम इथे लिहावे.

देशातील बहुसंख्य लोकांच्या घरातील १८ विश्वे दारिद्र्य खरेच कमी झालेले आहे. मोदी सरकार निवडून देणे, हा काँग्रेसच्या कष्टामुळे गरीबीतून वर आलेल्या काही कृतघ्न लोकांना भरल्यापोटी आलेला माज आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

इंग्रजांना या देशातून काँग्रेसने घालवले, तेव्हा बहुसंख्य जनतेची (जनसंघीयांची नव्हे. त्यांच्यातले बहुतेक इंग्रज सरकारच्या शासकीय सेवेत होते. म्हणूनच कधीही इंग्रजांना हटवायच्या संघर्षातही नव्हते, अन आजपर्यंत इंग्रजांची भलावण करीत काँग्रेसला काँग्रेज म्हणत असतात Wink ) जी परिस्थिती होती, त्यात प्र च ण्ड सुधारणा आहे, ही वस्तुस्थिती आहे.

तेव्हा पुन्हा एकदा, आपले कंप्यारिटिव्ह फॅमिली इन्कम, वा नॉन-फॅब्रिकेटेड विदा डिक्लेअर करून मग पुढे गरीबी हटवण्याबद्दल बोला, असे म्हणतो.

बाकी जर "आमच्या कष्टाने आम्ही शिकलो, आयायटी" वग्गैरे डिंग्या असतील, तर हेही सांगावे, की जर काँग्रेसने आयायट्या काढल्या नसत्या, तर आपण शिक्षण कसे घेणार होतात?
इंग्लंडात जाऊन? Lol

18* गंगा स्वच्छता अभियान - हा धागा बघितल्यावर सहज http://nmcg.nic.in/projectsearch.aspx इथे आत्ता मार्च २०१७ चे quarterly report पाहिले. बहुतेक सर्व प्रोजेक्ट २०१७-१८ ला पूर्ण होणे अपेक्षित आहे असं शेवटच्या कॉलममध्ये लिहिलं आहे. प्रत्येक प्रोजेक्ट लांबणीवर पडतो म्हणून २०१९ धरून चालू.

बाकीच्या मुद्द्यांवरही एक एक ऑफिशियल साईट धुंडाळावी लागेल. पण एका साईटमध्ये घुसलं की अख्खी साईटच बघत बसायला होतं. बराच वेळ जातो त्यात.

असो, नुकतीच बातमी वाचली होती गंगा किनाऱ्यापासून काही अंतरापर्यंत कचरा डंप करायला बंदी घातली गेली आहे म्हणून सहजच ह्या मुद्द्यावर थोडं शोधलं.

ok. thanks.

ok. thanks.

Pages