एखाद्यावर विश्वास टाकताना ....

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 July, 2017 - 02:04

एखाद्यावर विश्वास टाकताना .... तुम्ही काय बघता, कसा विचार करता?
किंवा याऊलट,
एखाद्याचा विश्वास तुम्ही कसा संपादन करता? एखादी गोष्ट त्याला कशी पटवून देता?

मागे एक मेसेज वाचण्यात आलेला,
एखाद्याचा तुमच्यावर विश्वास नसेल तर त्याला तुम्ही कितीही पटवून द्या, त्यांचा विश्वास बसतच नाही, तर ते पटवून देणे व्यर्थ आहे.
त्याऊलट ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, त्यांना काही पटवून द्यायची गरजच भासत नाही.
थोडक्यात स्वत:ला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका.

पण प्रॅक्टीकली हे अशक्य आहे. कारण एक वौश्विक सत्य हे देखील आहे की या जगात नेहमी खरे बोलणारा आणि कधीही खोटे न बोलणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. प्रत्येक जण आयुष्यात एकदा वा अनेकदा सोयीने खोटे बोलतोच. आणि हे सर्वांनाच माहीत असते. त्यामुळे ईथे प्रत्येक जण आपली विश्वासार्हता जपायला धडपडत असतो.

हे सारे सुचायचे तात्कालिक कारण, माझा फ्रिजचा धागा -
तिथे दोन गोष्टी या विश्वास अविश्वासाच्या कोर्टात हजर झाल्या.
1) एक माझी गर्लफ्रेंड जी गेले चार वर्षे माझ्या आयुष्यात आहे.
2) दुसरा माझा नवा फ्रिज जो मी चार दिवसांपूर्वी घेतला

चर्चेत मला प्रामुख्याने 3 गट आढळले.

1) याला गर्लफ्रेंडही नाही आणि याने फ्रिजही नाही घेतला - टोटल अविश्वास

2) याची गर्लफ्रेंडही आहे आणि याने नवीन फ्रिजही घेतला - टोटल विश्वास

3) याला गर्लफ्रेंड वगैरे काही नाहीये. पण याने फ्रिज मात्र जरूर घेतला - अर्ध विश्वास

यावर माझी काही निरीक्षणे,

1) ज्यांनी वरील दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवला. त्यांनी तो विश्वास तिथे नोंदवला आणि पुढे गेले.

2) ज्यांनी अविश्वास दाखवला. त्यांनी तो अविश्वास तिथे नोंदवला. पण पुढे न जाता वादप्रतिवाद करत तिथेच रेंगाळले.

3) ज्यांनी दोन्ही गोष्टींवर विश्वास दाखवला ते माझ्या सर्वच गोष्टींवर विश्वास टाकतात किंवा ज्यांनी अविश्वास दाखवला ते माझ्या सर्वच गोष्टींवर अविश्वास दाखवतात असे म्हणने कायच्या काय होईल. त्यामुळे हे या उदाहरणाला लागू नसले तरी माणूस प्रेमात वा द्वेषात आंधळा होतो असे म्हणतात. कारण तो समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास वा अविश्वास दाखवतो.
तर अश्या केसेसना आपण या धाग्यातून वगळूया.
जो विश्वास वा अविश्वास तर्काच्या कसोटीवर पारखून दाखवला जातो त्याबद्दलच ईथे चर्चा करूया.
उदाहरणार्थ, वरच्या केसमध्ये क्रमांक 3 चा गट ज्यांनी गर्लफ्रेंडवर विश्वास दाखवला मात्र फ्रिजवर नाही त्यांनी दोन्ही बाबी नक्कीच तर्काच्या कसोटीवर परखल्या असतील. याचा अर्थ दोन्ही गोष्टींवर विश्वास वा अविश्वास दाखवणारयांनी तसे केले नसावे असे म्हणायचे नाहीये.

तर धाग्याचा विषयच हा आहे की तुम्ही एखाद्याच्या एका गोष्टीवर विश्वास टाकताना तो कसा टाकता?
त्या व्यक्तीबद्दलचे आपले आधीचे मत, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, आपले ज्ञान वापरून तर्काची कसोटी, उलट तपासणी, वगैरे वगैरे..

तर याचाच उलट प्रश्न हा आहे की एखाद्याला विश्वास पटवून देताना तुम्ही तो कसा पटवून देता?
हा प्रश्न किंवा हे दोन्ही प्रश्न सोशलसाईटवर आपली उत्तरे आणि निकष बदलू शकतात. कारण ईथे प्रत्यक्ष व्यक्तीला आपण पाहिले नसते. पण तरीही येथील दिर्घ वावरानंतर काही मते बनवली असतात.
तेव्हा तुमची विचार प्रक्रिया नेमकी कशी काम करते?

तळटीप - धागा माझ्या फ्रिजच्या उदाहरणावरून सुचला तरी त्यावर ईथे पुन्हा तीच चर्चा नकोय, त्यासाठी तो धागा खुला आहे. ईथे आपण सर्वांनाच या विश्वास अविश्वासाच्या कसोटीवर उतरावे लागले असणारच. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने. तर त्यानुसार जनरल चर्चा अपेक्षित आहे. आपले स्वताचे अनुभव वाचायला आवडतील पण याची त्याची नावे घेऊन वाद टाळावेत ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैताग आला आहे ह्या निरर्थक धाग्यांचा. मला प्रत्यक्ष भेटलेले आणि ओळखणारे मायबोली सदस्य आहेत. तसं तुला कोणी भेटलं आहे का? नसेल तर तू कुठे राहतोस मुंबईत? आज संध्याकाळी भेटूया का? किंवा तू म्हणशील त्या वेळी आणि ठिकाणी दोघांच्या सोयीने भेटू. त्याहून बेस्ट म्हणजे तू या वेळी वविला जा!
ह्या तुझ्या सर्व खऱ्या खोट्या बातांचा एकदा निकाल लागून जाऊ दे. I'm very serious.

काय फरक पडतो.सोशल नेटवर्किंग वर कोण विश्वास ठेवतय का नाही. ठेवला विश्वास वाहवा!नाही ठेवला त्याहून वाहवा!आपण पण आपल्याला हवं ते घ्यावं आणि बाजूला व्हावं. इतरांचा विश्वास इतका महत्त्वाचा असेल तर मग आधी विश्वासपात्र व्हावे लागेल. ते कसं व्हायचं तो वेगळ्या धाग्याचा विषय!

एखाद्याचा तुमच्यावर विश्वास नसेल तर त्याला तुम्ही कितीही पटवून द्या, त्यांचा विश्वास बसतच नाही, तर ते पटवून देणे व्यर्थ आहे.
त्याऊलट ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, त्यांना काही पटवून द्यायची गरजच भासत नाही. >>> मीही हे वाचलेलं ..पण अस नाही ...तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलेलं दिसतेय..

आयुष्यात कधीही कोणाला स्पष्टिकरण देत बसू नका ,
कारण ज्यांना तुम्ही आवडता ,त्यांना स्पष्टिकरणाची गरज नसते!
आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ,
ते तुमच्या स्पष्टिकरणावर कधी विश्वास ठेवायला तयार होत नाही ..

अस आहे ते..ए. पी,जे अब्दुल कलामांच आहे बहुतेक..
कोणाच का असेना ..एकदम योग्य आहे..मलातरी पटलं..मी ते रोजच्या आयुष्यात आजमावतेही... Happy

राहिला तुमच्यावर विश्वास अस्ण्याचा/नसण्याचा, तुम्ही जे लिहिता ते किती खर आहे किंवा खोटं आहे याचा मी विचार करत बसत नाही...लेख आवडला तर तसा प्रतिसाद देते....मग ते काल्पनिक आहे कि खर आहे त्याच्याशी काही देणघेण नाही....वाचून मस्त वाटतं..तेवढच अपेक्षित आहे...

काही खरेदी करताना त्या गोष्टीच्या ब्रांडबद्दल अगोदर काहीच माहित नसेल तर मी विकणाय्राच्या बोलण्यावर विश्वास टाकत नाही॥ महागडी वस्तू नसेल तर विश्वास टाकतो.
अशा प्रकारांत फायदा /नुकसान होणार असते.
सोशलसाइटवर व्यवहार काहीच नसतो. विश्वास टाकतोच.

ऋन्मेष - तू अशा इथल्या मायबोलीवरच्या ओळखीवर कुणावर विश्वास टाकला आहेस का ? उत्तर हो किंवा नाही असे काहीही असले तरी त्यावेळी तुझे विश्वास / अविश्वास दाखवण्याचे निकष काय असतात हे वाचायला आवडेल.

सोशलसाइटवर व्यवहार काहीच नसतो. विश्वास टाकतोच.
Submitted by Srd on 7 July, 2017 - 12:54
>>>>>

हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. विश्वास टाकतानाचा रिस्क फॅक्टर.

(मला गर्लफ्रेण्ड आहे यावर अविश्वास दाखवणारयांना नक्की कसली भिती काय रिस्क वाटत असेल? - हा प्रश्न मला स्वत:ला आहे)

@ अंकु, अहो हा लेखनाचा धागा नाही प्रतिसदाचा आहे. लोकं काय विचार करतात ते जणून घ्यायचेय. पण आपली सूचना लक्षात ठेवेन.

@ जिज्ञासा, थोडा तुमच्यावर विश्वास बसला की लगेच .. ईथल्या काही जणांच्या संपर्कात आहेच.

@ हर्पेन, विचार करतो यावर...

अरे तुझ्यावर कणही विश्वास नसताना तुला भेटायला तयार आहे आणि तू! असो, हीच अपेक्षा होती तुझ्याकडून!

त्याला खरच गर्लफ्रेंड आहे का, तो खरंच तिथे रहातो का, त्याने खरेच फ्रिज घेतला का, तो म्हणतोय ते खरच आहे का?
आणि
तिला खरच बॉयफ्रेंड आहे का, ती खरच तिथे रहते का, तिने खरच फ्रिज घेतला का, ती म्हणतेय ते खरच आहे का?
वगैरे...
या वधु/वर पिता/मातांनी पडताळून पहायच्या गोष्टी आहेत.

बाकी लोक कशाला ताण घेतील / घेतात?

अशा गोष्टीत विश्वास ठेवण्या / न ठेवण्यासारखं काय आहे?
हे फक्त गॉसीपचे मुद्दे होऊ शकतात. कपालभातीच्या उच्छ्वासाच्या एका स्ट्रोक प्रमाणे ते डोक्यातून बाहेर काढून टाकता येईल, ईच्छा असल्यास.

कपालभातीच्या उच्छ्वासाच्या एका स्ट्रोक प्रमाणे ते डोक्यातून बाहेर काढून टाकता येईल, ईच्छा असल्यास. >>>
+१११ रिफ्रेश सगळं!!

अरे तुझ्यावर कणही विश्वास नसताना ...
>>>>>

एक्झॅक्टली! हेच कारण आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही. जेव्हा बसेल तेव्हा ऋन्मेष तुम्हाला भेटला म्हणूनच समजा. आता तुम्ही फक्त खरे खोटे काय आहे हे जाणून घ्यायच्या उत्सुकतेपोटी भेटत आहात, ऋन्मेषला भेटायची उत्सुकता तुम्हाला नाही. मग मी खरेच वेळात वेळ काढून तुम्हाला भेटावे का? स्वत:ला माझ्या जागी ठेवून विचार करा Happy

@ हर्पेन,
आपल्या प्रश्नाचे एक उत्तर असेही देता येईल. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर मी विश्वास ठेवतो Happy

अजून मुद्दे चर्चे दरम्यान लक्षात येत जातीलच..

मानवमामा,
विषय माझा नाहीये, तसेच तुम्ही म्हणता तसे काय खरे आणि काय खोटे याचा त्रास करून घ्यायचा की नाही याचाही नाहीये.

मग विषय काय आहे?
कोणाला समजले असल्यास सांगेल का?

मग विषय काय आहे?
कोणाला समजले असल्यास सांगेल का? >>> हा विषय आमच्यासाठी नाही,जे विरोध करत आहेत त्यांचासाठी आहे....जे अविश्वास दाखवत आहे त्यांनासाठी,आम्ही लेखाकडे फक्त लेख या द्रुष्टीनेच पहातो...त्यामूळे खर-खोट हा प्रश्नच येत नाही..... Happy

माझ मत सांगते,
मला तुमचे लेख आवदतात...फक्त त्यामधे काहीवेळेस मिर्च-मसाला जरा जास्त होतो..बट इट्स ओक्के.. Happy

लिहीत राह रे रुन्मेषभाऊ... हत्ती चालते राहे... नेगतीवे कंमेंट्स ला इग्नोर मारत जा..
काल्पनिक असो वा रिअल... तुमचं लेखन अवदाते अपल्याला

तुला भेटणं शक्य नाही हे खरे कारण आहे. कर नाही त्याला डर कशाला? मी खरी आहे आणि मी तुझ्याप्रमाणे खोटारडेपणा मी कधी केला नाही आणि करत नाही. तू मला भेटलास आणि जर तुझ्या सर्व गोष्टी सत्य असतील तर मी स्वतः मायबोलीवर धागा काढून तुझी माफी मागेन. उगाच फालतू शब्दांचे खेळ करू नकोस.

कंटाळा नाही येत का हो तुम्हाला? Wink
>>>>>

दारू सिगारेट काडी बिडी पान तंबाखू कसलेही व्यसन नाही, वेळ जात नाही आयुष्यात, मग ईथे येतो, ईथे आले की वेळ पुरत नाही आयुष्यातला, तर कंटाळा येणे फार दूरची गोष्ट आहे.

बाकी विषयावर कोणाला काही लिहायचे नसल्यास आवरूया धागा.
मला जे लिहायचेय ते मी सुचल्यावर लिहेन सावकाश
सोशल साईटवर कोणाकोणावर आजवर किती किती विश्वास टाकला आणि त्याचे काय काय अनुभव आले..

अहो त्याला त्याची आयडेंटिटी लपवायची आहे...
तेवढे स्वातंत्र्य आहे इथे सर्वाना... हे काय पासपोर्ट केंद्र आहे का खरी आयडेंटिटी द्याया...

@ जिज्ञासा, पुन्हा माझा पॉईंट तोच राहिला, जर एखाद्या व्यक्तीला केवळ खरे खोटे करण्यासाठीच मला भेटायचे आहे आणि बाकी मला भेटावे
अशी ना उत्सुकता आहे ना मला भेटून त्याला आनंद होणार आहे तर मी माझ्या आयुष्यातला वेळ खर्च करत त्या व्यक्तीला भेटावे का?

यावर तुम्ही किंवा मी सोडून ईथे ईतरांची मते वाचायलाही आवडतील Happy

धागा का आवरतोस? खरा असशील तर भेटशील ना! नाहीतर तू खोटारडा आहेस हे जाहीरपणे मान्य केलंस असं मी मानेन.

अहो त्याला त्याची आयडेंटिटी लपवायची आहे...
>>>>>
मी माझे अर्धे आयुष्य ईथे खोलून ठेवलेय आणि तुम्ही म्हणत आहात मला काहीतरी लपवायचे आहे Wink
फक्त फरक ईतकाच की मी जे सांगतो त्यावर कोणीतरी अविश्वास दाखवून माझ्याकडे पुरावे मागतात तेव्हा मी ते द्यायला नकार देतो ईतकेच.
तरीही आताच फ्रिजचा लेटस्ट फोटो टाकलाय, माठाच्या झाकणासह Happy

धागा का आवरतोस? खरा असशील तर भेटशील ना! नाहीतर तू खोटारडा आहेस हे जाहीरपणे मान्य केलंस असं मी मानेन.
>>>>
शीर्षकात लिहिलेय त्या विषयावर कोणी बोलत नसल्याने धागा आवरा बोललो,
आपल्या दोघांत चालू असलेल्या चर्चेवर ईतरांची मते मागवली आहेतच.

मी खोटारडा आहे हे मी या आधीच या धाग्यातही जाहीरपणे याच मायबोलीवर मान्य केले आहेच - http://www.maayboli.com/node/57688
आणि मला याचे जराही कौतुक नाही, ती माझी वाईट सवय आहे हे देखील मान्य आहे.

कपालभातीच्या उच्छ्वासाच्या एका स्ट्रोक प्रमाणे ते डोक्यातून बाहेर काढून टाकता येईल,>>>मला धाग्यापेक्षा हा प्रतिसाद खुप आवडला ग्रेट मानवजी

Pages